नमस्कार आपल्या सुविचार संग्रहात तुमचे स्वागत आहे. आपण रोज एक नवीन सुविचार संग्रह घेऊन येतो आपल्या सुविचार संग्रहात तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारी सुविचार मिळतील तसेच तुमचा आत्मविश्वास बळकट करणारी व तुम्हाला नवीन दिशा देणारी ऊर्जा या सुविचारां मधून मिळेल. आत्मविश्वास सुविचार मराठी
व्यवहारविषयक सुविचार
* प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्या कुट्यातून जातो, जो या काट्या कुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही.
*झोपताना दिवसाचा आढावा घ्या.
* जी व्यक्ती स्वतःची सुधारणा स्वतः करून घेते ती व्यक्ती लांबलचक भाषणे देणाऱ्या पुढाऱ्यापेक्षा जास्त सुधारणा समाजात घडवून आणते.
* विधायक दृष्टिकोन हा अधिक प्रभावी व त्वरित फलदायी असतो.
* प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद यांच्या युध्दात रक्तबंबाळ झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय.
संधी विषयक सुविचार
* थेट शहाण्या माणसाबरोबर चर्चा करण्यासाठी मिळालेली संधी ही महिनाभराच्या पुस्तकी अभ्यासाएवढी महत्त्वाची आहे.आत्मविश्वास सुविचार मराठी
* सतर्कतेने संधीची वाट पाहण्यापेक्षा साहसाने नि कौशल्याने संधी प्राप्त करा.
* संधी मिळाल्याशिवाय कर्तृत्व काय कामाचे ?
* गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
* काळ मोठा मित्र आहे. तो आजची दुःखे उद्या विसरावयास लावतो.
* काळ हा सर्वांचा न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे.
* अडचणी व अडथळे या सद्गुणांच्या खाणी आहेत.
अडचणीच्या आचीत कर्तृत्वाच्या लोखंडाचे पोलाद बनते.
• एक अडचण दहा उपदेशापेक्षा अधिक शिक्षण देऊ शकते.
संकट विषयक सुविचार
* मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे आहेत.
* जीवनाकडे पाहण्याचा स्वतःचा असा वेगळा दृष्टिकोन हवा मग संकटातही सुखाची अनुभूती घेता येते. आत्मविश्वास सुविचार मराठी
* संकटांना जो घाबरत नाही तोच खरा माणूस.
* संकटांना भिऊ नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
* चंद्राला ज्याप्रमाणे ढगातून जावे लागते त्याप्रमाणे माणसाला संकटातून जावे लागते.
* संकटसमयी तुम्ही हिम्मत ठेवाल तर अर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकाल.
* संकट कोसळले तरी सन्मार्ग सोडू नये.
*संकटात उडी घेतल्याशिवाय कल्याणकारक गोष्टीचा अनुभव येत नाही हे खरे; परंतु संकटात माणूस जिवंत राहील तरच कल्याणकारक गोष्टी दिसण्याचा संभव. म्हणून संकटात जपून उडी घ्यावी.
* दुर्दैव कधी एकटं येत नाही बरोबर संकटांचीमालिका घेऊन येतं.
*संकटे निर्माण होण्यापूर्वीच ती निवारण करण्याचा उपाय (शहाण्याने) योजावा.
*घराला आग लागल्यानंतर विहीर खणणे योग्य नव्हे.
*संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.
*संकटात शहाण्याची आणि युध्दात शूरांची परीक्षा होते.
*मनुष्य संकटांनी साहसी बनतो.
*संकटात वैरी जोर करतात. आत्मविश्वास सुविचार मराठी
स्वांतन्त्र्य विषयक सुविचार
* स्वैर वागणूक म्हणजे स्वातत्र्य नव्हे, तर आदर्श आचरण म्हणजे स्वातंत्र्य होय.
*ज्याला मनावर ताबा ठेवता येत नाही तो कधीच स्वतंत्र नसतो.
* स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आणि म्हणूनच सर्वाधिक लोकांना त्याची भीती वाटते.
स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने स्वातंत्र्याला धोका उद्भवतो, तसाच सत्तेच्या दुरुपयोगाने धोका निर्माण होतो.
* स्वातंत्र्य म्हणजे केवळ एखादा बहाल करण्याचा हक्क नव्हे, ती आपण स्वतः अंगी बाणविण्याची सवय आहे.
* ज्याचे शरीर, बुध्दी उद्योगात गढली आहे त्याला काळजी शिवत नाही. ‘तुम्ही ‘आजची’ काळजी घ्या म्हणजे ‘उद्या’ तुमची काळजी घेईल.
* काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही उलट आजच्या दिवसाची ताकद नाहीशी होते.
कर्म विषयक सुविचार
* मनुष्याने कधीही आपल्या कर्माचा त्याग करू नये.
* कर्म तसे फळ. कर्म हाच फलाचा मार्ग.
* या जगात सर्वच कर्माधीन असल्यामुळे न होणारे होत नाही आणि होणारे टळत नाही.
* हेतू, परिणाम आणि स्वरूपावरुन ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.
• कर्माच्या पोटी ज्ञानाचा जन्म होतो.आत्मविश्वास सुविचार मराठी
* कर्मयोगात कालनियमन, कर्मनियमन आणि कल्पना नियमन आवश्यक आहे.
* कर्म लहान की मोठे हा प्रश्नच नाही. ते करताना तुम्ही स्वतःला किती विसरता हा प्रश्न आहे. कर्माची किंमत स्वतःला विसरण्यावर आहे.
* कर्म आपले स्वरूप दाखविणारा आरसा आहे.
* कर्मफलाच्या दानाने सुख होते तर कर्मफलाचा संग्रह केल्याने दुःख होते.
* जसे तीर्थात स्नान केल्याने शरीर शुध्द होते तसे कर्मामुळे अंतःकरण स्वच्छ होते.
दैव विषयक सुविचार
* उद्योग, साहस, धैर्य, बुध्दी, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्या ठिकाणी असतात तेथे देव सहाय्य करतो. आत्मविश्वास सुविचार मराठी
* ज्याप्रमाणे एका चाकाने गाडी चालू शकत नाही. त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रयत्नाशिवाय दैव सिध्दीला जात नाही.
* आपण मनात योजावे एक आणि दैवयोगाने व्हावे दुसरेच.
* सुपिक जमिनीत बी पेरले नाही तर ते फुकट जाणारच, त्याप्रमाणे पराक्रमाशिवाय दैवही निष्फळ ठरणार.
* भोजनाच्या वेळी दैवयोगाने समोर आलेले भोजनसुध्दा हाताने (ते तोंडात घालण्याचा) उद्योग केल्याशिवाय थोडेसुध्दा तोंडात शिरत नाही.
* ‘दैव आहे’ या विचाराने आपला उद्योग सोडू नये.
* भाग्याची दारे सर्वत्र आहेत. गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात. आत्मविश्वास सुविचार मराठी
* भाग्य म्हणजे जिंकावयाची बक्षिसे, त्याचा रस्ता म्हणजे धैर्य आणि संधी.