चांगले सुविचार | चांगले सुविचार मराठी: 2024 

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

                 या सुविचार संग्रहात तुम्हाला असे चांगले  सुविचार मिळतील की तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि तुम्ही नवीन कामाची सुरवात करत असाल तर तुमचे काम कोणतीही अडथळे न येता पूर्ण पणे चांगल्या रीतीने पूर्ण होतील आणि असे सुविचार तुम्हाला कुठेही मिळणार नाही. शालेय जीवनात विद्यार्थी आणि शिक्षक सुविचारांचा उपयोग रोज केला पाहिजे. आजच तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना मराठी चांगले सुविचार पाठवा.आमच्या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे.🙏

“मराठी चांगले सुविचार’

  1. कोणत्याही योग्य मार्गाने जाणारा मनुष्य मार्ग असतो. 
  2. ज्याला संपत्ती मिळवण्याची घाई होऊन जाते, तो निर्दोष राहणे शक्य नसते. 
  3. मूत संतांची स्तुती आणि जिवंत संतांचा छळ ही जगाची रितच आहे. 
  4. ज्या वेळी प्रतिभा आणि विज्ञान यांची सांगड पडते, त्या वेळीच उत्कृष्ट फळे हाती पडतात. 
  5. स्वार्थीपणा हा सहज त्यागता येईल असा दुर्गुण नाही. स्वार्थीपणाचा दुर्गुण दुसर्‍यात असेल तर त्याला तुम्ही कधीच माफ करणारा नाही. परंतु स्वार्थ अजिबात नाही अशी व्यक्ति शोधूनही सापडणार नाही. चांगले सुविचार
  6. मौन पाळने हा स्त्रियांचा अलंकार आहे. परंतु हा अलंकार फार कमी वापरला जातो. 
  7. चरित्र, चालरीत,शैली या व अशा अनेक गोष्टीत उच्च नैपुण्य प्राप्त करायचे असेल तर साधेपणा अंगी बनवणे हाच एक मार्ग आहे. 
  8. स्वभावाचा साधेपणा हा सखोल विचारांचा नैसर्गिक परिणाम असतो. 
  9. ज्या ज्या वेळेस प्रयोग फसणार असे वाटते, त्या त्या वेळेस तो सफल होणार हे समजावे, अत्यंत विरोधाच्या पोटातूनच विकास बाहेर पडतो. 
  10. पाण्यामध्ये दगड टाकल्यास ज्याप्रमाणे एका मागून एक वर्तुळ निघतात,त्याप्रमाणे एका पापातून दुसरे पाप निर्माण होते. निर्दय मनुष्याच्या मानत क्रोधाचा अंगारा भडकला म्हणजे त्यातून खूनही होऊ शकतो. चांगले सुविचार
  11. आपण आपल्या मातृभाषेचा सदैव सन्मान केली पाहिजे. 
  12. तुम्ही सर्वकाळ सर्व जणांना फसवू शकत नाहीत. 
  13. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे होय. 
  14. शहाणपणाचे कृत्य तडजोडीवर व तडजोडीवर व देवघेवीवर अवलंबून असते. 
  15. महान कार्य सामर्थ्यापेक्षा चिकाटीने व नियमित परिश्रम असतात,त्यांना “आमचे नशीब वाईट आहे” अशी तक्रार केल्याचे ऐकवत नाही. चांगले चारित्र्य, चांगल्या सवयी आणि पोलादी उद्योग यावर दुर्दैव किंवा वाईट नशीब कधीच हल्ला करू शकत नाही; परंतु मूर्खना मात्र अशी शक्यता वाटते. 
  16. धीर धरल्यास पुष्कळ गोष्टी साधतात, पण अधीर झाल्यास त्या बिघडतात. 
  17. हात उगवण्यासाठी नसतात,उभारण्यासाठी असतात. 
  18. सात्तालालसेपायी माणूस स्वतःला अनेक शत्रू निर्माण करतो. 
  19. अपमान म्हणजे खोटे नाणे असते, ते खोटे नाणे आपल्याला लोक देतातच, पण आपण ते घेतलेच पाहिजेत असे नाही. 
  20. खरयाला मरण नाही आणि खोट्याला शांती नाही. चांगले सुविचार

Join a Whatsapp Group

“छोटे चांगले मराठी सुविचार,

  1. जगात ज्ञान वाढत आहे पण शहाणपण वाढत नाही.
  2. सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाने सौंदर्य आहे. 
  3. गरिबांचा अपमान करू व श्रीमंतांचा स्तुती करू नका. 
  4. धडा शिकवायचा नसतो,धडा घालून द्यायचा असतो.
  5. राजाच्या विरुद्ध प्रजाजणांचा रोष हा सर्व रोषांमय भयंकर आहे. 
  6. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक. शरीराला जेवढी आवश्यक आहे, तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. 
  7. मानत ठेऊन कुजत राहण्यापेक्षा चार शब्द स्पष्टपणे बोलून मन साफ ठेवा. 
  8. जसे सोने तप्त केल्याने सुद्धा होते,तसेच पश्चात्तापाने मन पवित्र होते. 
  9. कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही. 
  10. या जगात चिरकाल काही नसेल तरी चांगुलपणा चिरकाल टिकतो. 
  11. सत्शील चारित्र्य व कर्तबगारी या खऱ्या जिवंत सौंदर्याच्या खुणा आहेत. 
  12. प्रत्येक वाईट वागण्यापेक्षा त्यावर पांघरुन घालणे वाईट असते. 
  13. कीर्ती म्हणजे गाजलेल्या कर्तुत्वाचा सुगंध आहे. 
  14. आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थाचा पराभव करू शकतात. 
  15. चांगले पेरले तर चांगले उगवते, याचे भान कधीही सुटू नये. 
  16. प्रसंग पुष्कळांना वळण लावतात,पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच आढळतो. 
  17. अभ्यासामुळे आनंद वाढतो,भूषण प्राप्त होतो व कार्यक्षमता वाढतो. 
  18. सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात. 
  19. मनुष्य आनंद दुसर्‍याशी एकरूप होण्यात आहे. 
  20. ज्याला दूरचे दिसत नाही, त्याच्यापासून संकटही दूर नसतात. चांगले सुविचार

 “सुंदर मराठी चांगले सुविचार,

  1. अति परिचयाने अनादर होतो. गंगेच्या तिरी राहणारा मनुष्य गंगोधर सोडून शुद्धतेसाठी दुसर्‍या तीर्थाच्या उदकाकडे जातो. 
  2. मूर्खाचा गौरव त्याच्या स्वतःच्या घरी होतो. स्वामी स्वतःच्या गावी पूजेला जातो.राजाचे महत्व त्याच्या देशापुरतेच असते पण विद्धानाचा सर्वत्र गौरव होत असतो. 
  3. प्रसंग पुष्कळांना वळण लावतात, पण प्रसंगाला वळण लावणारा एखादाच आढळतो. 
  4. समाधानसारखे ओषध नाही. ते मिळत नाही म्हणुनच इतर ओऔषधे नाही. ते मिळत नाही म्हणुनच इतर औषधे घ्यावी लागतात. 
  5. सुसर पाण्यात असते तेव्हा शक्तिमान अशी हात्तीलाही ओढून नेते, पण तीच पाण्याबाहेर आली की कुत्रे देखील तिला त्रास देतात. 
  6. दुष्कृत्ये झाकले जाईल असा पडदा बनविणारा विणकर आजपर्यंत जन्माला आलेला नाही-चाणक्य.
  7. प्रत्येक समस्येमध्ये अंतिम सोक्षमोक्ष लावले गरजेचे असते अन्यथा ती समस्या पुन्हा निर्माण होते.
  8. ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत, अशा गोष्टी प्राथनेमुळे साध्य होतात. 
  9. लहान लहान वस्तू एकत्र आल्या तर फार मोठी कार्यशक्ती निर्माण होते. गवतातच दोर वळला तर त्याने मस्तवाल हात्तीलाही बांधता येते. 
  10. बुद्धि शुद्ध ठेवली तर पहिल्या प्रथम जे तुम्हाला विष वाटेल त्यातून तुम्हाला अमृत मिळेल. 
  11. एखादे ध्येय ठरवून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने अथक परिश्रम करणे यातच पुरुषार्थ आहे. 
  12. केवळ एकच सुपुत्र असला तरी तो आपल्या कुळाचा उधार करतो. जसा आकाशाला एक चंद्रच सर्व आसमंत उजळून टाकतो. 
  13. आदर्श चांगल्या गोष्टींसाठीच दाखवावं लागतो. वाईट गोष्टी आपोआप आत्मसात होतात. 
  14. माणसाने विरुद्ध बाजु धरून चालावे म्हणजे अपयश सहन करणाऱ्याची ताकद येते. 
  15. काळाला फसवायचे असेल तर त्याला अनुरूप चेहरा धारण करावा लागतो. 
  16. आशावादी बना आणि प्रत्येक गोष्टीतील चांगलेपणा पाहायला शिका. 
  17. जो शुद्ध मनाने सदाचारण व सुविचार करतो त्याला त्याच्या पाठीमागून येणाऱ्या सावली प्रमाणे सुखाचे शीतलता लाभते. 
  18. संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. 
  19. मौन म्हणजे परीक्षा आहे. ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होईल. 
  20. ज्यांना वस्तुस्थिती स्विकारता येत नाही, त्याच्या जीवनात नैराश्य अपरिहार्य असते. चांगले सुविचार

    “चांगले सुंदर मराठी सुविचार,

  1. सत्ता ही सत्याला शिक्षा ठोठावू शकते,परंतु सत्य हे सत्येपेक्षा श्रेष्ठ असते, हे विसरता कामा नये. 
  2. अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही,तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही.  चांगले सुविचार
  3. ज्याला दुसर्‍याच्या कीर्तीचा सुगां घेता येत नाही तो स्वतःच दुर्गंधीयुक्त असला पाहिजे. 
  4. जीवन म्हणजे आव्हाने, साहस आणि पात्रतेची खरी कसोटी होय. 
  5. सुड हा बूमरँगप्रमाणे आहे. ज्याच्यावर आपण हे सुडाचे बूमरँग फेकतो, ते त्याच्या अंगावर वेगाणे चाल करून जात आहे, असे सुरुवातीला वाटते; परंतु लवकरच ते बूमरँग वळण घेऊन परत येते आणि तुमच्या डोक्यावरच सर्वात मोठा फटका मारतो.
  6. इतरांना दुःखी करून आपण सुखी बनण्याची आकांक्षा करू नका. त्यामुळे तुम्ही स्वतःच दुःखी व्हाल.
  7. यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.तसेच विरोध व आरोपानां सामोरे जावे लागले. 
  8. ज्या गोष्टी आपण करू शकणार नाहीत, त्याविषयी बोलु नका आणि ज्या करू शकतो, त्या केल्यावर बोला.
  9. आयुष्यात पर्याय शोधताना जगणे कधी विसरू नका. 
  10. स्तुती करणारा मित्र व समर्थक हा कधीच घातक ठरतो. 
  11. डावपेच आणि कारस्थान करून काही वेळा यश मिळवता येईलच, पण ते टिकविता मात्र येणार नाही हे निश्चित.
  12. अहंकार उन्मत्त होण्यापेक्षा आपली वैचारिक पातळी वाढवा.
  13. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. 
  14. मागाल तर मिळेल, शोधाल तर सापडेल आणि ठोठावाला तर उघडले.
  15. व्यक्तीने मन प्रसन्न असेल व अंतःकरण शुद्ध असेल तरच चेहरा प्रसन्न दिसतो.
  16. मनुष्याचे जीवन कलंकित करणारी पापे व मानवी इतिहासातील कृष्णकृत्ये खोटेपणाच्या आधारामुळे निर्माण झाली आहेत. सर्व मानवांना पापापासून मुक्त करण्याचे धर्माचे जे प्रयत्न आहेत, ते सत्यावर विश्वास ठेवण्याशि संबंधित आहेत.
  17. सुखापेक्षा दुःखामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते. 
  18. सत्य फार काळ लपून राहत नाही. 
  19. आपमान आणि टीका यांना पुष्पगुच्छ समजा म्हणजे मन प्रसन्न राहील. 
  20. पराभव म्हणजे शिक्षण. आपल्या हातून पुढे काहीतरी चांगले घडण्याची पहिली पायरी म्हणजे पराभव. चांगले सुविचार
     “शालेय सुंदर मराठी सुविचार,
  1. आपण कोण आहोत हे आपणास माहीत असते, पण आपण कोण होणार आहोत,हे आपल्याला समजत नाही. 
  2. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चात्तापाचे शंभर दिवस उगवत नाहीत. 
  3. विवेक हा व्यक्तिचा सर्वात श्रेष्ठ गुण होय. 
  4. सतत असंतुष्ट असणं जस चुकीच असत तसच सतत आत्मसंतुष्ट राहणही बरोबर नसत.
  5. आळस हा इतका सावकाश प्रवास करतो की,दारिद्र्य त्यास ताबडतोबड गाठते.
  6. ज्या व्यक्ति मी पाणाची भिंत पार करू शकतात, त्याचेच जीवन यशस्वी होते. 
  7. खरा आनंद दुसर्यांना देण्यात असतो,घेण्यात किंवा मागण्यात नसतो. 
  8. अखंड सावधानता स्वातंत्र्याची किम्मत असते, जे ती देत नाहीत, त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही आणि मिळालेच तर ते टिकत नाही. 
  9. कपाळावर पडणार्‍या आठ्या मनावर पडू देऊ नका. मनातल्या उर्मिचा ताजवा जाता कामा नये .
  10. जितक्या अपेक्षा कमी त्या प्रमाणात मनाला अधिक शांतता लाभते.
  11. स्वतःला जागणे हीच सुरक्षा. जे स्वतः जवळ आहे त्याची ओळख होणे हाच आत्मानुभव. 
  12. नम्रतेचा वेष जर सदैव परिधान केला तर इतरांचे प्रेम व सहकार्य हमखास लाभले. 
  13. त्यागाशिवाय समता नाही, समताशिवाय शांती नाही आणि शांतीवाचून प्रगती नाही. 
  14. जीवनाची कलापूर्णता संयमात आहे. 
  15. चिंता माधमाशीसारखी असते. तिला जितकी दूर करण्याचा प्रयत्न कराल तितकी ती अधिक चिटकून असते. 
  16. चांगल्याचा चांगुलपणा जाणवायला अंगी चांगुलपणा असावा लागतो. 
  17. आपण जिभेच्या ताब्यात जाण्यापेक्षा जिभेला आपल्या ताब्यात ठेवा. 
  18. शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो. 
  19. जसा स्नानने शरीराचा मळ धुतला जातो तसा ज्ञानाने अंतःकरणाचा मळ धुतला जातो. 
  20. माणूस पशुत्व,मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे. चांगले सुविचार

also read

सुविचार मराठी संग्रह

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment