छोटे सुविचार | छोटे सुविचार : 2024

आपल्या या वेबसाईट वर तुम्हाला छोटे मराठी सुविचार मिळतील ह्या सुविचार संग्रहात तुम्हाला नवनवीन सुविचार मिळतील. आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना शेअर करा.

छोटे सुविचार

10 छोटे मराठी सुविचार |10 छोटे मराठी सुविचार

  • जीवनात जर आपल्याला महत्त्व मिळाले नाही तर त्याचा दोष देवाला न देता स्वतःलाच द्यायला हवा.
  • जर तुम्ही दुसऱ्यांचे दोष पाहण्यातच समाधान मानत असाल तर तुम्हाला पूर्णत्व व कौशल्य पाहण्यातही समाधान वाटणार नाही.
  • ज्याला प्रत्येक गवताच्या पात्याची भीती वाटते, त्याने गवताच्या कुरणात निद्रा घेऊ नये.
  • सज्जनांना भीती कशी ते ठाऊक नसते. जो वाईट कृत्य करायला भितो, त्याला एकच भीती असते. ज्यांनी भीतीवर मात केली अशी हजारो माणसे त्याला दिसत असतात.
  • जेंव्हा स्वतःशीच युद्ध सुरू होते, तेंव्हा तो मनुष्य कांही लायकीचा आहे असे समजावे.
  • जो स्तुती करतो तो व जो स्तुती करून घेतो तो, असे दोघेही बिघडतात.
  • ज्याच्या भांड्यात मध म्हणजे पैसा नसेल, त्याने आपल्या जिभेवर मध ठेवावा व गोड बोलावे.
  • परमेश्वराने ज्या अत्यंत रमणीय वस्तू निर्माण केल्या, त्यापैकी फुले आहेत पण देव त्यांना आत्मा द्यायला विसरला.
  • मूर्ख माणसाचे कौतुक करायला त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख असतोच !
  • मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा शहाण्या माणसाने केलेली कानउघाडणी जास्त चांगली असते.

चांगले मराठी सुविचार | चांगले मराठी सुविचार

  • आपले कोठेच चुकत नाही, आपण जे करतो ते अगदी बरोबरच आहे, असा ठाम
  • विश्वास फक्त मूर्ख माणसालाच वाटत असतो.
  • जीवनात शांती आणणारे उत्तम औषध म्हणजे विस्मरण. छोटे सुविचार
  • आपले ज्ञान वाढेल त्याप्रमाणात आपण क्षमा करायला शिकतो.
  • जोपर्यंत शिक्षक स्वतःच शिकत असतो तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने शिकवू शकतो. जोपर्यंत दिवा स्वतःचीच ज्योत प्रज्ज्वलित ठेवतो, तोपर्यंतच त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो.
  • ज्या वेळी हृदयावर बरेच दडपण येते त्या वेळी हृदयाच्या सुरक्षा झडपाप्रमाणे अश्रू कार्य करतात.
  • सुविचार हे स्वागतार्ह पाहुण्याप्रमाणे आहेत. त्यांचे स्वागत मनापासून करा. त्यांना उत्तम भोजन द्या, ते तुमच्याकडे यावेत यासाठी प्रयत्न करा. हे सुविचार तुम्ही जर तुमच्या स्मृतीच्या पात्रात साठवले तर पुष्पपात्रात साठवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे ते सुविचार दीर्घकाळ सुगंध देत राहतील.
  • सहनशीलता हा काही उच्च दर्जाचा सद्गुण नाही, पण असहनशीलता किंवा असहिष्णुता हा मात्र दुर्गुण आहे.
  • कुठल्याही परिस्थितीत प्रत्येकाने पंचशीलाचे पालन करावे. पंचशीलच पूर्णत्व देतात. ती पंचशीले अशी: गांभीर्य, आत्म्याचे औदार्य, प्रामाणिकपणा, कर्तव्य तत्परता आणि दयाबुद्धी.
  • माणसाजवळ मुख्य शहाणपण आपले दोष व चुका ओळखण्याचे असले पाहिजे, म्हणजेच त्याला दोष टाळता येतील व चुका दुरुस्त करता येतील.
  • ज्या माणसाला आपल्या कामाबद्दल प्रेम वाटत नाही आणि जो केवळ पैशासाठी काम करतो, त्याला त्यातून धनही मिळत नाही व जीवनातील सुखही मिळत नाही. छोटे सुविचार

Whatsapp group

सुविचार | सुविचार

  • कोणत्याही गोष्टीची कमतरता निर्माण झाल्यावरच त्या वस्तूची किंमत कळत असते.
  • बऱ्या झालेल्या जखमांचे व्रण मागे उरतातच.
  • ज्ञानाशिवाय उत्साह म्हणजे निखळ मूर्खपणा. छोटे सुविचार
  • आपण पूजा करताना ती देवता प्रत्यक्ष उपस्थित आहे असे मानून पूजा केली पाहिजे.
  • जर तुमचे मन त्या पूजेत गुंतले नसेल तर पूजा केली तरी ती न केल्यासारखीच आहे. 
  • सत्य हाच वाणीतील मध. सत्य हाच धर्मातील प्राण. यातूनच विश्वप्रेमाचा उदय होतो.
  • मूर्ख मनुष्य दुसऱ्याच्या अभिप्रायावरुन आपले मत बनवितो. . छोटे सुविचार
  • देशाची सुधारणा करायची असेल तर प्रथमतः विद्यार्थ्यांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • जो मनुष्य विनाकारण घाई न करता सातत्याने आणि चिकाटीने मार्गक्रमण करेल, त्याला कोणताही रस्ता लांब आहे असे वाटणार नाही आणि जो मनुष्य चिकाटीने व सातत्याने आपली तयारी एखादा सन्मान मिळविण्यासाठी करेल, तो सन्मान त्याच्या आवाक्यातील असेलच. छोटे सुविचार
छोटे सुविचार छोटे सुविचार

मराठी सुविचार | मराठी सुविचार

  • काळाच्या अधीन होण्यापेक्षा त्यावर मात करून जाऊ.
  • सहनशीलतेसारखा श्रेष्ठ गुण नाही. जो सहन करतो तोच टिकतो. जो सहन करत नाही तो नाश पावतो.
  • कमनशिबी किंवा दुर्दैवी म्हणवणारी दहा उदाहरणे घेतली तर नऊ जणांच्या कमनशिबाचे कारण त्यांनी सुखोपभोगाला पहिले स्थान दिले हे आहे आणि कर्तव्याला प्राधान्य दिले असते व सुखोपभोगाला दुय्यम स्थान दिले असते, तर ते दुर्दैवी ठरले नसते.
  • सूर्याला अंधार दिसतो का? 
  • दैव हे समुद्राप्रमाणे खोल व विस्तीर्ण आहे पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान असतात.
  • जे लोक विचार करतात, त्यांना हे जग सुखमय भासते, जे केवळ भावनेच्या आहारी जातात त्यांना हे दुःखमय भासते.
  • भयाच्या सावटाखाली जगण्यासारखा दुसरा शाप नाही.
  • जीवनवृक्षाला लागलेली दोन गोड फळे म्हणजे सज्जनांची संगत व प्रिय भाषण.
  • अपार शक्तीचा वापर जनकल्याणासाठीच करावा. छोटे सुविचार
  • स्वतःच्या वाटेत दुःखाचे काटे असले तरीही दुसऱ्याला फूल देणे हे आपले कर्तव्य आहे.
  • मनाला झालेल्या वेदना अत्यंत वेदना देणाऱ्या असतात. या जखमांना सहानुभूतीशिवाय औषध नाही. अश्रृंनीच हृदये कळतात व अश्रृंनीच हृदये मिळतात.
  • विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनवीत असते.
  • लोखंडाचं पातं न वापरता तसंच पडून राहिलं तर गंजतं. त्याला वापरत राहिल्यानेच ते उपयोगात येते. हाच नियम बुद्धीलाही लागू आहे.
  • स्वतःवरून दुसऱ्याचे मूल्यमापन करू नये. . छोटे सुविचार

सुविचार मराठी

Treading

More Posts