मराठी सुविचार : Marathi suvichar

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुविचार म्हणजे माणसाला दिशा देणारी एक पायरी या मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सुविचार मराठी मध्ये मिळतील असे सुविचार तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. आताच तुमच्या मित्रमैत्रिणीणा आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना शेअर करा  धन्यवाद 

आपल्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे .

मराठी सुविचार: marathi suvichar

Motivational marathi suvichar : प्रेरणादायी मराठी सुविचार 

  • जो लवकर रागावत नाही व रागावला तर लवकर शांत होतो, त्यास हानी कमी व
  • लाभ अधिक होतो, हे सात्विक लक्षण आहे.
  • घाईने चढणाऱ्याला पडण्याचा धोका फार असतो.
  • निसर्ग हा जितका कोमल आहे, तितकाच तो क्रूर आहे. म्हणून त्याच्याशी प्रतिकूल खेळ खेळू नका.
  • तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दावर आपली सत्ता असते, तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ता चालते.
  • ज्ञानार्जनात गुंतविलेले भांडवल भविष्यात चांगले व्याज देते.
  • आपण पराजित होणार अशी भीती ज्याला असते, त्याचा पराभव निश्चित आहे असे समजावे.
  • जर तुम्ही तुमच्या चुकांकडे डोळेझाक केली, तर प्रगती तुमच्याकडे पाठ फिरवील.
  • सामर्थ्य हे सांगण्याची वस्तू नसून प्रसंगी ती कृतीतून प्रगट होणारी शक्ती आहे.
  • जीवन वाईट नाही, वाईटरितीने जीवन जगणे हे वाईट आहे.
  • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. मराठी सुविचार
  • स्वतःशी जो प्रामाणिक असेल तोच इतरांशीही प्रामाणिक राहू शकेल.
  • एकतर जिद्दीने परिस्थितीवर मात करावी अथवा परिस्थितीशी समरस होऊन ती आत्मसात करावी.
  • गरजेपेक्षा अधिक वस्तुंची हाव धरू नका. ज्याच्याजवळ एकच घड्याळ असते त्याला किती वाजले ते समजते, पण ज्याच्याजवळ दोन घडाळे असतात, त्याचा वेळेबद्दल गोंधळ होतो.
  • कर्तबगार माणूस संधीची वाट पाहात नाही. तर ती तो स्वतः निर्माण करतो.
  • सत्कर्माचा वृक्ष वाढायला फार वर्षे लागतात, पण वाढल्यावर शेकडो वर्षांपर्यंत तो शीतल छाया आणि फळे देतो.
  • तलवारीपेक्षा लेखनीचे सामर्थ्य अधिक असते. “मराठी सुविचार.
  • शरीर आणि मन कामात इतके गुंतवून ठेवा की, होणारे श्रम तुम्हाला जाणवूच नयेत.
  • स्तुतीला नकार देणे म्हणजे दोनदा स्तुती करून घेण्याची इच्छा दर्शविणे !
  • भविष्य पुढे नसते, ते आपण आपल्या वर्तमानाच्या कृतीतून निर्माण करावयाचे असते.
  • प्रत्येकाच्या जीवनात निरनिराळ्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टींकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावरून सफलतेचा किंवा निष्फलतेचा मार्ग नक्की होतो. ही दृष्टी दोन प्रकारची असते. होकारात्मक आणि नकारात्मक. नकारात्मक दिशेने तुम्ही कधीच वळणार नाहीत पण लक्षात ठेवा, जीवनात सफल होण्याकरिता होकारात्मक दृष्टीने पाहा. यश नक्की मिळेल.
  • ग्रहापेक्षा पूर्वग्रहानेच लोक जास्त पछाडलेले असतात. “मराठी सुविचार,
  • वर्तमानकाळ ज्याला चांगला वापरता येतो, तो भविष्यातील भविष्य पाहात नाही.
  • दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले लहान वाक्य म्हणजे म्हण होय.
  • खूप लांबच्या यात्रादेखील एका पावलानेच सुरू होतात.
  • कर्तृत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव कृतीनेच करुन देतो.
  • खरा धैर्यवान मनुष्य नेहमी थंड व शांत असतो, तो पाशवी बळ वापरत नाही व त्याच्यात दुसऱ्याला दुखावणारा उद्धटपणा नसतो.
  • सौजन्यासाठी तुम्हाला काहीच द्रव्य द्यावे लागत नाही, पण सौजन्यामुळे तुम्हाला बरेच कांही मिळू शकते.

Whatsapp group मराठी सुविचार

मराठी सुविचार 

  • मूर्ख मनुष्य दूर कोठेतरी सुख शोधतो. शहाणा मनुष्य ते आपल्या पायाजवळ निर्माण करतो.
  • ज्याला संपत्ती मिळविण्याची घाई असते, तो निर्दोष राहणे शक्य नसते.
  • धोका देणाऱ्या घोड्यावर बसण्यापेक्षा, विश्वासू गाढवावर बसणे चांगले.
  • प्रत्येक क्रियेत भावभक्तीचा मसाला घाला म्हणजे ती ती क्रिया रुचकर होईल.   
  • मूर्खानी जर गप्प बसायचे ठरवले तर त्यांची कदाचित शहाण्यात गणना होईल.
  • निंदा आणि बदनामीस उत्तर न देणे, हेच जास्त फायद्याचे ठरते.
  • पूर्ण वेडे आणि पूर्ण शहाणे हे सामान्यपणे माणसाला उपद्रवी असतात खरे, पण अर्धवेडे आणि अर्धशहाणे हे फारच धोकादायक असतात.
  • निर्भयतेने प्रगती आणि नम्रतेने बचाव करता येतो. “मराठी सुविचार,
  • कामाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली म्हणजे लोभ निर्माण होऊ नये आणि प्रतिकूल परिस्थितीत क्रोध निर्माण होऊ नये.
  • जेथे साधनेची पराकाष्ठा होते, तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते.
  • जुने नष्ट न करता नाविन्याची भर घालते ते शिक्षण.
  • जो प्राप्त परिस्थितीत संतुष्ट असतो, तो श्रीमंत समजावा.
  • प्रगतीचा मार्ग नेहमीच चुकांच्या काटेरी वनातून जातो.
  • ज्ञानी माणसाबरोबर एक तास केलेली चर्चा शंभर पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
  • दारिद्र्यात लाज वाटण्यासारखे काहीच नसते. दारिद्र्याची लाज वाटणे हे मात्र खरे दारिद्र्य. दारिद्र्यात समाधानाने राहणे हे खरे प्रतिष्ठेचे लक्षण.
  • काही माणसं नुसती बोलतात, काही कामाचं बोलतात तर कांही माणसांचे प्रत्यक्ष कामच बोलते.
  • कटू सत्य सांगण्याची, ऐकण्याची अन् ते पचविण्याची तयारी ठेवा.
  • सोपवून दिलेले काम पार पाडण्यामध्ये आपला मेंदू खर्ची घाला, ते टाळण्यामध्ये मेंदू खर्ची घालू नका.
  • तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोखाशिवाय चमकू शकत नाहीत.
  • सत्य शोधून काढणे हे फारसे अवघड नाही, पण त्याला चिकटून राहणे ही गोष्ट फार अवघड आहे.
  • सुहास्य हा असा अलंकार आहे की, तो कुणाच्याही मुखकमलावर सुंदरच दिसतो.
  •  उथळ विचारांचे लोक नशिबावर विश्वास ठेवतात आणि शहाणी व करारी माणसे कार्यकारण भावावर विसंबतात.
  • योग्य प्रकारचे शिक्षण दिले नाही तर परिणाम उलट होतो, माणूस साक्षर होण्याच्या ऐवजी राक्षस बनतो.
  • शेतीत खत, बाजारात पत आणि घरात एक मत असावे.
  • केवळ पैशाने सुखी झाला असा मनुष्य अजून तरी जन्माला आला नाही. मराठी सुविचार
  • उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला न कळणे, यालाच सात्विक दान म्हणतात.
  • ज्याचा मंत्र होत नाही असे अक्षर नाही. ज्याचे औषध होत नाही असे झाडाचे मूळ नाही. त्याप्रमाणे कोणताही मनुष्य अयोग्य नसतो पण त्याचा योग्य प्रकारे उपयोग करणारा दुर्लभ असतो.
  • मनावरचा ताण कमी करण्यासाठी शरीरश्रमासारखे दुसरे साधन नाही.
  • वाईट सवयींचा जर लवकर प्रतिकार केला नाही, तर ती एक गरज होवून बसते !
  • जर भांडे स्वच्छ नसेल तर त्यात कांहीही ओतले तरी ते घाणच होणार. मराठी सुविचार

 सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी : the best suvichar Marathi 

  • दुसऱ्याच्या तोंडाला काळे फासण्यासाठी आधी आपले हात काळे करावे लागतात.
  • पापापासून चार हात दूर राहून व सदाचरणाने संपादिलेल्या ज्ञानाचा विनियोग लोककल्याणासाठी करणाऱ्या गृहस्थाचे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
  • आपले उपयुक्त विचार दुसऱ्यास समजतील अशा रीतीने व्यक्त करता येणे आणि
  • दुसऱ्याच्या भाषेतील निवडक विचार पारखून घेता येणे, ही बुद्धिमत्तेची लक्षणे होत. ८४८) कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. एकदा प्रारंभ केल्यानंतर विचार करू असे म्हणणे हा मूर्खपणा आहे.
  • कावळ्यास मिळालेले अन्न तो एकटा खात नाही. आपल्या गोतावळ्यास बोलावून तो सहभोजन करतो. अशा कावळ्यासारखा ज्याचा स्वभाव आहे, त्याला संपत्ती मिळून त्याचा उत्कर्ष होतो.
  • आळशाच्या घरी अक्काबाईची फेरी असते. सततोद्योगी असणाऱ्याच्या घरी कमलासना लक्ष्मी निवास करते.
  • योजिलेले कार्य यशस्वी होईपर्यंत त्याचे मर्म उघड करू नये. मध्यंतरीच त्याचा स्फोट झाला तर त्यातून भयंकर दुःख होण्याचा संभव आहे.
  • सूर्य कोणत्याही दिशेच्या आधीन नाही, तो ज्या दिशेला उगवतो ती पूर्व दिशा समजली जाते.
  • जर एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्गदर्शन करू लागेल तर दोघेही खड्ड्यात पडतील.

छोटे मराठी सुविचार

  • तरुणपणी जर तुम्ही गुलाबपुष्पांच्या शय्येवर पहडून राहू लागलात तर म्हातारपणी
  • काट्यांवर झोपण्याची वेळ येईल. मराठी सुविचार
  • केवळ उद्योगी असणे पुरेसे नाही तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या उद्योगात गुंतलेले असता, यालाही महत्त्व आहे.
  • गरज नसलेल्या गोष्टी जो खरेदी करीत राहतो, त्याच्यावर बऱ्याच वेळेला गरजेच्या वस्तू विकण्याचा प्रसंग येतो. 
  • उपदेश बऱ्याच जणांना मिळतो, फक्त सूज्ञच त्यापासून आपला फायदा करून घेतात.
  • वाटल्यास उपाशीपोटी झोपी जा, पण डोक्यावर कर्जाचा बोजा असलेल्या स्थितीत सकाळी उठू नका.
  • तुम्हाला जे आवडते ते मिळविण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, नाही तर जे
  • मिळेल ते आवडून घेणे तुम्हाला भाग पडेल.
  • जणूकाही हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे असे समजून प्रत्येक
  • दिवस सत्कारणी लावावा. “मराठी सुविचार,
  • जो आजारी पडेपर्यंत खातो, त्याला बरे वाटेपर्यंत उपवास करावा लागतो.
  • गर्व देवदूतांचे राक्षसात रूपांतर करतो, तर नम्रता माणसांना देवदूत बनविते.
  • प्राप्तीपेक्षा जो अधिक खर्च करतो, तो कधीही श्रीमंत नसतो, तर खचपिक्षा जो अधिक मिळवितो, तो कधीही गरीब नसतो.
  • आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्याकरिता माणसाला अनेक चांगल्या गोष्टी कराव्या लागतात. पण आपण वाईट आहोत हे सिद्ध करण्याकरिता मात्र केवळ एक वाईट गोष्टही पुरेशी होते.
  • शक्तीपेक्षा चिकाटी अधिक मोठी कामे पार पाडते.
  • माणसाच्या जीवनाचे मूल्यांकन त्याने केलेल्या एकूण कार्यावरून करायचे असते, त्याच्या आयुष्याच्या लांबीवरून नव्हे.
  • थोर मनुष्य हा नेहमी लहानपण स्वीकारायला तयार असतो.
positive suvichar Marathi
  • कुणीही माणूस दोषांशिवाय जन्माला आलेला नसतो. मात्र ज्याच्या ठिकाणी ते सर्वात कमी असतात, तो सर्वश्रेष्ठ असतो. “मराठी सुविचार,
  • योग्य वेळी जसे बोलायचे असते, तसेच योग्य वेळी मौनही राखायचे असते.
  • कष्ट करून मिळविलेली भाकरी सर्वात स्वादिष्ट असते.
  • तुम्ही वर्तमानकाळाची काळजी घ्या, भविष्यकाळ स्वतःच तुमची काळजी घेईल.
  • कामाधंद्याशिवाय असणे ही विश्रांती नसते, तर कामात बदल ही खरी विश्रांती असते.
  • जर एखादा मनुष्य शुद्ध विचार बोलत असेल व त्यानुसार आचरण करीत असेल तर सुखसमाधान त्याच्यामागे कधीही सोडून न जाणाऱ्या सावलीप्रमाणे राहाते.
  • विचार न करता बोललेले शब्द म्हणजे नेम न धरता सोडलेला बाण होय.
  • संशयी माणूस कोणतेही धाडस करू शकत नाही.
  • नैराश्य हा मनाचा महारोग असून विश्वास ही संजीवनी आहे.
  • सिंह हा ‘जंगलाचा राजा’ हे पद स्वपराक्रमाने मिळवतो. राजा बनण्यासाठी कुणी त्याच्यावर राज्याभिषेक करीत नाही.
  • सोन्यानी परीक्षा अग्नीत आणि मित्रत्राची परीक्षा संकटात होते. 
  • विजय त्याचाच होतो जो विजयी होण्यासाठी साहस करतो.

मराठी सुविचार संग्रह

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment