या सुविचार संग्रहात तुम्हाला सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार वाचनासाठी मिळतील. या सुविचार संग्रह तुमच्या मित्रांना कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. धन्यवाद सर्वश्रेष्ठ सुविचार
मराठी सुविचार
- सुख हे आपल्या जीवनातच अंतर्भूत असते.
- आयुष्यात असे कर्तृत्व करावे की, आपण गेल्यानंतरही लोक आपली आठवण काढत राहतील.
- जीवनात सफल होण्याकरिता तुम्हाला जीवनात काय पाहिजे ते प्रथम नक्की करा.
- थोर व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचाच विचार करीत असतात.
- स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही शहाणपणाच्या मंदिराची पहिली पायरी होय.
- तुमचे विचार जर शुद्ध असतील तर आपल्याला जे वाटते ते बोलणे आणि आपण जे बोलतो ते करणे सोपे जाते. सर्वश्रेष्ठ सुविचार
- मोती होऊन सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवावी.
- ज्याला जगात जगायचे आहे, त्यांना जगाला ठोकारून चालणार नाही.
- सहनशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे तर बदला घेण्याची भावना हा
- उत्साह हा अग्नीसारखाच असतो. त्यात भरही घालावी लागते आणि त्यावर तीव्र नजरही ठेवावी लागते.
- आयुष्यात चढ-उतार असतातच. आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे.
- स्वतःच्या अज्ञानाची जाणीव नसणे हीच अज्ञानी माणसाची खरी व्यथा होय.
- नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा, तरच जीवन आनंददायी होईल.
- संतुष्ट स्त्री घराचे सौभाग्य, स्वच्छता हीच खरी दौलत व समाधान हेच घराचे वैभव,
- टीका करण्याचा अधिकार तुम्हाला मदत करणाऱ्याला असतो.
- जीवन ही एक नाजूक वेल आहे आणि सुखे ही त्यावर फुलणारी फुले आहेत.
- ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतील.
- नियम लावताना तारतम्याचा विचार करावा.
- वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे.
- ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती अधिक महत्त्वाची असते.
- नियमितपणा ही मोठी शक्ती आहे. तिच्या बळावर व्यक्तीला आपल्या भाग्याचे स्वामी होता येते.
- तलवारीने मिळवलेले राज्य तलवार हातात असेपर्यंत टिकते.
- खऱ्या निष्ठेचे फळ उशिरा का होईना पदरात पडते.
- हसण्यात वेळ घालवा, आत्म्याचे ते संगीत आहे. सर्वश्रेष्ठ सुविचार
- जीवनातील कांही पराभव हे मिळालेल्या विजयाहून श्रेष्ठ ठरतात.
- चुका शेवाळाप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर आढळतात. पण मोती मिळविण्यासाठी खोल तळात जावे लागते.
- सन्मार्गावर चालताना अडचणींवर मात करून निर्भयतेने पुढे जाणं यातच खरा पुरुषार्थ आहे.
- गुणीजनांची ओळख पटेपर्यंत सामान्याला मान मिळतो. मात्र एकदा ती पटली की त्यांचाच गौरव होतो.
- धनी दुसऱ्याला पडताना पाहून स्वतःला सांभाळतो तर अज्ञानी वारंवार पडूनही उन्मत्त होऊन चालतो.
- जगाला क्षणभर फसवून चकित करणे हे तर सर्व कलांचे कार्यच आहे.
- मित्र हा जीवनाचा अलंकार नसून जीवनाला वळण लावणारा नट आहे.
- आत्मविश्वास हा भावी आयुष्याचा पाया आहे. सर्वश्रेष्ठ सुविचार
- ज्याला दुसऱ्याच्या कीर्तीचा सुगंध घेता येत नाही तो स्वतःच दुर्गंधीयुक्त असला पाहिजे.
- गर्वाचे घर कधी ना कधी खाली येते.
- ज्या गोष्टी मानवाला शारीरिक, मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिकदृष्ट्या दुर्बल बनवितात त्या गोष्टींचा विषवत त्याग करावा.
- सत्ता ही सत्याला शिक्षा ठोठावू शकते; परंतु सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, हे विसरता कामा नये.
- कोणीही सर्वगुणसंपन्न असत नाही, पण आपल्या कर्तृत्वाने जगात तो कीर्ती मिळवू शकतो.
- आपण जे कांही असतो ते आपल्या विचारांचा परिणाम म्हणून असतो. सर्वश्रेष्ठ सुविचार
प्रेरणादायी मराठी सुविचार | motivational marathi suvichar
- सहवास हा मनुष्याचे जीवन घडवतो. बालवयात माता-पित्यांचा सहवास बालकाच्या जीवनाला दिशा देतो. तरुणपणात मित्रांचा सहवास जीवन घडवतो. वार्धक्यात धर्म विचारांचा सहवास मोक्षाची वाट दाखवतो.
- कोणताही प्रसंग स्वतःवर आल्याखेरिज त्याची जाणीव होत नाही.
- वाचता सर्वांनाच येते परंतु काय वाचावे हे फारच थोड्यांना समजते.
- व्यक्तीजवळ स्वाभीमान असावा पण अहंकार असू नये.
- विचारांची जडणघडण जर उच्च स्वरूपाची असेल तर यश हमखास मिळतेच.
- घर ही गोष्ट दगड-विटांनी बांधली जात नाही. जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच घर होय.
- सत्कृत्यासाठी कष्टताना पद, प्रतिष्ठा बाजूस ठेवावी.
- अनुभव हा उत्तम शिक्षक आहे परंतु तो मोबदला मात्र जबर घेतो.
- यश व अपयश दोन्ही शांत वृत्तीनेच स्वीकारता आले पाहिजे.
- लहाणपणी आणि तारुण्यात पवित्रता आणि संयम अत्यंत आवश्यक आहेत.
- अपकीर्ती ते सांडावी सङ्कीर्ती वाढवावी विवेकदृढ धरावी वाट सत्याची
- विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.
- कोणत्याही परिस्थितीत आणि कुठेही धर्मभेद, जातिभेद पाळणे चुकच आहे.
- काळ हा कुणाचीही प्रतीक्षा करीत नाही. काळानुरूप घडणाऱ्या घटनाच काळ
- चांगला किंवा वाईट हे ठरवत असतात.
- नम्रता हाच माणसाचा खरा दागिना आहे.
- प्रयत्न हा परिस असून त्याच्या स्पशनि वाळवंटाचे नंदनवन करता येते.
- सावधपण, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढनिश्चय हे गुण यशासाठीआवश्यक असतात.
- कारणावाचून जो जागतो आणि दिवसा नेहमी झोपतो त्याच्या हातून कोणतेही कार्य होणार नाही असे समजावे.
- अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्मतात आणि संध्याकाळी नष्ट होतात.
- अपमान आणि गोळ्या दोन्हीही चावता येत नाहीत तर सरळ गिळणेच चांगले.
- आयुष्यात कांही ना काही गमावल्यावर जे उरते त्याला अनुभव म्हणतात. सर्वश्रेष्ठ सुविचार
सर्वश्रेष्ठ सुविचार मराठी | best suvichar Marathi
- कोंडलेला माणूस हवेसाठी, बुडणारा काठासाठी तसा विद्यार्थी ज्ञानासाठी हपापलेला हवा.
- काट्यावाचून गुलाब नाही.
- शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वधनी शुभ बोलावे, करावे जीवनाचे सोने
- अहंकार शेवटी स्वतःचाच पराभव करीत असतो.
- तीन गोष्टी देत राहा मान, दान आणि ज्ञान.
- प्रत्येक लहान मूल ईश्वरानं निर्माण केलेलं सुंदर चित्र असतं. त्यात रंग भरण्याचं काम मोठ्यांनी करायचं असतं.
- शरीरापेक्षा मनाची थोरवी अधिक असते. मन थोर असल्याने वृत्ती सदा आनंदी असते.
- जीवनाला सामोरे जाण्याचे शिक्षण अनुभवातून व चिंतनातून मिळते.
- संयोग आणि वियोग यांच्या अद्भूत रसायनाला जीवन असे म्हणतात.
- परिस्थितीच्या अधिन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा.
- स्वतःजवळचे नव्हे तर स्वतःच समर्पित झाल्याशिवाय मनःशांती लाभत नाही.
- जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक काम करणारे आणि दुसरे काम न करता त्याचे श्रेय घेणारे ! काम करणाऱ्यांच्या गटात जायचा प्रयत्न करा. कारण तिथे कमी स्पर्धा असते.
- प्रश्न सोडवायचे असतील तर फक्त विचार करून सुटत नाहीत त्याला विचार व कृतीची जोड हवी.
- गेलेल्या वेळेचे दुःख करत बसण्यापेक्षा आजचे काय ते पहा.
- क्रोध हा एक झंझावात असतो, तो इतक्या जोराने येतो की, सारा विवेकच नष्ट करतो.
- शहाणा माणूस जेंव्हा विक्षिप्तपणे वागतो, तेंव्हा त्यामागे काही अर्थ असतो,
- ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
- हृदयाने हृदयाला ओळखणे, हाच खरा धर्म होय.
- प्रेम हे आत्म्याचे सौंदर्य आहे.
- दुसऱ्याशी वाईट वागण्याऱ्या माणसाला ईश्वर क्षमा करीत नाही.
- अभ्यासाने आनंद तर मिळतोच, पात्रताही उत्पन्न होते.
- सारे मातीचेच पुतळे, किंमत असेल ती फक्त या मातीच्या मटक्यात असणाऱ्या मोठ्या मनाची, प्रेमळ हृदयाची आणि उदार विचारांची.
- उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तेथे ठराविक वेळेपेक्षा जास्त थांबता येणार नाही.
- वेळ म्हणजे जीवन, वेळ व्यर्थ घालवणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.
- जो स्वतःला ओळखत नाही, त्याचा विनाश ठरलेला असतो.
- निसर्गदत्त स्वभावावर मात करायला जावू नये.
- त्याग हे पोटात घेण्याचे औषध आहे तर दान ही कपाळावर फासण्याची सुंठ आहे.
- अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयश हवे.
- आपल्या अधिकारांविषयी काळजी करू नका. आपण बरोबर आहोत की नाही
- याचा नीट विचार करा.
- मृदूता आणि नम्रता हे जुळे सद्गुण देवाचे सानिध्य जतन करतात.
- सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.
- सज्जन माणसे सुपाप्रमाणे दोष पाखडतात व दुर्जन माणूस चाळणीप्रमाणे दोष घेतो व गुण टाकतो.
- जगात विशाल मनाचे कितीतरी लोक आहेत. पण त्यांच्यातले खऱ्या अर्थाने थोर कोण अन् खोटे कोण, हे ओळखण्यासाठी देखील तारतम्य हवे.
- सतत श्रमाची सवय अंगी बणवणे केव्हाही हिताचे ठरते.
- हसण्यात वेळ घालवा, आत्म्याचे ते संगीत आहे.
- पाय घसरल्यास कदाचित सावरता येते, पण जीभ घसरल्यावर त्याचा मनावर खोल ठसा उमटतो.
- धीर धरल्यास उत्तम फळ मिळते. तुप खावून लगेच रूप पाहण्याचा उतावळेपणा करू नये.
शुभ सकाळ सुविचार | good morning suvichar
- थोड्या अपयशाने लगेच खचू नये. सर्वश्रेष्ठ सुविचार
- घरी आलेल्या अतिथीला पाणी, भोजन देणे हाच खरा गृहस्थधर्म होय.
- जीवन एक खेळ आहे. तो खूप खेळा.
- प्रसंग पुष्कळांना वळण लावतात, परंतु प्रसंगाला वळण लावणारा एखादाच आढळतो.
- अंतरात्म्याची हाक येते, तेंव्हा आपण झोपलेलो असतो. जो जागा असतो, त्याला परमेश्वरी प्रसाद मिळतो.
- माणूस प्रयत्नाने यशस्वी होतोच पण त्याच्या जोडीला श्रेष्ठ दर्जाचे धारिष्ट व धैर्य आवश्यक आहे.
- परिस्थिती आणि वेळ पाहून वागणे हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली.
- लोक आपल्याबद्दल काय बोलतात, याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात, याचा विचार करा.
- स्तुती, विचारी माणसाला नम्र बनवते, मूर्खाला अहंकारी बनवते व दुर्बलांना
- अधिकच दुर्बल बनवते.
- जेंव्हा मत्सर आपले डोके वर काढतो, तेव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो तेसुद्धा आपले वैरी बनतात.
- आपल्या प्रत्येक कृतीकडे ईश्वराचे लक्ष आहे, ही जाणीव ज्या माणसाच्या ठायी असते तोच माणूस आपल्या रागावर संयम ठेवू शकतो.
- धैर्य म्हणजे जीवनाची कला आहे.
- महत्वाकांक्षेला चावी दिल्यावर संकटाचे, नशिबाचे काटे आपोआप फिरतात.
- गैरसमज कधीही पोटात ठेवू नयेत, त्याचे निराकरण व्हायला हवे.
- मूखनि आपल्याला मध दिला तरी तो मधूर न लागता कडवट लागतो. त्याचा त्याग करण्यातच भलाई असते. त्याउलट शहाण्याने विष दिले तरी ते पचविण्याची आपली तयारी हवी. सर्वश्रेष्ठ सुविचार
सुंदर मराठी सुविचार
- उंदरांना देखील शहाणपण असते, घर कोसळण्याच्या अगोदर ते घरातून पलायन करतात.
- दुर्जनांच्या मनात एक विचार असतो, जिभेवर वेगळाच विचार असतो आणि कृती मात्र तिसरीच असते, परंतु सज्जनांच्या बाबतीत मात्र काया-वाचा-मने एकच विचार असतो.
- मातृसेवा हीच खरी सेवा होय. सर्वश्रेष्ठ सुविचार
- संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे.
- प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे.
- कोणाच्या तरी मागे धावणाऱ्यांपेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहणाराच देवाला आवडतो.
- ज्ञान ही मनातून व्यक्त होणारी एक अभिव्यक्ती आहे.
- क्रोधाग्निने जेंव्हा तुम्ही जळू लागता, तेव्हा त्याचा धुर तुमच्या डोळ्यात जातो हे लक्षात ठेवा.
- आयुष्यात पर्याय शोधताना जगणे कधी विसरू नका.
- आपल्याजवळ जे कांही आहे ते वाटून घ्यावे.
- एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ज्ञानाची गरज लागते, पण तिची जाणीव होण्यासाठी अनुभवाची गरज लागते.
- तुम्ही फक्त सहन करण्यात समर्थ होऊन जा. प्रत्येक घटना जी तुम्हाला हादरून टाकते तीच तुम्हाला अजून मजबूत करून टाकते.
- जीवन सुंदर व संपन्न बनवण्यासाठी केवळ प्रेम, ज्ञान आणि शक्ती या भांडवलाची गरज लागते. या तीन गोष्टींच्या बळावर माणूस जग जिंकू शकतो.
- असंतोष हे सुधारणांचे मूळ आहे. जो थांबतो तो संपतो. उलट धावणाऱ्याला शक्ती येते.
- प्रगतीसाठी असंतोष आणि धडपड आवश्यक असते.
- मैत्रीसाठी समज हवी. समजूतदारपणामुळे सहानुभूती जन्माला येते. त्यामुळे सुसंवाद निर्माण होतो.
- परमेश्वराच्या ज्ञानबुद्धीवर ज्याचा विश्वास नाही, तो संशयात्मा असतो.
- चारित्र्याचेच चरित्र बनत असते, हे कधी विसरू नये. सर्वश्रेष्ठ सुविचार