सुप्रभात सुविचार : Good morning quotes [66+]

सुप्रभात सुविचार

   सुप्रभात मित्रांनो या सुविचार संग्रहात तुम्हाला सर्वश्रेष्ठ मराठी सुप्रभात सुविचार वाचायला मिळतील तसेच आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारचे सुविचार उपलब्ध आहे आपण वाचा  आणि दुसर्‍याला पण शेअर करा धन्यवाद 

आपल्या वेबसाईटवर आपले मनापासून स्वागत आहे. 

सुप्रभात सुविचार

सर्वश्रेष्ठ सुविचार : best suvichar 

  • चंद्र अमृताचा वर्षाव करतो, नाग मात्र सदैव विष ओकतो. सज्जन इतरांचे गुण गातात तर दुर्जन इतरांचे दोषच सांगतात.सुप्रभात सुविचार
  • सगळेच योग येत नसतात, काही प्रयत्नपूर्वक आणावे लागतात.
  • अविचाराने केलेल्या कामात नेहमी संकटे आणि दुःख असते.
  • कामे आरंभिल्याने होतात. विचारात वेळ घातल्याने नव्हे. सुप्रभात सुविचार
  • शिक्षणात काटकसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.
  • माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे ते माझे म्हणा.
  • प्रयत्न केल्यानेच कार्य सिद्धीस जाते. केवळ मनोरथ रचून नव्हे. झोपलेल्या सिंहाच्या मुखात हरिण स्वतःहून प्रवेश करीत नाही.
  • पुष्कळ पैसे मिळविण्यापेक्षा समाधान मिळविणे महत्त्वाचे आहे. सुप्रभात सुविचार
  • हृदयातील ईश्वर ज्याला सापडत नाही, त्याला तो अन्य ठिकाणी सापडणे शक्य नाही.
  • प्रत्येक गोष्टीत मर्यादा असते, ती ओलांडली की क्षय निश्चित असतो.
  • सत्य लपत नाही. ते केंव्हा न् केव्हा उघड होतेच. सत्य झाकण्याचा प्रयत्न केला की ते उफाळून वर येते.
  • काळ हे प्रत्येक गोष्टीवरील उत्तम औषध आहे. विस्मरणाची देणगी लाभल्यामुळेच दुःखाची तीव्रता कमी होते.
  • प्रयत्नात कसूर व्हायला नको. म्हणजे संधीचा उत्तम उपयोग करता येतो. एकदा मिळालेली संधी पुन्हा मिळत नाही.
  • आपण आयुष्यात किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. जन्माला येताना आपण रडावे आणि इतरांनी हसावे व मरताना इतरांनी रडावे आणि आपण हसावे, हेच खरे आयुष्याचे सार आहे.
  • संकटात असलेल्या आपल्या साथीदाराला जे मदत करीत नाहीत, त्यांना पश्चात्ताप होतो.
  • माणूस सुधारायचा असेल तर त्याच्या सवयी व त्याचे विचार या दोन्ही बाबतीत सुधारणा झाली पाहिजे.
  • लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढली की लगेच पाय उघडे पडतात.
  • जो स्वतः काम करतो, त्याला संपत्ती व सन्मान मिळतो.
  • धर्माच्या नावाखाली आपापसात फूट पाडू नका. धमपिक्षा माणसाचा जीव अधिक मोलाचा आहे. धर्म हे धूर्ताचे कारस्थान आहे. त्याला मूर्ख बळी पडतात.
  • धरती आणि आकाश यांना जोडणारा चैतन्यरूपी दुवा म्हणजे वृक्ष होय. 
  • धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्यांना यश मिळते. भेकडांच्या वाट्याला ते कचितच
  • योगायोगानं येतं. सुप्रभात सुविचार

छोटे मराठी सुविचार : small marathi suvichar

  • धान्याच्या कणाकडे कोंबड्याचे लक्ष जाते. पण त्यातील मोती राजहंस वेचतो.
  • माणसाचं मोल डोक्यावरील मुकूटाने आणि गळ्यातल्या जडजवाहिऱ्यांनी होत नाही तर त्याच्या अंतःकरणातील माणुसकीनं आणि मनगटातल्या पराक्रमांनी कळते.
  • बोलून फसण्यापेक्षा विचार करून बोलावे.
  • आळसाला आजचा दिवस तुम्ही बक्षीस दिला की, उद्याचा दिवस तुमच्यापासून त्याने चोरलाच म्हणून समजा.
  • एका अपराधाबद्दल क्षमा कराल तर तुम्ही अनेक अपराध करण्यास उत्तेजन द्याल.
  • आपले पद कितीही मोठे असो पण लहान-सहान कामे करण्यात कमीपणा मानू नये.
  • विज्ञान शस्त्र नव्हे पण त्याचा वापर जर शस्त्रासारखा केला तर विनाश ठरलेलाच.
  • राजाला फक्त राज्य मानतं, विद्वानाला विश्व.
  • माणसाची कीर्ती ही गोष्ट तशी प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट नाही. पण ही कीर्ती लाभते, त्याचे कारण तुमच्याबद्दल अनेक लोक चांगले बोलतात हे असते.
  • रामनामाने दगड तरतात तर कर्तृत्वाने आयुष्य तरते.
  • रडण्यानं भविष्य बदलत नसतं. सुप्रभात सुविचार
  • राईएवढा दोष लपविल्याने पर्वताएवढा मोठा होतो. तो दोष कबूल केल्याने नाहिसा होतो.
  • कोणतीही वस्तू चांगली वा वाईट नसते. फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.
  • आपल्या ऐपतीच्या बाहेर खर्च न करण्याचा स्वभावच माणसाला नेहमी सुखात ठेवतो.
  • अज्ञानी असण्यात नाही तर शिकण्याची तयारी न दाखविण्यात कमीपणा आहे.
  • उद्योगी माणूस कचितच निर्धन असतो.
  • संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.
  • जिवंत असताना विश्रांतीचे नाव अजिबात घेऊ नका, त्यासाठी मृत्यूनंतर पुष्कळ वेळ आहे.
  • वाईट सवयींचा जर लवकर प्रतिकार केला नाही, तर ती एक गरज होऊन बसते !
  • विश्वास म्हणजे माणसाला जिवंत ठेवणारी शक्ती आहे. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत आहे.
  • माणसाला मोठेपणा हा जसा स्थानाने येत नाही, तसेच राजदंडाने राजाला राजेपण येत नाही. मोठेपणा हा माणसाच्या अंगीच असावा लागतो.
  • मत्सराला मरण येत नसते. मत्सराने कोणीही श्रीमंत होत नाही. मत्सर आणि क्रोधाने आयुष्य कमी होत असते.
  • एकांतवासाने मन ताजेतवाने होते, पण एकलकोंडेपणाने ते मरण पावते, ज्यांना उदात्त विचारांची संगत मिळाली आहे, ते कधीच एकलकोंडे नसतात.
  • माणसांवर येणारी संकटे, अडचणी व अडथळे बुद्धीच्या विकासाने पुष्कळसे टाळता येतात.

Whatsapp group मराठी सुविचार

सुप्रभात सुविचार : good morning suvichar 

  • राष्ट्रीय संपत्तीची सूक्ष्म काळजी राष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनीच घेतली पाहिजे.
  • एक डाव हुकला म्हणून सर्वच डाव हुकतात असं कशावरुन ? आणि ते तसे हुकू दिले तर खेळणाऱ्यांचे चातुर्य काय ?
  • प्रगती करण्यासाठी तुमच्या दोस्तावर नव्हे तर दुष्मनावर नजर ठेवा.
  • सत्याचा झरा चुकांच्या प्रवाहातून वाहतो.
  • खऱ्याला मरण नाही नि खोटाला शांती नाही. सुप्रभात सुविचार
  • कर्तृत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव सौम्य शब्दांत आणि योग्य कृतीनेच करून देतो. तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो.
  • जे नावाडी कुशल व कार्यक्षम असतात, त्यांनाच समुद्रावर वाहणारे वारे आणि लाटा साहाय्य करतात. कार्यक्षम माणसांनाच निसर्ग मदत करतो.
  • जे अति सावध असतात त्यांच्या हातून विशेष कर्तृत्व घडत नाही.
  • आळशी लोकं इतके आळशी असतात की ते आळशीपणा करायचाही आळस करतात आणि उद्योगी लोकं विश्रांती घ्यायचेही विसरतात. आपण नित्य कार्यरत राहिले पाहिजे नाहीतर दुःख भोगावे लागेल.
  • शब्दांच्या माऱ्यापेक्षा प्रत्यक्ष कार्यातच जास्त सामर्थ्य असते. सुप्रभात सुविचार
  • सतत कार्यामुळे एखादेवेळी नुकसान होण्याचा संभव असतो. पण आळशीपणामुळे कधीच कोणाचा फायदा होत नाही.
  • संकटांमुळे मनुष्य श्रीमंत झाला नाही तरी शहाणा मात्र नक्की होतो.

Suvichar : सुविचार

  • संकटकाळातच मनुष्याला आत्मशक्तीचे भान येते. संकटांतून गेल्यामुळेच मनुष्यावर खऱ्या-खोट्या स्तुती-निंदेचा परिणाम होत नाही.
  • जो दुसऱ्याचा सल्ला घेतो तो कधी-कधी सल्लागारापेक्षा वरचढ ठरतो.
  • गुलामाला धनी एकच असतो. पण महत्त्वाकांक्षी माणसाला आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या माणसांची मदत घ्यावी लागते ते सर्वजण त्याचे धनीच असतात.
  • जे विचार करू शकत नाहीत, त्यांचे सारे सौख्य केवळ करमणुकीतच साठवलेले असते.
  • संतापी मनुष्य स्वतःलाच शिक्षा करून घेतो.
  • मनुष्य संतापला की त्याची बुद्धी जणू फिरायला निघून जाते. सुप्रभात सुविचार
  • रागावणे म्हणजे दुसऱ्यांच्या चुकीसाठी स्वतःवरच सूड उगवण्यासारखे आहे.
  • आपण आपला क्रोध आवरला पाहिजे. उष्णता नियंत्रित केली असता तिचे रूपांतर प्रचंड कार्यशक्तीत होते. त्याप्रमाणेच मनुष्याने आपल्या क्रोधावरच नियंत्रण मिळविले तर तो मनुष्य अशी शक्ती मिळवू शकतो की, ज्यामुळे हे संपूर्ण जग बदलून टाकता येते.
  • एखाद्याच्या पहिल्याच भेटीत प्रथमदर्शनी जे मत होते, त्याला फार महत्त्व असते. 
  • कसल्याही शिफारसपत्रापेक्षा प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही सर्वात मोठी शिफारस आहे.
  • आपल्या बरोबरीच्या माणसाबरोबर वाद-विवादात यश मिळेल की नाही हे सांगता येत नाही, आपल्यापेक्षा कार्यक्षम व ज्येष्ठ व्यक्तीबरोबर वाद करणे हा वेडेपणा आहे आणि कमी दर्जाच्या व कनिष्ठ व्यक्तीबरोबर वाद करणे हा क्षुद्रपणा आहे.
  • दीर्घकाळ धुमसात राहण्यापेक्षा क्षणभरच प्रज्जवलीत होणे चागले.
  • एखाद्या विषयावर संपूर्ण वाचन केल्याखेरीज त्यावर लिहू नका आणि एखाद्या विषयावर अगदी मनापासून चिंतन केल्याशिवाय त्या विषयावर कांही वाचू नका.
  • दरिद्री मनुष्याला खूप हवे असते पण अधाशी मनुष्य सर्वच बळकावू पाहतो.
  • अधाशी मनुष्य व सुख यांची सांगड कधीच पडत नाही.
  • खरी सौंदर्य प्रसाधने कोणती ? शांत वृत्ती, उदार स्वभाव, अत्यंत सोशिकपणा, नम्रता, आचारांची शुद्धता, मानवतेचे प्रेम हीच खरी आत्म्याची सौंदर्य प्रसाधने आहेत. या सौंदर्य प्रसाधनांचे तेज चेहऱ्यावर दिसून येतेच. या गुणांनी मंडीत झालेल्या व्यक्तीचेच सौंदर्य हे खरे सौंदर्य मानले पाहिजे.
  • या जगात ज्याला आपण सर्वात सुंदर म्हणतो, त्या वस्तूंचा व्यवहारात जवळजवळ काहीच उपयोग होत नाही.

मराठी सुविचार संग्रह

Motivational marathi suvichar
  • जो घाईने मैत्री जोडतो किंवा जो हळूहळू शत्रुत्व करतो, अशा दोघांपासून सावध राहा.
  • संधी ही नेहमी समंजस माणसाची बाजू घेते व त्यालाच लाभते. सुप्रभात सुविचार
  • चारित्र्य राखता येणे सोपे आहे, पण परत मिळवता येणे अवघड आहे.
  • हिरा ज्याप्रमाणे सर्व कठीण वस्तूंवर चरे पाडू शकतो, त्याप्रमाणे चारित्र्य सर्व बाबतीत वरचढ ठरते.
  • सत्यवादित्व हा चारित्र्याच्या पायाचा कोपऱ्याचा दगड आहे. तो जर नीटपणे बसवला गेला नाही तर तुमच्या चारित्र्याचा पाया कच्चाच राहील.
  • जो दान स्वीकारतो त्याने मिळालेले दान कधीही विसरू नये व जो दान देतो त्याने आपण दान दिले हे कधीही लक्षात ठेवू नये.
  • आपण फसवले जात आहोत हे ज्याला समजते, तो फसवला जात नाही.
  • परिस्थितीवर माणसाचे नियंत्रण असू शकत नाही पण आपली वागणूक आपल्या हातात असते.
  • हुशार माणसे चांगली असतात, पण ती सर्वश्रेष्ठ असतीलच असे नाही.
  • स्वतःची हुशारी लपवून ठेवण्यामध्ये माणसाची खरी हुशारी दिसून येते.
  • जीवनातील अनेक चैनी आवश्यक नसतात. इतकेच नव्हे तर त्या चैनींमुळे माणसाच्या प्रगतीत मोठेच अडथळे निर्माण होतात.
  • वाईट माणसांची संगत कधीही करू नये. सुप्रभात सुविचार
  • प्रशंसा करायला काही खर्च येत नाही. तरीही अनेकांना त्याची किंमत फारच द्यावी लागते.
  • मानवी व्यवहारात जे महत्त्वाचे बदल घडून आले, त्याचे कारण म्हणजे समेट करण्याची प्रवृत्ती !
  • मीपणा किंवा अहंकार हा माणसाच्या आत्म्याला झालेला असाध्य रोग आहे.
  • जेंव्हा मनुष्य स्वतःविषयी जास्त बढाई मारू लागतो, त्या वेळी त्याला दुसऱ्याने केलेली इतरांची स्तुती आवडत नाही.
  • जे प्रतिभावंत असतात ते आपली सर्व शक्ती एकाच विशिष्ट विषयाच्या बाबतीत लावतात आणि चित्त एकाग्र करून काम करतात. त्यामुळे त्यांच्या प्रतिभेत भरच पडते.
  •  दुष्कृत्याची कबुली हाच सत्कृत्याचा प्रारंभ ठरतो. सुप्रभात सुविचार
  • चुका किंवा दोष कबूल केले तर त्याचे निम्म्याने परिमार्जन झालेच समजा ! 
  • जो मनुष्य कुठल्याही पुराव्याशिवाय किंवा अनुभवाशिवाय तुमच्यावर संपूर्ण  सुप्रभात सुविचार

Treading

More Posts