सुविचार अनमोल वचन || सुविचार मराठी [99+]

नवीन पिढीला/ विद्यार्थ्यांना सुविचारांचे खतपाणी पुरवणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य क्षेत्रात सुविचारांचे अत्यंत उच्च स्थान आहे. सुविचार हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन आहेत. मानव धर्माचे शिकवण, माणुसकीची जाणीव आणि व्यवहारवादाचा धडा सर्वसामान्य माणसाला मिळवा.सुविचार अनमोल वचन

सुविचार अनमोल वचन

#आजचा सुविचार मराठी मध्ये

  1. भाग्य म्हणजे प्रारब्ध भोगावेच लागते. हे सर्वांना सारखेच भोगप्रद आहे.
  1. मनुष्य हाच भाग्याचा कारागीर असतो. सुविचार अनमोल वचन
  1. भाग्याची कमान चाकाच्या आरांप्रमाणे खाली वर होत असते.
  1. धावतांना मध्येच घोड्याने मारलेली उडी, ढगाची गर्जना, स्त्रियांची लहर, ‘पुरुषांचे भाग्य’, पाऊस न पडणे (अनावृष्टी) तसेच तो पाऊस फार होणे (पडणे) (अतिवृष्टी) या गोष्टी देवालाही कळत नाहीत मग मनुष्यांना त्या कोठून कळणार ?
  1. मनुष्य केवढाही प्रयत्नवान असला तरी यश हे भाग्यानेच येते.
  1. भाग्य व सुख यांचा परस्पर संबंध आहे.
  1. आपण रक्षण न केले पण भाग्य जर रक्षक असेल तर ती वस्तू सुरक्षित राहते.
  1. तुमचे सौख्य तुमच्या विचारावर अवलंबून असते.
  1. ज्ञानात मिळते तेवढे परम् सुख अन्य कशातही नाही.
  1. सुखाबरोबर दुःखाची चव घेतल्याशिवाय खरे सुख मिळत नाही.
  1. ज्याच्याजवळ सद्बुध्दी व विवेक आहे ती व्यक्ती परमसुखी असते.
  1. अन्न – वस्त्रातील सुखापेक्षा स्वतःच्या कर्तबगारीतील, पराक्रमातील सुखात जास्त आनंद घेतो.
  1. जे जे दुसऱ्याच्या ताब्यात ते दुःख आणि जे जे आपल्या स्वतःच्या हातात तेच सुख. सुख दुःखाची हीच थोडक्यात व्याख्या.
  1. सुख आणि दुःख कोणी देत नाही. दुसरा दुःख देतो असे समजणे ही वाईट बुध्दी. ‘माझ्यामुळे होते’ हा खोटा अभिमान. कारण सर्व लोक आपल्या कृतकर्माच्या धाग्याने बांधलेले आहे.
  1. आलेल्या सुखाचा उपभोग घ्यावा आणि प्राप्त झालेले दुःख सहन करावे. पीक येणे आणि न येणे याचा जसा शेतकऱ्याला अनुभव येतो तसेच सुख दुःखाचे आहे.
  1. संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते. चांगल्या व संस्कृत स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगलेच बोलतात.
  1. दुःख हे खरे सुख पडताळून पाहण्याचा आरसा आहे.
  1. स्वजनांसमोर दुःखाला पूर येतो.
  1. दुसऱ्यास दुःख देऊन आनंद मानणे म्हणजेच हजारपट दुःख भोगणे होय.
  1. दुसऱ्याच्या दुःखानेही दुःखी होणारा माणूस  सुविचार अनमोल वचन

WHATSAPP GROUP

#मराठी सुविचार स्टेटस साठी 

  1. अश्रू ही दुःखाची एक मूक भाषाच होय.
  1. दुःखावर औषध एकच ते म्हणजे सारखा विचार न करणे. कारण विचार केल्याने दुःख नाहिसे तर होत नाहीच उलट अधिकच वाढते.
  1. दुसऱ्याला दुःख न देता, दुष्टापुढे न वाकता आणि सज्जनांनी स्विकारलेला मार्ग न सोडता जे थोडे काही करू शकाल तेही पुष्कळच म्हटले पाहिजे.
  1. द्याचा भविष्यकाळ आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो.
  1. झोपताना दिवसाचा आढावा घ्या, ही यशाची गुरुकिल्ली आहे.
  1. पैसा ही गोष्ट माणसाचे महत्त्व मोजणारी आहे. ज्याच्या खिशात पैसा
  1. नाही, त्याची किंमत पैशाएवढीही नाही.
  1. धनवान व्यक्ती या जगात नेहमी बलवान ठरते. सुविचार अनमोल वचन
  1. जेव्हा मनुष्याजवळील धन नष्ट होते तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याची तब्येत बिघडते, तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते, परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य नष्ट होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होत असते.
  1. दरिद्री माणूस श्रीमंताचा मित्र नसतो.
  1. पैशाला जर तुम्ही ईश्वर समजाल, तर तो तुम्हाला सैतानाप्रमाणे भ्रष्ट करून टाकेल.
  1. वैभवशाली लोकांची दुषणे ही भूषणे मानली पाहिजेत. सुविचार अनमोल वचन
  1. पैसा हा माणसाचे हात किंवा पाय आहे. मग तुम्ही वापरा किंवा वापरू नका.
  1. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हावे.
  1. म्हातारपणी खर्च करता यावे म्हणून तरुणपणी पैसे वाचवा.
  1. विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे.
  1. पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा ठेवा.
  1. पैसा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो.
  1. उपभोगामुळे धनाला शोभा येते.
  1. रत्नापेक्षाही शहाणपण फार मूल्यवान आहे. सुविचार अनमोल वचन

#नवीन सुविचार मराठी मध्ये 

  1. वाघ, हत्तीसारख्या पशुंनी गजबजलेल्या अरण्यात राहणे परवडेल, पाणी पिऊन आणि फळे खाऊन झाडाखाली राहणे, गवतावर झोपणे आणि वल्कले नेसणेही परवडेल; परंतु नातेवाईकांमध्ये धनहीन अवस्थेत जगणे नको.
  1. द्रव्याची हाव माणसाला पशु बनविते.
  1. धन आणि यौवन दोन्ही चंचल. सुविचार अनमोल वचन
  1. माणुसकीचा ओलावा पैशाच्या उबेपेक्षा श्रेष्ठ असतो.
  1. वैभव असतानाच दान करावे आणि द्रव्याचा उपभोग घ्यावा (योग्य खर्च करावा) साठा करू नये.
  1. एकटा मत्सरही मृत्यूला कारण होतो. मर्यादा सोडून भाषण करणे म्हणजे लक्ष्मीचा नाश.
  1. मूर्खाची जेथे पूजा होत नाही, जेथे धान्य चांगले साठविलेले असते आणि जेथे नवरा बायको भांडत नाहीत तेथे लक्ष्मी स्वतःच येऊन राहते.
  1. धनाच्या साहाय्याने माणसे संकटातून निभावून जातात. जगात धनासारखा दुसरा मित्र नाही. म्हणून म्हणतो धन मिळवा, धन मिळवीत राहा.
  1. मोठमोठे वयोवृध्द, तपोवृध्द आणि ज्ञानवृध्द लोकदेखील धनिकाच्या दारी नौकराप्रमाणे वागतात.
  1. पैसा मिळविताना कष्ट, तो मिळाल्यानंतर त्याचे रक्षण करताना पुन्हा कष्ट, पैसा आला तरी कष्ट आणि गेला तरी कष्टच. एकूण कष्टातून जन्म घेणाऱ्या या पैशाचा धिक्कार असो.
  1. मनात योजलेले कार्य कधीही बोलून दाखवू नये. एखाद्या मंत्राप्रमाणे ते गुप्त ठेवावे आणि त्या कार्याला लागावे.
  1. काम झाल्यावर नोकर मालकाचा द्वेष करतो, लग्न झाल्यावर पुरुष आईवर रागावू लागतो. मूल झाल्यावर स्त्री पतीवर चिड…
  1. ज्या कामाचे फळ मिळणार किंवा मिळण्यासारखे आहे असे कोणतेही काम लवकर आटोपून नाही तर त्यातली गोडी वेळ टळून गेल्यामुळे (फार उशीर झाल्यामुळे) नाहीशी होते.
  1. जगात जो तो स्वकर्माची फळे भोगतो.
  1. एकजुटीने कार्य साधते. सुविचार अनमोल वचन
  1. उद्या कोणाचे काय होईल हे कुणालाही माहीत नसते. म्हणून शहाण्या माणसाने उद्या करावयाची कामे आजच करून टाकावीत.
  1. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  1. फसवणूक करून कोणतेही मोठे कार्य होत नसते. प्रेम, सत्य, निष्ठा व प्रचंड उत्साह याच्याद्वारेच महान कार्ये होत असतात. म्हणून आपले पौरुष प्रकट करा. विचारी मना तूंचि शोधोनि पाहे ।
  1. दुसऱ्यांना उपदेश करण्याचे पांडित्य पुष्कळ लोक दाखवितात; परंतु हे शहाणपण स्वतःच्या कार्याच्या वेळी साधारणपणे विसरतात.
  1. वाद न घालता काम करू या. जीवन सफल करण्याचा एकमेव मार्ग. सुविचार अनमोल वचन

#अनमोल सुविचार मराठी 

  1. जे काम आता होईल तेच होईल आजचे काम आज होईल उद्याच्या कामात यामुळे अडचण येणार नाही.
  1. गाजावाजा न करता शांतपणे व धीर धरून एकसारखे कार्य करीत राहा. जाहिरात बाजीच्या व नावाच्या पाठीमागे लागू नका. या गोष्टी सदैव ध्यानात ठेवा.
  1. सतत उद्योग हे लक्ष्मीचे, लाभाचे आणि कल्याणाचे मूळ आहे.
  1. उद्योग पुरुष लक्षणंम्.
  1. वैभवाची इच्छा बाळगणाऱ्याने उत्साहाने उद्योग केला पाहिजे.
  1. उद्योग हीच भाग्याची जननी. सुविचार अनमोल वचन
  1. मधमाशीप्रमाणे सतत उद्योगात मग्न राहणं हेच आपण मनोरंजन मानले पाहिजे.
  1. उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
  1. सन्मान हा आपल्या सद्‌गुणांनी, शांत स्वभावामुळे आणि विधायक कार्यान मिळत असतो. (दहशतवादी शक्ती क्षणिक असते.)
  1. तुमचे नशीब बनविणारे तुम्हीच !
  1. नशीब रजःकरणाचा पर्वत व बिंदू सिंधू बनवू शकतो.
  1. नशिबाने फार चांगले दिवस आले तरी शेफारून जाऊ नका. नशिबाचे चक्र केंव्हाही फिरू शकते. हे कधीही विसरू नका.
  1. संस्कृती म्हणजे विचारप्रणाली.
  1. ज्याठिकाणी कृतज्ञता संपते त्याठिकाणी माणूस संपतो, त्याठिकाणी संस्कृती संपते.
  1. शांती ही भगवंताची विभूति आहे.
  1. व्यावहारिक जीवनातही शांती ही वाटचाल, प्रसन्नता हा विसावा तर समाधान हा मुक्काम आहे, शांती हीच आनंदाची जननी आहे.
  1. शांतीमध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हरपून जाते.
  1. अभ्यास व चिंतनाने मनुष्य मोठा होतो.
  1. मोठेपणा येण्यासाठी आधी कष्ट सोसावे लागतात.
  1. कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून करावी. सुविचार अनमोल वचन

सुविचार मराठी छोटे

#आजचा सुविचार मराठी मध्ये
  1. कायद्याच्या क्षेत्रात खर्चाखेरीज निश्चिती कशाचीच नसते.
  1. कायदे गरिबांना भरडतात आणि श्रीमंत लोक कायद्यावर आपले अधिराज्य चालवितात.
  1. कायद्यापुढे सगळे लहान आहेत.
  1. समजपणा हे कायद्याचे रहस्य आहे.
  1. कायदे चाकर आहेत. जो त्याचे पालन करतो तो त्यांच्यावर सत्ता गाजवितो 
  1. जो आईची रोज पूजा करतो, त्याची जग पूजा करते.
  1. ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.
  1. सूर्याच्या किरणांनी कमळे फुलतात त्याप्रमाणे आईच्या कृपेने जीवनकळ्या फुलतात.
  1. आईची ममता ही हिमालयापेक्षा उंच विशाल व सागरापेक्षाही अथांग आणि आकाशातील पोकळीपेक्षाही भव्य असते.
  1. हृदयाच्या मखमली पेटीत जपून ठेवण्यासारखी दोन अक्षरे आहेत ती म्हणजे ‘आई’.
  1. आई – बापाचं पवित्र स्मरण पावन असतं. ती कृतज्ञता असते आणि या जगात कृतज्ञतेसारखं सुंदर आहेच काय ?
  1. आई हे दैवतांचे दैवत आहे.
  1. आई म्हणजे बालकांची पहिली शाळा असते.
  1. दोन गोष्टी कधीच वाईट नसतात. एक आपली आई आणि आपली जन्मभूमी.
  1. मातेच्या प्रेमाची भरपाई कोणताही पुत्र, मग तो तिन्ही लोकांचा स्वामी असला तरी करू शकत नाही.
  1. सर्व जगातील करूणा आटली असली तरी आईच्या डोळ्यातील करुणा कधीच आटत नाही. सुविचार अनमोल वचन
  1. आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
  1. लाड करणारी आई असते म्हणून मुलाचे बोबडे बोलणे शोभते. क्षमाशील परमेश्वर आहे म्हणून मनुष्याचे अज्ञान शोभते.
  1. आईने पाठीवरून प्रेमळपणाने हात फिरवून केलेले उपदेश साऱ्या ग्रंथातील ज्ञानापेक्षा पवित्र असतात. सुविचार अनमोल वचन
  1. आईच्या प्रेमाने बुध्दीचे समाधान होते तर प्रियतमेच्या प्रेमाने हृदयाची व्याकुळता वाढते.
  1. आईविना संगोपन म्हणजे सत्त्व काढून घेतलेलं अन्न, लोणी काढून घेतलेले दूध व तेज काढून घेतलेली उष्णता.
  1. ईश्वराने वात्सल्याचा सागर असणाऱ्या ‘आई’ ला निर्माण केले.
  1. माता म्हणजे मनुष्याच्या जीवनातील.   गंगाजळ आहे.
  1. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्य सिंधू आई !
  1.  जन्मदाता, उपनयन (मुंज हा संस्कार करणारा), विद्या देणारा, अन्नदाता (पोषण करणारा) आणि भयापासून (संकटापासून) संरक्षण करणारा असे पाच जण धर्मशास्त्रात पितृरूप मानलेले आहे.
  1. जो मनुष्य हित करणाऱ्या वडील माणसांना विचारून त्यांच्या सल्ल्याने काम करतो त्याच्या कुठल्याही कामात विघ्न निर्माण होत नाही.
  1. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. बरोबर आहे, “व्यक्ती तेवढ्या प्रकृत्ती.’
  1. मन ज्यात रमते तेच त्या व्यक्तीला गोड वाटते. सुविचार अनमोल वचन
  1. विशिष्ट हेतूकरीता केलेली मैत्री अखेरपर्यंत टिकत नाही. 
  2. आपल्या शत्रूवर प्रेम करण्याऐवजी आपल्या मित्रांना थोड अधिक सन्मानाने वागावे.
  3. तुमच्या नातेवाईकांची निवड नशिबाने केली आहे. मात्रांची निवड तुम्ही करा. 

Treading

More Posts