या जगात ज्ञानी म्हणवून घेणारी माणसे खूप विद्वान आहेत परंतु दुर्दैवाने सदाचरणी कमी आहेत महान कार्ये विचाराअभावी होऊ शकत नाहीत म्हणुनच कोणतेही मोठे कार्य करावयाचे असेल तर कार्याला आरंभ करण्यापुर्वी त्याविषयी विचार करा, चिंतन करा. ‘10 छोटे सुविचार मराठी’ या पुस्तकेमध्ये जगातील उत्तमोत्तम कृतीचा आश्रम घेऊन यातील सुविचारांची मांडणी विषयानुरुप केलेली असल्यामुळे विशिष्ट मनोवृत्तीला पोषण वातावरण निश्चितपणे निर्माण होऊ शकते. 10 छोटे सुविचार मराठी
#छोटे सुविचार मराठी | Suvichar Marathi
- विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री अखेरपर्यंत टिकत नाही. 10 छोटे सुविचार मराठी
- आपल्या शत्रुवर प्रेम करण्याऐवजी आपल्या मित्रांना थोडं अधिक सन्मानाने वागवा.
- तुमच्या नातेवाईकांची निवड नशिबाने केली आहे. मित्रांची निवड तुम्ही करा.
- मित्र कुणाला म्हणावं ? दोन शरीरात निवास करणारा एकच आत्मा.
- परिश्रम करून जो दमत नाही त्याच्याशिवाय इतरांशी देवदेखील मैत्री करीत नाहीत.
- समोर गोड बोलणाऱ्या परंतु दृष्टीआड होताच कार्याचा घात करणाऱ्या मित्राला दूध परंतु आत विष असलेल्या घड्याप्रमाणे त्याज्य समजावे.
- पाच वर्षे मुलाचे लाड करावे. दहा वर्षे होईपर्यंत केलेल्या चुकांबद्दल मार द्यावा, परंतु तो सोळा वर्षाचा झाल्यानंतर मात्र त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे.
- मैत्री वाईट बोलण्याने संपते.
- इंद्रियेच आपले शत्रू आहेत परंतु जर तुम्ही जिंकलेत तर ते तुमचे मित्र बनतील.
- जगात मनाशी नाते असलेली मैत्री एकमेव नाते असते.
- तुमच्या मित्राच्या चुका एकांतात सांगा परंतु त्याची स्तुती मात्र सर्वापुरा.
- मैत्रीसारखी जीवनात आनंद व उत्साह आणणारी दुसरी कोणती गोष्ट नाही.
- जो दुसऱ्याला कधीही त्रास देत नाही, दुखवत नाही तो खरा सज्जन असतो.
- सज्जन माणूस म्हणून जन्मास येणे हा योगायोग आहे. परंतु सज्जन माणूस
- म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई आहे.
- चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.
- सज्जनाचा राग कसा असतो ? पाण्यावर ओढलेली रेघ कशी ताबडतोब मिटून जाते सज्जनाचा राग तसाच तत्क्षणी शांत होऊन जात असतो.
- सज्जन परोपकाराचा, शूर शस्त्रांचा, कृपण धनाचा, कुलीन स्त्रिया अधोदृष्टीचा (मर्यादा पालन करणे) मरणोत्तरच त्याग करतात.
- या जगात तोडलेला वृक्ष पुन्हा फुटतो, क्षीण झालेला चंद्रसुध्दा (कलेकलेने) वाढतो. या विचारानेच सज्जन लोक खंत करीत नाहीत.
#आनंद सुविचार मराठी | आनंद सुविचार मराठी
- संतांनी भूतकाळाकडे व पाप्यांनी भविष्यकाळाकडे नजर ठेवावी. 10 छोटे सुविचार मराठी
- सज्जनांची निष्क्रीयता ही दुर्जनांसाठी पर्वणी असते.
- सज्जन व परोपकारी लोक वैभवाने गर्विष्ठ न बनता अधिकच नम्र होतात. (थोर गर्व न करी विभवाचा)
- ऋण, अग्नी आणि शत्रू यांचा थोडासा भाग शिल्लक राहिला तरी तो पुनः पुनः वाढू लागतो म्हणून त्याचा काही अवषेश ठेवू नये.
- गोड बोलणाऱ्याला शत्रू नसतो. 10 छोटे सुविचार मराठी
- बलवंताने दुबळ्या शत्रूची सुध्दा उपेक्षा करू नये. उदाः अग्नी लहान असला तरी जाळतो आणि विष कमी असले तरी मृत्यु येऊ शकतो.
- मोहासारखा शत्रू नाही.
- आळस हा माणसाच्या प्रत्येक चांगल्या कामाच्या आड येणारा प्रबळ शत्रू आहे.
- हितकारी शत्रू हा सुध्दा बांधवच.
- सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य आहे.
- शालीनता हाच स्त्रीचा एकमेव अलंकार आहे.
- सौंदर्य जर तुमच्या अंतःकरणातच नसेल तर सौंदर्याचा शोध घेण्यासाठी सर्व पृथ्वी पालथी घातली तरी ते तुमच्या हाती कधीच लागणार नाही.
- जग आणि जगातील सर्व वस्तू मूल्यवान आहेत; परंतु सद्गुणी स्त्रीच ही जगातील सर्वात मूल्यवान वस्तू आहे.
- सुयोग्य पत्नी म्हणजे कुटुंबाची शोभा व घराची लक्ष्मी असते.
- ज्या घरात अथवा कुटुंबात स्त्रियांचा आदर केला जातो तेथे देवाचे वास्तव्य असते.
- मातृदेवो भव अथवा त्वमेव माता च… यांत देखील प्रथम मातेचा उल्लेख आहे.
- जिच्यामध्ये अमृत व विष दोन्ही विद्यमान आहेत असा स्त्रीवाचून दुसरा पदार्थ जगात नाही. विषयासक्ताला ती अमृतासमान तर विरक्ताला विषाची वेल.
- पत्नी ही पतीची अर्धांगी होय. 10 छोटे सुविचार मराठी
- विश्व म्हणजे एक कोंदण आहे आणि स्त्री ही त्यातील अद्वितीय रत्न आहे. घि
#सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी
- स्वार्थत्याग, मूक सहिष्णूता, नम्रता, श्रध्दा व ज्ञान या गुणांची स्त्री ही सगुणमूर्ती आहे.
- स्त्री ही अहिंसेची मूर्ती आहे, अहिंसा म्हणजे अगाध प्रेम क्लेश सहन करण्याची अपार शक्ती, ती आईविना अन्यत्र अधिक कोठे दिसते.
- स्त्रियांनी सहजासहजी रागावू नये. त्यांनी सहनशील असावे. बाल्यावस्थेत माता पिता हेच त्यांचे संरक्षक असतात आणि युवावस्थेत त्यांना पतीचे संरक्षण लाभते.
- तरुण स्त्रीला नुसती नवऱ्याची बायको होऊन चालत नाही, त्याची मैत्रीण, त्याची बायको, त्याची मुलगी फार काय, प्रसंगी त्याची आईसुध्दा व्हावे लागते.
- स्त्रिया या घराला तेज आणणाऱ्या असून मंगलकारक, महाभाग्यवती व मान्य आहेत, त्या गृहलक्ष्मी होत. म्हणून त्यांची काळजी विशेष घ्यावी.
- विद्यार्थ्यांचे मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजे गुरुमाऊली होय.
- शिष्य कितीही विद्वान असला तरी गुरुजनांच्या हाताखाली वागताना त्याची विद्वत्ता मावळतेच.
- गुरुचा आदर करावा लागत नाही, तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो. 10 छोटे सुविचार मराठी
- गुरु तीन प्रकारचे असतात.
अ) अधिकार तैसा उपदेश करणार
ब) उपदेशाचा पाऊस पाडणारे
क) मौनाने उपदेश करणारे
- गुरु अव्यक्तमूर्ती आहे, वाटल्यास शब्दमूर्ती म्हणा.
- शिष्याच्या ज्ञानावर सही करणे एवढेच गुरुचे काम, बाकी शिष्य स्वावलंबी आहे.
- गुरु आपणास ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो. त्या ध्येये बनलेल्या ज्ञानाशी गुरु आपणास एकरूप करून टाकतो.
- शिक्षण हे जीवनाभिमुख व व्यवहारोपयोगी असावं, नुसते पुस्तकी नसावे.
- शिक्षण हे निश्चितच कौतुकास्पद होय. पण जे खरोखरच समजण्याच्या पात्रतेचं आहे ते कधीच शिकवता येत नाही. याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
- जीवनाची उमेदवारी म्हणजे शिक्षण !
- शिक्षण म्हणजे सत्संग.
- माणसानं शिक्षणाला रामराम केला की तोही संपला.
- शिक्षणाची मुळं कटू असतात पण त्याची फळं मात्र मधुर असतात.
- शिक्षण अंधाऱ्या रात्री चालावयाचा प्रकाशमय कंदील होय.
- चारित्र्य विकास हे सर्वात मोठे शिक्षण.
- 10 छोटे सुविचार मराठी
#शालेय सुविचार मराठी छोटे | शालेय सुविचार मराठी छोटे
- उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे की, जे प्राप्त झाल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्यतत्पर होतात.
- शिक्षक हा मार्गदर्शक आहे.
- शिक्षक हा वयाने वृध्द असला तरी मनाने तरुण असतो.
- साऱ्या सद्गुणांचा, सद्भावनांचा, सद्विचारांचा, सुसंस्कारांचा प्रवाह हा शिक्षकापासून सुरू होतो.
- कवी हा जन्मजात कवी असतो. तो बनवून तसा होत नाही.
- समीक्षक म्हणजे पाय नसलेला माणूस जो इतरांना पळायला लावतो.
- काव्याचा जन्म प्रेमातून होतो. प्रेम असेल तर संपूर्ण जीवनच काव्यमय बनते.
- कवी हा असा आहे की, ज्याच्याजवळ मनुष्याच्या आंतरिक गूढ भावनांनी जागृत करण्याचे सामर्थ्य असते.
- निष्कर्ष कधीच निरपेक्ष नसतात. ते नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतात. आपल्या विचारांशी ते सुसंगत असले तर आपल्याला ते सत्य वाटतात.
- वाचनासाठी वेळ काढा, तो शहाणपणाचा निर्झर आहे.
- जो लाभ व्यायाम केल्याने शरीराला होतो तो लाभ वाचन केल्याने मनाला होतो.
- कोणत्याही वाचनापेक्षा गाणं हेच स्मृतीमध्ये अधिक काळ राहते.
- विचारांना वाचनाने सहजच सहकार्य मिळते.
- वाचन हे मनाचे खाद्य आहे.
- आळस आणि अतिझोप हे दारिद्र्याला जन्म देतात
- जिज्ञासा, कौतुकवृत्ती यात साहित्याचा आत्मा आहे.
- गोष्ट, कविता, लघुनिबंध लिहावयास एकांत लागतो.
- साहित्याने दिलेली गोष्ट म्हणजे काहीतरी व्यक्त करण्याची विलक्षण खवखव लेखकाला जन्मापासून मरेपर्यंत असते.
- साहित्य जरूर संस्कार करते, पण विशिष्ट चाकोरीतले तत्त्वज्ञान शिकवीत नाही.
- पुस्तके ही तारुण्यात मार्गदर्शन करतात आणि म्हातारपणात मनोरंजन करतात.
- विचारांच्या युध्दात पुस्तक हेच शस्त्र आहे.
- पुस्तके ही जीवनरूपी समुद्रात दीपगृहाचे काम करतात.
- पुस्तक ही जागृत देवता आहे तिची सेवा करणाऱ्यास तात्काळ वरदान प्राप्त होते. 10 छोटे सुविचार मराठी
सुविचार संग्रह मराठी अधिक वाचा
#जीवनावरील मराठी सुविचार | जीवनावर मराठी सुविचार
- पुस्तक ही खिशातील बाग. 10 छोटे सुविचार मराठी
- बुध्दी ऐरण आहे आणि ज्ञान घण आहे, जितके जीवनाचे अनुभव बुध्दीवर पडतात. तितकी ती चमकते.
- ज्याच्याजवळ बुध्दी तोच अधिक बलवान निर्बुध्दाजवळ कसले बळ?
- ज्याची बुध्दी संकटात खचत नाही त्याला अशक्य असे काही नाही.
- प्रत्येक माणसाची बुध्दी निराळी असते. प्रत्येक मुखातून येणारी भाषा वेगवेगळी असते.
- बुध्दी ही शक्तीपेक्षा केव्हाही श्रेष्ठच. 10 छोटे सुविचार मराठी
- बुध्दी असली म्हणजे धन मिळते असे नव्हे आणि बुध्दी मंद असली म्हणजे दारिद्र्य येते हेही खरे नाही, लोकव्यवहार चतूर पुरुषांनाच समजतो इतरांना नाही.
- आपल्या अत्यंत विनम्र शिष्याची बुध्दी अत्यंत सुक्ष्म करून देणे म्हणजेच गुरुकृपा होय.
- सत्त्वहीन बुध्दी म्हणजे निव्वळ स्त्रीत्व मानलेले आहे आणि अनितीने युक्त असलेले सत्त्व म्हणजे पशुत्वच, पौरुष नव्हे.
- आपत्तीचा काळ जवळ आला म्हणजे प्रायः पुरुषांची बुध्दी झाकाळून जाते.
- जो अभ्यास करतो, लिहितो, निरीक्षण करतो, विचारतो आणि पंडिताचा आश्रय घेतो त्याची बुध्दी सूर्यकिरणांनी उमलणाऱ्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे विकास पावते.
- हत्तीवर बसून माहुताने वाजविलेला नगारा, आवाज करून जणू काही घोषणा करीत असतो की हत्तीची अशी दशा होण्याचे कारण एकच ते म्हणजे – ‘बुध्दी ही शक्तीपेक्षा केंव्हाही श्रेष्ठच.’
- मानसिक म्हातारपण आले की माणसाची बुध्दीही त्याला सोडून जाते.
- विवेकाशिवाय ज्ञान संभवत नाही. 10 छोटे सुविचार मराठी
- ज्याला स्वतःची बुध्दी नाही त्याला शास्त्र काय करणार? बुध्दीचा अर्थ चातुर्य किंवा शहाणपणा हे पुस्तकी ज्ञानाने प्राप्त होत नाही.
- बुध्दिवंतांना अगम्य असे काय आहे.10 छोटे सुविचार मराठी
- जवळ आलेल्या संकटामुळे गोंधळून जाऊन माणसाची बुध्दी साधारणपणे नष्ट होते.