[11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे 

[11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

नमस्कार मित्रांनो मराठी सुविचार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आमचे सुविचार आवडतील हे नक्कीच लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना मित्र मैत्रिणी शेअर करा

[11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

#छोटे सुविचार || मराठी छोटे सुविचार 

स्तुती करणारा व करून घेणारा हे दोघेही बिघडतात. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

स्तुती करणारा मनुष्य स्वतःच्या गुणग्राहकतेवर खुश होतो. ती खुशी त्याचा अहंकार वाढवते. त्याचप्रमाणे ज्याची स्तुती केली जाते त्याला त्याच्या क्षमतेबद्दल, गुणांबद्दल अहंकार याच्या आहारी गेलेला माणूस अति आत्मविश्वासाने त्यांच्यातील माणुसकीचा अंश कमी होतो.

झेप असावी गरुडाची, नजर असावी ससाण्याची, जिद्द असावी फिनिक्स पक्षाची!

गरुडाच्या झेपेचा आवाका मोठा असतो. म्हणून गरुडाच्या झेपेसारखे उत्तुंग ध्येय असावे. ससाण्याची आपल्या लक्ष्यावरची नजर तीक्ष्ण असते. त्याच्या तावडीतून लक्ष्य सुटत नाही. त्याप्रमाणे माणसाने आपल्या ध्येयप्राप्तीच्या बाबतीत पूर्ण लक्ष्य एकवटून प्रयत्न केले पाहिजेत. फिनिक्स पक्षी त्याच्या राखेतून पुन्हा उभारतो असे म्हणतात. त्याप्रमाणे ध्येय प्राप्तीसाठी येणाऱ्या अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने प्रयत्न करत राहिले पाहिजे.. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

• बुद्धिमत्ता आणि प्रतिभा या हिन्ऱ्यांचे सुंदर कोंदण म्हणजे नम्रता.

हिरा सुंदर, तेजस्वी असतो. परंतु त्याला सोन्याचे कोंदण मिळाले तर त्या कोंदणात हिरा अधिक उठून दिसतो. त्याप्रमाणे माणसाची बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ज्याच्यामुळे नवनवीन कल्पना साकारतात. जगामधील नवनिर्मितीचे कारण बुद्धिमत्ता आणि प्रतिभाशक्ती. त्यांच्या क्षमतेमुळे झालेल्या निर्मितीमुळे त्या शोभून दिसतात. म्हणजेच ती व्यक्ती शोभून दिसते. परंतु अशी व्यक्ती अहंकारी असण्यापेक्षा नम्र असेल तर तिला अधिक आदर प्राप्त होतो. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

सुविचार मराठी संग्रह

• राग गिळणे याला माणुसकी म्हणतात.

 राग फक्त माणसालाच येतो असे नाही. पशुंनादेखील राग येतो. परंतुमाणूस आणि पशू यांच्यामध्ये राग व्यक्त करण्यामध्ये फरक आहे. पशू राग आल्यावर विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे आहे त्या स्वरूपात व्यक्त करतात. परंतु माणूस विचार करू शकतो. त्यामुळे राग व्यक्त केल्यामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करून तो व्यक्त करणे चांगले. माणूस विचार करून रागावर नियंत्रण करू शकतो. राग गिळणे म्हणजेच राग नियंत्रित करणे जी माणसाची ओळख आहे. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

• ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवा म्हणजे कर्तृत्वाचा प्रकाश पडेल.

नंदादीप म्हणजे अखंड तेवत राहणारा दीप. त्याचप्रमाणे आपले जे ध्येय आहे ते माणसाने कायम ध्यानी, मनी ठेवले पाहिजे. जेथे पोहोचायचे असेल ते सारखे मनावर ठसले तरच माणूस ते मिळविण्यासाठी प्रयत्नदेखील करत राहतो. त्याच्या प्रयत्नातून त्याचे कर्तृत्व दिसून येते.

[11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

Good Morning short suvichar || चांगले सुविचार मराठी छोटे 

• स्वतःच्या वाट्याला कितीही काटे आले तरी दुसऱ्याला सुखद फुले देणे हे माणुसकीचे लक्षण आहे. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

स्वतःला कितीही दुःख भोगावे लागले, कष्ट सोसावे लागले, संकटांचा सामना करावा लागला, समस्यांना सामोरे जावे लागले तरी ते सर्व सहन करून इतरांना सुखाचे जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करणे म्हणजे माणुसकी. दुसऱ्यांसाठी जगणारे लोक या जगाच्या पाठीवर फार थोडे असतात.

• घर म्हणजे भिंती नव्हेत, घर म्हणजे नाती नव्हेत, घर म्हणजे प्रेम- जिव्हाळा. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

घर कशाला म्हणायचे? चार भिती, छप्पर, सर्वसोई, फर्निचर यांनी युक्त असणारी इमारत म्हणजे घर नव्हे. त्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या नात्यांनी बांधलेले लोक एकत्र राहणे म्हणजे देखील घर नव्हे. घर भिती, नाती यांच्यामध्ये प्रेमाचे जिव्हाळ्याचे बंध असले तर ते घर टिकून राहते. नाहीतर चार भिती आणि चार माणसे एकत्र राहून धर्मशाळा देखील होते.

जो घाव घालतो तो विसरतो पण ज्याच्या कपाळी घाव बसता त्याला विसर पडत नाही.                          

झाडावर कुऱ्हाड चालविणारा लाकूडतोड्याला झाडावरच्या घावाचे दुःख कळत नाही. त्याला फक्त झाड तोडायचे असते. त्रास देणारा व त्रास सहन करणारा यांच्यामध्ये त्रास सहन करतो तो कधीच त्रास विसरू शकत नाही. परंतु त्रास देणाऱ्याला काहीच सहन करावे लागत नाही, दुःख सोसावे लागत नाही त्यामुळे तो दुसऱ्याला दिलेला त्रास सहजपणे विसरून जातो. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

* क्रोध म्हणजे गांधील माशीच्या मोहळावर फेकलेला दगड.

गांधील माशीच्या मोहळावर दगड मारला तर त्या सर्व माशा रागाने चवताळून उठतात व जे दिसेल, ज्याच्यावर बसतील त्या सर्वांना दंश करतात. त्यामध्ये त्यांच्याही जिवाशी गाठ पडते परंतु रागाच्या भरात मृत्यूचीही त्यांना फिकीर नसते. तसेच माणसाचा क्रोध असतो. या क्रोधाच्या भरात माणूस कोणत्याही नुकसानाची किंवा दुष्परिणामांची फिकीर करीत नाही.

* समाधान हे घरातील सुख आहे.

साधारणतः ऐश्वर्य, मालमत्ता, घरदार, नोकरीतील हुद्दा किंवा पद, व्यवसायातील यश यामध्ये सुख आहे अशी आपली समजूत असते. परंतु ते सर्व क्षणिक आहे. जे क्षणिक आहे त्यामधून आपणासाठी कायमस्वरूपाचे सुख मिळत नाही. परंतु माणूस आपल्याला लाभलेल्या परिस्थितीशी आनंदाने जमवून घेतो तेव्हा त्याच्या मनाला समाधान लाभले. समाधान पैशाने न मिळविता येणारे सुख आहे. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

#उत्तम चांगले सुविचार || मराठी छोटे सुविचार 

* कला ही जीवनाची सावली आहे.

जीवन म्हणजे सुखदुःखाची चढाओढ असते. जीवनावश्यक अन्न, वस्त्र, निवारा मिळविण्यासाठी माणसाला खडतर प्रयत्न करावे लागतात. जीवनातील दुःख, खडतर प्रयत्न, संकटे, समस्या यांना तोंड देण्यात माणूस थकून जातो. या सर्व धकाधकीमध्ये विविध प्रकारच्या कला माणसाच्या मनाला विसावा देतात. त्याचा थकवा, कंटाळा घालवितात. त्याच्या आयुष्यातील रुक्षपणा, रखरखीतपण कलांच्यामुळे कमी होतो. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

* भय आणि जय हे एकमेकांचे वैरी आहेत.

ज्या माणसाला नवीन काही करण्याची, स्वीकारण्याची तयार नसत.त्याच्या मनात अपयशाची भीती असते. ही भीती त्याला कोणतीही कृती करण्यापासून थांबविते. जो पर्वत चढताना पडण्याची भीती बाळगतो, तोपर्यंत चढायला तयारच होत नाही. त्याला पर्वतावर पोहोचण्याचे यश मिळत नाही. त्यामुळे ज्याला आयुष्यात यशस्वी व्हावयाचे आहे त्याने मनातून भीती काढून टाकणे आवश्यक आहे. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

Join Marathi blogging course https://courseinmarathi.com/

* जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलतच नाही.

उद्यान फुलविण्यासाठी त्याची निगराणी केली पाहिजे. पुरेसे पाणी, सूर्यप्रकाश, खत घातल्याशिवाय बाग फळत नाही, फुलत नाही. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून विद्वत्ता मिळवायची असेल तर त्यासाठी अखंड कष्ट केले पाहिजेत. अभ्यास केला पाहिजे. अविरत ज्ञान मिळवीत राहिले पाहिजे. जशी वैविध्यपूर्ण फळेफुले असतील तर बाग शोभते तशी वेगवेगळ्या विषयांची सखाले माहिती करून घेतल्याने ज्ञानसंपन्नता येते.

*काया, वाचा, मनाने दुसऱ्यास त्रास देणे म्हणजे हिंसाच आहे.

आपल्याला हिंसा या शब्दाचा खूपच मर्यादित अर्थ माहिती आहे. कोणालाही शस्त्राचा वापर करून ठार मारणे यालाच आपण हिंसा म्हणतो. परंतु कोणाच्याही शरीराला, मनाला त्रास देण्यासारखे शब्द वापरण्यासाठी वाणीचा वापर करणे तसेच दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करणे, द्वेष करणे यांसारख्या भावना मनात उत्पन्न होणे म्हणजे देखील हिंसाच आहे. त्यामुळे शरीराने, मनाने व वाणीने दुसऱ्यांना त्रास देऊ नये.

[11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

* भव्य विचारांचा सुगंध दूरवर जातो.

सुगंधी फुलांना त्यांच्या सुगंधाचा प्रसार मुद्दाम करावा लागत नाही. वारा या फुलांचा आपणहून दूत बनतो व तो सुगंध दूरवर वाहून नेतो. तसेच भव्य, उदात्त, चांगले विचार लोकांना आवडतात, पटतात. जे त्यांचा स्वीकार करतात त्यांच्यातर्फे ते देशविदेशामध्येसुद्धा त्यांचा प्रसार होतो. सुगंधी फुलांप्रमाणे भव्य विचारदेखील दूरपर्यंत पोहोचतात.

#आत्मविश्वास सुविचार मराठी || मराठी छोटे सुविचार 

* यशाचे मधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र प्रकाशला पाहिजे.

चंद्र स्वयंप्रकाशी आहे. चांदण्या मात्र प्रकाशने चंद्रावर अवलंबून असते. तसे यश फक्त इच्छा, अपेक्षा बाळगून, स्वप्न पाहून मिळत नाही. त्यासाठी पहिल्यांदा ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्याच्या दृष्टीने कठोर परिश्रम मनापासून केले पाहिजेत. प्रयत्न करणे हे माणसाच्या हाती असते. यश मिळणे प्रयत्नांवर अवलंबून असते. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

• विद्या ही कामधेनूसारखी असते.

इच्छिलेले सर्व देणारी म्हणजे कामधेनू, विद्या म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असणारी आहे. नातलग, मित्र, उद्योग व्यवसाय, पैसा, यश, कीर्ती, मानसन्मान हे सर्व मिळण्यासाठी विद्या हे महत्त्वाचे साधन आहे. विद्वान माणूस सर्वत्र पूजला जातो. विद्याप्राप्तीशिवाय माणूस म्हणजे पशू आहे. फक्त त्याला शेपूट व शिंग नाही.

• अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा आहे.

विहीर, तलाव खोदण्यासाठी पहिल्यांदा वर दिसणारा कठीण खडक आधी कष्टाने फोडावा लागतो. नंतरच खाली पाण्याचे झरे लागतात. तसेच ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करूनही बऱ्याच वेळेला अपशय येते. अपयशाने निराश न होता, जिद्द न सोडता, न कंटाळता पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिले असता कधी ना कधी यश येतेच. आपले ध्येय आपण प्राप्त करू शकतो. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

• विचारांचा दिवा विझतो तेव्हा आचार आंधळा बनतो.

बोलणे आणि कृती करणे यासाठी आधी विचार करावा लागतो. काया, वाचा व मन यांच्यामध्ये न दाखविता येणारा बंध असतो. बुद्धीचा यांच्यावर प्रभाव असतो. माणस जसा विचार करतो त्याप्रमाणे आचरण करतो. जर त्याची विचार प्रक्रियाच थांबली तर त्याला काय, केव्हा व कसे वागावे याविषयी निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी त्याला दुसऱ्याच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. [11+] Marathi Suvichar short || मराठी सुविचार छोटे

• श्रद्धा ही वज्रासमान मानसिक शक्ती आहे.

वज्र म्हणजे कठीण. त्यामुळे ते मोडणे अशक्यच. श्रद्धा माणसाला मनाची शक्ति देते. जेवढे श्रध्दा अढळ तेवढी मनाची शक्ति प्रबळ.दगडावर असणारी अढळ श्रध्दा त्याला देव बनविते. त्याच्यामध्ये दैवी सामर्थ्य निर्माण करते. मनाला उभारी असते तोपर्यंत माणूस आशेने जगत असतो. परंतु ही मानतील जगण्यावरची श्रध्दा संपते त्यामुळे माणसाचे आयुष्य थांबते. 

Treading

More Posts