[50+] Suvichar || Best marathi suvichar

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आपले Marathi Quotes मध्ये स्वागत आहे. तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारी सुविचार ह्या मध्ये मिळतील.तर लगेच आपल्या मित्र मैत्रिणीला आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा.

#Marathi Suvichar || मराठी सुविचार

​सुख हे द्रव्यावर अवलंबून नसते.

वस्तू बदलत नाहीत, आपण स्वतः बदलत असतो.

​आकाशातील ताऱ्यांना हात लावता येत नाही हे मूर्खालाही कळते तरीही शहाणी माणसे हा प्रयत्न सोडून देत नाहीत.

​जे प्रेम काही मागणी करत नाही, फक्त देत जाते त्या प्रेमालाच खरे प्रेम मानावे.

​कार्यात चुका होतील म्हणून कार्य करणे स्थगित करू नये.

​व्यक्तिविकासासाठी शारीरिक आणि मानसिक ही दोन्ही प्रकारची शिस्त असणे जरूर असते.

​सोन्याची परीक्षा अग्नीत होते आणि मित्राची परीक्षा आपत्तीत होते.

​उच्च शिक्षण कोणते? ज्यामुळे माणूस नम्र, परोपकारी व ​कार्यतत्पर बनतो, तेच उच्च शिक्षण

​कावळा मंदिराच्या कळसावर बसला म्हणून भक्त होत नाही.

​परोपकार केल्यामुळे माणसाच्या आत्म्याची उन्नती होते व तो आनंदी होतो.

​माणूस समाजामुळे घडतो आणि समाज माणसामुळे घडतो.

​सतत उद्योग हा मित्र असतो आणि आळस हा माणसाचा शत्रू असतो.

आळस म्हणजे जिवंतपणी मृत्यू आणि सतत कार्य म्हणजे संजीवनी मंत्रच.

व्यसनांचा हव्यास म्हणजे आयुष्याचा सत्यानाश !

​एखाद्या गोष्टीचे ज्ञान सहज होते, पण अनुभवाशिवाय ज्ञानाची पारख होत नाही.

​जो मद्याकडे झुकला तो सुखाला मुकला.

बिकट परिस्थितीला जो हसत खेळत तोंड देतो तोच थोर गणला जातो.

​अनेक हक्क मागून मिळत नाहीत, ते झगडा करूनच मिळवावे ​लागतात.

​असाध्य ते साध्य । करिता सायास | ​कारण अभ्यास ।

​अमनुभवरूपी शिक्षक आधी परीक्षा घेतो व नंतर शिकवतो.

Suvichar
Suvichar

​दरिद्री लोकांना तुमचे प्रेम व सेवा हवी असते, सहानुभूती नको ​असते.

​माणसांपेक्षा मला पुस्तकांचा सहवास आवडत.

​हक्काचा आग्रह जरूर धरा पण कर्तव्य विसरू नका.

प्रतिभावंत चित्रकाराच्या हातामागे त्याची बुद्धी व मेंदू असतो

​तुम्ही नेहमी कला आणि कलाकार यांचे कौतुक केले पाहिजे.

स्वरूपवान स्त्री आणि द्रव्याचा साठा यापासून सावध राहा. दोन्ही गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत.

विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षार्थी होऊ नये, खऱ्या ज्ञानाचा संचय ​करावा.

जन्म आणि मृत्यू या दोन मुक्कामातील अंतर म्हणजेच आयुष्य होय.

अवघड विषयाकडे दुर्लक्ष नको. तो विषय पुनःपुन्हा वाचा व ​समजून घ्या.

तुमचा आवाज चढला म्हणून दुसरा आवाज नष्ट होत नाही. ​शांतता पाळल्यामुळेच दुसरा आवाज बंद होतो.

​माणसातील नम्रता संपली म्हणजे त्याच्याजवळची माणुसकीही संपते.

​जगातील ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेची खिडकी उघडी ​ठेवा.

​चंदनाचे झाड तोडले, कापले तरी ते सुगंध देतच राहते.

​धनदौलत संपली तरी चालेल, पण समय हरवू नका. समयाचा योग्य उपयोग करणाऱ्याकडे धन, कीर्ती आणि वैभव चालत येते.

जेथे ऐक्य असते तेथेच सामर्थ्य आणि शक्ती यांचे दर्शन होते.

मानवाने मानवावर प्रेम करणे हाच जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

​जीवनाचे माप सुखाने भरलेले नसते. जीवनाचे माप सततच्या कार्याने व उद्योगाने भरले जाते.

साक्षरता ही ज्ञानभांडाराची किल्ली आहे.

ज्याला शहाणा होण्याची गरज असते तोच शिक्षणाने शहाणा होतो.

सर्वच जुने सोने समजल्यास नवीन सुधारणा कधी होणारच नाही.

Suvichar

​कार्याबद्दल प्रेम असल्यास कामाचा कधी कंटाळा येत नाही.

​मानवता हा जन्मसिद्ध हक्क आहे. तो प्रत्येकाने मिळवलाच ​पाहिजे.

​माता, पिता, गुरू आणि राष्ट्र यांची सेवा म्हणजेच ईश्वराची ​सेवा असते.

कोकिळेचे सौंदर्य तिच्या रूपात नसते तर तिच्या गोड आवाजात असते.

​दुसऱ्याचे अवगुण पाहू नका. त्याच्याकडचे चांगले व सुंदर गुण पाहा.

​दारिद्र्य हे आळसाचे बक्षीस असते.

​आनंदी स्वभाव आणि सात्त्विक समाधान यामुळेच व्यक्तीचे ​सौंदर्य वाढते.

​स्वर्गापेक्षा मी उत्तम पुस्तकाचे स्वागत करतो. कारण पुस्तक ज्या ठिकाणी असेल तेथे स्वर्ग निर्माण होईल.

फुले जरी एखाद्याने पायदळी तुडवली तरी ती चुरगळलेली फुले त्याच्या पायांना सुगंध

​अहिंसा म्हणजेच नम्रता, मर्यादशीलता आणि अभिमानाचा अभाव.

सुख, समाधान आणि सुरक्षित वाटणे या गोष्टी आपल्या विचारावरच अवलंबून असतात.

​द्रव्यापायी नातीगोती, मैत्री तुटते हे लक्षात ठेवा.

झालेली चूक प्रामाणिकपणे मान्य करा व ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या.

ज्याप्रमाणे फार उन्हाळ्यात दूध नासते त्याप्रमाणे क्रोधामुळे स्नेह नासून जातो.

​ईश्‍वराचे भक्त व दास होण्यात जो आनंद आहे तो आनंद जगाचा सम्राट होण्यातही नाही.

​ज्ञान हा माणसाचा तृतीय नेत्रच आहे.

क्रोध हा माणसाला नेहमी पदभ्रष्ट करतो.

​आळस करण्यात प्रारंभी सुख वाटते पण आळसाचा शेवट दुःखात होतो.

​चव ही जीभेची नसून मनाची असते.

ज्याचा काही उपयोग नाही असे जीवन म्हणजे जिवंत मृत्यूच असतो.

Suvichar
Suvichar

​प्रीती आणि पराक्रम हे दोन जीवनाचे नेत्र आहेत. Suvichar

​स्वार्थरहित बुद्धीने केलेले कर्तव्य कधीही व्यर्थ जाणार नाही.

​जिज्ञासू वृत्ती चांगली असते पण अती चौकशी टाळा.

अपयशरूपी चिखलात पाय रोवल्याखेरीज यशाचे कमळपुष्प हाती येत नाही.

जुगार म्हणजे एकाचा तोटा तर दुसऱ्याचा फायदा.

रक्ताच्या नात्यापेक्षा मनोमन जुळलेली नाती श्रेष्ठ असतात.

वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका. Suvichar

​धर्म आयुष्यहून वेगळा आहे. आयुष्यासच धर्म मानायला हवे

तोंडातून बाहेर पडलेला शब्द व निघून गेलेला वेळ कधीही ​परत येत नाही.

​दोष लहान, मोठा असला तरी तो दोषच असतो. आपल्यामध्ये ​दोष नाहीच असे मानणे म्हणजे स्वत:ला फसवणे आहे.

रोगरहित सशक्त मुले ही राष्ट्राची संपत्ती असते.

​विद्या नसेल तर माणसाला स्वत:ची ओळख होऊ शकत नाही.

जो खूप शिकेल तो सूर्यासारखा चमकून दिसेल.

​आपण जगू किंवा मरू तरीही आपली लढाई चालूच ठेवली ​पाहिजे.

​उत्कर्षरूपी इमारतीचा पाया शिक्षण हाच असतो.

तर मित्रांनो marathi quotes कसे वाटले मला खात्री आहे तुम्हाला आवडलेच असतील. तर मित्रांनो वाट कसली बघताय लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment