आपल्या जीवनात सुविचारांचे महत्व
अनन्यसाधारण आहे एक सुविचार ऐखाध्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकण्यास साहाय्यभूत ठरू शकते.सुविचारातुन कोणाला प्रेरणा मिळते कोणाला जगण्याची कला अवगत होते तर कोणाला जीवनात संदेश मिळतो. शालेय जीवनात जर विद्यार्थ्यांना सुविचारांचे वाचन व त्या सुविचारांवर चिंतन करण्याची सवय लावली तर त्यांच्या वैयक्तिक जडण-घडणीत याचा पुरेपूर फायदा होईलच.शिवाय सुविचारांच्या माध्यामातून संस्कारही होतील.Suvichar Marathi
● भाषा म्हणजे विचारांनी परिधान केलेला पोषाख
● चांगला मनुष्य हाच उत्तम मित्र असतो,असा मित्रा लवकर जोडावा,दीर्घकाळ टिकावावा आणि त्यांची मैत्री कधीच सोडू नये.
● ज्याचे मन समाधानी असते. त्याला सर्व प्रकारचे वैभव मिळल्यासारखे आहे .
Suvichar Marathi/सुविचार मराठी
● आपल्या भरभराटीच्या काळात मित्र आपणाभोवती.गोळा होतात. पण विपतिच्या काळात मित्रांची परीक्षा
होत असते.
● देव नेहमी शुरावर कृपा करते.
● फसवणूक करणारा प्रथम स्वतःला फसवतो. व ही त्याची सर्वात मोठी फसवणुक असते.
● कोणत्याही माणसाला योग्य ते शिक्षण घेतल्यानंतर मानव म्हणता येईल.शिक्षणाशिवाय मनुष्य म्हणजे केवळ प्राणी.
● चेष्टामस्करी करतानाही आपण मित्राला दुखावता कामा नये.
Suvichar Marathi/सुविचार मराठी
● ज्याचे स्वतःवरच नियंत्रण नसते तो स्वतंत्र असू शकत नाही.
● मोडलेली मैत्री येईल पण ती पक्की राहणार नाही.
● जो सर्वांशी मैत्री करायला बघतो,तो कोणाचाच मित्र नसतो.
● देवामुळे नातेवाईक लाभतात पण आपले मित्र आपण निवडू शकतो.
● पुढे येणारा काळ आजच येऊन ठेपला आहे असे समजून शहाणा मनुष्य सर्व तरतूद करत असतो.
● सन्मान आणि नफा हे एकाच पोत्यात सापडत नाहीत.
● लोभीपनाची अपत्य आणि उधळपट्टीचा पिता सापडत नाहीत.
● प्रतिभेचा पोषण उद्यमशीलतेने होते.Suvichar Marathi
● प्रतिभा म्हणजे कमालीचे परिश्रम करणाऱ्याची अखंड आवड होय.
● जे स्वतःला मदत करतात, त्यांनाच परमेश्वर मदत करतो.
● जो मनुष्य दक्षता बाळगून सर्वत्र लक्ष ठेवतो, कोणताही निर्णय सावधतेने व
प्रामाणिकपणे घेतो, तो नकळतच प्रतिभावंत होतो.
● विद्या ही सोन्या सारखी आहे, कारण विधेने प्रतिष्ठाही वाढते आणि लाभही
होतो.
● नुसती चांगली कृती करून उपयोग नसतो, ती योग्य रीतीनेच करायला हवी.
● या जगात वाईट गोष्टीमुळेच चांगुलपणाचा ही अनुभव येतो.
● शहाणा मनुष्य कोणालाही आपल्यावर नियंत्रण ठेऊ देत नाही किंवा
दुसर्यावर ताबा मिळवायचं प्रयत्न करीत नाहीत.
Make your online blooging courses
Suvichar Marathi/सुविचार मराठी
● कोल्ह्याला जेंव्हा द्राक्षापर्यंत पोहोचता येत नाही नाही. तेव्हा तो ती आंबट
आहेत असे म्हणतो.
● एक चांगले सुविचार वाचल्यानंतर मिळणारे ज्ञान एका वर्षाच्या अनुभवाच्या बरोबर असते. Suvichar Marathi
● लहान दुःखे बोलकी असतात अन् मोठी दुःखे मुकी असतात.
● स्वतः केलेल्या गुन्ह्याबद्दल त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची जगाची रीत असतेच.
● जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्यालाच खऱ्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे.
● द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्यास या जगात. ● द्वेषाचा शेवट कधीच होत नाही. द्वेष घांबवायचा असेल तर तो प्रेमाने थांबवता येतो.
● इतरांना आपले सुख वाटणे यातच खरे सुख असते.
● मूर्ख मनुष्य दूर कोठेतरी सुख शोधतो, शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळच निर्माण करतो.
● खरे सुख वास्तविक फार स्वस्त असते.पण खोट्या सुखाच्या मागे लागून आपण खूपच खर्च करत असतो.
● ज्याने संपत्ती निर्माण केली नाही त्याला त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही. त्याला त्या सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही.
● दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य सुखी होऊ शकत नाही.
● सुखी जीवन हे नेहमीच शांतपणे घालवलेले असते.
● मनुष्याची जितकी कल्पना असते तितका तो सुखीही नसतो आणि दुःखीही नसतो.
● केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास घेतला तर ते तुम्हाला मिळणार नाही.तुम्ही कर्तव्यपालन करून त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न. केल्यास सावलीप्रमाणे ते सुख तुमच्या मागोमाग गावंढळपणा व असभ्यतेचेच लक्षण आहे.
Suvichar Marathi/सुविचार मराठी
● घाई आणि यश यांची वाटचाल एकत्र होत नाही.
● द्वेष हा अग्नीसारखा असतो, ज्याप्रमाणे अग्रीमुळे साधा कचराही घातक ठरतो; त्याप्रमाणे द्वेषाने नुकसान होऊ शकते.
● नुसते जगणे म्हणजे जीवन नव्हे आरोग्यमय आयुष्य म्हणजे जिवंतपणा.
● मिताहार हाच तुमचा वैद्य.
● आपले चित्त प्रसन्न असेल तर हवामानही प्रसन्न वाटते.
● स्वतः दीर्घायुषी बनण्याची जो सतत काळजी करतो त्याला जीवनात फारशी शांतता लाभत नाही.
● उत्तम मनःसामर्थ्य हे उत्तम प्रकृती असलेल्यालाच मिळू शकते. बलिष्ठ शरीराची शोभा म्हणजे बळकट मन परंतु,चळकट मन असण्यासाठी निरोगी शरीर असणे अत्यंत जरूर आहे.
● अंतःकरणाच्या हालचाली बुद्धीला अगम्य असतात.
● जे अंतःकरणातून बाहेर येते ते अंतःकरणालाच जाऊन भिडते.
● आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधार आहे.
● जगाच्या इतिहासात ज्याचे विचार कालाच्या पुढे राहिले, त्याला पाखंडी म्हणण्यात आले.
● चाकराला आपला धनी, शूरवीर किंवा मोठा आहे असे कधीच वाटत नाही.
● आपले घर कसेही असले तरी घराची उणीव भरून काढेल असे दुसरे कांहीही नसते.
● पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी ओझे आणि तिसऱ्या दिवशी त्रासदायक मनुष्य अशी असते पाहुणचाराची कया.
● राजा असो किया रंक, ज्याच्या घरात शांतता आहे, तोच सर्वात सुखी मनुष्य,
● प्रामाणिकपणा हे सुंदर रत्न आहे, पण बाजारात त्याची चलती नाही.
● प्रामाणिक मनुष्य ही परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती असते.
● कोणत्याही प्रामाणिक व्यक्तीला आपल्या
प्रामाणिकपणाबद्दल कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. Suvichar Marathi
suvichar Marathi/सुविचार मराठी
● मान-सन्मानापासून मनाला ज्या जखमा होतात, त्या आपणच करून घेतलेल्या असतात.
● सन्मान प्रत्यक्ष मिळविण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते.
● फक्त एक माणूसदेखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकेल, पण वीस माणसांनीही प्रयत्न करून ते घोड्याला त्याच्या इच्छेविरुद्ध पाणी प्यायला लाऊ शकणार नाहीत
● दुःखात घालवलेला एक तास, आनंदात घालविलेल्या संबंध दिवसाइतका भासतो.
● नम्रतेचा गुण मिळविल्याखेरीज कोणाला कांहीच शिकता येणार नाही.
● ज्या गोष्टींशी आपला संबंध नसतो, त्या गोष्टी आपल्याला नेहमीच गमतीदार व विनोदी वाटतात.
● भूक ही तलवारीपेक्षा धारदार असते.
● तोंडावर स्तुती करणारे आणि पाठीमागे निंदा करणारे हे एकाच माळेचे मणी असतात.
Suvichar Marathi/सुविचार मराठी
● जेथे अज्ञानात सुख आहे, तेथे ज्ञान मिळविणे हाच मूर्खपणा ठरतो.
● मनुष्याचे मन हे पॅरॅशूटसारखे आहे,ते उघडे केले तरच कार्यप्रवण होते.
● साचलेल्या डबक्यात ज्याप्रमाणे आपोआप किडे तयार होतात त्याप्रमाणे काहीच काम नसलेल्या रिकाम्या मनात वाईट विचार उत्पन्न होतात.
● ज्ञानापेक्षा कल्पनाशक्तीला जास्त महत्त्व आहे.
● अशक्य हा शब्द फक्त मूर्खाच्याच शब्दकोषात सापडू शकतो.
● तुमच्यापाशी बुद्धिमत्ता व प्रतिभा असेल तर उद्योगप्रियतेतुळे ती आणखी वाढेल.तुमची कार्यक्षमता मध्यम प्रकारची असेल
तर उद्योगामुळे त्यातील उणीवा दूर होतील.योग्य दिशेने परिश्रम केल्यास साध्य होणार नाही असे काहीच नसते.काही साध्य करायचे असल्यास उद्यमशीलतेशिवाय ते साध्य कधीच गाठता यायचे नाही.
● मधमाशीप्रमाणे सतत उद्योग, हीच आपण आपल्या आवडीची गोष्ट केली पाहिजे.
● उद्योगामुळे शरीर निरोगी राहते, मन स्वच्छ राहते, हृदय धडधाकट राहते व पैशाचे पाकीट भरलेले राहते.
● वारसाहकाने मालमत्ता मिळणे म्हणजे जणू मृतस्थितीत जन्माला येणे आहे.
● दुसऱ्यावर अन्याय करण्यापेक्षा तो अन्याय आपण स्वतः सहन करणे जास्त चांगले असते.
● न्यायाचा अतिरेक म्हणजे अन्यायाचाही अतिरेक !
suvichar Marathi/सुविचार मराठी
● लोखंड तापलेले असतानाच त्यावर घाव मारले पाहिजेत. पण त्याला चकाकी आणण्याचे काम सावकाश करता येते.
● मत्सराचा जन्म प्रेमाबरोबरच होतो, पण मत्सराचा मृत्यू मात्र प्रेमाबरोबर होत नाही.
● मस्करीमुळे शत्रूवर विजय मिळवता येत नाही, पण मित्र मात्र गमावतो.
● दुःख अनावर झाले की माणसाला हसू येते आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते.
● शंभर तास प्रार्थना करण्यापेक्षा एक तासभर केलेले चांगले कृत्य जास्त बरे असते.
● तुम्ही जर आनंद मिळविण्यासाठी त्याचापाठलाग कराल तर तो तुम्हाला मिळणार नाही. आनंद मिळेल की नाही याचा विचार न करता, धिमेपणाने कर्तव्याच्यामार्गावर बालत रहाणे हाच आनंद मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे ज्याप्रमाणे मेंडी आपोआप घरी येते त्याप्रमाणे आनंद आपोआप तुमच्याकडे येईल.तुम्ही तुमच्या मार्गाने बरोबर जात असाल तर सोनेरी केसांचा आनंदाचा देवदूत तुम्हाला निश्चित भेटेल.
● जो फार घाई करून अभिप्राय देतो, त्याला तेवढ्याच घाईने पश्चात्ताप करावा लागतो.
● दयाळूपणाच्या सूर्यप्रकाशात सद्गुणांची वाढ होते.
● ज्ञान मिळाले तरी शहाणपण यावयाला वेळ लागतो.
● लक्षात ठेवणे निराळे आणि ज्ञान असणे निराळे आहे.
● ज्या माणसाला केव्हा गप्प बसावे हे समजते, त्याला कांही ज्ञान नसले तरी खूपच ज्ञान आहे,असे समजावे.
● ज्ञान मिळविण्यात केलेल गुंतवणूक सर्वात चांगले व्याज देते.Suvichar Marathi
● प्रतिभेमुळे मनुष्य प्रचंड कामे सुरू करू शकतो पण केवळ परिश्रमाने त्याची पूर्तता होते.