तर मित्रांनो मध्ये आपले स्वागत आहे. असे सुविचार तुम्हाला कुठेही मिळणार नाही. inspirational Quotes In Marathi हे सुविचार आपले दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारी सुविचार आहेत.
#Marathi Inspirational Suvichar
सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे समाजाचे मुक्त विद्यापीठ आहे. inspirational Quotes In Marathi
श्रीमंताच्या दासीप्रमाणे आपल्या संसारात अलिप्त रहा.
ईश्वरावर श्रद्धा असल्यावर गृहस्थाश्रम सुखकारकच होतो.inspirational Quotes In Marathi
ज्याचा गृहस्थाश्रम आनंदित, त्याचा परमार्थ यशस्वी.
देह प्रपंचाला व चित्त हरीला वाहिल्याने प्रपंची परमार्थ होतो.inspirational Quotes In Marathi
प्रपंच कर्माधीन व परमार्थ प्रयत्नाधीन आहे.
संसारात बंध वाढतो तर परमार्थात तो नाहीसा होतो.
आधार आणि जीवनाचा विसावा म्हणजे घर.
समाधान घरातील धन आहे व आतिथ्य हे घराचे वैभव आहे.
जेथे आपले अंतःकरण स्थिरावते ते आपले खरे घर.
ज्या घरी देव आणि ग्रंथ यांना स्थान आहे ते खरे घर.
सुख-दुःख ही संसाररथाची दोन चाकं आहेत.
चारित्र्यसंपन्नतेने मनुष्य अधिक तेजस्वी दिसू लागतो.
व्यक्तिगत चारित्र्यावरच राष्ट्रीय चारित्र्य अवलंबून असते.
सर्व सद्गुणांचा सुंदर मिलाफ म्हणजे शीलसंवर्धन होय.
परिस्थितीच्या धक्क्याने चारित्र्य हेलावता कामा नये.
व्यक्ती कितीही शिकली तरी चारित्र्याशिवाय ती पशुतुल्य असते.inspirational Quotes In Marathi
ज्ञानपुष्पाला चारित्र्यामुळे सुगंध येतो.
चारित्र्यहीनतेने मनुष्य खाली येतो, निंदेने नव्हे.
सुशीलता ही मरेपर्यंत कधीही नष्ट न होणारी संपत्ती आहे.
आज शीलाइतकेच वशिल्याला महत्त्व आले आहे !!
गृहस्थाश्रम म्हणजे प्रेम आणि कर्तव्य यांचे मिश्रण आहे.
#suvichar Marathi || suvichar Marathi
चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करणे हा मनाचा मोठेपणा आहे.inspirational Quotes In Marathi
बुद्धी चौकसखोर असावी, पण दिवाळखोर नसावी.
जिज्ञासा म्हणजे बुद्धीला लागलेली ज्ञानाची तहान.
धन व खूप जगण्याची आसक्ती या वाढत जाणाऱ्या गोष्टी आहेत.inspirational Quotes In Marathi
जगण्याची इच्छा हे मरणाचे विस्मरण आहे.
विचार, अनुभव आणि श्रद्धा यांचे घनफळ म्हणजे जीवन !
जगाच्या चिरंतन नावीन्याची जाणीव म्हणजे जीवन.
हास्य आणि अश्रू यांचा सुरेख संगम जीवनात आढळतो.inspirational Quotes In Marathi
मृगजळाप्रमाणे भ्रम ठरणारे मोहमय स्वप्न म्हणजे जीवन.
प्रामाणिक मनुष्य ही परमेश्वरी सृष्टीतील उत्कृष्ट देणगी आहे.inspirational Quotes In Marathi
आयुष्य हा एक बाजार आहे, त्यात प्रेमाची देवाण-घेवाण करावी.
जगून मरण्यापेक्षा मरून जगण्यात जास्त मोठेपणा आहे !
जीवनाच्या दीर्घ प्रवासातील दीर्घ विश्रांती म्हणजे मृत्यू होय.inspirational Quotes In Marathi
निरुपयोगी जीवन म्हणजे जिवंत मृत्यू होय.
जीवन केवळ चैनीची वस्तू नसून ती कर्तव्याची भूमी आहे.
जीवनाचा गुलाब बिकट स्थितीच्या कार्यातून उमलत असतो.
जीवनरचनेचा काळ म्हणजे तारुण्य होय.
जीवन हे एक फूल आहे आणि प्रेम हा त्यातील मध आहे.
स्वतःला समजावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जीवन.
मानवी जीवन केवळ भोगार्थ नसून ते कर्तव्यार्थ आहे.
जीवनपुष्प उमलते ते मृत्यूच्या पवित्र वेदीवर वाहण्यासाठीच.
JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇
#Good Morning Inspirational Quotes
प्रेम आणि कर्तव्य जीवनातून गेल्यास जीवन शून्य होईल.
विनय आणि गोड वाणी ही माणसाची खरी भूषणे आहेत.
पराक्रम व प्रीती हे जीवनाचे खरेखुरे डोळे आहेत.
सम्यक् वाचा (सत्ययुक्त दयेने भरलेली निष्कपट वाणी)
सम्यक् कर्म (प्रामाणिक व शुद्ध कर्म)
सम्यक् स्मृति (मन सदैव जागृत व सावधान ठेवणे)
सम्यक् समाधि (जीवनातील सत्याविषयी सखोल मनन, चिंतन )
जीवन संपते पण जीवनभर जोपासलेली मूल्ये मरत नाहीत.
शंका असावी पण कुशंका असू नये.
हात चलाख असावेत पण हातचलाखी करू नये.
संशयासारखे घोर पाप नाही.inspirational Marathi Quotes In Marathi
संशय ही मनुष्याच्या विनाशाची वाघूर आहे.
आत्मस्वरूपाविषयी संशय म्हणजे जीवित्वाचे लक्षण आहे.
संशयातीत मनुष्यच परमोच्चपदास पोहोचू शकतो.
संशयी माणूस कोणतेही धाडस करू शकत नाही.
तपश्चर्येविना कोणालाही कार्याची सिद्धी सहज होत नाही.inspirational Quotes In Marathi
फोलकट असावे, पण हलकट असू नये.
सत्य आणि प्रिय भाषण हे वाचिक तप आहे.
वाचन, मनन, लेखन हे वाङ्मयीन तप आहे.
धन, विद्या व भोजन या तीन वस्तू देण्यास योग्य आहेत.
निंदा, दुष्ट संगत व अतिलोभ या तीन गोष्टींपासून दूर रहावे.
आई, वडील व तारुण्य या तीन गोष्टी जीवनात एकदाच मिळतात.inspirational Quotes In Marathi
शरीर सेवेत, धन धर्मात व मन परमार्थात असावे.
पिकाला खत, गावात पत आणि घरात एकमत असावे.
शक्य, योग्य आणि आवश्यक असेल तेच करावे.
विचार, उच्चार आणि आचार चांगले ठेवा.
विचार, उच्चार आणि आचार चांगले ठेवा.inspirational Quotes In Marathi
एकाची हानी व दुसऱ्याचा लाभ म्हणजे
#Motivational Quotes In Marathi || Marathi Quotes
धैर्य, शांती आणि परोपकार यांची कास धरा.
अब्रू, देश आणि मित्र यासाठी प्रसंगी भांडा.
निष्ठा, चिकाटी व उद्योगशीलता सोडू नका.inspirational Quotes In Marathi
निर्मळ मन, विचारी बुद्धी आणि आनंदी चेहरा ठेवा.
रिकामी बडबड, क्रोध आणि कुठेपणा यांचा त्याग करा.
मोक्ष हा नित्यसिद्ध आहे व बंध हा अनित्य आहे.
जो बुद्धीने मोठा तो पंत व जो मनाने मोठा तो संत.
उपकार मित्रापासून प्राप्त होतात व अपकार शत्रूपासून.
तुलना जरूर करावी, पण अवहेलना करू नये.
निदर्शनाला योग्य मार्गदर्शन नसेल तर अपाय होतात.
मार्गदर्शन होण्यासाठी प्रदर्शन हे उपयुक्त साधन आहे.
दर्शन प्रथम स्वतःचे आणि मग इतरांचे असावे.
सत्याचे दर्शन घेण्यास सूक्ष्मबुद्धी असावी लागते.
ज्याचे दर्शन होताच आनंद होतो ते प्रियदर्शन.inspirational Quotes In Marathi
ज्याचे दर्शन होताच दुःख होते ते अशुभ-दर्शन होय.
लहान मूल, भुकेलेला मनुष्य आणि वेड्यांची दया करावी.
वेदान्त्यांनी मायावाद आणि संतांनी दयावाद सांगितला.
ज्याचे हाती क्षमाशस्त्र आहे त्याला दुर्जन काय करणार ?
क्षमेने समर्थ माणूस अधिक समर्थ बनतो.inspirational Quotes In Marathi
जेथे दया, क्षमा, शांती राहते तेथे देवाची वस्ती असते.
दुसऱ्याला क्षमा करता न येणे हे कंजुषपणाचे लक्षण आहे.inspirational Quotes In Marathi
द्रव्य साठविणाऱ्यापेक्षा ते देणाऱ्याचीच कीर्ती अधिक असते.
परतीची अपेक्षा न करता केलेले दान श्रेष्ठ दान असते.
दरिद्री असूनही जो दान करतो तो श्रेष्ठ दाता होय.
रक्तदान हे प्राणदानाइतकेच श्रेष्ठ आहे.
काही लाभासाठी काही त्याग करावाच लागतो.
सर्वोच्च त्याग हा जीवनमंदिराचा कळस आहे.
त्यागातच वैभव आहे, संचयात नाही.
मनुष्याला नादान करणारे दान असू नये.
ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर केलेली मदत श्रेष्ठ ठरते.
#Marathi Suvichar || Marathi Suvichar
क्रोधाला केवळ क्रोधाने नव्हे तर मौनानेही जिंकता येते.
आत्मस्थ होणाऱ्याला मौनव्रत अत्यंत साहाय्यभूत होते.
मौनव्रत ही सत्य-सेवकाची दैवी शिस्त आहे.
पूर्ण मौनापेक्षा यथायोग्य बोलणे बरे.inspirational Quotes In Marathi
अतिशयोक्त आणि व्यर्थ बोलणाऱ्यांना मौनाशिवाय पर्याय नाही.
सत्य झाकण्यासाठी धारण केलेले मौन व्यर्थ आहे.
मौनातही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे असतात.
आळसाने आलेली विवशता म्हणजे संयम नव्हे.inspirational Quotes In Marathi
असमर्थपणामुळे त्यागलेली उपाधी म्हणजे संन्यास नव्हे.
वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास आहे.
प्रारब्धावर देहाची चिंता सोडणे हे संन्यासाचे लक्षण आहे.inspirational Quotes In Marathi
नाही ज्याला फिकीर तो फकीर समजावा.
दुर्बल भावना असलेला शक्तिमान मनुष्य दुर्बलच असतो.
निर्बलांना संरक्षण देणे हीच बलाची सफलता आहे.
शारीरिक दुर्बलतेपेक्षा मानसिक दुर्बलता घातक असते.
ज्याचे मन दुर्बल त्याचे सर्वच दुर्बल.
ज्याचे मन बलवान त्याचे सर्वच बलवान असते.
धनहीनाला व्यवहारात दुर्बल समजले जाते.inspirational Quotes In Marathi
शीलहीनाला श्रेष्ठांच्या पंगतीत दुर्बल समजले जाते.
सर्वांवर प्रेम करण्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे देशभक्ती होय.
विश्वाची शांती आणि ज्ञानाचे निकेतन भारतभूमी आहे.
परस्परसामंजस्याने राहणे म्हणजे राष्ट्रीयत्व होय.
कालानुरूप धोरण आणि कार्य हे लोकशाहीचे गमक आहे.
JOIN MARATHI BLOOGING COURSE
समारोप
तर मित्रांनो कसे वाटले inspirational Quotes In Marathi मला खात्री आहे.त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. तर लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना व कुटुंबातील सर्व सदस्यांना शेअर करा.