[66+] Good Thoughts In Marathi on life || Best Suvichar

Good Thoughts In Marathi on life

कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त चांगला सिद्धांत सांगणे हेच सुविचारांचे गमक आहे. Good thoughts in marathi on life आकाराने लहान असलेले हे विचार, सुजाण बुद्धिला प्रेरक ठरून महान कार्य घडवून आणू शकतात.

“Thoughts On life in Marathi || Marathi Suvichar”

नागरिकांच्या सद्‌गुणांवरून देशाची किंमत ठरत असते.

पुरुषार्थ करा, दैव पुरुषार्थांच्या मागे जात असते..

प्रयत्नांची पराकाष्ठा करा, नशीब हे प्रयत्नानुसारी आहे.

मनुष्य हाच आपल्या भाग्याचा खरा कारागीर असतो.

दैव नेहमी समंजस माणसाच्या बाजूने असते.

आनंद व दुःख यांनी विणलेला सुंदर कपडा म्हणजेच दैवी जीवन.

प्रत्येक सत्कृत्य म्हणजेच दानधर्म आहे.Good Thoughts In Marathi on life

कष्टाची सवय आणि कर्तव्य हाच धर्म, असा ध्येयवाद हवा.

दुःखितांचे दुःख-परिहार करणे हा खरा मानवधर्म आहे.

सुखाने जीवन जगण्याची कला म्हणजे धर्म होय.

प्रत्येक वस्तूचा स्वभाव हा तिचा धर्म आहे,

नम्रता अंगी आल्याशिवाय सत्य सापडत नाही.

नम्रता ही सर्व दैवी गुणांची जननी आहे.

परमेश्वराच्या साक्षात्काराचा आविष्कार म्हणजे नम्रता होय.

नम्रतेत माणुसकी आहे, ती संपली की नम्रता संपते.

ज्या ठिकाणी नम्रता नाही, तेथे प्रसन्नता राहात नाही.

नम्रतेविना साधकाला विद्या शिकता येणार नाही.

नम्र होणे हे पूर्ण ज्ञानाचे लक्षण आहे.Good Thoughts In Marathi on life

जो नम्र झाला आहे त्याला अहंकाराची भीती नाही.

जनतेस नम्र झालेल्यांना जनार्दन वश होतो.

विनय हा विद्वत्तेचा सौभाग्यतिलक आहे.

अंतराळातसुद्धा फुलणारी विषारी वेल म्हणजे कुटाळकी होय.

टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल !

जगात आज संस्कृतीची जी विकृती दिसते ती विचित्र आहे.

स्वतःला कमी लेखणे म्हणजे आत्मविश्वास गमविणे होय.

टीकेच्या नावाखाली टवाळी करु नये.

दुसऱ्याला हलका लेखणारा स्वतःच मनाने हलका असतो.

निष्ठेशिवाय प्रतिष्ठा नाही आणि कष्टाशिवाय फल नाही.

जी एकनिष्ठ व वस्तुनिष्ठ असते ती निष्ठा होय.

जिला पर्याय चालत नाही ती निष्ठा होय.

कर्तृत्वाने आलेल्या नेतृत्वाचा पाडाव कोणी करू शकत नाही.

परिस्थिती असणे वेगळे आणि ती निर्माण करणे वेगळे होय.

समाजाला योग्य मार्गाने नेतो तो नेता होय.

स्वतःचे स्वामी झाल्याशिवाय जगाचे स्वामी होता येत नाही.

Good Thoughts In Marathi on life

JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇

माणसाच्या एकंदरीत स्थितीवरून परिस्थितीची कल्पना येते.

आपल्या सोयीचे नाही म्हणून सोडून देणे म्हणजे पलायनवाद.

मनुष्या तू मनी उमज, कुटुंबनियोजन ही काळाची गरज !

दुसऱ्यानंतर तिसरा ? नव्हे दुसऱ्या नंतर विसावाच !!

रुजवा विचार घरोघरी, दोनच मुले गुटगुटीत बरी.

अद्वैत विचाराचे सूत्र, भेद न माना कन्या पुत्र.

सुजाण पालकाचे लक्षण, मुलाचे आरोग्य व पूर्ण शिक्षण.

वाढली आज महागाई म्हणून वाटू देऊ नका महाग + आई.

एकच पूर्ण, सर्व गुणवान, जसा का अंजनीचा हनुमान.

ना निराश झाले पंडितजी, होती जरी एकटी इंदिराजी.

सुखी जीवन, कुटुंबनियोजन.Good Thoughts In Marathi on life

लोभ, द्वेष आणि प्रमाद ही मानसिक पापे होत.

अन्यायाशी तडजोड करणे हे महापाप आहे.

दुष्टबुद्धीने केलेले पवित्र कर्मदेखील पापकर्मच असते.

जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरे पुण्य करतो.

कार्यकारणाचा मेळ असल्याशिवाय ध्येय प्राप्त होत नाही.

ध्येयवादाची नशा ज्यांना चढली त्यांनीच इतिहास घडविला.

सर्व खचले तरी चालेल, पण धैर्य खचू देऊ नये.

मुंगीसारखी उद्योगशीलता असावी.

काहीच न करण्यापेक्षा थोडे करणे बरे.

योग्य संधीशिवाय कर्तबगारीचा उपयोग होत नाही.

हृदयातील जिव्हाळ्याविना कर्तव्य व्यर्थ ठरते.

प्रयत्नाशिवाय फळ नाही, असा विश्वंभराचाच संकेत आहे.

प्रयत्न हा परीस आहे, त्याने नरकाचेही नंदनवन होते.

कामात चूक होईल म्हणून काम करणे थांबवू नका.

ध्येयपूजा देवपूजेइतकीच श्रेष्ठ आहे.

ध्येयासाठी जगणे हेच खरे जगणे आहे.

प्रत्येकाचा उत्कर्ष हा स्वावलंबी प्रयत्नातच भरलेला आहे.

परिश्रमाशिवाय स्वातंत्र्य नाही.

निरुपयोगी परिश्रम अधःपतनाचा पाया आहे.

मनुष्याने शक्यतोवर आपल्या घामाची भाकरी खावी.

प्रयत्न भाग्याची जननी आहे.

श्रम जीवनाचे सौंदर्य आहे.Good Thoughts In Marathi on life

परिश्रमाशिवाय भूक नाही आणि भूकेशिवाय रुची नाही.

प्रयत्नाने सर्व अडचणीवर मात करता येते.

उद्योगासारखा मित्र नाही आणि आळसासारखा शत्रू नाही.

उद्योगपती असावा पण उचापती नसावा.

प्रयत्न व अभ्यास यामुळे असाध्य ते साध्य करता येते !

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे.

मनाची महत्त्वाकांक्षा हाताच्या श्रमानेच सिद्धीस जाते.

श्रमाचे फळ निश्चित आहे हे लक्षात असू द्या.

श्रमाने अंगातून गळणारे पाणी गंगेच्या पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

ईश्वराला कृतज्ञतेने मारलेली हाक म्हणजे प्रार्थना होय.

आत्मशुद्धीकरणासाठी प्रार्थना यासारखे साधन नाही.

अपूर्णतेची कबुली आणि पूर्णतेची हृदयाची हाक म्हणजे प्रार्थना.

मनाच्या स्वच्छतेसाठी प्रार्थनेचे स्नान आवश्यक आहे.

विषयाभिलाषेने केलेली प्रार्थना म्हणजे देवाशी केलेला व्यापार होय.

करारपद्धतीने केलेली देवाची प्रार्थना मन शुद्ध करीत नाही.

समाजाचे भावनात्मक नाते निर्माण होण्यास प्रार्थनेची मदत होते.

प्रयत्नाने थकलेल्या मनाला प्रार्थनेशिवाय विरंगुळा नाही.

स्वतःवर प्रेम नसणारा दुसऱ्यावर प्रेम काय करणार ?

Good Thoughts In Marathi on life

JOIN MARATHI BLOOGING COURSE https://courseinmarathi.com/

जेथे प्रेम आहे तेथे हक्काचा प्रश्नच उद्भवत नाही.

जे आनंदरूप करते ते खरे प्रेम होय.

शुद्ध प्रेमात विचारपरिवर्तन करण्याचे सामर्थ्य असते.

सहानुभूतीने अंतःकरणातील दुःखे हलकी होतात.

स्नेहाचे बंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा मजबूत असतात.

बालपणात स्वर्गाचे सुख भरलेले असते.

अनिश्चित कार्याविषयी आधी ठाम बोलून दाखवू नये !

लोकांची मने जिंकण्यासाठी मधुर भाषण हा एक सोपा मार्ग आहे.

कोकिळेच्या मधुर स्वरामुळे महाकवीही तिच्यावर कविता स्चतो.

बोलण्याच्या जोरावर सारे जग जिंकता येते.

मन मोकळे असणे चांगले पण जीभ मोकळी सोडू नये.

आचाराने उच्चार प्रभावी ठरतो.Good Thoughts In Marathi on life

बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करुन बोलावे.

महत्त्वाचे व कमी बोलणाराच आनंदी राहू शकतो.

वाणी जिंकणे हे वाचेचे तप आहे.

शब्दाच्या शैलीपेक्षा शीलाला जास्त महत्त्व आहे.

भाषेचे सौंदर्य हे देशाचे सौंदर्य आहे.Good Thoughts In Marathi on life

भाषा हे विचार आदान-प्रदानाचे मुख्य साधन आहे.

आपल्या भाषेची कदर करूनच दुसऱ्या भाषेचा आदर असावा.

भाषेचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे.

Good Thoughts In Marathi on life

माणसाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !

भित्र्या माणसाचा संसार व परमार्थ नीट होत नाही.

भीतीला पुरुषार्थी माणसे टाळीत नाहीत, तिच्या समोर जातात.

सभ्य माणसाला भीती शिवत नाही.Good Thoughts In Marathi on life

ज्ञान संस्कृतीचा आत्मा असून आचार तिचे शरीर आहे.

जीवनास उजाळा देते; गती देते, समृद्ध करते ती संस्कृती.

थोर कृती या विशाल बलाच्या निदर्शक असतात.Good Thoughts In Marathi on life

अनावश्यक भीती आणि पाप अधःपतनास कारण होते.

हृदयपरिवर्तन होण्यासाठी संस्कृतीची फारच जरुरी आहे.हृदयपरिवर्तन होण्यासाठी संस्कृतीची फारच जरुरी आहे.

रडणे हे दुर्बलतेचे तर लढणे हे सबलतेचे लक्षण आहे.

https://courseinmarathi.com/

मनोबलाशिवाय शरीरबल व्यर्थ आहे.

संकल्प-विकल्प करणे हा मनाचा स्थायी स्वभाव आहे.

तर मित्रांनो कसे वाटले good thoughts in marathi on life मला खात्री आहे. तुम्हाला नक्कीच त्याच्या उपयोग झाला असेल. तर लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा.

Treading

More Posts