[69+] Life Quotes In Marathi; आज ये प्रभावी सुविचार तुमचे जीवन बदलतील.

   नमस्कार मित्रांनो life Quotes In Marathi मध्ये आपले स्वागत आहे.आपल्या रोजच्या जीवनात नवीन नवीन अडचणी येतात. त्याला सामोरे जाण्याची ताकत आपल्या या वेबसाईट वर च्या सुविचार संग्रहातून मिळतील.

[69+] Life Quotes In Marathi || Powerful positive suvichar

Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार 

  • कर्तुत्वहीनपेक्षा कर्तुत्व श्रेष्ठ पण कर्तुत्वापेक्षा अकर्तृत्व श्रेष्ठ.  Life Quotes In Marathi
  • कर्तव्य केल्याने होणारा आनंद ,हा त्रिभुवनातिल सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो. 
  • कर्तव्यात तात्काळ समाधान आहे.
  • शाळेतला पहिला धडा जोडाक्षराने सुरू नसला तरी आयुष्यातील पहिला पाठ जोडाक्षराने सुरू होतो तो म्हणजे ‘कर्तव्य’.
  • कर्तव्याचा मार्ग यशाकडे नेतो. 
  • मनुष्याला कर्तव्याचा मार्ग दाखविणारी आचारपध्दती म्हणजे संस्कृती. 
  • आपले कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणे हा परमार्थ होय. 
  • हक्क व कर्तव्य नाण्याच्या दोन बाजू. 
  • कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात. 
  • जो कर्तव्याला जगतो, तो कौतुकास पात्र होतो. 
  • कर्तव्याचे फळ व भविष्यकाळ हे ईश्वराच्या आधीन आहे. 
  • कर्तव्य व आजचा दिवस यावर आपली मालकी आहे. 
  • माणसाची उच्चता त्याच्या शारीरिक उंचीवर कधीच मोजली जात नाही. ती त्याच्या कर्तव्याच्या उंचीवर मोजली जाते. 
  • समुद्रातील भरती ओहोटीचे प्रकार नैसर्गिक क्रियेने घडत असतात. पण माणसाच्या जीवनातील सुख-दुःख त्याच्या चांगल्या वाईट कर्तुत्वानुसार घडत असतात. 
  • एखाद्या मूर्ख मनुष्य आपल्याला कमीपणा आणणारे एखादे कृत्य करतो, तेव्हा तो हे मला कर्तव्य म्हणून करण भाग होत असे सांगण्यास विसरत नाही. 
  • जो शीलवान आणि ज्ञानी आहे, जो सत्यवादी आहे, आपले कर्तव्य जाणणारा आहे अशांची संगत धरा.

Join Marathi course blooging

  • वाईट गोष्टीशी असहकार दाखविणे हे मानवाचे पवित्र कर्तव्य आहे. 
  • स्वत:च्या वाट्याला दुःखाचे काटे असले तरी दुसर्‍याला सुखद फुले देणे हे मानवी कर्तव्य आहे. 
  • एका कर्तव्याची पूर्तता करण्याचा पारितोषिक म्हणजे दुसर कर्तव्य पूर्ण करण्याची शक्ति प्राप्त होण आहे. 
  • कर्तव्याची दोरी मनाच्या धर्म आहे पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. 
  • कर्तव्यत्रयी 

    1.सत्यनिष्ठा 

    2.धर्मचरणाचा प्रयत्न 

    3.हरी स्मरणरूप स्वाध्याय.  Life Quotes In Marathi

  • एखाद्या कर्तव्याला पाठमोर होणे म्हणजे जे सत्य आपल्याला कळणे आवश्यक होत. त्यालाच पाठमोर होण्यासारखे होय. 
[69+] Life Quotes In Marathi || Powerful positive suvichar

Life Quotes In Marathi | Marathi Status on life | Life Marathi Suvichar 

  • आई-बापांनी,गुरुंनी सूचना द्याव्यात, धडपड ज्याची त्याने करावी. 
  • प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष आहे. Life Quotes In Marathi
  • देवपूजेपर्यंतच्या पायर्‍या 

          1. चित्तशुद्धी 2. देशसेवा 

          3. विश्वप्रेम  4. देवपूजा 

  • कासवाप्रमाने कर्मयोगात शांत पण निश्चित पावले टाकावीत.
  • जीवनाचा खरा आनंद लढण्यात आहे, रडण्यात नव्हे.
  • जीवन अनुभवाने समृद्ध करावे. Life Quotes In Marathi
  • जीवनात विनोद हास्य याना महत्त्वाचे स्थान आहे, परंतु जीवनाचे हसे करू नका. 
  • जीवन फुलपाखरासारखे आनंदी ठेवा. पण ध्येय मात्र मधमाशीसारखे ठेवा. 
  • जगातील सर्व थोरपुरुष संयमी होते, त्यांचे खाणे- पिणे साधे असे. 
  • मनुष्यामध्ये असणारी सुप्त प्रतिक्षेच्या नवकल्पना विकासाची  प्रक्रिया म्हणजेच शिक्षण होय. 
  • दुसर्‍यामध्ये दुष्टता पाहू नका, दुष्टता म्हणजे अज्ञान होय, दुर्बलता होय. 
  • सामर्थ्य हे भलेपणा आहे, पावित्र्यात आहे. 
  • मला माझ्या बांधवांना सह्या करू द्या.मला फक्त एवढेच हवे आहे. 
  • कमकुवत माणसे जेव्हा सर्वस्व गमावतात व स्वतःला दुर्बल समजतात तेव्हा ती ज्योतिष वैगरेकडे वळतात. Life Quotes In Marathi
  • आत्मसंतुष्ट वृत्तीने बिछान्यावर पडून राहणे हा शुद्ध रोग होय. स्वतंत्र व्हा,स्वातंत्र बुद्धीने निर्णय घेण्यास शिका. 
  • खरा विरषुरुष गाजावाजा न करता शांतपणे कार्य करीत राहतो. 
  • फक्त आपल्या एकट्यावरच सर्व कार्याची मदार आहे अशा भावनेने काम करा. 
  • आपण हा पहिला धडा घेतला पाहिजे की मी बहिरील कोणत्याही गोष्टीची केव्हाही निंदा करणार नाही, दुसर्‍या कोणाही व्यक्तीला मी दोष देणार नाही. असा निश्चय करा. 
  • माणुस व्हा,उठा नि सारा दोष स्वतःवर घ्या. आधी स्वतः मध्ये सुधरणा करा. 
  • मानवी मनाच्या शक्तीला काही सीमा नाही. जे जितके अधिक एकाग्र होईल; तितकी एखाद्या गोष्टीवर केंद्रित होण्याची त्याची शक्ति वाढेल. 
  • समोर एखाद्या आदर्श असलेला मनुष्य जर हजार चुका करील तर माझी खात्री आहे, की कोणताही आदर्श नसणारा मनुष्य पन्नास हजार चुका करील. 
  • जगात जी काही खरीखुरी प्रगती झाली आहे ती सारी प्रेमाच्या शक्तिनेच झाली आहे. 

Thought on life in Marathi Good Thought in Marathi on Life 

  • हे जग वाचाळ लोकांनी भरलेले आहे. आज आपल्याला पोकळ भाषणापेक्षा प्रामाणिक कार्याची अधिक गरज आहे.Life Quotes In Marathi
  • ते तर मानवी जीवनाचे सौंदर्याच म्हणावयाचे,अपयशाखेरीज जीवन ते काय ? ह्या अपयशांवर मात करण्याची धडपड तर जीवनात हवी ह्या धडपडीची त्या चुकीची त्या अपयशांची तमा बाळगू नका.
  • आपण चिंतनशील आणि विवेक व्हायला पाहिजे. 
  • ज्याचे दोष त्यालाच सांगावे तेच हितकर असते. त्याचे गुण मात्र सर्वाना सांगावेत. 
  • एकांगीपणा ही जगातील अत्यंत हानिकारक गोष्ट होय. 
  • चांगले नि वाईट सर्वत्रच दिसून येते. चांगली कृत्ये करून लोकांसमोर चांगली उदाहरण ठेवणे येवढेच आपले काम. 
  • आपल्यापैकी किती जण चांगले करावयाचे म्हणून चांगले करतात? आपल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बाकीचे देखील चांगले करतात, परंतु ते भाग पडल्यामुळे. 
  • एकाच समान ध्येयाने प्रेरित केल्याखेरीज लोक एकाच सूत्रात ओवले जात नाहीत. 
  • आपल्या मनात जेव्हा स्वतःचा विचार असत नाही तेव्हाच आपण चांगल्यात चांगले काम करू शकतो. इतरांवर आपला प्रभाव जास्तीत जास्त पाडू शकतो. 
  • या आर्यावर्तासारखं देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही म्हणून या देशाचे सुवर्णभूमि असे नाव पडले. 
  • दररोज नियमितपणे परमेश्वर ध्यान, योगाभ्यास, बुद्धीवर्धन
  • सत्यधर्मांनुचरण आणि अधर्मांचा संपूर्ण त्याग करीत जावे.
  • जर सारे जग खरोखरच दुःखामय असतो तर कोणत्याही जिवाला. जगाविषयी कसलेच आकर्षण वाटले नसते. 
  • वर्णव्यवस्था कर्माने व गुणाचे आहे जन्माने नव्हे. 
  • सोने की पितळ हे कसोटीच्या दगडावर ठरते, सरलता नि कपटाची पारख परमेश्वरापाशी होत असते.  Life Quotes In Marathi
  • आगगाडीचे इंजिन स्वतः निघून जाते, इतकेच नव्हे तर मालाने गच्च भरलेले कित्येक डब्बेही आपल्याबरोबर ओढून घेऊन जाते. ‘अवतार देखील सहस्त्र सहस्त्र जिवांना भगवंताच्या श्री चरणाशी येऊन जातात. 
  • सहनशीलतेपरीस आणखी श्रेष्ठ गुण नाही. जो सहन करतो तोच टिकतो. 

Good Quotes on life in marathi | Best Life Quotes in marathi | Life motivational Quotes in marathi

  • दृढनिश्चय व एकजुटीची कृती यांनाच कर्मभूमीत यश मिळत असते. 
  • निराशेमुळे नवीन आशा निर्माण होते. 
  • अन्याय घडतात तेव्हाच देशाची स्थिती सुधारण्यास आरंभ होतो . 
  • जुलूम सहन करणे यात स्वार्थ नाही परमार्थही नाही,ही पशुवृत्ती आहे. 
  • आपल्या तत्त्वाला शेवटपर्यंत चिटकून खरा शूर. 
  • सांघिक मन ही गोष्ट तर अत्यंत महत्त्वाची आहे. 
  • कोणतीही गोष्ट केवळ नवी आहे म्हणूनच ग्राह्य वा त्याज्य ठरत नाही. 
  • जगताच्या आनंद यज्ञामध्ये मला निमंत्रण मिळावे,ध्यन झाले, धन्य झाले माझे हे मानवजीवन !
  • परममित्र म्हणून अहंकाराला जवळ केले, त्यानेच माझी फसगत केली. 
  • सुख दुःखाचे सर्व बंधन मिथ्या आहे, मायारूप आहे. 
  • धीर धरलास म्हणून हा मंगलमुहूर्त पाहू शकलास,हिम्मत सोडली नाहीस त्याचे सार्थक झाले. 

चांगले सुविचार मराठी

  • जीवन हे सुख दुःख आणि भय यांच्या रूपाने नेहमीच हेलकावे देत असते. 
  • मृत्यू चुकविता येईल असा काही योग किंवा उपाय मनुष्याला सापडला नाही. 
  • शूर पुरुष पराक्रम करून दाखवितात, बडबड करणाऱ्याच्या हातून काहीच होत नाही. 
  • माता- पित्याचे प्रेम पुत्रावर स्वतःवरील प्रेमापेक्षाही अधिक असते. 
  • आपली आपण अवहेलना करू नये,आज जे लोक निंदा करतात तेच उद्या आपली कीर्ती गाऊ लागतील. 
  • मोठी संपत्ती, विद्या अथवा ऐश्वर्या प्राप्त झाल्यावरही जो गर्वरहित वागतो,त्याला पंडित असे म्हणतात. 
  • शस्त्राने केलेली जखम भरून येते, परंतु निंद्य भाषणाने केलेली जखम भरून येत नाही. 
  • मस्तर हे मृत्यूचे मुख्य कारण होय. Life Quotes In Marathi
  • दुर्लक्ष,त्वरा आणि आत्मश्लाघा हे विद्येचे शत्रू होत. 
  • सुशीलपणा आणि सदाचरण हे अध्ययनाचे फळ होय. 
  • वाईट काळासाठी पैशाची बचत आवश्यक. 
  • उद्योगी माणसाजवळ दारिद्र्य राहात नाही. 
  • आत्मप्रशांसा करू नका, हे समाजाचे इतरांचे कार्य आहे. 

 

Treading

More Posts