[69+] Motivational Suvichar In Marathi || Best Suvichar

Motivational Suvichar In Marathi

नमस्कार मित्रांनो Motivational Suvichar in Marathi || Best आपले स्वागत आहे.असे सुविचार तुम्हाला कुठेही मिळणार नाही. लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व मित्र मैत्रिणी ला शेअर करा.

#Marathi Suvichar || मराठी सुविचार

ज्ञानाची तळमळ असल्यास अभ्यासात आनंद होतो.

आवडीच्या विषयाच्या अभ्यासाचा कंटाळा येत नाही. Motivational Suvichar In Marathi

साध्य ठरविल्याशिवाय अभ्यासाचा उपयोग नाही.

सातत्य आणि चिकाटी असणे म्हणजे अभ्यास होय.

त्याच त्या विषयाचे पुनःपुन्हा चिंतन म्हणजे अभ्यास होय.

अध्यात्माचे रसायन मिळाल्यावर काळाची भीती नाही.

अध्यात्मज्ञानाशिवाय विज्ञान सज्ञान होऊच शकत नाही.

आधिभौतिकापेक्षा अध्यात्म हे चिरंतन सत्य आहे.

कर्तव्यनिष्ठा हाच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे.

वैज्ञानिक सुधारणेने माणुसकीची हत्या होता कामा नये.

शुद्ध प्रेम आणि स्वातंत्र्य यांचे मीलन म्हणजे अध्यात्म होय.

भेदभाव गेल्याशिवाय स्वातंत्र्य व समता व्यर्थ आहे.

जातीभेद हा मानवतेला जडलेला मोठा रोग आहे.

अर्थाचा उपयोग अयोग्य झाल्यास अर्थाचा अनर्थ होतो.

अर्थ असेल तरच धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ती होते.

विश्वातील बहुतेक कामे धनामुळे अडून राहतात.

घाम गाळल्याशिवाय दामाची किंमत कळत नाही.

कष्टार्जित धन हे अयाचित धनापेक्षा श्रेष्ठ आहे.

हिंसेने मिळवलेली सत्ता फार काळ टिकत नाही.

शांतीनेच चिरकाल शांती टिकते, हिंसेने नव्हे !हिंसा हे दुर्बलाचे आणि अहिंसा हे सबलाचे शस्त्र आहे.

काया, वाचा, मनाने दुसऱ्यास त्रास देणे म्हणजेच हिंसा होय.

शुद्ध प्रेमाचा उत्कर्ष म्हणजे अहिंसा होय.

दुष्कृत्याला चिथावणी देणे ही देखील हिंसाच आहे.

जबरदस्तीने एखाद्यावर ताबा ठेवणे ही देखील हिंसाच आहे.

अनुभवाने मिळालेले ज्ञान पुस्तकी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते.

अनुभव हे ज्ञानाचे मुख्य अंग आहे.

विद्येची सांगड व्यवहारात घालते ते खरे ज्ञान आहे.

अनुभव ही ज्ञानाची जननी आहे. Motivational Suvichar In Marathi

Motivational Suvichar In Marathi

Motivational Suvichar In Marathi

अनुभव हा एक महान शिक्षक आहे, पण तो मोबदला फार येतो.

अनुभव हा मनुष्याच्या जीवनात बरेच काही शिकवितो.

अहंकार गेलेल्यांची कृती संपली तरी कीर्ती संपत नाही.

दूरहंकार सोडल्यानेच माणूस सुखी होतो.

सत्याभिमान असावा पण दुरहंकार असू नये.

जीवनात एकांत साधणे म्हणजेच अहंकाराचा नाश करणे होय.

जेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हा आत्मा प्रकाशमान होतो.

अहंकार मनाला क्षीण करून सद्विचाराला मारक ठरतो.

माणसाने स्वाभिमानी असावे पण दांभिक नसावे.

स्वाभिमानी मनुष्यच काहीतरी कर्तबगारी करतो.

दांभिकता माणसास नष्ट करते.

अहंकार स्वरूपाचा असेल तर त्यास अस्मिता म्हणतात.

अडचणीच्या पलीकडे सुख आहे हे लक्षात ठेवावे.

अडचणी माणसाचा चांगुलपणा उघडकीस आणतात.

चंद्राला ढगातून आणि माणसाला संकटातून जावे लागते.

विवेकाची जागा विकार घेतो तेव्हा अनर्थ निर्माण होतो.

संकटांना आव्हान दिल्याशिवाय अडथळे दूर होत नाहीत.

सत्तेपुढे शहापण नाही आणि द्रव्याशिवाय सत्ता नाही.

अधिकारी झाल्यावर जनतेकडे पहाण्याचे चष्मे बदलतात.

बरेच हक्क मागून मिळत नाहीत ते झगडूनच मिळवावे लागतात

पात्रता असल्यावर अधिकार आपोआप चालून येतात.

Motivational Suvichar In Marathi
Motivational Suvichar In Marathi

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

दुःखतप्तांना मातेसारखी दुसरी सावली नाही.

मातेसारखे श्रेष्ठ दैवत नाही.

भयभीतांना मातेसारखा दुसरा आधार नाही.

पित्याची योग्यता दहा उपाध्यांहून अधिक आहे.

प्रत्येक मुलावर सारखे प्रेम करते ती माता होय.

‘ जसे कराल तसे भराल’ ही भावना विसरू नका.

पैसे खर्चुन सर्व मिळेल पण आई-वडील मिळणार नाहीत.

ज्यांचे उपकार अगणित आहेत, त्यांच्या गरजा पूर्ण करा.

दुसरं सारं काही विसरा परंतु आईवडिलांना विसरू नका.

जिच्या कर्तृत्व व प्रेमावर घर उभे राहते, ती आई.

हृदयात ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत ती म्हणजे आई.

आजारी माणूस उत्कटतेने स्मरण करतो ती आई.

मुलांवर सुसंस्कार करून त्यांचे जीवन आदर्श करते ती माता.

सर्व संकटे सहन करून मुलांना आनंद देते ती माता.

मनुष्याने विनोदी असावे, पण टवाळखोर असू नये.Motivational Suvichar In Marathi

Motivational Suvichar In Marathi
Motivational Suvichar In Marathi

पश्चात्ताप व प्रायश्चित्ताशिवाय सुधारणा होत नाही.

मनुष्याने लीन असावे, पण दीन असू नये.

सत्यभाषण, धर्माचार, अध्ययन या गोष्टी कटाक्षाने कराव्यात.

यज्ञात पशू मारण्यापेक्षा पशूवृत्ती मारणे हा श्रेष्ठ यज्ञ आहे !

यज्ञात तीळ, तांदूळ जाळण्यापेक्षा अहंकार जाळणे बरे.

वाईट वागण्याइतकेच त्यावर पांघरूण घालणे वाईट आहे.

सदाचार हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.

व्रतामुळे मन संयमी बनते आणि आत्मबल वाढते.

दहा विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ आहे.

शिष्टसंमत आचार म्हणजे शिष्टाचार.Motivational Suvichar In Marathi

सुशीलता ही मरेपर्यंत नष्ट न होणारी संपत्ती आहे.

आपण लोकांकडून फसणार नाही एवढे व्यवहारी असावे.

मनुष्याने मर्यादशील असावे पण भिडस्त असू नये.

मनुष्याने उदार असावे, पण उधळे असू नये.

मनुष्याने कर्मनिष्ठ असावे, पण कर्मठ असू नये.

उपदेश करणाऱ्यांपेक्षा तसे वागणाऱ्यांचीच वानवा आहे.

सदाचारीच खऱ्या अर्थाने अंतरी सुखी असतो.

सदोष आहार हा अनेक रोगांचा जनक आहे.

शरीराला पोषक व मनाला प्रसन्न ठेवतो तो आहार.

आत्मविश्वासाने प्रगतीची सर्व दालने खुली होतात.

कमी आत्मविश्वास हे अपयशाचे कारण आहे.

आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

अंगी हुरूप आणि अभ्युदय यांचा जन्म आशेतूनच होतो.

जी आशा पूर्ण होण्यासारखी नाही, ती आपण करू नये.

चांगल्या कार्यात निराश न होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

सतत कार्यमग्न असल्यावर निराशा कधीही शिवत नाही. Motivational Suvichar In Marathi

आशा नसेल तर चेतन मनुष्य अचेतनवत असतो.

आशा ही कमळाच्या पाकळीवरील दवबिंदूप्रमाणे आहे.

प्रगतशील जीवन हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

http://Courseinmarathi.com

Motivational Suvichar In Marathi

दुष्टपणाच्या बदल्यावर सद्वर्तन हे फायद्याचे उत्तर आहे.

योग्य संघर्षाने खऱ्या कर्तृत्वाची परीक्षा होत असते.

सत्य संघर्षाशिवाय जीवनाचे चरित्र बनत नाही.

सत्याविषयीच्या संघर्षानेच मनुष्य खरा जिवंत असतो.

परिणाम चांगला होईल असा संघर्ष असावा.

माणसाच्या प्रगतीतील आळस हा मोठा शत्रू आहे.

कामातील ढिलेपणा हा प्रगतीतील अडसर आहे.

निरोगी शरीर सर्वोत्तम दागिना आहे.

मन प्रसन्न असल्यावर शरीराचे आरोग्यही चांगले राहते.

वैद्य रोग्यांना जगवतात व रोगी वैद्यांना जगवतात.

शरीराचे सौंदर्य म्हणजे हृदयाचे सौंदर्य !

आजारीपणाशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही.

शरीरापेक्षा मनाच्या आरोग्यालाच जास्त जपावे लागते.

आत्मदर्शन हे जीवनातील आनंद देणारे महाकाव्य आहे.

आत्मानात्मविवेकालाच ‘विचार’ म्हणतात.

ब्रह्मानंदापेक्षा सेवानंद हा सोपा व सुलभ मार्ग आहे.

आत्मानुसंधान हे सर्व शास्त्रांचे सार आहे.

ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही तो दुःखी असतो.

आत्मप्रेम प्रगत झाल्याशिवाय विध्वंसक प्रवृत्ती थांबणार नाही.

आत्मप्रेम प्रगत झाल्याशिवाय विध्वंसक प्रवृत्ती थांबणार नाही.

अंतरंगाची ओळख करून घेणे म्हणजे आत्मज्ञान होय.

आत्मज्ञान सर्व ज्ञानात श्रेष्ठ ज्ञान आहे.

आत्मज्ञानाशिवाय अखंड सुख मिळूच शकत नाही.

आत्मज्ञान स्वतः जन्मास येते व दुसऱ्याचा जन्म घालविते.

आत्मज्ञानप्राप्तीत कर्माकर्माची फुणफुण थांबते.

तत्त्वज्ञ माणसास ईश्वराचे दर्शन सर्वत्र होत असते.

नामी व्हायचे असेल तर ‘ना-मी’ झाले पाहिजे !

जगातील सर्व दुःखाचा शेवट ईश्वर अनुभूतीत आहे.

तेच हात पवित्र की जे दीनदुःखितांचे अश्रू पुसतात.

दरिद्रीनारायणाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे.

ज्याला कोणी नसते त्याचा वाली परमेश्वर असतो.

देवाची पूर्णपणे जाणीव होणे हाच जगाचा विसर आहे.

भ्यायचे तर देवाला आणि दृष्कृत्याला भ्यावे.

पाणी गोठले की बर्फत्वास येते तसे निर्गुण सगुणत्वास येते..

परिस्थिती पचवून उत्साह वाढविण्यासाठी उत्सव असतो.

वर्तमान परिस्थितीत आनंद होण्यासाठी उत्सव असतात.

उत्सवाने चेतना वाढते आणि म्हाताऱ्यास तारुण्य येते.

ज्यात संस्कृतीस चालना मिळते तो खरा उत्सव.

उत्साहप्रिय माणूस असला तरी तो उत्साह उतू जाऊ देऊ नये.

ज्ञानाचा दिवा घरोघरी लावून दीपावली साजरी करा.

तैलधारेप्रमाणे अखंड ध्येयाचे चिंतन म्हणजे उपासना.

‘उप-आसन = उपासना याचा अर्थ देवाजवळ बसणे.

ज्ञान कोठेही असो मधुमक्षिकेप्रमाणे ज्ञानोपासक ते तेथून घेतोच.

आपल्यातील देवत्व प्रकट करणे हा उपासनेचा उद्देश आहे.

स्वात्म्याला लक्षून केलेली सोऽहं, ही उपासना आहे.

समारोप

तर कसे वाटले Motivational Suvichar In Marathi सुविचार मला खात्री आहे तुम्हाला सुविचारांचा फायदा झालाच असेल. तर लगेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व मित्र मैत्रिणींना शेअर करा.

Treading

More Posts