[79+] Good Thoughts in Marathi || Best Suvichar

[post_dates]

#Good Thoughts In Marathi for Students

ध्येयाला अनुलक्षून केलेली ती ध्येयोपासना आहे.

त्याग व भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय.

मी तू पणाची व अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.

मनुष्य जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ कनिष्ठ ठरतो.Good Thoughts in Marathi

समता हे अमृत असून विषमता हे विष आहे.

एकत्वाची भावना असणे हे राष्ट्रीयत्वाचे गमक आहे.

एकाग्रतेशिवाय अभ्यास नाही आणि अभ्यासाविना यश नाही.

बौद्धिक एकाग्रतेनेच जगातील मोठ-मोठी कामे साकारली गेली.

यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे एकाग्रता होय.Good Thoughts in Marathi

मनाच्या एकाग्रतेपुढे कोणतीही गोष्ट अवघड नाही.

एकाग्रतेसाठी ध्येय निश्चित हवे.

सूक्ष्म अभ्यासानेच दृष्टीची व मनाची एकाग्रता प्राप्त होते.

प्राप्त वस्तूचा जो त्वरित उपयोग करुन घेतो तो शहाणा.

भावनेपेक्षा प्राप्त कर्तव्य करणे हे श्रेष्ठ आहे.Good Thoughts in Marathi

आपल्या बऱ्यावाईट कर्मांचे फळ इतरांनाही भोगावे लागते.

कुशलतापूर्वक केलेल्या कामासच योग असे म्हणतात.

काचेसारखे स्वच्छ कर्म केल्यानेच ईश्वरदर्शन होते.

ज्ञान हे निष्काम कर्मवृक्षाला आलेले सुंदर फळ आहे.

कल्पकतेने केलेले कार्य अद्भुतता घडवून आणते.

प्रामाणिकपणे कर्तव्य करणाऱ्याच्या मागे ईश्वर असतो.

साध्य-साधन याचे बिनचूक ज्ञान असले की कर्म सफल होते.

दिवसभर चांगले कर्म केले तरच रात्री शांत झोप येईल.Good Thoughts in Marathi

जे जे करावयाचे ते ते ज्ञानपूर्वक श्रद्धेने करणे तो कर्मयोग !

बोलण्यापेक्षा कृतीचा परिणाम अधिक होतो.

लहान काम उत्तम केल्यास मोठे काम चालून मागे येते.

Good Thoughts in Marathi

#Positive thought in Marathi || Positive thought in Marathi

कृती ही चटका लावणारी असावी चटका देणारी नको.

कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो.

नेतृत्त्व, कर्तृत्वाविना वांझ असते.

कर्तृत्वान हा खरा नेतृत्वाचा हक्कदार असतो.

माणसाची उच्चता शरीरावर नसून त्याच्या कर्तृत्वावर असते.

मनुष्य स्वतःचे कर्तृत्व घडवितो आणि त्याची फळे भोगते.

ज्याला कर्तृत्वाचा अभिमान नाही तोच खरा अलिप्त.

आपला कामावर भाव असला की लोकावरही प्रभाव पडतो!

जो खऱ्या अर्थाने कलेला जगवतो त्याला कला जगवते.

कलामय जीवनाला वैफल्य कधीच ग्रासीत नाही.

कलेमुळे जीवन बहुरंगी, बहुढंगी आणि चिरतरुण राहते.

चित्रकला हे मनाला मोहित करणारे अबोल काव्य आहे.

छंदातून अश्लीलतेला उत्तेजन मिळू नये.

सत्यं, शिवं आणि सुंदरं याचे संमेलन म्हणजे कला.

कला ही आनंदाची जननी आणि मांगल्याची माता आहे.

सर्व प्रकारच्या कला या निसर्गाच्या नकला आहेत.

मनाला आंनद देणारी प्रत्येक कृती कलापूर्ण असते.

कलेसाठी कला जोपासणाऱ्याला व्यवहारात कीर्ती मिळते. जीवनासाठी कला जोपसणाऱ्याला व्यवहारात धन मिळते.

जीवनानंदाची वृद्धी व्हावी म्हणून कलादेवतेचा उपयोग होतो.

देव व समाजसेवा म्हणूनही कलेचा उपयोग करता येतो.

समाजरंजन व ज्ञानप्रबोधन म्हणूनही कला उपयुक्त ठरते.

अनिवार्य भावनेचा उस्फूर्त उद्रेक म्हणजे काव्य.

सुकाव्यासारखा दुसरा जगात रस नाही.Good Thoughts in Marathi

मानसिक दुःखावर काव्य ही गुणकारी जडीबुटी आहे.

काव्यानंद शुद्ध व उच्च प्रतीचा असावा. कविता ही प्रतिभेचे बाह्यनर्तन आहे.

वाईटाच्या विरुद्ध तिरस्कार जागृत करणे हे कवीचे कर्तव्य आहे.

Good Thoughts in Marathi

#Good Thoughts In Marathi Text

जो दोष आपणाला दिसत नाही तो कायद्याने दाखवला जातो.

माणसाने स्वतःच्या बाबतीत स्वतःला न्यायाधीश समजू नये.

आपल्याला फायदेशीर असले तरी ते कायदेशीर असलेले चांगले !

रागद्वेषापासून मुक्त असलेला मनुष्य आदर्श बनतो.

क्रोधाला क्रोधाने जिंकता येत नसून शांतीने जिंकता येते.

क्रोधाच्या ताब्यात न जाता क्रोधाला ताब्यात ठेवा.

क्रोध अर्थाला घालवितो आणि अनर्थाला जन्म देतो.

क्रोधाने विवेक नष्ट होऊन मनुष्य पाशवी बनतो.

क्रोध हा बुद्धीतील विवेकदीपाला मालविणारा सुसाट वारा आहे.

क्रोध विचाराला नष्ट करून अविचारास जन्म देतो.

माणसाला काही गोष्टीचा राग असावा, पण द्वेष नसावा.

माणसाने विनोदी असावे, पण कुचेष्टेखोर नसावे.

माणसात मवाळकी असावी, पण टवाळकी असू नये.

द्वेष दुर्गुणांचा असावा, व्यक्तीचा नसावा.Good Thoughts in Marathi

राग आपल्या विकारावर काढावा दुसऱ्यावर नव्हे.

क्रोध असावा पण त्याचे परिणाम वाईट होतील असा नसावा

क्रोधाग्नी शत्रूपेक्षा आपणासच जास्त जाळतो !

कारणाशिवाय कार्य संभवतच नाही.

सार्वजनिक कार्यकर्त्याची वागणूक संशयरहित असावी.

कार्यकर्त्यांची भूमिका व्यवहार्य व वास्तववादी असावी.

मनपरिवर्तनासाठी कीर्तनासारखे दुसरे साधन नाही.

कीर्तनावरील भावाशिवाय कीर्तनकाराचा लोकांवर प्रभाव पडत नाही.

हरिकथा भवव्यथा घालविते.

क्रांती आधी मनामध्ये आणि मग जनामध्ये व्हायला हवी.

करुणा आणि कठोरता हे क्रांतीचे दोन पैलू आहेत.

क्रांती ठरवून होत नसते, ती वेळ आली की आपोआप होते.

भ्रांतीरहित क्रांतीच यशस्वी होते.

कृतज्ञतापूर्वक केलेल्या कामाचा कधीच शीण वाटत नाही.

कृतज्ञतेच्या अश्रूची किंमत हिऱ्यांपेक्षा मोलाची असते.

दसऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव म्हणजे कृतज्ञता.

कृतज्ञतेने माणसाच्या माणुसकीला तेज चढते.

उपकारकर्त्याचे उपकार फुकट न जाऊ देणे म्हणजे कृतज्ञता.

उपकारामुळे मनुष्य स्वातंत्र्य गमावून बसतो.

मूर्खावर केलेला उपकार अपकारासही कारण होतो !

उपकाराची फेड अपकाराने करणे हे नीचपणाचे लक्षण आहे.

उपकार याचा अर्थ जवळ करणे, अभय देणे असा आहे.

दीन-दुःखितांना प्रेमाने जवळ करणे म्हणजे उपकार होय.

मनुष्याला दारिद्र्याची नव्हे तर दुर्गुणांची लज्जा वाटावी.

गरीब-श्रीमंत हा दैवी भेद नसून तो मनुष्यकृत भेद आहे.

अन्यायाने मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा न्यायाची गरिबी बरी.

आर्थिक गरिबी असली तरी मन श्रीमंत असावे.Good Thoughts in Marathi

अनिच्छा दारिद्र्याला अपरिग्रह म्हणता येत नाही.

जातीभेदाइतकाच गरीब-श्रीमंत हा भेद वाईट आहे.

लोकमान्यता मिळण्यासाठी लोकनिंदा पचवावीच लागते !

थोर कार्य साकारण्यासाठी वृत्तीत थोरपणा असावा लागतो.

JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇

#Good Thoughts In Marathi short || Good Thoughts Marathi

जे मनाने व कर्तृत्वाने मोठे ते खरे मोठे.

कीर्ती ही सद्‌गुणांची पडछाया आहे.

समजूतदारपणा ही भौतिक संपत्तीपेक्षा श्रेष्ठ संपत्ती आहे.

देवाचे नाव कधीही न संपणारी भावनिक संपत्ती आहे.

ज्याचे मन समाधानी झाले, त्याचे जवळ सर्व ऐश्वर्य आहे.

सत्याचाच विजय होतो ही सात्त्विक व तात्त्विक गर्जना आहे.

घंटानिनाद देवाला नव्हे तर सद्‌गुणांना जागे करण्यासाठी आहे !

गतीमध्ये प्रगती पाहिजे, किमान अधोगती तरी नको असते !

गरजेशिवाय केलेला उपदेश वाया जातो.

किमान गरजा म्हणजे सुखाची गुरुकिल्ली आहे.

गरज लागली की मनुष्य डोंगर चढून वर जातो.

डोंगरावरील संन्यासी दोन प्रहरी अन्नासाठी खाली उतरतो.

जेव्हा मिठाची गरज असते तेव्हा साखर उपयोगी नसते.

शील म्हणजे सदाचारसंपन्न आचरण.

करुणा म्हणजे सर्व प्राण्यांविषयी प्रेमभाव.

विश्वबंधुत्व म्हणजे सर्व प्राणिमात्रांसंबंधी आत्मीयता.

क्रोधपूर्ण शब्दासारखे दुसरे तीक्ष्ण शस्त्र नाही.

अतिलोभासारखे दुसरे प्राणघातक विष नाही.

चिंतेसारखी भयानक दुसरी आग नाही.

आत्मस्वरूपज्ञानासारखी दुसरी काळीकुट्ट रात्र नाही.

मनाला मलीन करणारी लोभासारखी दुसरी धूळ नाही.

असत्य वाणी ही जीभेची मलीनता आहे.Good Thoughts in Marathi

अनीती पहाण्यात आनंद वाटणे हा डोळ्यांचा रोग आहे.

परनिंदा ऐकणे हा कानाचा दोष आहे.

सत्कर्माकडे प्रवृत्त होणे हे शुद्ध मनाचे लक्षण आहे.

उच्चारावरून नम्रता आणि आचारावरून शील समजते.

श्रेष्ठपणा वयावर अवलंबून नाही गुणांवर आहे.

दान देणाऱ्यापेक्षा गुणाला दाद देणारा दाता बरा.

माणसाचे अंगी क्षमा असेल तर चिलखताची गरज नाही.

क्रोधासारखा मारक दुसरा शत्रू नाही.

दुर्जनासारखा दुसरा सर्प नाही.

विद्येसारखे दुसरे धन नाही.

शांतीसारखे दुसरे वैभव नाही.

विनयासारखे दुसरे भूषण नाही.

आपला दोष न समजणे हाच मोठा दोष आहे !

नजर दुसऱ्याचे गुण घेण्यावर आणि आपल्या दोषावर ठेवा.

गुणांमुळे माणूस जितका प्रिय होतो तितका रूपामुळे नाही.

गुणांची यथार्थ पारख स्वतः गुणी असल्याशिवाय होत नाही.

खरा बलवान कोणाचा द्वेष करीत नाही.

द्वेषाला सहानुभूतीने जिंकता येते.Good Thoughts in Marathi

माणसाला दोष कळत नाही तोपर्यंत तो जातच नाही.

गुणी मनुष्य जनता व जनार्दनाला लवकर प्रिय होतो.

दोष आपले टाकावे, गुण दुसऱ्याचे घ्यावे.

स्वभावातील दोष झाकून टाकण्यापेक्षा ते काढून टाकावेत.

सुधारणा होणार असेल तर दोष जरुर दाखवावेत.

Good Thoughts in Marathi
#Good Morning good thought || Good Thoughts Marathi

सद्गुण हीच समाजाची संपत्ती आहे. ती जपायला हवी.

श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा.

आकाराने मोठे असण्यापेक्षा गुणाने मोठे असावे.

ज्याचे मन आणि वाणी सुंदर त्याचे सर्वच सुंदर असते.

ग्रंथाइतका प्रांजळ आणि निष्कपटी गुरू जगात नाही.

सौंदर्यात उपयुक्तता असेल तर दुधात साखर !

ज्याला जे आवडते त्याला ते सुंदर वाटते.Good Thoughts in Marathi

सौंदर्यदृष्टी नसणाऱ्याला कुठेही सौंदर्य दिसत नाही.

उदासवृत्तीच्या माणसाला कुठेही सौंदर्य दिसत नाही.

कोमल हृदयी माणसाला सौंदर्यदृष्टी असते.

चांगले पसरायला वेळ लागतो, वाईट ताबडतोब पसरते.

फळ नसलेल्या झाडांना कोणी दगड मारीत नाही.

दोष सांगणे व बोलणे हीनपणाचे लक्षण आहे !

विचारी मनुष्य तत्त्वज्ञ बनतो व विकारी बेताल बनतो.

जे ऐकले आणि अंगी बाणून अनुभवले ते खरे शिक्षण.

शिष्याला जीवन ज्ञानाच्या गाभाऱ्यात घेऊन जातो तो गुरू.

शिष्याला ध्येयरूप ज्ञानाशी एकरूप करतो तो गुरू.

दैनंदिन जीवनाशी ज्ञानाची सांगड घालून देतो तो गुरू.

ज्ञान आणि अनुभव यांची सांगड घालणे म्हणजे खरी गुरुभक्ती.

अनुभवाचे बोलते चालते विद्यापीठ म्हणजे गुरू.

गुरुशिष्याचे नाते हे सर्व नात्यांहून श्रेष्ठ आहे.

ग्रंथाइतका प्रांजळ आणि निष्कपटी गुरू जगात नाही.

आचार्यांची योग्यता दहा क्षत्रियांहून अधिक असते.

उपाध्यायांची योग्यता दहा आचार्यांहून अधिक असते.

सद्‌गुरुवचनी विश्वास हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

ग्रंथवाचनाचा आनंद स्वर्गानंदापेक्षा श्रेष्ठ आहे.

मित्र व ग्रंथ हे मोजकेच असावेत, पण ते उत्तम असावेत.

ग्रंथसंपत्तीवरून त्या समाजसंस्कृतीचे निदान करता येते.

दागिन्यांच्या संग्रहापेक्षाही ग्रंथसंग्रह श्रेष्ठ आहे.

ग्रंथालय हे आजच्या प्रगतविश्वातील विश्वविद्यालय आहे.

ग्रंथालय आकाराने मोठे नसले तरी ग्रंथांनी समृद्ध असावे.

जिज्ञासूंची ज्ञानपिपासा भागविणारा झरा म्हणजे ग्रंथालय.

श्रेष्ठांचे विचार आणि अनुभव ज्यात ग्रथित आहेत ते ग्रंथ.

JOIN MARATHI BLOOGING COURSE http://Courseinmarathi.com

ग्रंथ वाचनासाठी असतात, केवळ पूजनासाठी नव्हेत.

वाचकाचा वेळ वाचविणे हे ग्रंथपालाचे परम कर्तव्य आहे.

वाचकाला हवा तो ग्रंथ मिळवून देणे हे ग्रंथपालाचे काम आहे.Good Thoughts in Marathi

बंद करून ठेवलेले पुस्तक हे कागदाच्या ढिगासमान आहे.

रंजनातून मनुष्याची मनोन्नती करते ते साहित्य.

समारोप

तर मित्रांनो कसे वाटले Good Thoughts in Marathi मला खात्री आहे तुम्हाला ह्या सुविचारांचा फायदा नक्की झाला असेल. तर वाट कसली बघता लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. आणि काही माहिती

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment