[79+] Motivational Thoughts in Marathi || Best Suvichar

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सुविचार हे जीवनात फार महत्त्वाचे कारण सुविचारांमुळे माणूस पूर्ण बदलतो Motivational Thoughts in Marathi आणि त्याच्या जीवनात फार बदल घडतात. तो पूर्ण सकारात्मक ऊर्जा मिळवतो.

“Motivational thoughts in marathi”

बाह्य शत्रूपेक्षा अंतरशत्रू मारण्यात पुरुषार्थ आहे.

संकटपूर्व उपाय करणे हे शहाणपण आहे.

स्वतःच्या दोषांची जाणीव होणे हे पहिले शहाणपणाचे लक्षण आहे.Motivational Thoughts in Marathi

शहाणपण हे रत्नापेक्षाही मौल्यवान आहे.

ध्येयावरून शहाणपण पारखता येते.

पुस्तकी ज्ञानाचा उपयोग व्यवहारात करुन घेतो तो शहाणा होय.Motivational Thoughts in Marathi

व्यवहारी जीवन यशस्वी करते ते खरे शिक्षण होय.

विद्यार्थी मान देतील इतकी शिक्षकांनी मान उंच ठेवावी.

समाजाचा विकास यंत्रापेक्षा शिक्षकामुळेच जास्त होतो.

मनुष्याच्या शरीर व बुद्धीचा उपयुक्त विकास म्हणजे शिक्षण होय.

सुशिक्षित असून सुसंस्कृत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ आहे.Motivational Thoughts in Marathi

उद्योग व सहयोग यांवर आधारित शिक्षण असावे.

जीवनाला शक्ती आणि गती देऊन प्रगतीला नेते ते खरे शिक्षण.

उत्तम गुणांचे आदान व उपजतगुणांचे संवर्धन म्हणजे शिक्षण.

मनुष्याला भुक्ती, मुक्ती जी प्राप्त करून देते ती विद्या होय.

चारित्र्याच्या विकासाविना शिक्षण विकलांगी आहे.

कणखर माणूस निर्माण करते ते शिक्षण असते.

मनुष्याच्या महान शक्तीचा आविष्कार म्हणजे शिक्षण होय.Motivational Thoughts in Marathi

स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवते ते शिक्षण.

शिक्षणात काटकसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे. Motivational Thoughts in Marathi

संशयी माणसाला इह, परलोकी कोठेही शांती नाही.

चैतन्याविना शरीर तसा श्रद्धेविना मनुष्य असतो.

अविश्वास दुर्बलतेचा जनक आहे.

मनुष्याने सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे.

आत्मविश्वास जीवनसफलतेचे रहस्य आहे.

मानवाला अन्नाइतकीच श्रद्धेची गरज आहे.

श्रद्धेने माणसाला मानसिक बळ येते.

श्रद्धेच्या प्रेरक शक्तीविना जीवन उन्नत होणार नाही.

तत्त्वनिष्ठश्रद्धा तर्कामुळे नष्ट होत नसून ती दृढ होते.

कृतिशील सत्याचे श्रद्धेविना फळ हाती येत नाही.

मानवाला अन्नाइतकीच श्रद्धेची गरज आहे.

श्रद्धेविना जीवन वाळवंटासारखे रखरखीत व उदास असते.Motivational Thoughts in Marathi

श्रद्धेने माणसाला मानसिक बळ येते.

अविश्वास दुर्बलतेचा जनक आहे.

मनुष्याने सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावे.

आत्मविश्वास जीवनसफलतेचे रहस्य आहे.

“Motivational thoughts In Marathi”

“Motivational Quotes In Marathi” : Motivational Quotes In Marathi

सदाचार व दया हे साधूचे खरे अलंकार आहेत.

विवेकी आपल्या सहनशीलतेने बरेच अपाय टाळू शकतो.Motivational Thoughts in Marathi

मंदिराच्या कळसावर बसणारा कावळा भक्त होत नाही

मन निराकार आहे, पण निर्विकार नाही.

पाण्यातील रेषेप्रमाणे सज्जनांचा क्रोध लवकर शमतो.

सुस्वभावी व्यक्तीच्या सहवासाने कुस्वभाव नाहीसा होतो.Motivational Thoughts in Marathi

आज सज्जनाला सजा आणि दुर्जनाची मजा असे चालू आहे.

कर्मात बदल शक्य असतो स्वभावात नाही.

पिसाळलेले कुत्रे चावले तर त्यास आपण चावू नये.

सज्जनांची शक्ती प्रयत्नपूर्वक संघटित करावी लागते.

दुर्जनांची शक्ती लवकर संघटित होते.

परीस लोखंडास सुवर्ण करतो, पण संतसंगती माणसास सवर्ण करते.

खोटे बोलून पैसे मिळतात पण विश्वास जातो.

सोने की पितळ याची परीक्षा प्रसंगी कसोटीनेच होते.

आपण नकळत जे बोलतो तेच पुष्कळदा खरे असते.

सत्याच्या अधिष्ठानानेच जीवन व कलेला मोल चढते.

सत्य हेच मृत्यूलोकातील सार आहे.

इहपर कल्याणार्थीनी सत्यासाठीच जगावे व मरावे.

सत्याने मानव परमेश्वर बनतो व असत्याने पशू बनतो.

एक खोटे लपवण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते.

माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे ते माझे म्हणा.

सत्य ज्याने गमावले त्याने सर्व काही गमावले.

सामर्थ्याशिवाय सत्याला सत्यपण प्राप्त होत नाही.

असत्यामुळे तात्पुरता फायदा होतो, पण कायमचा तोटा होतो.Motivational Thoughts in Marathi

सत्याला भय नसते आणि भय असते ते सत्य नसते.

सत्य हे वाणीचे सौंदर्य आणि जीवनाचे सार आहे.

सत्यापासून न ढळणाऱ्यांचा भविष्यकाळ चांगला असतो.

ज्ञान अंगी मुरून नम्रता आल्याशिवाय सत्य सापडत नाही.

सत्यासाठी सर्व त्याग परवडेल पण सत्याचा त्याग परवडणार नाही.

सत्य हे प्रारंभी कटू असले तरी परिणामी गोड असते.

त्रिकालाबाधित असते तेच सत्य असते.

JOIN NOW SOCIAL GROUPS 👇👇👇

“Success thoughts in marathi”: Success thoughts in marathi

स्वतःच्या विकारांवर ज्याचा ताबा चालतो तो श्रेष्ठ होय.

अज्ञानाचा नाश झाला की प्रपंचाचा भास नाहीसा होतो.

मनुष्य संताला शरण गेल्याने कृतार्थ होतो.

समाज आपणास बनवितो आणि आपण समाजाला बनवितो.

समाजामध्ये नव्वद टक्के सहकार्य व दहा टक्के संघर्ष दिसतो.

समाजपरिवर्तनासाठी स्ववर्तनाकडे लक्ष असावे.

समाज तोडण्याचा नव्हे तर जोडण्याचा प्रयत्न करावा.

समाजधारणेस नीती आणि भीती या दोन्हींची गरज आहे.

मिळालेली संधी कोणत्याही सबबीवर दवडू नका.

मिळालेल्या लहान संधीतूनच मोठा फायदा होतो.

मोठ्या संधीची वाट पहाणारा आपले आयुष्य व्यर्थ दवडतो.

उचित वेळी मिळालेली कोणतीही संधी लहान नसते.

आपले भाग्यचक्र फिरविणाऱ्यांना संधीची कमतरता नसते.

कार्यशील माणसाला संधीची वाट पहावी लागत नाही.

जो संधिचुकार तो जन्माचा भिकार !

संधिसाधू माणूसच यशस्वी जीवनाची वाटचाल करतो.

संस्थेची वाढ तिच्या उत्तम व्यवस्थापनावरच असते.

संस्थांचे उद्देश रचनात्मक आणि विधायक असावेत.

सर्वांनी मिळून काम करण्याचा आधार म्हणजे संस्था होय.

कमरेषेचा प्रान्त संपल्यावरच भाग्यरेषेची हद्द सुरू होते.

प्रकर्षाने प्राप्त होते ती प्रसिद्धी होय.

सिद्धीला प्रसिद्धी नसेल तर तीसुद्धा कुचकामी ठरते.

योग्यता नसताना प्रसिद्धीची हाव धरणे घातक आहे.

कर्तबगार माणसाला पुढे नेणारी प्रसिद्धी ही जननी आहे.

दुसऱ्याला सुख देण्यातच सुख मिळविण्याचे रहस्य आहे.

जनाला दुखविणे म्हणजे जनार्दनाला दुखविण्यासारखे आहे.

सुख मनुष्य घटाघट पितो आणि दुःख मात्र चघळीत बसतो.

दुःखाचे मोल दिल्याशिवाय सुख मिळत नाही.

दुःख ठेवावे मनात आणि सुख सांगावे जनात.

जीवनात दुःखामुळेच सुखाला किंमत आहे.

दुःखच नसते तर सुखाची जाणीवही झाली नसती.

सुख ही शोधून मिळणारी वस्तू नाही तर ती मनाची धारणा आहे.

सुखदुःख हे जीवनाचे दोन मुखवटे आहेत.

एकाचे सुख ते दुसऱ्याचे दुःख होऊ शकते.

सुख म्हणजे मनाची समाधानी वृत्ती होय.

Motivational Thoughts in Marathi

“Marathi thoughts in Marathi” : Marathi thoughts in marathi

दुःख विभागल्याने कमी होते व सुख विभागल्याने वाढते !

सदैव दुःखाच्या भावनेतून क्रांतीचा उदय होत असतो.

दुःखाने सुखाची चव अधिक वाढते.Motivational Thoughts in Marathi

आपली सुखदुःखे आपणच निर्माण करीत असतो.

आशारूपी मदिरेमुळेच व्यक्तीला दुःख भोगावे लागते.

प्रत्येकाला आपल्या दुःखाचे ओझे आपणच वहावे लागते.

प्रेमाच्या पाठबळाने दुःखाचा पहाड चढण्याचे श्रम जाणवत नाहीत.

दुसऱ्यांना तुडवून सुख मिळाले तरी त्याचा काय उपयोग ?

दुःख शमण्यासाठी कालांतर, विषयांतर व स्थलांतर करावे.

जो दुःखाने दुःखी होत नाही तो दुःखालाच दुःखी करतो.

सुखाच्या मोहातच दुःखाचे मूळ असते.

खरा सुखाचा निधी बाहेर नाही तर अंतःकरणातच असतो.

मनाच्या प्रसन्नतेत सुखाची सफलता दडलेली आहे.

ज्या क्षणी स्वतःला पूर्ण विसराल तो क्षण आनंदाचा समजावा.

सुख-दुःख न बाधणे म्हणजे समाधान होय.

आपल्या आनंदी स्वभावामुळेच इतर जीवही आनंदी होतात.

नित्यानंद टिकविणाऱ्याला नित्य दिवाळी असते.

आनंद हे म्हातारपणाचे शक्तिवर्धक औषध आहे.

सुखदुःख हे जीवनपटावरील दोन मुखवटे आहेत.

जीवनपट हा सुखदुःखाला कारण होत असतो.

सुखाचा गैरफायदा दुःखाला कारण होत असतो.

भगवंतावर विश्वास नसेल तर काळजीने ग्रासलेच म्हणून समजा.

गेलेल्यांची चिंता करणे म्हणजे असलेली शक्ती घालवणे.

काम करताना काळजी घ्या, पण नुसती काळजी करीत बसू नका.

दुःखाचे दुःख करून ते कमी न होता अधिक वाढते.

शरीराचे शोषण करणारे चिंतेसारखे दुसरे काही नाही.

चिंतामुक्त मनुष्यच शांतीचा अधिकारी बनू शकतो.

प्रसन्नतेशिवाय केलेले काम समाधानकारक होत नाही.

मनाची अखंड प्रसन्नता म्हणजे ईशकृपा होय.

दुसऱ्याच्या हृदयात शिरायला प्रसन्नतेसारखे साधन नाही.

प्रसन्नतेशिवाय लाभलेली एकाग्रता सदोष आहे.

मन विक्षिप्त झाल्यावर बाह्योपचाराने शांती मिळत नाही.

दुष्कर्माने वैभव मिळेल पण शांती मिळणार नाही.

शांतीविना सर्व वैभव तुच्छ आहे.

Motivational Thoughts in Marathi

“Marathi Motivational Suvichar : “Marathi Motivational Suvichar”

दुसऱ्याला आनंद देण्यातच सज्जनांचा खरा आनंद दिसतो.

जीवनातील अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य.

अखंड प्रसन्नता प्राप्त करणे हे परमोच्च परमार्थाचे ध्येय आहे.

ज्ञानाने बुद्धी तर सेवेने अंतःकरण जिंकले जाते.

प्राणिमात्राविषयी दया असल्याशिवाय सेवा घडत नाही.

सेवा हा परमार्थ आहे, तो प्रत्येकाने पाळलाच पाहिजे.

कुत्र्याला भाकरी टाकली तर ते प्रामाणिकपणे घर राखते.Motivational Thoughts in Marathi

सध्या तरी मेवा घेतल्याशिवाय सेवा करण्याची प्रवृत्ती दिसत नाही.

फक्त परमार्थ विषय बोलण्यास सोपा व करण्यास कठीण आहे.

शिव्या देणे सोपे आहे, ओव्या म्हणणे अवघड आहे.

खोटे बोलणे सोपे आहे, खरे बोलणे अवघड आहे.

मुले होणे सोपे पण ते यथायोग्य जोपासणे अवघड.

नुसते बोलणे सोपे पण ते करणे अवघड आहे.

स्वतःच्या सुधारणेवरच जगाची सुधारणा अवलंबून आहे.

https://courseinmarathi.com/

जे करायचे ते आपल्यापासून सुरू केले पाहिजे.

स्वच्छतेविना सौंदर्य सिद्ध होत नाही.Motivational Thoughts in Marathi

जे स्वभावतः आहे ते पूर्णतः बदलणे अवघड असते.

धूर्त माणूस स्वतःशी देखील प्रामाणिक नसतो.

शहाणपणाची भ्रष्ट नक्कल म्हणजे धूर्तपणा होय.

स्वतःपुरतेच जगणे असेल तर जगापुढे हात पसरू नयेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment