[99+] Suvichar | ‘सुविचार सर्वोत्तम मराठी सुविचार’

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

        या सुविचार संग्रहात केवळ एक सुविचार जरी आपल्या विचारांना कलाटणी देण्यास व आपल्याला प्रेरणा देण्यास महत्त्वाचे ठरले तर हा सुविचार संग्रह आपल्यासमोर सादर करण्याचा माझा हेतू खरोखरच साध्य झाल,असे मी समजेन.

       माझा हा छोटासा प्रयत्न आपल्याला निश्चितच आवडेल याचा हे संग्रह आपल्यासमोर सादर करीत आहे. Suvichar | सुविचार 

सुविचार

         मराठी सुविचार

  1. ज्या कामात आपल्याला आनंद वाटतो, त्या कामाचा आपल्याला त्रास वाटत नाही. 
  2. प्रामाणिकपणे परिश्रम करण्यात प्रतिष्ठा असते. 
  3. सुरुवातीला हसण्यापेक्षा शेवटचे स्मित चांगले असते. 
  4. पक्षी पकडायला गेल्यानंतर ओरडायला लागलो, पण त्याचा उपयोग नसतो कारण उशीरा झालेला असतो. 
  5. हास्य ही सर्वोत्तम गोष्ट आहे.हास्य ही मानवाला मिळालेली देणगी आहे.पशु रडू शकतात पण हसू शकत नाहीत. 
  6. कायदा हे नोकर आहेत धनी नव्हते जो कायद्याने पालन करतो तोच कायद्यावर सत्ता गाजवू शकतो. 
  7. माणसाचा स्वभाव असा बनवला आहे की  दुसर्‍याच्या बाबतीतील गुण दोष अगदी स्पष्ट दिसतात. पण स्वतः च्या गुण-दोषाबदल काही सांगू शकत नाही. (दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. 
  8. तुम्ही कितीही मोठे असा,कायदा नेहमी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. 
  9. कायदा वाईट कृत्ये शोधू शकतो. पण त्याचे निर्मूलन करणे त्याच्या हातात नसते.
  10. कायद्याबदल अज्ञान ही सबब चालत नाही. 
  11. ज्या देशातील कायदे दोषपूर्ण असतात,त्या देशातील नीतिमत्ता ही सदोष असते. 
  12. ज्ञान हे स्वतः अभ्यास करूनच मिळवावे लागते. ती वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता नव्हे.
  13. विश्रांती ही पूर्वी केलेल्या श्रमाची बक्षीस आहे. 
  14. फुरसतीच्या वेळ हा केलेल्या श्रमाचे बक्षीस आहे. 
  15. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. म्हणुन अनेकांना स्वातंत्र्याची भीती वाटते. 
  16. नेहमी खोटे बोलणारे जरी खरे बोलला तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. खोटे बोलणाऱ्याला हिची शिक्षा होत असते. 
  17. मनुष्य कसा मृत्यू पावतो याला महत्त्व नसते, त्याचे जीवन कसे घालवले यालाच सर्व महत्त्व आहे. 
  18. ज्याचे जीवन सुरू झाले, त्याच वेळी त्याची मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली असे समजले पाहिजे. 
  19. आयुष्य प्रतिष्ठेने जगण्यात तुम्हाला जर अडचणी आल्या तरी प्रतिष्ठेने मरणे आपल्या हातातच असते.
  20. जे भावनेच्या आहारी जाऊन जगतात,त्यांना हे जीवन दुःखाचे वाटते.जे विचार करून जगतात त्यांना हे जीवन सुखमय वाटते. 

                 मराठी सुविचार 

  1. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत कसे जगायचे ते शिका. 
  2. काही लोक मृत्यूला इतके घाबरतात की, ते जीवन जगण्याची सुरुवातच करीत नाहीत. 
  3. घाणीतून प्रकाशाची किरणे गेली तरी घाण प्रकाशकिरणांना चिकटत नाही.
  4. नीट श्रवण करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. 
  5. ज्याच्यावर आपण प्रेम करतो,त्याच्याकडूनच फक्त आपन शिकतो. 
  6. एक यंत्र 50 सामान्य लोकांचे काम करते,पण एका असामान्य व्यक्तिचे काम कोणतीही यंत्र करू शकत नाही.
  7. पुरुष निर्बल झाले की स्त्रियांना अध:पात नक्कीच होतो. 
  8. सर्व मानवजातीतील समजून घेणे सोपे आहे,पण माणसाला व्यक्तिशः समजून घेणे अवघड आहे. 
  9. मानव हा एकाच प्राणी असा आहे की जो भूक नसतानाही खातो आणि तहान नसतानाही पाणी पितो. 
  10. चांगली अगर वाईट माणसे ही आपल्याला भासतात तितकी वाईट किंवा तितकी चांगली नसतात.
  11. प्रत्येक माणूस म्हणजे एक ग्रंथच आहे. तो कसा वाचायचा हे तुम्हाला समजले पाहिजे. 
  12. विवाह ही एक लॉटरी आहे.यामध्ये पुरुष आपले स्वातंत्र्य पणाला लावतो तर स्त्री आपले सुख पणाला लावते.
  13. निसर्ग,काल आणि संयम हे तीनच खरे श्रेष्ठ वैध आहेत. 
  14. दररोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टर तुमच्यापासून लांब राहतील. 
  15. ज्याला बहुतेक औषधी कशी निरुपयोगी आहेत हे समजते, तोच उत्तम वैध असतो. 
  16. दिसते तसे नसते म्हणुनच जग फसते. 
  17. चांगल्या स्मरणशक्तीचे रहस्य एकाग्रते आहे आणि ज्या विषयात आपल्याला रुची असते त्याबाबतच आपण मन एकाग्र करू शकतो. ज्या गोष्टीमुळे आपल्या मनावर खोल ठसा उमटतो ती गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही. 
  18. इतरांच्या संगतीत आपले मन घासून पुसून स्वच्छ ठेवणे उत्तम!
  19. कंजूष मनुष्य आपल्याजवळ काय आहे याचा विचार करीत नाही. त्याऐवजी आपल्याजवळ जे नाही त्याची त्याला गरज भासत राहते. 
  20. हे लक्ष्यात ठेवा की, सुखी जीवनासाठी फारच थोड्या गोष्टींची जरूरी असते. 

marathi blooging online course

                    मराठी सुविचार

  1. अहंकार ही आज्ञानी माणसाची कुबडी असते. 
  2. सर्व विनाशाचे किंवा संकटाचे मूळ द्रव आहे असे म्हणतात.ते खरे नव्हे पण द्रवाचा हव्यास,अति स्वार्थीपणा आणि अती स्वार्थीपणा आणि अतिलोभी या गोष्टी दुष्टपणा व दुर्देवाला कारणीभूत असतात. 
  3. पैसा मिळवायचा असेल तर प्रथम पैसा खर्च करायला शिकले पाहिजे.
  4. पैसे हा चांगला नोकर आहे. परंतु धनी म्हणुन फार वाईट आहे. 
  5. प्रत्येक माणूस हा चंद्रासारखा असतो.तो आपली काळी बाजु कोणालाच दिसू देत नाही. 
  6. लहान मुलाच्या तोंडी आणि चित्तात आई हे नाव देवाप्रमाणे असते.
  7. संगीतामुळे मानवाला असे काही मानसिक मिळते की, ते मिळवण्याचा त्याने अगदी अतिरेक केले तरीही त्यामुळे त्याच्या नैतिक किंवा धार्मिक भावनांना कसलाही धक्का पोहोचत नाही. 
  8. मोठी जखम बरी होऊ शकते पण झालेली अपकीर्ती नाहीशी होत नाही. 
  9. निसर्ग आपल्याला कधीच फसवत नाही. आपणच आपली फसवणूक करत असतो. 
  10. वर्णमानपत्रे म्हणजे जनतेचे विश्वविद्यालये आहेत. 
  11. रात्री जसे तारे चमकतात,त्याप्रमाणे दुःखामुळेच सत्याचे खरे स्वरुप प्रगट होते. 
  12. मनुष्य आपण किती चांगल्या तर्‍हेने जगलो याचा विचार करीत नाही, फक्त तो विचार करतो की, आपण किती काळ जागणार, खरे म्हणजे दीर्घायुष्य मिळणे हे माणसाच्या हातात नाही, पण उदात्तपणे जगणे ही मात्र त्याच्या हातातली गोष्ट आहे. 
  13. आज्ञाधारक ही यशाची जननी आहे. 
  14. जो सौम्यपणे आज्ञा देतो,त्याला सर्वजण लवकर नमतात .
  15. ज्याला आज्ञापालनाची सवय आहे, तोच दुसर्‍याला आज्ञा कशी करावी,हे समजू शकतो.प्रथम आज्ञापालन शिका. आपल्याला संघटन हवी आहे आणि त्या शक्तीचा रहस्य आज्ञापालन आहे. 
  16. निरीक्षण ही जीवनातील नित्य टिकणार आनंद देणारी गोष्ट आहे. 
  17. दुसर्‍या माणसाचे मत तुमच्यापेक्षा भिन्न आहे म्हणुन तुम्ही त्याच्या डोक्यावर प्रहार करण्याचा विचार करू नका.तुमचे दहा वर्षापूर्वी जे मत होते त्यापेक्षा आज तुमचे मत भिन्न आहे. म्हणुन स्वतःच्या डोक्यावर प्रहार करण्यासारखे ते होईल 
  18. सर्वसामान्य माणूस प्रथम कशावर तरी विश्वास ठेवतो आणि नंतर आपल्या मतासाठी पुराव्याच्या शोध घेऊ लागतो.
  19. अगदी लहानसहान गोष्टीत जरी भिन्न मत असेल तरी क्षुद्र लोकांचे त्यामुळे वैर निर्माण होत असते. 
  20. लोकमत हे नित्य,अस्थिर व दोलायमान असते. 

                       मराठी सुविचार 

  1. उत्तम संधी आली असता विलंब करणे फारच तोटयाचे ठरते. 
  2. सामोऱ्या आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे येच यशाचे प्रमुख शस्त्र आहे. 
  3. चार गोष्टी परत येऊ शकत नाहीत. उच्चारलेल्या शब्द,लक्ष्यावर सोडलेला बाण, भूतकाळ आणि वाया घालवलेली संधी. 
  4. निर्भयता हे नैतिकतेचे सर्वात उत्तम गोष्टीचा पाया असतो. 
  5. ज्याला जगातील दुःखाची ओळख झाली नाही,त्याला हे जग अर्धेच समजले असे म्हंटले पाहिजे. 
  6. दुःखात सुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दुःख फार लांबले तर त्यात तीव्रता उरत नाही आणि दुःख जर तीव्र स्वरूपाचे असेल तर ते लांबत नाही. 
  7. जर आई बाबांना आपली मुले प्रामाणिक असावीत असे वाटत असेल तर प्रथम त्यांना स्वतः प्रामाणिक असायला हवे.
  8. आनंद जेथे शोधायला जावे,तेथे तो बहुधा सापडत नाही. 
  9. जो मनुष्य आपल्या देशाचे चांगली सेवा करतो, तो आपल्या पक्षाची चांगली सेवा करतो. 
  10. सहनशीलता ही आपल्याला न आवडणारी कटू गोष्ट असली तरी तिचे फळ मधुर असते. 
  11. ईश्वराला सामान्य दिसणारी व असणारी माणसाचे जास्त आवडतात. म्हणुनच ईश्वर अशी माणसाचे मोठ्या प्रमाणात निर्माण करतो. 
  12. फुलाला ज्याप्रमाणे सुगंध, त्याप्रमाणे माणसाला त्याचे व्यक्तिमत्त्व असते. 
  13. या जगात सत्कृत्य करणे आणि आपले कर्तव्य बजावले यापासून जो आनंद खात्रीने मिळतो तशा आनंदाची प्राप्ती दुसर्‍या कशानेही होत नाही. करतोयपूर्वीच्या या आनंदाला उपमा नाही. 
  14. आपण बहुधा गरिबाकडून घेत असतो व ते श्रीमंतांना देत असतो. 
  15. पाप आणि निषेधा हे कृत्यातून जो आनंद मिळतो, तो विष लावलेल्या भाकरीप्रमाणे असतो. त्या भाकरीमुळे भूक क्षणभर भागेल परंतु त्याचा शेवट मृत्यूतच आहे. 
  16. काव्य म्हणजे विचारांचा अत्यंत सुंदर अविष्कार होय. 
  17. खरी नम्रता स्वातंत्र्यतून व सहजतेतुन येते.दुसर्‍याने कसे वागावे याबद्दल तुमची जी अपेक्षा असते,तसे दुसर्‍यशी वर्तन करणे म्हणजे नम्रता. 
  18. श्रीमंतांच्या चैनी गरिबांच्या अश्रूंचे मोल देऊन विकत घेतलेल्या असतात.
  19. गरिबाची लाज वाटायची असे त्यात काही नसते, पण गरिबाची लाज वाटणे हेच खरे दारिद्र्य. 
  20. स्तुतीमुळे चांगली माणसे जास्त चांगली होतात, तर वाईट माणसे आणखीच बिघडता.
                              मराठी सुविचार 
  1. योग्यता नसताना केलेली स्तुती म्हणजे स्तुतीच्या बुरख्याखाली केलेली विडंबन किंवा थटाच होय. गर्वाने कसलाही झगझगीत व भव्य वेष घातला तरी गर्व म्हणजे क्षुद्रपणा.
  2. वैभवाच्या काळातील गर्विष्ठपनाचे पडत्या काळात दुःखात होते.
  3. जीवन म्हणजे प्रगती आणि प्रगतीसाठी दुःखे भोगाविच लागतात.
  4. तुम्ही जेव्हा सर्वात सुदैवी ठरता व उत्कर्षाचा परमोच्च बिंदू गाठता तोच क्षण तुमच्या परीक्षेचा व कसोटी पाहणारा असतो. 
  5. लोकाना रूढ झालेल्या सुभाषितांवरुण त्यांचा स्वाभाव कसा असेल हे प्रकट होते. 
  6. शहाणे लोक सुभाषिते तयार करतात आणि मूर्ख लोक त्याची पोपटपंची करतात.
  7. मूर्ख मनुष्य स्वतः गाफील राहतो आणि दुसर्यांना मात्र सल्ला देत असतो. 
  8. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड मारू नये.
  9. रिकाम्या पोटी मनुष्य देशभक्त होऊ शकत नाही. 
  10. वेळेवर एक टाका घातला तर नंतर नऊ टाके घालण्याचे श्रम वाचवतील.
  11. आयुष्याला काही अर्थ येतो तो केवळ ध्येय बाळगल्यामुळेच.
  12. गर्विष्ठ मनुष्य हा कृतघ्न कधीच नसतो, कारण आपल्या लायकीईतके आपल्याला मिळाले आहे असे त्याला कधीच वाटत नाही.
  13. चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने घेतलेल्या नेमावरुण समजते,जवळ बाळगलेल्या बानावरून नाही. 
  14. जर एका बाजूकडचे चूक असेल तर भांडण फार काळ टिकत नाही.
  15. शहाण्यांची बुद्धिमत्ता व शहाणपणा आणि माणसाचा दीर्घकाळचा अनुभव सुभाषितरूपाने साठवता येतो.
  16. आपले आयुष्य मर्यादित आहे. त्यात निवांत वेळ फारच कमी असतो.म्हणुन ज्यात काही विचारधन नाही.अशी पुस्तके वाचण्यात वेळ घालवू नये.
  17. चिंतनावाचून केवळ वाचन केले तर मेंदू कोराच राहील.
  18. ग्रंथ जितक्या काळजीने लिहिले जातात तितक्याच काळजीने ते वाचले गेले पाहिजेत. 
  19. विचार हे काव्यांप्रमाणे असावेत,एकदा सुचेल म्हणजे मन बैचेन झाले पाहिजे. 
  20. क्षमा करणे हा सुड उगवण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो.

also read

सुविचार संग्रह

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment