सुंदर सुविचार मराठी | सुंदर सुविचार मराठी

      नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे .सुविचार हा छोटासा का असेना पण एक सुविचार एखाद्याचे जिवन बदलू शकते. त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. असे सुविचार तुम्हाला कुठेच मिळणार नाही. लगेच आपल्या मित्र मैत्रिणींना आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना मराठी सुविचार शेअर करा सुंदर सुविचार मराठी

सुंदर सुविचार मराठी | सुंदर सुविचार मराठी

सकारात्मक मराठी सुविचार | Positive marathi suvichar 

  • ज्याची सद्सद्विवेकबुद्धी नष्ट झाली, त्याच्याजवळ जपावे असे कांहीच उरत नाही. सुंदर सुविचार मराठी
  • समाधान म्हणजे चित्ताची संपत्तीच आहे. ज्याला हे धन सापडले तो खरा सुखी होतो.
  • ‘मला आता पुरेसे आहे’ असे मनाने ठरविणे हे तत्त्वज्ञान पचवल्याचे लक्षण आहे व मनाची अतिशय दुर्मिळ अवस्था आहे. खूप वस्तू किंवा संपत्ती जवळ बाळगण्यात समाधान नाही, पण जे जवळ आहे त्यातच सुख-समाधान मानण्यात खरे सौख्य आहे.
  • ज्याच्या गरजा अगदी अल्प असतात, त्याला नेहमी जे हवे आहे ते मिळतेच.
  • ज्याला आपल्या देहस्वभावानुसार योग्य परिस्थिती मिळते, तो सुखी असतो पण जो आपला स्वभावधर्म कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, तो तर सर्वोत्तम ठरतो.
  • जीवनातील सर्वोच्च आनंदांपैकी संभाषण हे एक होय.
  • तुमच्या संभाषणाचा परिणाम चांगला होवो किंवा वाईट होवो, तुमचे संभाषण हीच तुमची जाहिरात असते. ज्या-ज्या वेळी तुम्ही बोलण्यासाठी तोंड उघडता, त्या त्या वेळी तुमच्या मनात काय आहे याचे संपूर्ण दर्शन समोरच्या माणसाला घडू द्या. त्याला तुमचे मन किंवा चित्त नीटनेटके, पारदर्शी व व्यावहारिक दिसते आहे का ते पाहा.
  • संभाषण करताना तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे. तुम्ही सोपे शब्द वापरले पाहिजेत. तुमचे हावभाव व वागणूक सभ्य व रीतीला धरुन असावी. तुम्ही उपदेश करा, परंतु त्याबरोबर लोकांची चित्तवृत्ती प्रसन्न होईल असे विनोदही करा. तुम्ही जर दुसऱ्याला हसवू शकाल तरच समोरच्या माणसाला तुम्ही आवडू लागाल व तो तुमच्यावर विश्वास ठेवेल. सुंदर सुविचार मराठी
  • उत्तम संभाषण कोणते ? स्वतः गप्प बसून दुसऱ्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकूण घेणे. स्वतः बोलत बसणे याला संभाषणकला म्हणता येणार नाही. सुंदर सुविचार मराठी
  • योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी योग्य तेच बोलणे ही मोठीच कला आहे, पण दुसऱ्याच्या चुकीच्या गोष्टीचा उल्लेख करण्याचा मोह टाळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
  • चांगल्या संभाषणकलेत चार गोष्टी हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे खरेपणा हवा, दुसरी गोष्ट म्हणजे तारतम्य हवे, तिसरी गोष्ट म्हणजे चांगली विनोदबुद्धी हवी व चौथी गोष्ट म्हणजे संभाषणातून बुद्धीची चमक दिसली पाहिजे.
  • नवीन ताऱ्यांच्या शोधापेक्षा एखाद्या नवीन पदार्थाच्या कृतीचा शोध माणसाला जास्त सुख देणारा ठरतो.
  • खरा धैर्यवान मनुष्य नेहमी थंड व शांत असतो. सर्वात शूर मनुष्य पाशवी बळ वापरत नाही.
  • संकटाची जेव्हा वेळ येते किंवा धोका उत्पन्न होतो, त्या वेळी धैर्यवान मनुष्य अत्यंत शांत चित्ताने व मोकळ्या मनाने त्या प्रसंगास सामोरा जातो.सुंदर सुविचार मराठी
  • आपले जीवन थोडकेच आहे, तरीही सभ्यपणा दाखवण्यासाठी या जीवनात भरपूर वेळ असतो.
  • सौजन्यासाठी तुम्हाला काहीच द्रव्य लागत नाही पण सौजन्यामुळे तुम्हाला सर्वकाही मिळते.
  • स्वभावाने भित्रे लोक, खरा मृत्यू येण्यापूर्वीच अनेक वेळा मृत्यू पावतात.
  • जो सर्वच गोष्टींवर विश्वास ठेवतो, तो मूर्ख असतो. सुंदर सुविचार मराठी
  • जेव्हा मनुष्य गुन्हा करतो, तेंव्हा त्याला जरी वाटले की मला कोणी पाहत नाही, तरी त्याच्या सर्व कृत्यास ईश्वर साक्षीदार असतोच.
  • माणसाने केलेले गुन्हे हेच त्याचे सर्वात दुष्ट शत्रू असतात. हे गुन्हे त्याचा आयुष्यभर सावलीप्रमाणे पाठलाग करतात.
  • कोणत्याच टीकाकाराचे स्पष्ट वा नक्की असे मत कोणत्याच बाबतीत कधीही सापडणार नाही.
  • जे पाषाणहृदयी असतात किंवा मनाने दुबळे असतात, तेच इतरांशी क्रूरपणे वागतात. सुंदर सुविचार मराठी

Joim whatsapp group

अनमोल मराठी सुविचार

  • धूर्तपणा अंगात अजिबात नसणे हाच सर्वात उच्च दर्जाचा धूर्तपणा आहे.
  • प्रत्येक माणसालाच आपण शहाणे व्हावे असे वाटते आणि ते जेंव्हा जमत नाही, तेंव्हा तो धूर्त होतो.
  • अंधश्रद्धेमुळे शहाण्या माणसांना उपद्रव होतो आणि मूर्ख माणसे तिचे भजनपूजन करतात.
  • माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होणारी पहिली व साधी सोपी भावना उत्सुकतेची असते, कुतुहलाची असते.
  • कुतुहल हेच उत्साही बुद्धिमत्तेचे एक प्रमुख वैशिष्ट्य असते.
  • जो अतिभित्रा असतो, तो संकट येण्यापूर्वीच घाबरतो. ज्याच्यामध्ये धैर्याचा अभाव असतो तो प्रत्यक्ष संकट ओढवले असता घाबरतो आणि जो कधीही घाबरत नाही.
  • अंधारात सर्व रंग सारखेच असतात. सुंदर सुविचार मराठी

चांगले मराठी सुविचार | The Best marathi suvichar 

  • दिवसातील सर्वात आनंददायक क्षण म्हणजे पहाटेची वेळ. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणे चांगले.
  • जन्माप्रमाणे मृत्यू हे सुद्धा निसर्गाचे गूढच आहे.
  • आजच्या दिवशी परमेश्वराने तुमच्यावर जी कृपा केली आहे, त्याचा मनसोक्त आनंद घ्या आणि जी अवकृपा केली असेल ती शांतपणे आणि धीराने सहन करा. कारण फक्त आजचाच दिवस आपला आहे.
  • ज्याला कुणाचे कर्ज नाही, त्यालाच खरा श्रीमंत मानले पाहिजे.
  • स्वतःचीच फसवणूक करणे हे पहिले व सर्वात वाईट पापकृत्य आहे. त्यानंतर कोणतेही पाप करणे सोपे असते.
  • माणसाला चारित्र्यसंपन्न करणे हे शिक्षणाचे एकमेव साध्य नसले तरी ते एक प्रमुख साधन आहे.
  • सतत कार्यरत असणे हे जणू नैसर्गिक औषधाप्रमाणे आहे. माणसाच्या सुख- समाधानासाठी सतत कार्यरत राहाणे आवश्यक आहे. सुंदर सुविचार मराठी
  • जो सहनशीलपणा दाखवतो त्याला पराभव स्वीकारावा लागत नाही.
  • तुम्हाला ५० मित्र आहेत का ? ते कमीच आहेत. तुम्हाला एक शत्रू आहे का ? तो जास्तच आहे.
  • प्रत्येक मनुष्य हा स्वतःचाच मोठा शत्रू असतो.
  • जगातली निम्मी दुष्कृत्ये भित्रेपणातून होतात.
  • जो खोटे बोलायला घाबरतो तो या जगात दुसऱ्या कशालाही घाबरत नाही.
  • गुप्त मार्गावर गुप्त शत्रू दबा धरून बसलेले असतातच.
  • ‘पुरेसे’ म्हणजे किती हे कळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त गोष्टी कोणत्या आहेत, याचे ज्ञान झाले पाहिजे.
  • नुसता उत्साह असून चालत नाही तर त्याला कल्पनाशक्तीची जोड असणे आवश्यक आहे.
  • घाईगर्दीत काम करणाऱ्यास नेहमी उशीर होतोच. असा उशीर टाळायचा असेल तर लॉर्ड नेल्सनप्रमाणे प्रत्येक कामगिरीवर दहा मिनिटे आधी पोहोचण्याची सवय लावून घ्यावी. लॉर्ड नेल्सनने ट्राफलगारच्या लढाईत नेपोलियनवर का विजय मिळवला त्याचे कारण तो सांगत असे की, लढाईच्या ठिकाणावर शत्रूपेक्षा मी दहा मिनिटे आधी पोहोचलो व मला तशीच सवय होती.
  • मोठ्या लोकांचा मत्सर करू नका. तसे कराल तर तुमचा हलकेपणा व क्षुद्रपणाच लोकांना दिसून येईल.
  • आपण सर्वजण जन्मतः समानच असतो. नंतर जो फरक पडतो तो सद्गुणांच्या प्रभावामुळे.
  • दुष्ट मनुष्याला सुख-समाधान मिळू शकत नाही.
  • ज्ञान म्हणजे वृद्धपणी आश्रय देणारी अतिशय जरूरीची अशी आरामाची गोष्ट आहे. हा ज्ञानवृक्ष तरुणपणी लावला नाही तर त्याची छाया म्हातारपणी लाभणार नाही.
  • चुका करणे हे एक प्रकारचे शिक्षण आहे, कारण चुकांतून आपण शिकतो आणि पुढे आपली प्रगती होते.
  • पाच-पंचवीस सुवचनांपेक्षा एक घडलेले उदाहरण जास्त मोलाचे असते.
  • सबब ही असत्यापेक्षा जास्त वाईट व भयंकर आहे, कारण सबबीमुळे असत्याला संरक्षण लाभते.
  • शहाणे लोक रोग बरा व्हावा म्हणून व्यायामावर अवलंबून राहतात. सुंदर सुविचार मराठी
  • डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात, तर कान इतरांचे ऐकून त्यावर विश्वास ठेवतात. १०४५) काहीच न करणे, आळशीपणा आणि अति नाजूकपणा यामुळे शरीर प्रकृतीचे
  • जास्त नुकसान होते. तुम्ही जर जास्त मेहनत केली किंवा जास्त कष्ट घेतले तर

सुविचार मराठी संग्रह

छोटे मराठी सुविचार

  • फारसे नुकसान होत नाही. परंतु नियमित पण मर्यादित व्यायाम, मर्यादित कष्ट
  • यामुळे शरीराला ताकद येते व प्रकृती नित्यासाठी चांगली राहते.    
  • जर आपली भावनात्मक, बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक यंत्रणा गंजू न देता कार्यक्षम ठेवायची असेल तर त्यासाठी उपाय एकच आहे. आपण सतत कार्यरत राहिले पाहिजे व सतत सराव व अभ्यास केला पाहिजे.
  • जे कसलीच अपेक्षा बाळगत नाहीत, तेच खरे भाग्यवान असतात, कारण त्यांना निराश होण्याची वेळच येत नाही.
  • अनुभव हीच ज्ञानाची माता आहे. सुंदर सुविचार मराठी
  • अनुभवामुळे मूर्खही शहाणा होतो आणि अनुभवातून जो शिकत नाही, तो महामूर्ख असतो.
  • मानवी अनुभव हा जहाजावरच्या मागच्या दिव्याप्रमाणे असतो. आपण जो मार्गचालून आलो त्यावरच अनुभवामुळे प्रकाश पडू शकतो.
  • आपल्या जीवनपद्धतीचा दुःखद विशेष असा आहे की, दुसऱ्यास मिळालेला अनुभव आपण आपल्याकडे बदलून घेऊ शकत नाही किंवा शिकू शकत नाही. दुसऱ्याने एखादे दुःख भोगले असेल त्यातून आपण शिकू शकत नाही. आपण स्वतः दुःख भोगूनच तो धडा शिकावा लागतो. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच खरे आहे.
  • डोळ्यांवर जर मनाचा पहारा असेल तर नेत्र वाईट मार्ग आचरणार नाहीत.
  • माणसाचा चेहरा हा एखाद्या पुस्तकाप्रमाणे वाचता येतो. त्या चेहऱ्यावरून त्याचे विचार व भावना या पुस्तक वाचण्यापेक्षाही कमी वेळात समजू शकतात. तसेच चेहऱ्यावर उमटणाऱ्या विचारांबाबत व भावनांबाबत गैरसमज होण्याची शक्यता खूपच कमी असते. सुंदर सुविचार मराठी
  • तुम्ही ज्याच्याशी संभाषण करीत आहात, त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे नीट पाहा. त्याच्या मनात उठणारे भावतरंग, तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर वाचता येतील. कारण तो जे बोलतो त्या बोलण्यावर तो मर्जीप्रमाणे नियंत्रण ठेवू शकतो. पण चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावनांवर त्याचे नियंत्रण नसते.
  • जर मनाने कच खाल्ली नाही तर अपयश कधीच येणार नाही. ज्याचे अंतःकरण खचलेले नाही, तो नक्कीच नेहमी जिंकणार !
  • विचार न करता ठेवलेल्या श्रद्धेपेक्षा संशोधनपूर्वक केलेली चौकशी जास्त श्रेष्ठ. 
  • माणसाने श्रद्धा जरूर बाळगावी पण त्या श्रद्धेला योग्य आधार असला पाहिजे, नाहीतर त्या श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत होईल. सुंदर सुविचार मराठी
  • श्रद्धेशिवाय केलेले कार्य म्हणजे पाण्याविना मासा. ज्यात जिवंत राहायचे असे तत्त्वच श्रद्धेशिवाय मिळत नाही. श्रद्धा म्हणजे कार्यरुपी इमारतीचा पाया आहे. प्रत्येक चांगली कृती म्हणजे या कार्यरूपी इमारतीच्या पायातील एकएक दगड आहे. श्रद्धारूपी पाया नसेल तर कार्यरूपी इमारत उभीच राहू शकणार नाही.
  • जे घाईघाईने उत्कर्ष करू पाहतात किंवा वर चढू पाहतात, त्यांचे पतन एकाएकी होते. 
  • कीर्तीचे मंदिर हे मृतांच्या समाधीवर उभारतात. (कीर्ती मृत्यूनंतर लाभते).
  • ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे सर्वांचा व्यवहार असावयास हवा.
  • आपण कल्पनाशक्तीला सोबत घ्या; परंतु मार्गदर्शक म्हणून बुद्धीचेच अनुयायी व्हा.
  • दहा हजार प्रार्थना म्हणून जे पुण्य मिळवता येणार नाही, ते पुण्य काळजीपूर्वक शेत नांगरून मिळू शकते. (कोरड्या प्रार्थनेपेक्षा उत्पादन महत्त्वाचे)
  • बाप तसा बेटा. जर बियाणे चांगले असेल, वृक्ष चांगला असेल, तर फळे चांगली येणारच. सुंदर सुविचार मराठी

Treading

More Posts