Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार 2024

Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

नमस्कार मित्रांनो good morning marathi Suvichar मध्ये आपले स्वागत आहे. दिवसाची सुरवात चांगली व सकारात्मक ऊर्जाने सुरुवात करा. या मध्ये तुम्हाला सुविचार व सुविचारांचे अर्थ पण मिळणार. 

Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

#Good Morning Quotes In Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठी 

  • जसे बीज पेरावे तसे ते फळाला येते. 

        माणूस आपल्या कर्माची फळे भोगतो. तो जसे कृत्य करतो त्याचप्रमाण त्याला सुखदुःखे भोगावी लागतात. चांगले वागल्याने त्याची फळे चांगली मिळतात,वाईट वागल्यास वाईट फळे भोगावयास लागतात. उसाचे पीक येण्यासाठी उसाचीच लागवड करावयास हवी. एरंडाची बी टाकली तर त्यातून एरंडाचेच झाड येणार ऊस नाही. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

  • या जगामध्ये अप्रिय परंतु हिताचे बोलणारा व ऐकणारा मिळणे दुर्लक्ष आहे

माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे त्याला दुसर्‍याला दुखवायचे नसते. त्यामुळे तो दुसर्‍या व्यक्तिच्या समोर त्याची खोटी स्तुती करतो. परंतु त्याच्या माघारी त्याची निंदा करतो. जगामध्ये अशा माणसांचीच संख्या जास्त आहे. लोकांचे खायचे दात एक व दाखवायचे दात वेगळे असतात.परंतु नि:स्वार्थीपणे दुसर्‍याचे कल्याण होण्यासाठी त्याला आवडले नाही तरी त्याची चूक दाखविणारा, दोष सांगणारा मिळत नाही. असा सांगणारा मिळत नाही. असा सांगणारा मिळाला तर खुळ्या मनाने ते ऐकणारा, स्वीकारणारा व स्वतः मध्ये त्याप्रमाणे बदल करणारा मिळत नाही. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

  • दुर्बल माणसाचा दैव घाट करतो.

शरीराने किंवा मनाने दुर्बळ असणारा माणूस आपल्यालावर होत असणार्‍या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करत नाही. तो ते अन्याय सोसत राहतो. तो जोपर्यंत सोसत राहतो तोपर्यंत  अन्याय करणार्‍यांची हिंमत वाढत राहते. तो अधिकाधिक अन्याय करत राहतो. त्यामुळे दुर्बल माणसाच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या नुकसानाला तो स्वतःच जबाबदार असतो.सशक्त असणार्‍याला सर्व साथ देतात. दुर्बलाला कोणीही साथ देत नाहीत. वारा वणवा विझवू शकत नाही, परंतु दीप विझवू शकतो. 

  • बोले तैसा चाले | त्याची वंदावी पाउले ||

व्यर्थ बडबड करणाऱ्याबदल कोणालाही आदर वाटत नाही. परंतु जे बोलतो तेच आचरणात आणणार्‍यांबदल मात्र लोकांच्या मनात आदर निर्माण होतो. नुसती मोठमोठ्याने व्याख्याने देणे सोपे आहे. परंतु व्याख्यानात ज विचार मांडतो त्याप्रमाणे वागणे अवघड असते. असे वागणाऱ्यांचे आपन आदर्श म्हणून पूजन करतो. लोकांचे थोरपण त्यांच्या कृतीमध्ये असते. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

10 छोटे सुविचार

#“शुभ सकाळ मराठी सुविचार 

  • जगी निंध ते सर्व सोडून धावे | जरी वंध ते सर्व भावे करावे ||

जे वर्तन केल्यामुळे आपल्याला लोक नावे ठेवतील,निंदा करतील असे अजिबात वागू नये. परंतु ज्या वागण्याचे लोक कौतुक करतात, स्तुती करतात असे वागावे. समाजाचे काही अलिखित नियम ठरलेले असतात त्याचे पालन करतच माणसाला जगायचे असते.Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार 

Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार
  • शंभर विचारापेक्षा एक आचार श्रेष्ठ आहे. 

माणसाच्या मनामध्ये,बुध्दीमध्ये सतत तरंग असतात. त्यातील काही नाहीसे होतात तर काही टिकून राहतात. डोक्यात येणारे अनेक चांगले विचार लोकांसमोर बोलून दाखविण्यापेक्षा त्यातील एखाद्या विचाराप्रमाणे आचरण केले तर ते जास्त प्रभावी ठरते.ते आचरण आदर्श वाटून इतर लोकही त्याचे अनुकरण करतात.त्यामुळे तो चांगला विचार समाजामध्ये रुजतो. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

  • जीवनातील अंध:कार नाहीसा करणारी ज्योत हास्य. 

जीवण हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले आहे. सुखाचे क्षण आपण आनंदाने उपभोगतो ते कधी संपतात ते आपल्याला कळतदेखील नाहीत. परंतु जीवनातील दुःख, संकट यामुळे निर्माण झालेला अंध:कारात मात्र आपन बुडून जातो. आपन चाचपडतो.या अंधारात प्रकाशाचा किरण दिसतो तो हास्यामुळे.हास्य मनावरचा दुःखाचा भार कमी करते.

  • भीतीचा नेहमी त्याग केला पाहिजे. तुम्ही ज्यात घाबरता ती गोष्ट तुम्हापुढे उभी राहिलीच समजा. 

भीती आपल्या जगण्यातील आनंद संपविते.भीती ही एक नकारात्मक प्रवृत्ती आहे. आपण ज्याची भीती बाळगतो त्याचाच विचार करण्यामध्ये  आपली खर्च करतो. आपले मन व बुध्दी ज्या भीतीमध्ये गुंतून जाते. तिच तीच नकारात्मक इच्छा कार्य करते आणि ज्याची भीती मनामध्ये असते, ते संकट प्रत्यक्ष आपल्यावर  ओढवते.Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

#सुंदर शुभ सकाळ सुविचार मराठी

  • संघटन ही राष्ट्राची शक्ति आहे. 

संघटन म्हणजे एकी. एकजुटीने काम कारण्यामुळे काम चांगले व लवकर तर होतेच परंतु त्याची ताकद देखील वाढते. हाताचे एक बोट कोणतेच काम करू शकत नाही. प्रत्येक बोट एकमेकांना सहकार्य करते तेव्हाच मोठे काम तो हात करू शकतो. पाच बोट एकत्रित येतात तेव्हा ती आशिर्वाद देतात, मूठ वळून सामर्थ्य दाखवितात.त्याप्रमाणेच राष्ट्रामधील संघटन राष्ट्राचे सामर्थ्य दाखविते. 

  • साहित्य हे जीवनाचे दर्शन होय. 

कथा, कादंबर्‍या, कविता या साहित्याच्या विविध अंगातून जे विषय मांडले जातात ते त्या -त्या काळातील संबंधित विषय असतात. त्या काळातील आचार, विचार, वातावरण, समस्या, प्रवृत्ती यांचेच दर्शन आपणाला त्या काळातील लेखनातून आढळतो. साहित्य वाचनातून त्या काळातील जीवन कसे होते हे आपणाला समजू शकते. म्हणजे ते त्या जीवनाचे प्रतिबिंबच असते. 

  • अडथळे आपल्याला नम्र होण्यास शिकवितात.

माणसाला आयुष्यामध्ये जे हवे आहे ते सहज मिळत गेले, यश मिळत गेले तर त्यामुळे त्याच्यातिला स्वाभिमान अहंमन्यतेमध्ये बदलतो. त्याला कोणाचीच पर्वा वाटत नाहीत. वागण्यामध्ये उत्तमपणा,गर्विष्ठपणा असे दुर्गुण येतात. परंतु जर त्याच्या ध्येयाच्या वाटेत अडथळे आले,समस्या आल्या तर त्याचे पाय जमिनीवर राहतात. डोके ठिकाणावर राहते. त्याच्यामध्ये नम्रता येते. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

  • मनावर ताबा असणे हे संस्कृतीचे लक्षण आहे. 

मानत आले की लगेच त्याप्रमाणे वागणे हे पशुंचे लक्षण आहे. त्यांना माणसाइतकी बुद्धी नाही, ते विचार करत नाहीत. परंतु माणसाला बुध्दी व विचार करण्याची क्षमता ही देणगी उपजतच लाभलेली आहे. त्यामुळे मनात येणारी प्रत्येक गोष्ट आचरणात आणणे समाजामध्ये योग्य ठरत नाही. त्यामुळे मनावर नियंत्रण असले पाहिजे. तसे संस्कार मनावर करणे हीच संस्कृती असते. Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार

  • दृढविश्वास महान कार्याचा जनक आहे. 

मी कोण आहे, मी काय करू शकतो, काय करू शकत नाही याविषयी पक्की खात्री असणे म्हणजे दृढ विश्वास. असा दृढ विश्वास असणारा कोणतेही मोठे कार्य हाती घेतो. त्या कार्याच्या पूर्ततेबदल व स्वतःच्या क्षमतांबदल त्याला खात्रीच असते. त्यामुळे कितीही अडथळे आले,समस्या उभ्या राहिल्या तरी त्यावर तो मात करतो व ध्येय साध्य करतो. 

  • जो मनाला जिंकू शकतो तो जगालाही जिंकू शकतो. 

काम, क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर हे मनाचे षड्रिपु आहे. माणूस त्यांच्या आहारी जातो. त्यामुळे त्याच्यासाठी अनेक संकटे निर्माण होतात. आजुबाजुला त्याच्या स्वभावामुळे अनेक शत्रूदेखील निर्माण होतात. या सगळ्यांशी झगडण्यातच त्याचा वेळ, सामर्थ्य वाया जातो. परंतु षड्रिपुंवर विजय मिळविणारा मन जिंकतो.स्वतःवर नियंत्रण ठेवतो व जगावरही नियंत्रण ठेऊ शकतो. 

Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार
  • डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात. कान मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवतात. 

डोळे स्वतः पाहतात. त्याची प्रतिमा मेंदूपर्यंत पोहोचते व त्याचे मेंदूकडून आकलन होते.परंतु कान मात्र दुसर्यांनी पाहिलेले वर्णन ऐकतात,दुसर्यांनी ऐकलेल वर्णन ऐकतात म्हणजेच ते स्वतःपेक्षा ‘दुसऱ्यावर’ विश्वास ठेवतात. 

Join Marathi blogging course https://courseinmarathi.com/

  • मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. 

शरीराचा मृत्यू होतो. भावनेचा मृत्यू होत नाही. मित्राचा मृत्यू हा त्याच्या शरीराचा मृत्यू आहे. त्यामुळे दुःख होते. परंतु मैत्रीचा मृत्यू म्हणजे मनाने,भावनेने दोन मित्रांच्यात अंतर पडते,एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्यांच्यातील मैत्री संपते. ती जास्त दुःख देते, त्रास देते.Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार 

  • अविरत परिश्रम करून मिळणार्‍या यशाचा अमृतकुंभ हातात घेण्यापूर्वी हलाहल पचवावे लागते. 

समुद्रमंथनातून 14 रत्ने उत्पन्न झाली. शेवटे रत्न अमृत. पण अमृतकुंभ बाहेर येण्याआधी हलाहल म्हणजे विषाचा कुंभ उत्पन्न झाला. त्याची तीव्रता व त्याचे परिणाम लक्षात घेऊन सर्वांच्या बचावासाठी शंकराने विष पचविले व नंतर अमरत्व देणारा अमृतकुंभ बाहेर आला. त्याप्रमाणे यश प्राप्ती होण्यासाठी अनेकदा अपयश पचवावे लागते. निराश न होता,जिद्द न सोडता पुन्हा खडतर प्रयत्न करून यशाला खेचून आणावे लागते.Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार 

  • सुड घेण्यापेक्षा क्षमा करणे जास्त चांगले. 

आपल्याला झालेल्या त्रासासाठी, अपमानसाठी पहिल्यांदा तसाच त्रास, तसाच अपमान दुसर्‍याचा करावा, ही भावना म्हणजे सूडभावना.दुसऱ्यावर सूड उगवण्यामुळे आपल्याला झालेला त्रास व अपमान नाहीसा होत नाही. फक्त आपले श्रम व वेळ फक्त वाया जातो. मनाला शांती, समाधान मिळत नाही. सुखाची झोप अनुभवता येत नाही.सूड हा न संपणारा प्रवास आहे. परंतु क्षमा करण्यामुळे हा प्रवास थांबतो. सुडामुळे निर्माण होणारे दुष्टचक्र व मानसिक अधःपतन टळते.Good Morning Marathi Suvichar | Best मराठी सुविचार 

  • स्वतः शुद्ध असणारा माणूस कधी दुसर्‍याचा द्वेष करीत नाही. 

पाण्याने आंघोळ करून शुद्ध, स्वच्छ होते ते शरीर. मन शुद्ध होण्यासाठी मनाचे षड्रिपुंपासूनमुक्तता झाली पाहिजे. कोणत्याही मनाच्या विकारांपासून मन दूषित न होण्यासाठी मनावर तसे संस्कार करण्याची, मनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असते. सर्व विकार निघून गेल्यावर मन निर्मळ होते. त्यामुळे असे शुद्ध, निर्मळ मन असणार्‍या माणसाच्या मनात कुणाबद्दलही राग, लोभ, द्वेष असत नाही. 

Treading

More Posts