Reality marathi quotes on life || best सुविचार मराठी 2024

Reality marathi quotes on life || सुविचार मराठी 2024

नमस्कार मित्रांनो reality marathi quotes on life मध्ये आपले स्वागत आहे.तुम्हाला सर्व प्रकारचे सुविचार मिळतील या वेबसाईट वर मिळतील. 

Reality marathi quotes on life || सुविचार मराठी 2024

#Thought on life in marathi || जीवनावरील मराठी सुविचार 

ध्येयाचा ध्यास घ्या म्हणजे श्रमाचा त्रास होत नाही.

प्रत्येक माणसाचे काही ना काही ध्येय असते. ते ध्येय गाठण्यासाठी मनामध्ये, डोक्यामध्ये सारखे त्याचेच स्मरण असले पाहिजे. उठता, बसता, खाता, पिता फक्त ध्यास एकाच गोष्टीचा तो म्हणजे आपले ध्येय. त्यासाठी खूप परिश्रम शरीराने, मनाने, बुद्धीने, पैशाने घ्यावे लागतात परंतु डोक्यात ध्येयाशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे ते श्रम जाणवत नाहीत. त्याचा त्रास होत नाही. Reality marathi quotes on life

* त्यागाचा मोठेपणा दानाच्या आकारावरून ठरविता येत नाही.

त्यागाला आकार नसतो, तुलना नसते, कारण दुसऱ्याला मदत करण्यासाठी जे आपल्याकडे आहे त्याचा त्याग करून गरजवंताला देण्याची इच्छा होणे ही भावना दान करण्यामागे असते. भावना सच्ची असते. ती लहान किंवा मोठी असत नाही. भुकेल्याला गरिबाने दिलेली अर्धी भाकरी किंवा श्रीमंताने दिलेले पंचपक्वान्नाचे ताटे याचा हेतू एकच असतो तो म्हणजे भूक भागविणे.

* काळजी ही जीवनरूपी ज्योतीवरील काजळी असते.

जीवन ही एक जगण्याच्या रूपात असणारी ज्योत असते. सुखदुःखांच्या तीव्रतेनुसार ही ज्योत लहान मोठी होत असते. काही वेळेला तिच्यावर काळजीची काजळी धरते व प्रकाश मंद होऊ लागतो. जगण्यातील उमेद, उत्साह कमी होतो. काळजी माणसाला जिवंतपणी चितेवर नेते. जेव्हा काळजी संपते तेव्हा जीवनातील नैराश्य संपते व जगण्यामध्ये पुन्हा एकदा उत्साह येतो. दिव्यावरची काजळी झटकल्यावर त्याचा अधिक प्रकाश पडतो. तसे चिंता दूर झाल्यास जगणे आनंदी होते.Reality marathi quotes on life

छोटे सुविचार संग्रह

विवेक नष्ट करणारा क्रोध हा माणसाचा शत्रू आहे.

विवेक म्हणजे विचार करण्याची क्षमता. रागावलेला माणूस व्यसनी माणसाप्रमाणे आपल्या बुद्धीवरील नियंत्रण गमावतो. त्याला चांगले, वाईट, धर्म-अधर्म, सत्य-असत्य या कशाचीही चाड राहत नाही. तो कशाची पर्वा करीत नाही. कारण रागामुळे पहिली बुद्धी भ्रष्ट होते. विचार संपतो, मनावरील संयम संपतो. संयमहीन माणूस पशू होण्यास वेळ लागत नाही. त्याच्या हातून कोणतीही मोठी चूक होऊ शकते.Reality marathi quotes on life

Reality marathi quotes on life || सुविचार मराठी 2024

संकटापासून पळून जाऊन संकट दूर होत नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटे येत असतात. त्यांना काहीजण सामोरे जातात, तर काहीजण संकटांपासून पळ काढतात. संकटांपासून पळून जाणे म्हणजे भित्रेपणा आहे. दुर्बलता आहे. संकटांना टाळता येत नाही, त्यांच्यापासून पळून जाऊन सुटका करून घेता येत नाही. संकटांसमोर जिद्दीने पाय रोवून दोन हात केल्याने त्याचे निवारण करता येते. त्यातच शहाणपण आहे.Reality marathi quotes on life

#Good thought in marathi on life || चांगले सुविचार मराठी 

जीवन मागे जात नाही व भूतकाळ बरोबरीने येत नाही.

जीवन काळाबरोबर पुढे जाते. गेलेला एकही क्षण पुन्हा उपभोगता येत नाही. काळ कोणालाही थांबवता येत नाही. जीवनाला गती असते. ही गती पुढे जाणारी असते, मागे येणारी नसते. आपण भूतकाळातील सर्व घटना, क्षण स्मरणात ठेवू शकतो परंतु तो भूतकाळ आपल्याला वर्तमानात जगता येत नाही. जीवन पुढे जाते मात्र भूतकाळ मागेच राहतो.

* पायदळी तुडवली जाणारी फुले तुडवणाऱ्या पायऱ्यांनाही सुगंध देतात.

फुलांची ओळख म्हणजे त्यांचा सुगंध. फुले आपला सुगंध सर्वांना देतात. सुगंध देताना ती कोणताही भेदभाव करीत नाहीत. सज्जनांना तसेच दुष्टांनासुद्धा फुले सुगंध देतात. पाणी घालून वाढविणाऱ्यांना फुले सुगंध देतात तसेच पायदळी तुडवून कुस्करणाऱ्यांनासुद्धा फुले सुगंध देतात. फुले समदर्शी असतात. Reality marathi quotes on life

वय व अधिकारामुळे ज्ञान व अभ्यास साधत नाही.

वयाने वाढल्यामुळे, उच्च पद मिळाल्यामुळे माणसाला विना सायास ज्ञान प्राप्त होत नाही. प्रयत्न न करता, कष्ट न घेता अभ्यास साधत नाही असे असते तर अवघ्या सोळाव्या वर्षी संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारी ‘ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर माऊली लिहू शकले नसते. ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास करणेच आवश्यक असते.Reality marathi quotes on life

• जो दुसऱ्याकडून न्यायाची अपेक्षा करतो त्याने स्वतः न्यायाने वागावे.

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी. दुसऱ्याने कसे वागावे हे सांगण्यापूर्वी तसे पहिल्यांदा आपण वागावे. ‘आधी केले, मग सांगितले’ हे तत्त्व आचरणात आणले पाहिजे. आपल्यावर अन्याय होतो तेव्हा इतरांनी आपल्याशी न्यायाने वागावे अशी अपेक्षा माणूस करतो. परंतु आपल्याकडून दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत तो विचार करीत नाही.

मनावर मिळविलेला जय हा सर्वांत श्रेष्ठ आहे.

बाहरेच्या शत्रूवर विजय मिळविणे कठीण असले तरी अशक्य नाही. शत्रूची क्षमता लक्षात घेऊन पूर्ण तयारीनिशी शत्रूशी झुंज देऊन त्याचा पराभव करता येतो. परंतु आपल्या मनाशी झगडा करणे खूप अवघड असते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार मनाचे शत्रू आहेत. या मनाच्या शत्रूमुळे बाहेरील शत्रू निर्माण होतात. म्हणून मनाच्या शत्रूवर पहिल्यांदा नियंत्रण करता आले पाहिजे. Reality marathi quotes on life

#Marathi status on life || मराठी सुविचार जीवनावरील 

जीवन हा संघर्ष आहे आणि त्याला धैर्याने सामोरे जाणे म्हणजे पराक्रम.

जीवन म्हणजे सुखदुःख. जीवन म्हणजे समस्या. जीवन म्हणजे जे हवे आहे ते मिळविण्यासाठी, जे मिळविले आहे ते टिकविण्यासाठी केलेला संघर्ष. संघर्षाला घाबरून संघर्ष संपत नाही. संघर्ष संपविण्यासाठी त्याला न घाबरता सामोरे जायला हवे. त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे. यासाठी लागणारे धैर्य हाच पराक्रम होय.

जीवनाच्या नित्यक्रमांचे जेव्हा उत्सव होतात तेव्हा आयुष्य ही आनंदयात्रा होते.

नीरस, कंटाळवाण्या जीवनात सणसमारंभ, उत्सव यांच्यामुळे रटाळपणा नाहीसा होतो. जगण्यात उत्साह, आनंद निर्माण होतो. प्रत्येकाचा एक नियमित दिनक्रम असतो. हा दिनक्रम माणूस यांत्रिकपणे पार पाडत असतो. त्यामुळे त्याला जीवन नीरस व कंटाळवाणे वाटते. तो निरुत्साही होतो. परंतु येणारा प्रत्येक दिवस नवीन आहे हे जाणून प्रत्येक कृती मनापासून केली तर त्यातील यांत्रिकता कमी होऊन जीवनाचा आनंद मिळतो.

निंदकाला निंदाच ऐकू येते व भित्र्याला भुतेच दिसतात.

माणसाला जे आवडते ते ऐकण्यात, बघण्यात, करण्यात तो रमतो. तसेच ज्याच्या विचारात गढतात त्याचेच त्याला भास होतात. सज्जनांचे लक्ष कुठे चांगले ऐकायला, पाहायला मिळते तिकडे असते, निंदा करणाऱ्याचे लक्ष निंदा करणाऱ्या शब्दांकडेच असते. घाबरणाऱ्या माणसालाच ज्याला घाबरतो त्याचेच भास होतात. Reality marathi quotes on life

* प्रार्थनेमुळे देव बदलण्यापेक्षा प्रार्थना करणारा बदलतो.

मानला तर ‘देव’ नाहीतर दगड. त्यामुळे देव ही संकल्पना श्रद्धेवर अवलंबून आहे. देव निर्गुण निराकार असतो. त्यामुळे तो कोणाच्या स्तुतीमुळे, 1 पूजेमुळे बदलण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु नियमित प्रार्थना करणाऱ्यावर प्रार्थनेचे संस्कार होतात. त्यांच्यामधील दोष, दुर्गुण कमी होत जातात. त्याचे मन, प्रवृत्ती, भावना, विचार या सर्वांवरच चांगला परिणाम करतात.

*मन मोकळे असणे सद्‌गुण आहे तर जीभ मोकळी असणे दुर्गुण आहे.

ज्याच्या मनावर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षड्रिपुंची पकड नाही. त्याचे मन स्वच्छ, शुद्ध असते. कोणाविषयी वाईट विचार मनात येत नाहीत. त्यामुळे मनात वेगळे, बोलायचे वेगळे असे त्याच्या बाबतीत होत नाही. मन मोकळे असणे चांगले. परंतु जीभ मोकळी असणे म्हणजजिभेवर खाताना, बोलताना नियंत्रण नसणे. अशी जीभ जीव जाण्यास कारणीभूत होते. Reality marathi quotes on life

Reality marathi quotes on life || सुविचार मराठी 2024

#Best suvichar Marathi || अतिसुंदर मराठी सुविचार 

चित्र निर्मळ तर जग निर्मळ.

कावीळ झालेल्याला जग पिवळेच दिसते. गॉगल लावलेल्याला सर्व जग काळे दिसते. जे मनात असते तसेच सर्व जगात दिसते. मन कोणत्याही विकारांच्या अधीन न होता स्वच्छ, शुद्ध असेल तर आजूबाजूच्या जगाचा अनुभव चांगला येतो. किंबहुना जो अनुभव येतो, मन त्याचा चांगलाच अर्थ लावते. जगात कोठेही, काहीही वाईट दिसत नाही. म्हणजेच चित्र स्पष्ट व निर्मळ असेल तर सर्व जग निर्मळ असल्याचाच अनुभव येतो.

पराभवाची भीती माणसाचा पराभव करते.

पराभव होईल या भीतीने माणूस कोणतीही नवीन गोष्ट करायला तयार होत नाही. पडण्याची भीती घेतली तर माणूस उभाच राहणार नाही, चालणार देखील नाही. भीती माणसाला निष्क्रिय करते. पराभवाच्चा भीतीने कृतीच न करणे म्हणजे आधीच मनाने पराभव स्वीकारणे होय. Reality marathi quotes on life

Join Marathi blogging course https://courseinmarathi.com/

माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.

माणसाच्या सृजनशीलतेतून नवीन संकल्पना तयार होतात. माणूस आपल्या सोईसाठी त्यांचा वापर करतो. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन वगैरे जगाच्या पाठीवर असणाऱ्या धर्मांची निर्मिती माणसाने केली. त्यामुळे समाजाला शिस्त लागावी ही अपेक्षा होती. परंतु हाच धर्म माणसामाणसांमध्ये भांडणाचे कारण होऊ लागतो. तेव्हा धर्मासाठी माणूस असल्याची परिस्थिती निर्माण होते.

* मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एका चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ.

आपल्या जगण्यामुळे दुसऱ्याचे जगणे सोपे होत असेल तर ते जगणे अर्थपूर्ण आहे. पावसाचा थेंब चातकाची तहान भागवून त्याला जीवन देतो व शिंपल्यातील थेंबाचा मोती होऊन त्याचे मूल्य व सौंदर्य वाढवितो. सौंदर्य वाढविण्यापेक्षा दुसऱ्याला जगविणारा थेंब मौल्यवान आहे. Reality marathi quotes on life

कोणत्या तरी कल्याणार्थ जगणे यातच जीवनाची सार्थकता असते.

आपण किती वर्ष जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचे आहे. स्वतःसाठी शंभर वर्ष जगणे म्हणजे किड्यामुंग्यांचं जीवन आहे. त्यापेक्षा दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगणे कठीण आहे, परंतु त्यामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो. दुसऱ्यासाठी जगणारे त्यांच्या मृत्यूनंतरदेखील अजरामर होतात.

#Reality marathi quotes on life || मराठी सुविचार 

अत्याचारी माणसाला विरोध करणे हे ईश्वराची आज्ञा पाळण्यासारखेच आहे.

दुसऱ्यावर अन्याय करणे, अत्याचार करणे चुकीचे आहे. तो गुन्हा आहे. परंतु अन्याय, अत्याचार सहन करणे हा मोठा गुन्हा आहे. अन्यायाला विरोध न करता तो सहन करत राहणे म्हणजे अन्याय करणाऱ्याला पाठिंबा देण्यासारखे आहे. आपण अधिक गुन्हेगार निर्माण करण्यासारखे आहे.

* मान ज्याने पचवला, तो सत्पुरुष झाला.

माणूस अपमानाने खचतो तसेच मानाने अहंकारी होतो. अहंकारामुळे माणूस माणुसकी विसरतो. त्याला स्वतः पुढे सर्व जग म्हणजे क्षुद्र वाटू लागते. त्यामुळे सन्मान मिळत असताना पाय जमिनीवर व मन थाऱ्यावर राहणे कठीण असते. त्यासाठी स्वतःवर नियंत्रण हवे. ज्याचे स्वतःवर नियंत्रण असते तो सत्पुरुषच असतो. Reality marathi quotes on life

* यशस्वी आयुष्याचे गमक तीनचतुर्थांश चांगल्या व नम्र वागणुकीत असते.

चांगल्या व नम्र वागणूक असणाऱ्यांना नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, नोकरी व्यवसायामधील लोक वश होतात. त्यामुळे त्यांना शत्रू जवळजवळ नसतातच. त्यामुळे त्यांचा वेळ, कष्ट, शत्रुत्वामध्ये वाया जात नाही. तो आयुष्य सत्कारणी लावतो. आयुष्यामध्ये सुख, समाधान मिळवितो.

* जीवनाची प्रेरक शक्ती म्हणजे आत्मविश्वास

आपण काय करू शकतो व काय करू शकत नाही याची खात्री असणे म्हणजे स्वतःवरील विश्वास. हा विश्वास माणसाला नवनवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रेरणा देतो. यामुळेच जीवन आकार घेते. जीवनाला गती मिळते. जर माणसाकडे आत्मविश्वास नसेल तर त्याला सगळ्याचीच भीती Reality marathi quotes on life

Treading

More Posts