Marathi Suvichar for Students || सुविचार best 2024

Marathi Suvichar for Students || सुविचार best 2024

सुविचार म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार आणि सकारात्मक दिवसाची सुरुवात चांगली होते. व नवीन नवीन अडचणीणा सामोरे जाण्याची ताकत या सुविचारांमधून मिळते.विद्यार्थ्यांना चांगले सुविचार वाचणे गरजेचे आहे. रोज एक सुविचार वाचले पाहिजे. या सुविचार संग्रहात तुम्हाला सुविचारांचे अर्थ सुद्धा मिळणार आहेत. 

Marathi Suvichar for Students || सुविचार  best 2024
Marathi Suvichar for Students || सुविचार best 2024

#Marathi Suvichar for Students with meaning || 

• जुने नाहीसे होऊन त्या जागी नवे जन्मास येणे यालाच सृष्टीचा नियम म्हणतात.

‘जन्म’ शब्दामध्येच निर्माण होणे व नष्ट होणे या दोन्हीही घटना समाविष्ट आहेत. जे जन्माला येते त्याला मृत्यू असतो. जे निर्माण होते ते नष्ट होते. कोणतीही वस्तू व्यक्ती याला अपवाद नाही. हा सृष्टीचा नियम आहे. तो कोणी बदलू शकत नाही, मोडूही शकत नाही.Marathi Suvichar for Students

• कितीही पाणी घातले तरी योग्य ऋतू आल्याशिवाय झाडाला फळे येत नाहीत.

माणूस कोणत्याही बाबतीत उतावीळ असतो. त्याला जे हवे असते ते लगेच मिळावे वाटते. वाट पाहण्याची त्याची मानसिकता नसते. बी पेरल्यावर त्यातून लगेच वृक्ष तयार होऊन त्यापासून फळे मिळत नाहीत. बीमधून कोंब फुटतो, हळूहळू योग्य निगराणीने तो मोठा होतो व फळे लागण्याएवढा पक्व झाल्यावरच त्याला फळे येतात.Marathi Suvichar for Students

• सदाचार, कर्तव्यनिष्ठा हे माणसाचे सर्वश्रेष्ठ अदृश्य अलंकार आहेत.

माणूस सुंदर दिसण्यासाठी चांदी, सोने, हिरे, माणिक, मोती यांचेदागदागिने करून वापरण्यासाठी धडपडतो. परंतु माणसाचे खरे सौंदर्य आहे ते त्याच्या चांगल्या आचरणामध्ये व आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागण्यामध्ये. असा सदाचरणी व कर्तव्यनिष्ठ कोणताही इतर अलंकार न वापरतादेखील सुंदर दिसतो. Marathi Suvichar for Students

● माणूस पाप करतो हे एकवेळ क्षम्य आहे, पण पापाचे समर्थन करणे अक्षम्य आहे.

प्रत्येक माणूस हा चांगल्या व वाईट गुणांचे मिश्रण असतो. काही वेळेला तो कळत-नकळत चुकीचे वागतो, पापकृत्य करतो. चुकीतून शिकणे हा माणसाचा गुणधर्म आहे, त्यामुळे त्याचे पापाचरण हे क्षमा करता येण्याजोगे असते. परंतु आपल्या पापाचरणाबद्दल पश्चात्ताप न होता तो ते बरोबरच आहे, असे इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र ते क्षमा करण्यास पात्र नाही.Marathi Suvichar for Students

● यथाशक्ती मदत याचाच अर्थ कमीतकमी मदत असा नसून जास्तीतजास्त दान असा आहे.

माणूस देण्यापेक्षा घेण्यासाठी उत्सुक असतो. त्यामुळे ‘यथाशक्ती’ या शब्दाचा अर्थ म्हणजे जेवढे शक्य आहे तेवढे अधिक असे न घेता आपल्या ‘परिस्थितीनुसार कमीतकमी’ दान करावे असा घेतो. असा चुकीचा अर्थ लावण्यामध्ये त्याचा फायदा असतो, त्यामुळे तसा सोयीस्कर अर्थ तो घेतो.Marathi Suvichar for Students

● गाईची तहान भागवावी आणि वाघाला विष होऊन मासवे अशी नदीची वर्तणूक नसते.

निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो. त्याला भेदभाव माहीत नसतो. एकाशी चांगले, दुसऱ्याशी वाईट असे तो वागत नाही. तो माणूस, पशु, पक्षी असाही भेदभाव करत नाही. त्यामुळे नदी सर्वांसाठीच जीवनदायिनी असते. तिचे पाणी सर्वांचीच तहान भागवते. चांगला, वाईट, गरीब-श्रीमंत, सद्वर्तनी व दुराचरणी असा भेदभाव नदी कधीच करत नाही.

Marathi Suvichar for Students || सुविचार  best 2024
Marathi Suvichar for Students || सुविचार best 2024

#Marathi Suvichar for school Students || मराठी सुविचार शाळेय विद्यार्थ्यांसाठी 

● दोष प्रत्येक माणसात असतात पण ते मान्य करून सुधारणा करणारा माणूस एखादाच असतो.

प्रत्येक माणूस गुण-दोषांनीयुक्त असतो. परंतु आपल्या गुणदोषांची जाणीव असणारे, त्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करणारे खूपच कमी लोक असतात. त्याहीपेक्षा स्वतःमध्ये असणारे दोष जाणून, ते मान्य करणारे व ते सुधारणा करणारे मात्र खूपच दुर्लभ असतात.Marathi Suvichar for Students

● निष्क्रिय महत्त्वाकांक्षा म्हणजे अपयशाला आमंत्रण असते.

महत्त्वाकांक्षा म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळवायचे आहे, काय व्हावयाचे आहे याविषयीचा निश्चित विचार. फक्त महत्त्वाकांक्षा असणे म्हणजे ते मिळविणे नव्हे. त्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याची तयारी असली पाहिजे. काहीही प्रयत्न न करता महत्त्वाकांक्षा बाळगून ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त अपयशच प्राप्त होते.Marathi Suvichar for Students

● शस्त्रास्त्रांच्या युद्धापेक्षा विचारांचे युद्ध अधिक प्रभावी असते.

शत्रूला नामोहरम करण्यासाठी युद्ध करताना शस्त्रास्त्रे वापरली जातात. प्रभावी शस्त्रास्त्रामुळे शत्रूचे शारीरिक अस्तित्व नष्ट होईलच असे नाही. परंतु विचारांच्या युद्धामुळे नवनवीन विचार समाजामध्ये पसरतात, रुजतात व प्रगती होते. त्यामुळे ते अधिक प्रभावी असते.Marathi Suvichar for Students

course in Marathi blogging Courseinmarathi.com

● ज्यांच्यावर आपल्याला मात करता येत नाही, त्यांच्याशी हातमिळवणी करणेच श्रेयस्कर असते.

माणूस आपल्याच वागण्याने आपल्या पायावर दगड पाडून घेत असतो. आपले ज्याच्याशी शत्रूत्व आहे तो आपल्यापेक्षा शक्तिशाली असेल तर त्याच्याशी युद्धाला उभे ठाकणे म्हणजे आपल्या पराभवाची खात्रीच होय. या अपयशाला निमंत्रण देण्यापेक्षा अशा शत्रूशी हातमिळवणी करणे श्रेयस्कर ठरते.

● माणूस कितीही मोठा असला तरी याचना करताना त्याला लहान व्हावे लागते.

दाता आणि याचक या दोघांमध्ये दाता श्रेष्ठ असतो. तो उच्च स्थानी असतो. याउलट याचक मात्र नीच मानला जातो. देणाऱ्या व्यक्तीला जोमानसन्मान, कीर्ती लाभते, ती घेणाऱ्याला लाभत नाही. त्याला महत्त्व लाभत नाही. दुसऱ्याकडून काहीही मागताना याचकाला कमीपणा स्वीकारावा लागतो. पाणी देणारे ढग उंच आकाशात असतात, तर पाणी घेणारा समुद्र खाली जमिनीवर असतो.Marathi Suvichar for Students

● बुद्धिमान माणसे गेली तरी त्यांचे विचार आचाररूपाने सदैव जिवंत असतात.

गरीब-श्रीमंत, मंद बुद्धी – बुद्धिमान असा कोणताही भेदभाव मृत्यू करत नाही. त्यामुळे मृत्यूमुळे शरीर नष्ट होते परंतु चांगले विचार मात्र माणसाच्या मृत्यूनंतर देखील टिकून राहतात. विचार जितके प्रभावी व समाजहिताचे असतात. त्यानुसार ते दीर्घकाळ जिवंत राहतात.

● ज्याने उपकार केलेले आहेत त्याच्यावर अपकार करू नका.

जो माणूस आपल्याला मदत करतो, आपल्यावर उपकार करतो त्याच्याशी प्रामाणिक राहणे आपले कर्तव्य आहे. ज्याने आपल्या वेळेला मदत केलेली असते त्या उपकारांची फेड करता येणे कठीण असते. त्याला त्याच्या वेळप्रसंगी मदत करता आली नाही तरी ठीक आहे परंतु त्याला आपल्यापासून उपद्रव होणार नाही याची खबरदारी बाळगावी.Marathi Suvichar for Students

#Marathi Suvichar and meaning || मराठी सुविचार आणि अर्थ 

● दुसऱ्यांच्या झोपड्या जाळून आपला प्रासाद उभा करणे म्हणजे संस्कृती नव्हे.

माणसाने स्वतःची प्रगती जरूर करावी, परंतु त्यामुळे दुसऱ्याला उपद्रव होणार नाही, दुसऱ्यांचे नुकसान होणार नाही; याची खबरदारी घ्यावी. दुसऱ्याच्या तोंडचा घास घेऊन आपली भूक भागविणे, दुसऱ्याचा आसरा नष्ट करून तिथे स्वतःसाठी घर बांधणे म्हणजे माणुसकीला काळिमाच आहे.

● कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करणारा माणूस सदैव सुखी असतो.

माणसाच्या दुःखाची कारणे अनेक आहेत. त्यामध्ये दुसऱ्या व्यक्तींनी आपल्याशी कसे वागावे, काय करावे याविषयी तो काही अपेक्षा मनाशीबाळगत असतो. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर तो काही काळ सुखात राहतो. परंतु त्या अपेक्षा अपूर्ण राहिल्या तर मात्र तो कायम त्याच्या स्मरणानेसुद्धा दुःखी होतो.Marathi Suvichar for Students

● साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे सुखदुःखाविषयी विचार करण्यास मिळणारा वेळ.

माणूस स्वतःला सुखी किंवा दुःखी समजतो हे त्याचा विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जो चोवीस तास काम करण्यामध्ये आणि कामाच्या विचारामध्ये मग्न असतो, त्याला स्वतःला सुखी किंवा दुःखी ठरविण्यास वेळ नसतो. परंतु ज्याला वेळ मिळतो तो माणूस स्वतःला सुखी किंवा दुःखी ठरविण्यात वेळ वाया घालवितो.Marathi Suvichar for Students

● आरशात स्वतःकडे ज्या मग्नतेने आपण पाहतो, तितकेच मग्नतेने जगाकडे पाहण्याचे भान ठेवावे.

माणसाला स्वतःची प्रतिमा पाहण्यास आवडते. त्यासाठी तो आरशात पाहतो. आरसा पाहताना सर्व जगाचा त्याला विसर पडतो इतका त्यामध्ये तो मग्न होतो. त्याच एकाग्रतेने माणसाने जर जगाकडे पाहिले तर जगातील सुखदुःखांचे दर्शन त्याला होऊ शकते. जगाचे खरे रूप त्याला समजते.

● घाईघाईने मैत्री जोडू नका, पण एकदा मैत्री जुळली की तिच्याशी एकनिष्ठ राहा.

मैत्री म्हणजे व्यवहार नसतो. मैत्री ही भावना असते. ती मन जुळण्यावर अवलंबून असते. त्यामुळे मित्र पारखून मैत्री करावी. घाई गडबडीने मैत्रीजोडू नये. परंतु एकदा पारखून केलेल्या मित्राबरोबर त्याच्या सुखदुःखामध्ये नेहमी त्याला साथ करावी.

● विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे.

शाळा म्हणजे इमारत व परिसर नव्हे. सुंदर इमारत व सुंदर परिसर असून त्यामध्ये शिकण्यासाठी विद्यार्थीच नसतील तर तो परिसर भकास वाटतो. परंतु विद्यार्थी असतील तर, इमारतीशिवाय सुद्धा शाळा भरते व तो परिसर सुंदर दिसतो.Marathi Suvichar for Students

Marathi Suvichar for Students || सुविचार  best 2024
Marathi Suvichar for Students || सुविचार best 2024
#Marathi Suvichar for Students with meaning || मराठी सुविचार विद्यार्थ्यांना अर्थ 

● वाचन व लेखन यापेक्षा आचरण अधिक महत्त्वाचे आहे.

प्रत्येक दिवशी माणसाने काही वाचन करावे, लिहावे त्यामुळे माणूस विचार करतो व तो समृद्ध होतो. निष्क्रिय विचारांपेक्षा त्याप्रमाणे वागणे हे अधिक महत्त्वाचे आहे. समाज विचारांपेक्षा आचरणाने प्रभावित होतो व तो विचार समाजामध्ये प्रामुख्याने रुजतो.Marathi Suvichar for Students

● दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण.

शिक्षण म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय. शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या माणूस सुसंस्कारित होणे हा शिक्षणाचा हेतू असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या भावना समजावून घेणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता येते हा बदल शिक्षणामुळे होण्याची अपेक्षा असते.Marathi Suvichar for Students

● अभ्यासात येणारे यश हे दैवी देणगी किंवा चमत्कारांचे नसून कष्टाने साध्य होणारे यश असते.

विद्या मिळविण्यासाठी कष्ट करावे लागतात. पुन्हा पुन्हा अभ्यास करून शिकलेला भाग दृढ करावा लागतो. न कळालेला भाग समजावून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. शिक्षणातील यश हे नशिबामुळे मिळत नाही तर ते जाणीवपूर्वक खूप कष्ट केल्यामुळे मिळते.Marathi Suvichar for Students

● संपत्तीचा लोभ हा माणुसकीला लागलेला काळिमा आहे.

माणसाला जगण्यासाठी संपत्ती हवी असते. परंतु मिळत असणाऱ्यासंपत्तीपेक्षा अधिक हवी वाटणे म्हणजे संपत्तीचा लोभ. असा संपत्तीचा लोभ माणसाला कोणतेही पाप, कोणताही गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करतो. संपत्ती मिळविण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊन प्रयत्न करणारा माणूस पशुपेक्षाही हीन पद्धतीने वागतो व माणुसकीला काळिमा फासतो.Marathi Suvichar for Students

● रात्रीच्या अंधारातच उज्ज्वल पहाटेची बीजे दडून असतात.

दिवस व रात्र हे अव्याहत चालू असणारे चक्र आहे. दिवसाचा प्रकाश माणसाला हवाहवासा वाटतो. परंतु रात्रीचा अंधार त्याला नकोसा वाटतो. रात्रीच्या अंधारातूनच हळूहळू पहाट होत असते. याचप्रमाणे आयुष्यामध्ये देखील दुःखानंतर सुखाचे दिवस येत असतात.

● सृजनशील व साहसी माणसांना दिशा आणि सीमा यांची पर्वा नसते.

नवनिर्माण करण्यासाठी क्षमता असणारा व धाडसी माणसाच्या शब्दकोशामध्ये अडीअडचणी, समस्या, बंधन, मर्यादा हे शब्दच नसतात. त्याला कोणतीही गोष्ट कठीण व अशक्य वाटत नाही. येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर, समस्यावर तो उत्तर शोधत पुढे जात राहतो.Marathi Suvichar for Students

● नशिबावर हवाला ठेवणाऱ्यांपासून कर्तृत्व कायमचे दूर जाते.

नशिबावर हवाला ठेवणारे कोणतीही कृती करण्यास तयार होत नाहीत. आपल्या नशिबात असेल तर आपल्याला मिळेल नाही तर मिळणार नाही यावर विश्वास ठेवून ते कोणतेच प्रयत्न करत नाहीत. हळूहळू ते पूर्णपणे निष्क्रियच होतात. व त्यांच्या कर्तृत्वाला तेच बंधन घालतात.

● प्रयत्न हा परीस आहे. प्रयत्नामुळेच नरकाचे नंदनवन होते.

लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते. त्याप्रमाणे प्रयत्न हा असा परीस आहे की कोणतीही खडतर परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य त्यामध्ये असते. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करणे फक्त प्रयत्नांमुळेच शक्य असते.Marathi Suvichar for Students

● डोंगराहून पर्वत मोठे, पर्वतापेक्षा समुद्र अथांग; समुद्रापेक्षा आकाश अति विशाल, पण ह्या सर्वांहून काय अथांग असेल तर माणसाची आशा.

माणूस कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये उद्याच्या चांगल्या दिवसांची आशाच त्याला जगण्यासाठी प्रेरणा देत असते. डोंगर, पर्वत, समुद्र, आकाश हे विशाल, अथांग असले तरी त्याहीपेक्षा ही आशा न संपणारी असते जी जगण्यास माणसाला प्रवृत्त करते.Marathi Suvichar for Students

● शेळी होऊन शंभर वर्षे जगण्यापेक्षा वाघ होऊन शंभर दिवस जगलेले चांगले.

माणूस किती वर्षे जगतो त्यापेक्षा तो कसा जगतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. कर्तृत्वशून्य, अर्थहीन, दीर्घकाळ जगण्यामुळे यश, कीर्ती, मान लाभत नाही. कर्तृत्ववान सक्रिय माणूस मात्र अल्पकाळातच स्वतःच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतो व अजरामर होतो. सतत घाबरणारा माणूस क्षणाक्षणाला मरतो. त्यापेक्षा बेडरपणे जगणारा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने जगतो.Marathi Suvichar for Students Marathi 

● प्राप्तीपेक्षा प्रयत्नाचा आनंद विशेष समाधानकारक असतो.

माणूस काही मिळविण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जे हवे आहे ते मिळणार आहे. या कल्पनेने आनंदित असतो. जेव्हा त्याला अपेक्षित गोष्ट प्राप्त होते तेव्हा आनंद होतो, समाधान मिळते परंतु ते काहीच काळ टिकते. पुन्हा नवीन गोष्ट प्राप्तीचा ध्यास लागतो, त्यामध्ये जे मिळाले आहे त्याचा आनंद नाहीसा होतो.

● मनुष्य प्रामाणिक असेल तर त्याच्यातील उणिवा व दोष हे बऱ्याच वेळा क्षम्य ठरतात.

सर्वांमध्ये काही उणिवा असतात, काही दोष असतात. कोणीही या जगामध्ये शंभर टक्के गुणवान असत नाही. आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवा व दोष यांची जाणीव ठेवून जो आपल्या कामाशी, कर्तव्याशी, भूमिकेशी प्रामाणिक राहतो, त्याबाबत कोणताही कुचराई करत नाही. त्यावेळी त्याच्या उणिवा व दोष यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.Marathi Suvichar for Students

Treading

More Posts