Deep meaning reality marathi quotes on life : best 2024

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारचे सुविचार तुम्हाला मिळतील. या सुविचार संग्रहात तुम्हाला सुविचारचे अर्थ सुद्धा मिळतील. Deep meaning reality marathi quotes on life

Deep meaning reality marathi quotes on life

#Marathi Suvichar || मराठी सुविचार 

* गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुद्धा बांधता येतो.

गवत क्षुद्र आहे. गवत दुर्बळ आहे. त्याला कोणीही पायदळी तुडवून जाते. परंतु ते गवत एकत्र करून त्याच्यापासून वळून दोरी तयार केली तर त्याच्यामध्ये शक्तिशाली हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते. संघटित राहण्याचा हा फायदा आहे. याचा दुबळेपणा सबलतेत बदलतो.

* जुलमाने विचार मरत नाहीत, ते सुदृढ केले जातात.

नवीन विचार व तो विचार मांडणारा क्रांतिकारी असतो. रुळलेल्या मार्गानं विचार करणाऱ्यांना तो आवडत नाही. त्यामुळे ते त्याला विरोध करतात. केवळ विरोधाने तो क्रांतिकारी विचार मांडणारा त्यापासून परावृत्त होत नाही, म्हटल्यावर त्याला त्रास देऊन तो थांबविण्याचा प्रयत्न केला तरी तो विचार नाहीसा होत नाही याउलट त्याच्याकडे सर्वांचे अधिक लक्ष जाते.Deep meaning reality marathi quotes on life

* एकत्वाची भावना हे राष्ट्रीयत्वाचे गमक होय.

देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, विचाराचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेषभूषा करणारे लोक राहत असले तरी त्यांच्यामध्ये आपण सर्व एक आहोत, एकाच देशाचे नागरिक आहोत अशी भावना असणे म्हणजे त्यांना त्यांचेच राष्ट्रीयत्वाची जाणीव असणे होय.Deep meaning reality marathi quotes on life

* जेथे मोह नाही तेथे दुःख नाही आणि जेथे हाव नाही तेथे मोह नसतो.

एखाद्या गोष्टीचा हव्यास आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल मोह निर्माण करतो. त्या मोहामुळे माणूस ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या इच्छेप्रमाणे जे हवे ते मिळाले तर माणूस आनंदी होतो. पुन्हा नवीन काहीमिळविण्याचा हव्यास असे दुष्टचक्र चालूच राहते. पण जे हवे ते मिळाले नाही तर मात्र तो निराश होतो, दुःखी होतो.

Join facebook Group https://www.facebook.com/profile.php?id=61564126075549&mibextid=JRoKGi

तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात ।

संत कुणाला म्हणावे याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, जो जगाकडून होणारे आघात सहन करतो, त्रास सोसतो तरीही त्यांच्या कल्याणासाठी धडपडतो त्याला संत म्हणावे. अंगावर भगवे वस्त्र परिधान करून, हातामध्ये कमंडलू घेऊन कोणी संत होत नाही.Deep meaning reality marathi quotes on life

* तेच दान श्रेष्ठ की जे उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला कळत नाही.

लोक वेगवेगळ्या प्रकारचे दान करतात. आपल्या क्षमतेनुसार गरजवंतांची गरज भागविण्यासाठी त्याला अन्न, वस्त्र, पैसा वगैरे रूपामध्ये दान दिले जाते. दान योग्य व्यक्तीला द्यावे ते देताना गाजावाजा न करता गुप्तपणे द्यावे. त्यामुळे घेणाऱ्याला संकोच वाटत नाही व देणाऱ्याचा अहंकार वाढत नाही.

* गोड बोलण्यात काटकसर कशाला ?

चांगले बोलणे किंवा वाईट बोलणे हे एकाच तोंडाकडून होत असते. वाणीचा वापर चांगले बोलण्यासाठी, गोड बोलण्यासाठी करायला वेगळे कष्ट करावे लागत नाहीत किंवा त्यासाठी आपल्याकडील पैसाही खर्च होत नाही. तसेच आपल्या गोड बोलण्यामुळे स्वतःला व ऐकणाऱ्याला आनंद मिळतो. असा दुहेरी फायदा असूनही गोड बोलणे कशासाठी टाळायचे ?

Deep meaning reality marathi quotes on life

रथचक्राच्या आऱ्यांप्रमाणे सुख व दुःख आलटून पालटून येतात.

आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे आणि दुःखाचे क्षण येतात. सुखाचे क्षणही कायम राहत नाहीत व दुःखाचे क्षण देखील कायम टिकत नाहीत. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येत असते, जात असते. त्याप्रमाणे रथचक्र फिरताना त्याचे आरे सारखे खालून वर जातात व वरून खाली येत असतात तसेच सुखदुःखाचे स्थान आपल्या आयुष्यात आहे. Deep meaning reality marathi quotes on life

लबाडी तोकड्या चादरीप्रमाणे असते, तोंडावर ओढली की पाय उघडे पडतात.

लबाड माणसाला दुसऱ्याशी लबाडीने वागून त्याला फसविण्यामध्ये मजा वाटते. त्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. परंतु तो दुसऱ्याला फसविण्यापेक्षा स्वतःच फसत असतो हे त्याच्या लक्षात येत नाही. एक लबाडी लपविण्यासाठी त्याला आणखी लबाडी करावी लागते. केलेली लबाडी उघडी पडू नये यासाठी सारखे जागरूक राहावे लागते. तरीही बेसावधपणे त्याची लबाडी उघडी पडते.

* दुसऱ्याच्या हाताला अत्तर लावताना आपल्या हातालाही सुगंध येतो.

दुसऱ्याच्या हाताला घाण लावताना आपले हात घाण होतात. दुसऱ्याच्या हाताला सुगंधित करताना आपले हात सुगंधित होतात. त्याचप्रमाणे दुसऱ्याला त्रास देऊन दुःखी कष्टी करणारा स्वतःदेखील दुःखी राहतो. दुसऱ्याला आनंदित करण्याचा जो प्रयत्न करतो तो स्वतःदेखील आनंदित राहतो.Deep meaning reality marathi quotes on life

सुधारणा ही मनातून झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा होणार नाही.

व्यक्तीमध्ये किंवा समाजामध्ये सुधारणा करावयाची असेल तर कायदे व नियम करून ती होऊ शकत नाही. दुसऱ्यांनी केलेले नियम व कायदे मोडले जातात. परंतु व्यक्तीला स्वतःला पटलेला विचार तो कधीही मोडत नाही. त्यासाठी कोणतीही सुधारणा करताना ते व्यक्तींच्या मनामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. व्यक्तीच्या मनावर सुधारणेचे संस्कार रुजले पाहिजेत.

* तुलना करावी पण अवहेलना करू नये.

तुलना करणे चांगले की वाईट हे तुलना करताना ती कोणत्या हेतूने करतो यावर अवलंबून आहे. मोकळ्या मनाने सुधारणेच्या हेतूने केलेली तुलना ही प्रगतीच्या मार्गावर नेते. परंतु निंदेच्या हेतूने किंवा दुसऱ्याच्य कमीपणा करण्यासाठी केलेली तुलना ही हानिकारक असते. त्यामुळे कोणाचीही प्रगती होत नाही.

#सुविचार व सुविचारांचे अर्थ 

* दुःख जितके अधिक उगाळू तितके ते अधिक हानिकारक असते.

माणूस दुःखाने व्याकूळ होतो. त्याला आपले दुःख दुसऱ्याला सांगून ते हलके करावे, मन मोकळे करावे असे वाटते. परंतु पुन्हा पुन्हा त्याचे वर्णन करत असताना माणसाला ते पुन्हा अधिक तीव्रतेने आठवते. ते पुन्हा जगत असल्यासारखे वाटते. त्यामुळे ते कमी होत नाही, विसरले जात नाही. त्याची तीव्रता वाढत जाते. ते शरीराला व मनाला त्रासदायक ठरते. Deep meaning reality marathi quotes on life

जो वेळेवर जय मिळवितो, तो जगावर जय मिळवितो.

प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. कारण गेलेला क्षण पुन्हा कितीही मोलान परत मिळविता येत नाही. हे वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन जो प्रत्येक क्षानाचा सदुपयोग करतो, वाया घालवित नाही तो खूप मोठे कर्तृत्व गाजवू श कुतो. प्रत्येक क्षणाचा वापर करणाऱ्याला जगात कोणतीच गोष्ट अशक्य वाटत नाही. त्याला त्यासाठी वेळ कमी पडत नाही.

• ज्याचे विचार सुंदर तोच सुंदर

शरीराचे सौंदर्य हे कायम टिकणारे नाही. त्या सौंदर्यामुळे समाजामध्ये कोणताच बदल होऊ शकत नाही. ते बिन कामाचे आहे. परंतु ज्याचे विचार सुंदर आहेत ते जगाच्या अंतापर्यंत टिकून राहतात. ते सुंदर विचार समाजामध्ये क्रांती घडवू शकतात. समाजसुधारणा घडवून समाजाचा विकास घडवतात. एवढे सामर्थ्य ज्याच्या विचारांमध्ये आहे तो सुंदर असतो.Deep meaning reality marathi quotes on life

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.

बहिणाबाई चौधरी यांनी अगदी साध्या, सोप्या पद्धतीने त्यांच्या कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आयुष्यामध्ये आपल्याला जे हवे आहे ते विना कष्टाचे, सहज प्राप्त होत नाही. त्यासाठी पहिल्यांदा खूप त्रास सोसावा लागतो. ज्याप्रमाणे भूक भागविण्यासाठी भाकरी करणाऱ्या स्त्रियांना पहिल्यांदा ती करताना हाताला चटके सोसावे लागतात.

कामात वेग पाहिजे, नीटनेटकेपणा पाहिजे आणि तिसरी गोष्ट ज्ञान पाहिजे. 

काम सर्वांनाच करावे लागते. परंतु जो ठरावीक वेळेच्या मर्यादमध्येअत्यंत व्यवस्थितपणे काम करतो त्या कामाला व करणाऱ्याला महत्त्व असते.तसेच ते काम का, कशासाठी व कशापद्धतीने केले असता अत्यंत चांगल्यारीतीने पूर्ण होईल. याविषयीचे ज्ञान करणाऱ्याला असले तर त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे होते.

* जिथे स्वच्छ पाण्याची नदी, तिथे असते समृद्धी.

नदी म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवन. पाणी सर्वांची तहान भागविते, धनधान्य पिकविते. उद्योगधंदे चालविते. प्रदूषित पाणी रोगराई पसरविते. शेतामध्ये पिकणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करते. स्वच्छ पाण्यामुळे शेतीचे उत्पादन वाढते. ते सकस असते. माणूस व गुरेढोरे यांना आयुष्य, आरोग्य लाभते.Deep meaning reality marathi quotes on life

शिक्षणाने मनुष्य साक्षर व अनुभवाने तो शहाणा होतो.

शिक्षण माणसाला लिहायला, वाचायला शिकविते. ते वेगवेगळ्या विषयांचे सखोल ज्ञान देते. चांगले-वाईट, नीती-अनीतीचे ज्ञान शिक्षणामुळे होते. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर कशा पद्धतीने करावयाचा व त्याचे होणारे परिणाम हे अनुभवानेच माणसाला समजतात. त्यातूनच तो आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करण्याचे शिकतो.Deep meaning reality marathi quotes on life

अज्ञानाशी लढायला हातात ज्ञानाचे शस्त्र घ्यावे लागते.

आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या या अज्ञानामुळे निर्माण होतात. अज्ञानामुळे विकास खुंटतो, अंधश्रद्धा वाढतात व पसरतात. लोकांकडून फसवणूक होते. गैरसमजुती वाढतात. या सर्वांपासून सुटका करून घेण्यासाठी ज्ञानाची कास धरली पाहिजे. जेवढे ज्ञान मिळविता येईल तेवढे मिळवून आपले अज्ञान नष्ट केले पाहिजे.Deep meaning reality marathi quotes on life

* आसू आणि हसू ज्याला पचवता आले, तो महात्मा होय.

दुःखामुळे डोळ्यात अश्रू येतात. आनंदाच्या, सुखाच्या प्रसंगी ओठावर हसू फुलते. सामान्य माणूस सुखदुःखाच्या आहारी जातो. सुखाने तो हुरळून जातो, दुःख कुरवाळून तो निराश होतो. सुखदुःखाच्या आहारी न जाता तटस्थ राहणारा माणूस असामान्य असतो. तोच महात्मा असतोDeep meaning reality marathi quotes on life.

* एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो.

एकच सूर्य सर्व विश्वातील अंधार नाहीसा करतो. एकच सुगंधित फूल आजूबाजूचा परिसर सुवासिक करते. तसेच एखादा चांगला विचार जेव्हा सर्वांपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याच्या प्रभावामुळे इतर सर्व दुष्ट विचार नाहीसे होतात.Deep meaning reality marathi quotes on life

marathi Suvichar

* तीन गोष्टी देत राहा मान, दान, ज्ञान.

ज्या तीन गोष्टी दिल्यामुळे देणाऱ्याचेही नुकसान होत नाही व ज्याला मिळते तो तृप्त होतो ते म्हणजे मान, दान व ज्ञान. दुसऱ्याला मान दिल्यामुळे आपल्यालाही दुसऱ्याकडून मान मिळतो. गरजवंतांना दान दिल्यामुळे समाधान मिळतें. ज्ञान दिल्यामुळे कमी होत नाही तर ते वाढतच राहते. Deep meaning reality marathi quotes on life

Deep meaning reality marathi quotes on life

# बळ आणि पैसा यापेक्षा बुद्धिबळाचे सामर्थ्य हवे.

आपल्याला जीवनातील ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी फक्त शारीरिक सामर्थ्य असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तसेच सर्वच गोष्टी आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. त्यासाठी शक्ती व पैसा याच्यापेक्षा बुद्धी असली पाहिजे. हुशारी असली पाहिजे. तरच शक्ती व पैसा यांचा योग्य उपयोग करून घेता येतो.

विद्येचा उपयोग वादासाठी नसून विकासासाठी असतो.

आपल्याकडे असणाऱ्या विद्येचा वापर तर्क लढवून, प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा खिस पाडून विद्वत्ता व्यक्त करण्यामुळे फक्त वेळ आणि श्रम वाया जातात. त्यामध्ये कोणाचेच कल्याण होत नाही. त्यापेक्षा त्या विद्वत्तेचा वापर स्वतःच्या व इतरांच्या विकासासाठी करण्यातच तिचे सार्थक असते.Deep meaning reality marathi quotes on life

* दुसऱ्याला क्षमा करणे यातच मोठेपणा असतो.

दुसऱ्याकडून चूक घडली तर त्याबद्दलची सहज प्रतिक्रिया म्हणजे त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरविले जाते. शिक्षाही केली जाते. परंतु त्यामुळे त्याच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नाही. त्यापेक्षा त्याला चुकीसाठी क्षमा केल्यास त्याला त्याच्या चुकीबद्दल पश्चात्ताप होतोDeep meaning reality marathi quotes on life.

* ग्रंथामुळे जगाचा इतिहास जिवंत आहे. इतिहास म्हणजे भूतकाळ.

वर्तमान व भविष्यकाळ पाहता येतो. परंतु भूतकाळ पाहता येत नाही. कारण तो घडून गेलेला असतो. या भूतकाळातील घटना, प्रसंग यांच्याविषयी त्या काळातील व्यक्तींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले असल्यामुळे तो काळ व व्यक्ती यांच्याबद्दल आजदेखील जगाला माहिती उपलब्ध होते.Deep meaning reality marathi quotes on life

* माणूस जातीने नव्हे, कर्तृत्वाने श्रेष्ठ ठरतो.

जाती या निसर्गनिर्मित नाहीत. त्या माणसाने निर्माण केल्या. कोणतीही जात श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही. कोणत्या जातीमध्ये जन्माला यावे हे माणसाच्या हातात नाही. परंतु कोणत्याही जातीमध्ये जन्माला आल्यामुळे कर्तबगार माणसाला त्याच्या कामासाठी मर्यादा नसतात. आपल्या कामाचा ठसा कायमपणे इतिहासाच्या पानावर उमटवून तो अजरामर होतो.Deep meaning reality marathi quotes on life

• विचारांचा दिवा लागला नाही, तर जीवन अंधारातच जाईल.

विचार माणसाच्या आचार व कृतीला जन्म देतात. त्याला दिशा दाखवितात. त्यामुळे तो आयुष्यभर दिशाहीन भरकटत जात नाही. विचारांमुळे माणूस आपले ध्येय निश्चित करतो. व तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो. ज्याच्या डोक्यात विचार येत नाहीत, जो विचारच करत नाही तो ध्येयहीन जगतो व मरतो.Deep meaning reality marathi quotes on life

* लोकांची वाटणारी भीतीच त्यांना आपल्यापासून दूर लोटते.

आपल्या संकोची वृत्तीमुळे समोरची व्यक्ती आपल्याबरोबर बोलेल की नाही, अशी भीती मनात येते तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलण्याचे, व्यवहार करण्याचे टाळतो. त्यामुळे विनाकारण एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होतो. नवीन व्यक्तीविषयी आपलेपणा निर्माण होण्याऐवजी दुरावाच निर्माण होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
10 छोटे सुविचार मराठी || Best Suvichar