सुविचार मराठी छोटे | सुविचार मराठी छोटे {99+} best marathi

[post_dates]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

             जीवनात यश संपादन करावयाचे असेल आणि मिळालेले यश टिकवायचे असेल तर विचारांचा पाया मजबूत पाहिजे.त्याकरिता सुविचारांचे बीज मनामधे रुजली पाहिजे. व स्वातंत्र्य विचारशैली तयार असलेला युवक कोणत्याही क्षणी डगमगत नाही.त्या युवकाचे व्यक्तिमत्त्व सुविचारांमुळे उजळून निघते. धन्यवाद. सुविचार मराठी छोटे

सुविचार मराठी छोटे

 सुविचार मराठी

  • एकीचे बळ संपले की विनाश ठरलेलाच! सुविचार मराठी छोटे
  • मातृप्रेम,स्वावलंबन व साधेपणा यांनी जीवन यशस्वी होते. 
  • कोणतेही काम अर्धवट करणे योग्य नाही.जे काम करणे उचित आहे, ते धीटपणे पूर्ण करा आणि जे काम करणे योग्य नसेल, ते न करता तसेच सोडून द्या. 
  • स्वतः अंतर्बाह्य बदलतात तरच तुम्हाला जग बदलता येईल अन्यथा नाही. 
  • वय वाढल्याने नव्हे तर प्रगती थांबल्याने तुम्ही म्हातारे होता . 
  • दोष विधमान असूनही ते न सुधारणे वास्तविक दोष होय. 
  • उपाशी कुत्र्याला उचलून नेऊन तुम्ही जर त्याला जगवलेत व सुस्थितीत आणलेत,तर तो तुम्हाला कधीच चावणार नाही. कुत्र्यात आणि माणसात हाच फरक असतो. 
  • माणसाची स्वप्ने जितकी जास्त त्या प्रमाणात त्याची विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती कमी होते. 
  • मधपान म्हणजे स्वतःहून स्वीकारलेला पागलपणा आहे. 
  • दारूचा अंमल शरीरावर सुरू झाला की अक्कल बाहेर पडलीच म्हणुन समजा.
  • मानवी व्यवहारावर वस्त्रांचा नैतिक परिणाम होतो. सुविचार मराठी छोटे

छोटे मराठी सुविचार 

  • आपल्यासमोर जे काम आलेले आहे ते दक्षतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे कर्तव्य निभावणे. 
  • गरुड हा एकटाच उडत असतो, एकत्र घोळका करून जमतात ती फक्त मेंढरे!
  • एक मनुष्य पहाटे 5 ला उठतो दुसरा सकाळी 7 ला उठतो, तर या दोघांमधे पहाटे उठणाऱ्या मनुष्यचे आयुष्य जणू 10 वर्षानी वाढलेले असेल.
  • आपल्याला दोन कान आणि एकच तोंड आहे. कारण आपण कमी बोलावे व खूप ऐकावे म्हणुन.
  • आयुष्य वाढविण्यासाठी आहार कमी करायला हवा. 
  • केवळ तीन मार्गांनी मनुष्याला संपत्ती मिळू शकते. काम करून,देणगी मिळाल्यामुळे किंवा चोरी केल्यामुळे. कामकरी लोकांना खूपच कमी संपत्ती मिळते यांचे मुख्य कारण भिकारी व चोर यांना ती जास्त मिळते, हेच आहे. 
  • जो खूप खातो,त्याला कसे खावे हे कळत नाही. 
  • काटकसर म्हणजे उत्पन्नाचे एक साधनाचे असते. 
  • लहानसहान खर्च करण्यामध्ये जास्त काळजी घ्या,कारण प्रचंड नौकेला लहानसे जरी छिद्र पडले तरी ती त्यामुळे बुडते.  सुविचार मराठी छोटे
  • काटकसर म्हणजे गरीब माणसाला पैसे मिळविण्याचा मार्गाच आहे. 
  • जे लोक आपल्या मुलाबाळांसाठी खूप संपत्ती ठेवतात पण त्यांचे गुण कसे वाढतील याकडे लक्ष देत नाहीत,ते लोक आपल्या घोड्याला खूप खाऊ पिऊ घालणाऱ्या व त्याला अजिबात न फिरवणार्‍या लोकांप्रमाणे असतात. 
  • विद्यार्थ्यांचा मान ठेवणे यातच शिक्षणाचे रहस्य आहे. 
  • शिक्षणाची फळे कडू असली तरी त्याची फळे मात्र मधूर असतात. 
  • परिस्थिती सुधारत नसते तर परिस्थितीत बदल घडवून आणल्याने आपण सुधारत असतो. 
  • संकटांना घाबरण्याऐवजी त्यांचे स्वागत करा. 
  • महावृक्ष स्वतः उन्हात उभे राहतात पण इतरांना सावली देतात.वृक्ष फळे देतात ती सुद्धा इतरांसाठी. स्वतः साठी त्यांनी काहीही नको असते. 
  • कामात रस असेल, तर कामगिरी सरसच होईल. 
  • प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद हा फार मोठा आहे. 
  • दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता नेहमी महत्त्वाची असते. 
  • संकटांना धैर्याने तोंड दिले तर ती आपोआप नाहीशी होतात. सुविचार मराठी छोटे

Join whatsapp group

 सुविचार मराठी छोटे

  • जेव्हा आपण स्वतःची किंमत करतो तेव्हा आपण भविष्यकाळात काय करू शकतो याचा विचार करतो.पण जेव्हा दुसरे लोक तुमचे मूल्यमापन करतात तेव्हा तुम्ही आजपर्यंत काय केले आहे,ही गोष्ट विचारात घेतात. 
  • सज्जन व कर्तुत्ववान व्यक्तिसमोर संकटे टिकत नाहीत. 
  • मूर्खाच्या सहवासामध्ये एकांत बरा. 
  • जशी दृष्टी तशी सृष्टी.
  • इच्छा तेथे मार्ग. 
  • विचाराला कृतीकडे नेण्याचे काम करणारी शक्ति म्हणजेच इच्छाशक्ति होय. 
  • ज्याचा खर्च त्याच्या कामापेक्षा जास्त असतो, असा कोणत्याही परिस्थितीतील मनुष्य श्रीमंत नसतो आणि ज्याच्या खर्च अवाक पैशापेक्षा कमी असतो, असा मनुष्य गरीब आहे,असे म्हणता येणार नाही. सुविचार मराठी छोटे
  • कोणत्याही गोष्टीचा अनिवार तहान लागल्यावाचुन ती मिळत नाही. 
  • सर्व मोहबंधनातून मुक्ती मिळविणे हाच सत्याचा साक्षात्कार होय. 
  • माणसाचे मोठेपणा त्याच्या वेषभूषेवर अवलंबून नसते. 
  • दुःखात होरपळल्याशिवाय सुखाची खरी किंमत कळत नाही. 
  • ईश्वराचे नावे तर अनेक आहेत, परंतु एकच नाव शोधून काढायचे असेल तर ते सत्य म्हणजेच सत्य हाच ईश्वर आहे. 
  • संघर्षाशिवाय ध्येय साध्य करता येत नाही. 
  • तुमच्या मनाचा आरसा पारदर्शक असेल तरच तुमचा चेहरा सुंदर दिसेल.
  • ध्येयासाठी मारण्यापेक्षा ध्येयसाठी जगणे अधिक महत्त्वाचे आहे. 
  • ज्या प्रकारचा आहार आपण घेतो त्याच प्रकारचे विचार आपल्या मानत येतात. 
  • धाडशी लोकांनाच नशीब साथ देत असते. 
  • आळस्यावर मात करून जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो. 
  • समजूतदारपणाने चांगले फळ मिळते. 
  • अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते. सुविचार मराठी छोटे

छोटे शालेय सुविचार 

  • मृत्यूइतकी अटळ गोष्टी दुसरी कुठलीही नाही त्यामुळे मृत्यूचा शोक करू नये. 
  • जीवनाचा आनंद इतरांबरोबर वाटून घेणे ही सर्वात मोठी सेवा होय. 
  • उच्च स्थानी बसला म्हणून नव्हे तर मनुष्य त्याच्या गुणांची ओळखला जातो. राजवाड्याच्या शिखरावर बसला म्हणून कावळा गरुड होत नाही. 
  • एखाद्या श्रेष्ठ कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तुम्ही सिद्ध असाल तरच यशस्वी व्हाल. 
  • मार्ग शोधा अथवा निर्माण करा. 
  • लहान मुलांचे मोठे गुण त्याच्या बालवयातच दिसून येतात.
  • जीवनातल्या नित्यक्रमांचे जेव्हा जेव्हा उत्सव होतात, तेव्हा आयुष्य आनंदयात्रा होते. 
  • विद्या हे माणसाचे परम दैवत आहे.राजदरबारी विद्येची पूजा होते,धनाची नव्हे!
  • विद्या नसलेला मनुष्य हा पाशुसारखा असतो. 
  • अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे मूळ आहेत. 
  • आपण स्वतः जसे असतो, तसेच जग दिसते. जीवनात आपणाला जे जे भेटतात, ते अरसेच असतात. 
  • सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगणे होय. 
  • प्रेम  हे ह्रदयाचे नि जीवनाची भुषण आहे. प्रेम नसेल तर बाहेरचे सौंदर्य काय कामाचे? 
  • सद्भावना, प्रेम सत्यनिष्ठा,पावित्र्य भावनिक उदारता आणि दयाळूपणा ही खऱ्या धर्माची लक्षणे आहेत. 
  • जो चांगल्या वृक्षाची आश्रय घेतो,त्याला चांगली छाया मिळते. 
  • शंभर जणांना एखादा शूर असतो. हजारांमध्ये एखादा पंडित असतो. दहा हजारात एखाद्या वक्ता असतो. पण दानशूर मात्र क्वचितच सापडतो. 
  • थांबला तो संपला. 
  • ज्यानी ममतेचा व अभिमानाचा त्याग केला आहे, त्यांना असीम शांती प्राप्त होते 
  • अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही,तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपल्याला होणार नाही. 
  • गरिबांना उपदेश करण्यापेक्षा त्यांना मदत केलीत तर ते जास्त श्रेयस्कर होईल. सुविचार मराठी छोटे
प्रेरणादायी मराठी सुविचार
  • केवळ योगायोग असे काहीही नाही, जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. 
  • दोषाबाबत स्वतःवर विश्वास ठेवू नका. समजण्यासाठी मित्राचा उपयोग करा. 
  • नास्तिक बरा पण दांभिक वाईट. पहिला प्रामाणिक असतो तर दुसरा प्रामाणिकपणाचे ढोंग आणतो. 
  • इतरांच्या आयुष्यात दुःख न निर्माण करता सुख देण्यात प्रयत्न करणे हीच साधुत्वाकडे नेणारी वाटचाल आहे. 
  • जगाला युद्धाच्या खाईतून वाचविणाऱ्या घरात नेहमी शीतयुद्ध चालू असते. 
  • संकटांना धैर्याने तोंड दिले तर ती आपोआप नाहीशी होतात. 
  • चिंता जिवंत माणसाला सतावत असते. 
  • पुस्तक म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे. 
  • काटकसरी वृत्तीच जीवनात स्थिरता देते. 
  • मानवी जन्म प्राप्त झाला असताना सत्कर्म करावे म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळतो. 
  • सूर्याची किरणे सर्वसामान जागी पडली तरी पाणी, आरसा किंवा तेजस्वी पदार्थावर ती अधिक परावर्तित होतात.त्याप्रमाणे भगवंताचा वास सर्वत्र सारखा असला तरी साधूपुरुषांच्या हृदयामध्ये तो अधिक प्रकाशमान होतो. 
  • व्यसनात गढून गेलेल्या माणसाकडून कोणतेही चांगले काम पूर्ण होऊ शकत नाही. 
  • चांगल्या सवयी मुलांना बालपणाची लावाव्या लागतात. 
  • स्वतःला तुम्ही जितके अधिक जणाल तितकेच शांत व आनंदी राहणे सोपे जाईल. 
  • दुसर्‍याला हलके लेखणारे मनुष्य स्वतःच हलक्या मनाचा असतो. 
  • कणभर सेवा की मनभर सेवा महत्त्वाचा प्रश्न नाही. त्यात ध्यास आहे की नाही, हा प्रश्न आहे. 
  • जीवन हा हास्य आणि अश्रू यांचा संगम आहे. 
  • आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावरच जीवन अवलंबून असते. 
  • संस्काराचे मुल्य अमूल्य आहे. संस्कारामुळे माणसाच्या व्यक्तिविकासात मदत होते. 
  • आईचे प्रेम सर्वांवरच समान असते. तरी आई कोणास खाऊ देते तर कोणास कपडे देते आणि मुलांनाही त्यात आनंद असतो. ईश्वराची कृपाही तशीच आहे. 
  • चेहर्‍यावर प्रसन्नता व वाणिव गोडवा असेल तरच लोक तुमच्याजवळ येतील. 
  • संघर्षाला घाबरू नका. संघर्षाशिवाय कधीच काहीही नवे निर्माण झालेले नाही. 
  • कल्पनेवर भर देण्यापेक्षा वास्तवावर भर देणे कधीच उचित ठरतात. सुविचार मराठी छोटे

Also read

मराठी सुविचार संग्रह

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment