Marathi Quotes On life || सुविचार मराठी best 2024

[post_dates]

Marathi Quotes On life || सुविचार मराठी best 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला कोणते सुविचार पाहिजे आहेत मला माहीत आहेत. काळजी करू नका आपल्या वेबसाईटवर  सर्व प्रकारचे सुविचार तुम्हाला मिळतील. आणि तेही सुविचार चा अर्थ सुद्धा तुम्हाला वाचनासाठी मिळणार. Marathi Quotes On life

Marathi Quotes On life || सुविचार मराठी best 2024

#सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार || सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार 

* फुटलेले मणी व तुटलेले मन कधी सांधता येत नाही.

फुटलेला मणी जरी कृत्रिमपणे जोडला तरी त्याची ओळख तुटलेला अशीच राहते. त्याचा जोड दिसत राहतोच. तसेच माणसाचे मन असते. माणूस दुसऱ्या माणसाशी मनाने जोडलेला असतो. त्या मनामध्ये दुसऱ्याविषयी शंका आल्यास किंवा कोणत्याही कारणाने मनाने दुरावा निर्माण झाल्यास तो पुन्हा कोणत्याही उपायाने सांधता येत नाही.

* संयम नावाच्या कटु वृक्षाची फळे गोड असतात.

व्यक्तीचे आपल्या मनावरील नियंत्रण म्हणजे संयम. संयम नसेल तर माणूस चुकीचे बोलतो, चुकीचे वर्तन करतो. त्याचे होणारे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. संयम असणारा माणूस विचार करून बोलतो व वागतो. त्यामुळे सहसा त्याच्याकडून चूक होत नाही. त्याचे परिणामही चांगलेच होतात.Marathi Quotes On life

marathi Suvichar

* पशूना द्रव्याची इच्छा नसते, माणसाला तीच इच्छा पशू बनवते.

पशुपक्ष्यांना जगण्यासाठी अन्न, पाणी लागते. परंतु त्यासाठी ते त्याचा साठा करून ठेवत नाहीत. ऐषोराम, चैन करणे हे शब्द त्यांच्या कोशामध्येच नाहीत. त्यामुळे त्यांना पैसा लागत नाही. त्यासाठी ते धडपडत नाहीत. माणसाला मात्र जीवनावश्यक गरजा भागल्यानंतर सुखासीन जीवन हवेसे वाटते व जितके मिळेल तितके कमीच असते. त्यासाठी कसाही पैसा मिळवायला तो तयार असतो. कोणतेही हीन कृत्य तो करायला तयार होतो. पशूला लाजवेल असे तो वागतो.Marathi Quotes On life

* उथळ लोक दैवावर विश्वास ठेवतात, समर्थ लोक कृतीवर भर देतात.

फारसे विचार न करणारे म्हणजे उथळ लोक. ते जीवनाबद्दल, जगण्याबद्दल गंभीर होऊन विचार करत नाहीत. ते आपले जीवन नशिबाच्या हवाल्यावर सोपवतात. त्यांना आपल्या क्षमतांची जाणीव नसते. परंतु समर्थ माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो. आपल्या हाताच्या बळावर विश्वास ठेवतो. म्हणूनच तो प्रत्यक्ष कृतीवर भर देतो.Marathi Quotes On life

• जे कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत नव्हे ते कायमचे भ्रष्ट ठरतात.

माणूस श्रद्धेवर जगतो. त्याची जीवनावर श्रद्धा असली पाहिजे. तरच त्याच्यामध्ये जगण्याची आशा, ऊर्मी निर्माण होते. आशा त्याला काम करण्याची प्रेरणा देते. तो क्रियाशील होतो. जो कशावरच श्रद्धा ठेवत नाही त्याला जगण्याचे कारणच कळत नाही. जगण्यासाठी दिशा मिळत नाही. परिणामी त्यांचे जगणे हे वाऱ्यामध्ये भरकटलेल्या जहाजासारखे असते. Marathi Quotes On life

#Marathi Quotes || मराठी सुविचार व अर्थ 

• आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे माणसाचे मोठे शत्रू आहेत.

आळशी माणूस निष्क्रिय होतो. अज्ञानामुळे माणूस फसविला जातो. अंधश्रद्धेमुळे माणसाकडून चुकीचे वर्तन घडते. निष्क्रियता, फसवणूक, गैरवर्तन यांच्यामुळे त्याचे आयुष्यात नुकसान होते. त्याची प्रगती खुंटते. त्याचे दुर्गुण त्याचे नुकसान करतात. तसेच त्याच्या कुटुंबाचे, समाजाचे व देशाचे देखील नुकसान करतात. म्हणूनच ते माणसाचे मोठे शत्रू आहेत.Marathi Quotes On life

* जीवन ही चैनीची गोष्ट नसून कर्तव्याची भूमी आहे.

पशुपक्षी, कीटक, किडे हे जगण्यासाठी जगत असतात. त्यांच्या जगण्याला वेगळा अर्थ त्यांना देता येत नाही. परंतु मनुष्यप्राणी हा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. बुद्धिमान आहे. तो विचार करू शकतो, त्याच्याकडे सद्सदविवेकबुद्धी असते. याचा वापर करून त्याने मनुष्यजन्म ऐषोरामात

व्यर्थ न घालविता, आपले कर्तव्य पार पाडून जन्म सार्थकी लावला पाहिजे.Marathi Quotes On life

* आपले सारे जीवन खेळासारखे आहे.

प्रत्येक खेळासाठी नियम असतात, बंधन असते. खेळामध्ये प्रतिस्पर्धी असतो. कधी यश मिळते, कधी अपयश पदरी पडते. त्याला त्या खेळाचा सतत सराव करावा लागतो, कष्ट करावे लागतात. तसेच आपले जीवन असते. जीवनाचे काही नियम पाळावे लागतात. काही मित्र असतात, काही शत्रू असतात. आयुष्यामध्ये सुखदुःखाचे प्रसंग येतात. त्यांच्याशी धैर्याने सामना करत जगावे लागते.Marathi Quotes On life

* त्यागातच वैभव आहे, संचयात नाही.

माणूस पैसा, मालमत्ता अधिकाधिक मिळवितो व साठवून ठेवतो. परंतुज्या संपत्तीचा उपयोग कोणाच्याही कल्याणाकरिता होत नाही ती असून नसल्यासारखीच आहे. आपल्याकडे जे आहे त्यातील थोडे दुसऱ्यासाठी द्यावे. देण्यामुळे माणूस मोठा होतो. मृत्यूनंतर संपत्ती बरोबर येत नाही. दान करण्याने कीर्ती मागे राहते.Marathi Quotes On life

* नियपयोगी जीवन म्हणजे अकाली मृत्यूच.

आपल्या जगण्याचा कोणालाच उपयोग होत नसेल तर ते जीवन निरुपयोगी असते. निरुपयोगी जीवन जगणारा कितीही वर्षे जगला तरी ते व्यर्थच आहे. मृत्यूनंतर जसे शरीर निरुपयोगी होते तसे जगतानाच हे लोक निरुपयोगी होतात. त्यामुळे ते इतरांच्या दृष्टीने नसल्यासारखेच असतात.Marathi Quotes On life

* जीवन ही एक समरभूमी आहे, त्यात लहान-मोठ्या जखमा होणारच.

जीवनामध्ये अनेक संकटे येतात. दुःखाचे प्रसंग येतात. त्या सर्वांशी निराश न होता धैर्याने सामना करावा लागतो. अशा वेळी मनाला त्रास होईल अशाही गोष्टी आपल्या बाबतीत इतरांकडून होतात. त्यामध्ये आपले आप्तस्वकीय, जिवलग मित्रसुद्धा असतात. पण हे सर्व विसरून सर्वांशी मिळतेजुळते घेऊन आनंदाने जगण्यासाठी हिंमत असावी लागते.Marathi Quotes On life

Marathi Quotes On life || सुविचार मराठी best 2024

#जीवनावरील मराठी सुविचार || जीवनावरील मराठी सुविचार 

* मोठ मोठी कामे शक्तीने होत नाहीत, तर ती सहनशक्तीने होतात.

माणूस मोठ्या उत्साहाने कामाला लागतो. कामे लहान असो किंवा मोठे असो. ते पूर्ण करण्यासाठी शारीरिक शक्ती लागते त्याचप्रमाणे मानसिक शक्तीदेखील लागते. काही वेळेला कामाची पूर्तता करताना अनेक अडीअडचणी येतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी सहनशक्ती असावी लागते.

* अंधानुकरणाने आत्मविकासाऐवजी आत्मसंकोच होतो.

माणूस अनुकरणप्रिय असतो. अनुकरण करताना विचार केलेला असला पाहिजे. ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल, विकास होईल त्याचे अनुकरण करणे योग्य असते. परंतु न समजता न विचार करता आंधळेपणाने दुसऱ्यासारखे वागण्यामध्ये तोटा होतो. प्रगतीऐवजी अधोगती होते.Marathi Quotes On life

• नवीन शिकण्याची ज्याची उमेद संपली, तो म्हातारा.

बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था या शारीरिक तीनही अवस्थांमधून माणूस जात असतो. वयानुसार माणूस वृद्ध होतो. परंतु नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद जोपर्यंत त्याच्यामध्ये असेल तर तो मनाने तरुणच असतो. वयाने तरुण असून नवीन काही शिकण्याची उमेद नसेल तर मात्र तो मनानेच वृद्ध झालेला असतो.

Join Marathi blogging course https://courseinmarathi.com/

* अस्वस्थ वृत्ती कर्तृत्वाला जन्म देते.

जो माणूस आपल्या कामावर खुश होतो, समाधानी राहतो त्याच्यामध्ये नवीन काही करण्याची इच्छा निर्माण होत नाही. परंतु जो अस्वस्थ असतो त्याला अजूनही पुढे काही करावे असे वाटत असते. त्यासाठी तो धडपडतो. विचार करत राहतो. याच्यातून नवनवीन कल्पना त्याला सुचतात व त्या अमलात आणण्यासाठी तो धडपडतो.

* प्रत्येकाच्या विकासाला संपूर्ण संधी देणे हाच खरा सुसंस्कृतपणा होय.

प्रत्येकाला स्वतःची प्रगती व्हावी असे वाटते. त्यासाठी तो प्रयत्न करतो. ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामध्ये काही विशेष नाही. परंतु आपली मते दुसऱ्यावर लादून त्याला त्याच्या मताप्रमाणे, विचाराप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याला त्याचा अपेक्षित विकास साधता येत नाही. त्यामुळे ज्याला त्याला त्याच्या विकासासाठी पूर्ण संधी देण्यामध्येच आपली सुसंस्कृतता असते.Marathi Quotes On life

• टीका आणि विरोध हीच समाजसुधारकाला मिळणारी बक्षिसे असतात.

कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील समाजसुधारक हा त्याच्या काळात असणाऱ्या समाजातील अपप्रवृत्ती, गैरसमजुती, अंधश्रद्धा यांच्यावरच घाव घालत असतो. चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्यांना ते पटत नाही, रुचत नाही. त्यामुळे समाज जे समाजाला सुधारण्यासाठी वेगळेपण योग्य पाऊल उचलतात त्यांना विरोध करतो. त्यांच्यावर टीकास्त्र सोडतो.Marathi Quotes On life

#अद्वितीय मराठी सुविचार || मराठी सुविचार 

• अपयश आणि अशक्य हे शब्द केवळ मूर्खाच्या कोशातच सापडतात.

प्रयत्न करणाऱ्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कदाचित त्याच्या क्षमतेनुसार ती सोपी किंवा कठीण असते. काही वेळेला त्याला पहिल्या प्रयत्नात यश आले नाही तरी त्याच्या प्रयत्नांमुळे तो कधीतरी यश येतेच. मूर्ख माणूस काम करण्यापूर्वी प्रयत्न करण्याच्या कल्पनेनेच घाबरतो. त्यामुळे त्याला ते अशक्य वाटते. त्याला प्रयत्न न करण्याच्या प्रवृत्तीमुळे अपयश्च समोर दिसते.Marathi Quotes On life

* नावे ठेवणे सोपे, पण नाव कमावणे कठीण

निंदा करणे ही ज्याची प्रवृत्ती असते तो त्याच नजरेने सर्व जगाकडे पाहतो. जे चांगले आहे त्यांकडे दुर्लक्ष करून जी कमतरता आहे ती पाहण्याकडेच त्याचे लक्ष असते. स्वतः काही कष्ट घेण्यापेक्षा दुसऱ्याने कष्टाने केलेल्या कामाबद्दल कौतुक न करता असूयेने निंदा करणे यासाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. ते खूप सोपे असतो. परंतु तेच काम स्वतःच करून दाखविणे कष्टाचे असते.

* काळजी करू नये, काळजी घ्यावी.

आपल्यासाठी निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांची निष्क्रियपणे काळजी करून उपयोग होत नाही. काळजी करून आपली कार्यक्षमता कमी होते न येणारी समस्या निर्माण होते. त्यापेक्षा कोणतेही काम करताना संभाव्य समस्यांचा विचार करून केल्यास त्या समस्या निर्माण होणार नाहीत.

* परिस्थितीचे कुंपण तोडल्याशिवाय मानवाची प्रगती नाही.

माणसाला आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीतून जावे लागते. प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूल असतेच असे नाही. प्रतिकूल परिस्थिती हा स्वतःची प्रगती साधताना येणारा अडथळा असतो. तो अडथळा दूर करून तो सातत्याने प्रयत्न करतो, तोच आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो.

• आवश्यकता घाबरटालाही साहसी बनवते.

प्रत्येक माणसाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टींची भीती असते. ज्याची भीती वाटते त्या गोष्टी करणे त्याला अशक्य वाटते. परंतु एखादी गोष्ट करण्याची आवश्यकता निर्माण होते, ती करण्याशिवाय तरणोपाय नाही अशी नरिस्थिती निर्माण होते. त्यावेळी तो धाडसी होतो. त्याच्या मनातील भीती कधी पळून जाते हे त्यालाच कळत नाही. Marathi Quotes On life

* पूर्ण विचाराशिवाय कार्य करणाऱ्यांना पश्चात्ताप करावा लागतो.

कोणतेही कार्य मनात आले म्हणून लगेच केले तर त्याच्यातील अडीअडचणी, चांगल्या-वाईट बाजू आधी समजलेल्या नसतात. कार्याला सुरुवात केल्यानंतर त्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेला त्या समस्यांना सामोरे जाता आले नाही तर ते अर्ध्यातच सोडून द्यावे लागते व कार्य सुरू केल्याबद्दल पश्चात्ताप होतो.

Marathi Quotes On life || सुविचार मराठी best 2024
#शुभ सुविचार || शुभ सुविचार 

* हे विश्वचि माझे घर.

संपूर्ण विश्व म्हणजे माझे घर आहे अशी जर भावना असेल तर जगातील सर्व भांडणतंटे संपून जातील. सर्वजण सुखासमाधानाने, आनंदाने राहतील. एकाच घरातील म्हणजे एकाच कुटुंबातील सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखाचा विचार करतात. सर्वजण एकमेकांशी सामंजस्याने राहतात. तसेच संपूर्ण विश्वामध्ये घडल्यामुळे सर्वत्र शांतता नांदेल.

* काम फत्ते व्हायचे तर ते हातांनी होते, बातांनी नाही.

कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नुसती व्यर्थ बडबड कामाची नाही. काय करावे, कसे करावे याचे नियोजन करत राहण्यामुळे काम पूर्णत्वाला जाणार नाही. त्याच्याविषयी असणाऱ्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्यापेक्षा ते प्रत्यक्ष वापरले पाहिजे. यामुळे कार्यसिद्धी होते. Marathi Quotes On life

• कोणत्याही धर्माचे रक्षण तलवारीने होत नाही.

धर्माची निर्मिती माणसाने केलेली आहे. कोणताही धर्म लहान-मोठानाही. कोणताही धर्म भांडण-तंटा करायला शिकवत नाही. माणुसकी विसरायला शिकवत नाही. माणसाने माणसाशी पशूप्रमाणे न वागता माणसाप्रमाणे वागण्यामध्येच धर्माचे रक्षण होते. धर्माच्या नावावर हिंसा करून धर्म टिकवता येत नाही.

* जीवन हे एक फूल आहे आणि प्रेम हा त्यातला मध आहे.

फूल उमलते, फुलते, कोमेजते. फुलामध्ये सौंदर्य आहे. जीवनदेखील फुलाप्रमाणे उमलते, फुलते, कोमेजते. जीवनदेखील फुलाप्रमाणे सुंदर वाटते जर त्यामधील नातेसंबंधांमध्ये प्रेम असेल तर फुलामधील मधामुळे भूगे त्याच्याकडे आकर्षित हातात त्याप्रमाणे जीवनामध्ये प्रेमामुळे लोक एकमेकांच्या जवळ येतात.

* ‘स्वस्तुती करणे व वडिलांची कीर्ती सांगणे’ हे मुर्खाचे लक्षण आहे.

आपल्या चांगल्या कामाची प्रशंसा इतरांनी किंबहुना आपल्या शत्रूनीही करावी. त्यामध्ये सन्मान आहे. तसेच वडिलांचे कर्तृत्व, वडिलांची कीर्ती सांगून स्वतःला मोठेपणा मिळत नाही व मिळाला तरी तो टिकत नाही. स्वस्तुती व वडिलांच्या कीर्तीमुळे मोठेपणा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला हे समजत नाही. म्हणून तो मूर्खच आहे.

* टीका करताना ज्यावर जी करायची त्याबद्दल आदर असला पाहिजे.

टीका या शब्दाचा अर्थ निंदा करणे नव्हे. टीका म्हणजे योग्य असे रसग्रहण करणे. योग्य समीक्षा करणे. चांगले व वाईट या दोन्हीबद्दल मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता आपले मत मांडणे. ज्याला दुसऱ्याबद्दल आदर असतो, तो पूर्वग्रह बाळगत नाही व तटस्थपणे तो टीका करतो.Marathi Quotes On life

• लढाई जिंकण्यासाठी धोका पत्करावा लागतो.

लढ़ाई जगण्याची असेल किंवा रणांगणावरची असेल ती लढताना अपयश येते, संकट येते, अडथळे येतात, या सर्वांना तोंड देतच पुढे जावे लागते. जो हे सर्व जाणून त्यांच्याशीदेखील दोन हात करण्याची हिंमत ठेवतो तो कोणत्याही लढाईमध्ये यशस्वी होतो.

Marathi Quotes On life

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment