Marathi Suvichar |मराठी सुविचार :Top best [99+]

      नमस्कार मित्रांनो आपल्या marathihindi.in वर आपले स्वागत आहे. आपल्या या वेबसाईट वर तुम्हाला मराठी सुविचार मिळतील हे सुविचार आपले दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा देणारी सुविचार आहे. Marathi Suvichar

Marathi Suvichar

●अभ्यास●

  • अभ्यास चार शत्रू दुर्लक्ष, त्वरा, स्तुती, आळस.
  • अभ्यासाने अभ्यास वाढतो,आळसाने आळस वाढतो. 
  • अभ्यासाने बुद्धीची संवर्धन होते, आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते.  Marathi Suvichar

●  विद्या ●

  • विद्या ही विनय म्हणजे नम्रता किंवा मर्यादा निर्माण करते. विद्या विनयेन शोभते. 
  • विद्या मिळविण्यास उत्सुक असणार्‍यांना न सुख मिळते न निद्रा . 
  • विधे हे माणसाने सुंदर रूप आहे. 
  • विद्या हे गरिबाचे धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. 
  • विद्यारुपी धन चोर चोरू शकत नाही, राजा घेऊ शकत नाही, भावामध्ये वाटले जाऊ शकत नाही आणि त्याचे कुठल्याच तर्‍हेचे ओझे आपल्यालावर नसते म्हणुनच विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. 
  • जिवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उधाण फुलत नाही. 
  • विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार. 
  • विद्यादान हे अन्न दानापेक्षा श्रेष्ठ आहे. अन्नाने क्षणीक तृप्ती होते परंतु विद्येमुळे जीवनभराचे सुख प्राप्त होते.  Marathi Suvichar

Join whatsapp group सुविचार मराठी

  ● ज्ञानप्राप्ती ●

  •  संपत्तीची लालसा ज्याप्रमाणे सतत वाढत राहते त्याचप्रमाणे ज्ञान जसेजसे प्राप्त होईल तसतशी ज्ञानाची तहानही सदोदित वाढतच राहते. 
  • माणसाचे वय काहीही असो, त्याला ज्या गोष्टीचा ज्ञान नाही ते शिकण्यामध्ये लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. 
  • विज्ञान म्हणजे ज्ञानाची सुसूत्र मांडणी. 
  • सुखापेक्षा दु:खामुळे होणारी ज्ञानप्राप्ती श्रेष्ठ दर्जाची असते. 
  • ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते तर ज्ञान तुमचे रक्षण करते. 
  • वायफळ बडबड जेवढी अधिक तेवढी ज्ञानाची पातळी उथळ. 
  • जगात एकच गोष्ट निर्भेळ, चांगली आहे ती म्हणजे ज्ञान आणि एकच गोष्ट केवळ अनिष्ट ती म्हणजे अज्ञान.
  • ज्ञानाचं मर्म काय? ज्ञान असेल तर त्याचा उपयोग करा. नसेल तर आपल्या अज्ञानाची कबुली द्या.  Marathi Suvichar

  ● अज्ञान

  • अज्ञान हेच सर्व दुःखाचे मूळ आहे. 
  • अज्ञान हाच आपला पराजय होय. 
  • अज्ञानाची उत्पत्ती लोभातून होते आणि लोभाबरोबरच आज्ञान वाढते. 
  • अज्ञानी माणूस कल्पनेत जगतो. कल्पना अज्ञानाचे सुख आहे अन् सत्य ज्ञानाचं. 
  • कोणत्याही समस्येची उकल अज्ञानाने कधीच होणार नाही.
काव्य
  • काव्य ही सर्व उदात्त गुणांची जननी आहे. 
  • काव्य ही दुःखाच्या रोगावर जडीबुटी आहे. 
  • जिथं पावित्र्य तिथं काव्य .
  • काव्याचा जन्म प्रेमातून होतो. Marathi Suvichar

● विचार ●

  • विचारांची संपत्ती ही माणसाच्या जिवणातील कामधनू आहे. 
  • ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो. 
  • सुविचार हे बुद्धिला मिळालेले खाद्य आहे. 
  • एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट करतो. 
  • विचार एकदा परिपक्व झाले की शब्दाचे रूप घेऊन कागदावर उतरतात.
  • विचार थकले की विकार भडकतात.
  • दुसर्‍याच्या दुःखाचा जो विचार करतो तोच खरा सुशिक्षित. 
  • विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे, कृतीकडे सवय लागते,सवयीमुळे स्वभावामुळे साध्य प्राप्त होते. 
  • चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणुन मनाच येताच कृती करा. 
  • तुमचे सौख्य तुमच्या विचारावर अवलंबून नसते. 
  • विचारात जबरदस्त शक्ति असते, विचाराने माणसाची उन्नती होते तसेच पतनही होते. 
  • माणसाचे जीवन समृद्ध करायला एकदाही प्रभावी विचार उपयोगी पडतो म्हणून चांगल्या विचारांचा सतत प्रसार करीत असावे.
  • विचारपूर्वक बोला, पण कृती मात्र तत्परतेने करा. 
  • जितके निरीक्षण सूक्ष्म तितकी समजूत अधिक. म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा. 
  • विचार हा जनक आहे आणि शब्द हा त्याचा पुत्र आहे. 
  • मनुष्याची वाढ ही अवयववादीने होत नाही तर विचारानेच होत. विचारांना वाचनाने सहकार्य मिळते. 
  • विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे याचे खरे नाव शिक्षण.  Marathi Suvichar
Marathi Suvichar

● स्वभाव ●

  • स्वभाव सुंदर वस्तू संस्काराची अपेक्षा करीत नाही. कसोटीवर घासून मोत्याला तेज प्राप्त होत नाही. ( ते अंगीभूत असते)
  • विद्वत्तेपेक्षा सुस्वभावाला अधिक महत्त्व द्यावे. 
  • स्वाभावत: सुंदर किंवा कुरूप असे काहीच नसते जे ज्याला आवडते तेच त्याच्या दृष्टीने सुंदर. 
  • सुस्वभाव म्हणजे अशी विशिष्ट जमीन आहे तिथे सद्गुणाचे पोषण होते. 
  • उपदेश करून माणसाचा स्वभाव बदलता येत नाही.पाणी कितीही तापवले तरी ते पुन्हा थंड होणारच. 
  • चांगल्या स्वभावामुळे (सद्गुणामुळे) जीवनात प्रकाश पडतो. 
  • स्वभाव आणि सवयी सारख्या असल्या की, मैत्री जुळते. 
  • मोठे लोक स्वभावत:च मितभाषी असतात. 
  • गाढवाला केला शृंगार तरी तो मातीत लोळणारा. 
  • जर स्वभावात दोष असेल तर तो दाबून टाकू नका, तो काढून टाका. 
  • प्राणी जन्माला येतो तो स्वभाव घेऊनच. 
  • स्वभावाची परीक्षा कर्तबगारीतून होते. 
  • तेजस्वी माणूस दुसर्‍याचे तेज जुमानता नाही कारण तो त्याचा जन्मत: स्वभावच असतो. 
  • चांगल्या व सुसंस्कृत स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगले बोलतात. 
  • विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे, कृतीमुळे सवय लागते सवयीमुळे स्वभाव बनते व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.  Marathi Suvichar

छोटे सुविचार

● विनोद ●

  •  विनोद  हा माणसाचा चांगुलपणा मान्य करतो व दोष घालवितो.
  • विनोद ही एक महान कलाच आहे. 
  • विनोद हा प्रसन्न आणि मोकळा मनाचा उद्गार आहे. 
  • विनोदामुळे आयुष्याचा गढूळपणा नाहीसा होऊन जीवन शुद्ध होते. 
  • विनोद हे मानवी जिवणातील विधेइतकेच मोठे वैभव आहे. 
  • विनोद हा न्यायाधीशाप्रमाणे निष्ठूर असतो. 
  • विनोद हा सत्याचा मित्र आहे. 
  • विनोद म्हणजे संभाषणाची चव निर्माण करणारी मृदू फुंकर 
  • विनोद म्हणजे चेष्टेच्या आवरणाखाली लपलेले गांभीर्य. 

  ● सवय ●

  •  विद्याघरी वरिष्ठांना म्हणते, “मुने सवयीने कडू पदार्थही
  • आवडू लागतो. एखाद्याला  कडूनिंब आवडतो तर  एखाद्याला मध.” 
  • सवयी सारख्या असल्या की मैत्री जुळते. 
  • चांगल्या सवयीनं सद्गुण म्हणतात तर वाईट सवयींना व्यसन म्हणतात. 
  • सवयींमुळे अवघड कामेही सहजपणे पार पाडतात. त्यामुळे कामाची सवय ठेवा.  Marathi Suvichar

● अहिंसा ●

  • अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे. 
  • अहिंसा हा श्रेष्ठ संयम आहे . 
  • अहिंसा हे श्रेष्ठ दान आहे. 
  • अहिंसा ही श्रेष्ठ तपश्चर्या आहे. 

● दान ●

  • आपण केलेले दान कोणालाही कळू देऊ नका. 
  • प्रत्येक सत्कृत्य हे दानधर्म आहे. 
  • न मागताही जो दान करतो तो श्रेष्ठदानी होय.
  • दात्याने अनिच्छिने दिलेले दान स्वीकारणे वाईटच.
  • त्याग आणि दान हे दोन्ही धर्मच आहेत पण त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे तर दाताची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे. 
  • वैभव असतानाच दान करावे आणि द्रव्याचा उपभोग घ्यावा ( म्हणजे जीवन योग्य खर्च करावा) साठा करू नये. या जगात मधमाशांनी साठवलेला मध ( अर्थ ) इतरच लुबाडतान दिसतात.वाजविपेक्षा जास्त संचय करू नये हा मतितार्थ. 
  • दान हे प्रसिद्धीसाठी नसावे.
  • व्यक्ति व समजाच्या जीवनातील उणीवा दूर करणे हेच दानामागचे तत्व आहे. 
  • दान हा हाताचा अलंकार आहे तर सत्य हे कंठाचे भूषण आहे. Marathi Suvichar
Marathi Suvichar

● उपकार ●

  •  सूर्य स्वतः जळतो आणि जगाला प्रकाश देतो. 
  • आज्ञा पालन बरी उपकार वाढतो भारी. 
  • पाणी स्वतः नष्ट होते व सुकत असलेल्या गवताला जगवीते.
  • जो मनुष्य केवळ आपल्या फायद्यासाठी जगतो त्याचे मरण म्हणजे जगावर झालेला उपकारच होय. 
  • मेणबत्ती स्वतः जळते आणि लोकांना प्रकाश देते. 
  • सज्जन स्वतः झिज सोसून दुसर्‍यावर उपकार करतात. Marathi Suvichar

● भीती ●

  •  भीती गुन्ह्याची पाठ सोडत नाही आणि गुन्ह्याची हीच मोठी शिक्षा आहे. 
  • जग भित्र्याला भिवविते व भिवविकणार्‍या भिते.
  • चांगल्या सद्गुणी व्यक्तीबाबत आदरयुक्त भीती जरूर बाळगावी, त्यामुळे आपण वाईट कर्मापासून दूर राहतो.

● आशा ●

  • आशा व निराशा एकाच नाण्याच्या बाजू आहेत. 
  • आशा म्हणजे दुःखी लोकांना दुसरा आत्मा.
  • आशा ही विचित्र श्रृंखला आहे, तिने बांधलेला माणूस भरधाव धावतो व न बांधलेला माणूस लुळापांगळा होतो. 
  • आशा म्हणजे जीवनाच्या वादळी समुद्रात मार्ग दाखवणारी तारका. 
  • आशावादी माणूस अडचणीची संधी बनवितो तर निराशावादी संधीलाही अडचण मानतो. 
  • माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते. 
  • गर्वाने देव दानव बनवतात तर नम्रतेने मानव देव बनतो. 
  • अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो. 
  • नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ व अनेक गुणांची जननी. 
  • अत्यंत सुंदर व सुगंधी फुल लज्जाशील व विनयशील असते. 
  • नम्रता हा सर्वधर्माचा पाया आहे. 
  • विनयाशिवाय वैभवाला आणि चंद्राशिवाय रात्रीला काय किंमत?
  • गुरुजनांच्या सहवासात नेहमी विनयाने राहावे. त्याच्यासमोर पाय पसरून बसणे वैगरे गोष्टीचे कधीही आचरण करू नये.
  • पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. 
  • नम्रतेच्या उंचीला माप नसते. 

Treading

More Posts