सुविचार हे जीवनातील एक महत्त्वाचे भाग आहे. आपण रोज सुविचार वाचले पाहिजे. त्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते व दिवसाची सुरुवात चांगली होते आणि मन प्रसन्न राहते. त्यामुळे रोज एक सुविचार वाचा आणि मित्र मैत्रिणी पण शेअर Marathi Suvichar ani Arth

1. #Marathi Suvichar Ani Tyanche arth || मराठी सुविचार आणि त्यांचे अर्थ
● माणूस पैशापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा हिंमत गमावल्यामुळे सर्वस्व गमावते.
माणूस पैसा गमावतो तेव्हा हिंमत ठेवल्यास पुन्हा अधिक पैसा कमावू शकते. त्याने प्रतिष्ठा गमावली तरीही हिमतीने ती परत मिळवू शकतो. संतु हिंमतच गमावली तर तो आयुष्यात काहीच मिळवू शकत नाही. जे आहे त देखील गमवावे लागते. Marathi Suvichar ani Arth
● हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहावे.
शत्रू आपले नुकसान करणार, त्रास देणार याच्याविषयी आपल्याला खात्री असते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने हल्ला करू शकणाऱ्या शत्रूपासून आपण सावध असतो. परंतु आपली स्तुती करणारा मित्र आपल्याला काही नुकसान पोहचवेल असे आपल्याला वाटत नाही. त्यामुळे त्याच्यापासून आपण गाफिल राहतो व त्याने हल्ला केल्यास आपण मनानेच ढासळतो. विश्वासघातकी परंतु स्तुती करणाऱ्या मित्रापासूनच सावध राहावे लागते.Marathi Suvichar ani Arth
● कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नये.
कर्ज पूर्णपणे फेडले नाही, तर थोडे शिल्लक राहिलेले कर्ज व्याजामुळे पुन्हा वाढत जातो. शत्रू पूर्णपणे नष्ट केला नाही, तर पुन्हा पूर्ण तयारीनिशी तो हल्ला करू शकतो. रोग, मुळासकट बरा झाला नाही, तर तो पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो. अशा रीतीने कर्ज, शत्रू, रोग शिल्लक ठेवल्यास ते पुन्हा वाढत जातात म्हणून ते थोडेसुद्धा बाकी ठेवू नये. Marathi Suvichar ani Arth
Also Read
https://marathihindi.in/motivational-reality-marathi-quotes-on-life-best/
● हल्ला करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहावे.
शत्रू आपले नुकसान करणार, त्रास देणार याच्याविषयी आपल्याला खात्री असते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने हल्ला करू शकणाऱ्या शत्रूपासून आपण सावध असतो. परंतु आपली स्तुती करणारा मित्र आपल्याला काही नुकसान पोहचवेल असे आपल्याला वाटत नाही. त्यामुळे त्याच्यापासून आपण गाफिल राहतो व त्याने हल्ला केल्यास आपण मनानेच ढासळतो. विश्वासघातकी परंतु स्तुती करणाऱ्या मित्रापासूनच सावध राहावे लागते.
● अंधार नसता, तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत राहिली नसती.
दिवसा सूर्याच्या तेजस्वी प्रकाशामध्ये ताऱ्यांचे चमकणे कोणालाच कळत नाही. त्यामुळे ते व्यर्थ ठरते. परंतु रात्रीच्या अंधारात चमकणारे तारे आकाशाचे सौंदर्य वाढवितात व पृथ्वीला प्रकाश देतात. त्यामुळे त्यांचे मोल समजते. त्याप्रमाणेच महान माणसांचे जीवनात संकटे, अडचणी नसतील तर त्यांचा मोठेपणा सिद्ध होऊ शकत नाही. Marathi Suvichar ani Arth
● कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुद्धा बाकी ठेवू नये.
कर्ज पूर्णपणे फेडले नाही, तर थोडे शिल्लक राहिलेले कर्ज व्याजामुळे पुन्हा वाढत जातो. शत्रू पूर्णपणे नष्ट केला नाही, तर पुन्हा पूर्ण तयारीनिशी तो हल्ला करू शकतो. रोग, मुळासकट बरा झाला नाही, तर तो पुन्हा पुन्हा उद्भवू शकतो. अशा रीतीने कर्ज, शत्रू, रोग शिल्लक ठेवल्यास ते पुन्हा वाढत जातात म्हणून ते थोडेसुद्धा बाकी ठेवू नये.
● विनोद हा दोष दर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे.
प्रत्येकामध्ये काही गुणदोष असतात. माणसाला गुणांसाठी केलेली स्तुती आवडते. परंतु दोषांसाठी केलेली निंदा आवडत नाही. दुसऱ्याला अप्रिय असणारी गोष्ट म्हणजे त्याच्या दोषांसाठी केलेली निंदा हाच दोष विनोदाच्या माध्यमातून सांगितला गेला, तर ऐकणाऱ्याच्या मनाला जखम होत नाही व त्याच्यातील दोष त्याला कळतो. तो स्वतःमध्ये सुधारणा घडवू शकतो. Marathi Suvichar ani Arth
2.#Marathi suvichar and meaning || मराठी सुविचार आणि अर्थ

● काम लहान का मोठे याचा विचार न करता ते पुरे करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे.
काम हे कामच असते. ते लहान किंवा मोठे असत नाही. ते कमी किंवा अधिक महत्त्वाचे असत नाही. कोणतेही मोठे काम यशस्वी होण्यासाठी त्यातील प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या कामाचा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो. प्रत्येक पायरीवरील, प्रत्येक व्यक्तीकडून होणारे काम चोख असेल तर मोठे काम सहजपणे यशस्वी होते.
● माणसाजवळ राक्षसी शक्ती असावी, पण ती राक्षसासारखी वापरू नये.
राक्षसी शक्ती ही अमानवी असते. अविश्वास वाटावा अशी प्रचंड शक्ती म्हणजे राक्षसी शक्ती. मानवाला या प्रचंड शक्तीचा उपयोग आपली कामे गतीने पूर्ण करता येतात. परंतु आपल्याला प्राप्त झालेली अमानवी शक्ती त्याने अमानुष पद्धतीने वापरू नये. त्यामुळे माणसाचे अकल्याण होते. Marathi Suvichar ani Arth
● संयम नसणारा बुद्धिमान मनुष्य आंधळ्या मशालजीप्रमाणे आहे.
माणसाजवळ बुद्धीबरोबरच संयम असला पाहिजे, कोणतेही काम कसे करावे हे कळले पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी योग्यवेळ कोणती हे जाणून तोपर्यंत वाट पाहण्याचा संयम असला पाहिजे. अन्यथा मशालजी दुसऱ्याला चालण्यासाठी मार्ग दाखवतो, परंतु त्याला स्वतःला मार्ग दिसत नाही, त्याप्रमाणे अवस्था होते. दुसऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माणसाला स्वतःलाच मार्ग सापडत नाही.
● पैसा हा सर्वांत मोठा उपद्रव आहे, कारण मनुष्य धनवान होताच तो लगेच बदलून जातो.
पैसा नसताना दुर्बल असणारा माणूस पैसा येताच बदलतो. त्याच्यामध्ये अहंमन्यता येते. तो स्वतः शिवाय इतरांना अत्यंत क्षुद्र समजतो. माणुसकी विसरतो. त्याच्या संवेदना बोथट होतात. सज्जन, सद्गुणी माणसामध्येसुद्धा नसलेले दुर्गुण येतात.
join Marathi blogging course https://courseinmarathi.com/
● इतिहास आम्हाला घडवितो हे काही अंशी खरे असले, तरी आम्ही इतिहास बनवितो हेही तितकेच खरे आहे.
भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना माणसाला काय करावे व काय करू नये हे कळते. माणसावर योग्य संस्कार इतिहास करतो. इतिहास म्हणजे फक्त भूतकाळ नव्हे तर त्या काळात घडून गेलेल्या घटना व घटनांशी संबंधित व्यक्ती. त्यांच्यामुळे इतिहास घडतो.
● माणुसकीला लाथाडून जिवंत राहण्यापेक्षा माणुसकीचे रक्षण करता करता मृत्यू कवटाळणे चांगले.
माणूस स्वतःमधील दुर्गुणांच्या आहारी जाऊन फक्त स्वार्थी जीवन जगत राहतो. त्यामुळे इतरांना किती त्रास होतो, नुकसान पोहोचते याविषयी देखील तो विचार करत नाही. त्याच्या मृत्यूबरोबरच त्याची ओळख पुसली जाते. परंतु जो इतरांच्या कल्याणासाठी स्वतः त्रास सोसतो तो मृत्यूनंतरही स्मृती ठेवून जातो.Marathi Suvichar ani Arth
● कुणाचेही दुःख असो, ते कळण्याचा या जगात एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करणे.
माणूस आपल्याच दुःखात बुडून जातो. त्यामुळे इतरांचे मोठे दुःख त्याला क्षुद्र वाटते. इतर पशुपक्षी असतील किंवा माणूस त्यांचे दुःख, त्यांचे संकट आपण त्यांच्या भूमिकेत जगल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी दुसऱ्याच्या ठिकाणी आपण असल्याची कल्पना केली तर त्याच्या भूमिकेतून त्याच्यावरील प्रसंग अनुभवू शकतो व त्याचे दुःख समजते.
3.#Marathi Suvichar ani tyache purn vishleshan || मराठी सुविचार आणि त्याचे पूर्ण विश्लेषण
● दूध गाईचे, फूल जाईचे, प्रेम आईचे त्यांना पर्याय नाही.
म्हैस दूध देते, शेळी दूध देते परंतु गाईचे दूध व त्यापासून होणारे दही, ताक, लोणी, तूप यांच्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे त्याला पर्याय नाही. जाईचे फूल इतर फुलांपेक्षा नाजूक, सुंदर व सुवासिक असते त्यामुळेत्याला इतर फुलांचा पर्याय नाही. वडील, भावंड, इतर नातलग, मित्र यांच्या प्रेमापेक्षा आईचे प्रेम हे अधिक निःस्वार्थी असते. त्यामुळे त्याला पर्याय नाही.
● आकाशातील तारे मोजता येत नाहीत; आईची माया तोलता येत नाही.
आकाशातील तारे अगणित असतात. त्यामुळे ते मोजून त्यांची संख्या निश्चित सांगता येत नाही. त्याप्रमाणे आईची माया अमाप असते. ते मोजण्यासाठी कोणतेही परिमाण अस्तित्वात नाही. त्याची कुणाबरोबरही तुलना करता येत नाही. मायेचे प्रमाण सांगता येत नाही. Marathi Suvichar ani Arth
● माणसे जन्मतात नि मरतात. प्रेम जन्मतं, पण मरत नाही.
जन्माला येणारी प्रत्येक वस्तू व व्यक्ती यांना मरण निश्चित असते. त्यामुळे जन्माला येणारा माणूस कमी-अधिक आयुष्य जगून मरतो. परंतु प्रेम ही भावना आहे, ती वस्तू किंवा व्यक्ती नाही, त्यामुळे प्रेम संपत नाही. प्रेम मरत नाही. माणसाचा मृत्यू झाला तरी प्रेम अमर आहे. ते टिकून राहते.
● वसन शरीराचे रक्षण करते, तर व्यसन घराची राखरांगोळी करते.
‘वसन’ व ‘व्यसन’ या शब्दांमध्ये एका अक्षराचा फरक आहे. परंतु त्याचे परिणाम मात्र वेगळे आहेत. वसन म्हणजे वस्त्र. वस्त्रांमुळे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये होणाऱ्या त्रासांपासून शरीराचा बचाव होतो. परंतु त्यामध्ये ‘व’ येऊन ‘व्यसन’ होते. तेव्हा ते व्यक्ती, कुटुंब सगळ्यांचेच नुकसान करते. कुटुंब उद्ध्वस्त करते. Marathi Suvichar ani Arth
● अज्ञानी असा, पण वाईट असू नका.
अज्ञानी माणूस ज्ञान प्राप्त करतो व अज्ञान घालवितो. परंतु वाईट विचार, आचार असणे खूपच घातक आहे. ‘वाईट असणे’ ही प्रवृत्ती आहे, ती बदलणे खूपच कठीण आहे. एखाद्याच्या वाईट प्रवृत्तीचे परिणाम खूप गंभीर आहेत. वाईट प्रवृत्तीमुळे व्यक्ती, कुटुंब यांच्याबरोबर सर्व समाजाचे नुकसान करते.
● स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.
पैसा हे वस्तू व ऐषोराम विकत घेण्यासाठीचे साधन आहे. परंतु त्याने भावना विकत घेता येत नाही. दुःखी माणसाला पैशाची अपेक्षा नसते.
त्याला आपले दुःख समजावून घेणारा भागीदार हवा असतो. दुसऱ्याचे दुःख इतरांना घेता आले नाही तरी प्रेमाच्या वागणुकीने त्याच्या दुःखावर फुंकर घालता येते. दुःख कमी करता येते. Marathi Suvichar ani Arth
● तरुणांनी प्राचीन काळची सुखद स्मृती जागृत ठेवावीच, पण त्याचबरोबर भविष्यकालीन जग निर्माण करण्याकडेही दृष्टी ठेवावी.
तरुण पिढी ही जगाचा आधारस्तंभ असते. प्राचीन काळातील चांगल्या गोष्टी समजावून घेऊन त्या टिकवून ठेवण्याची जबाबदारी तरुण पिढीवर असते.
त्याचबरोबर नवीन गोष्टी स्वीकारून पुढील पिढीसाठी उज्ज्वल भविष्यकाळाचा पायादेखील त्यांनीच घालावयाचा असतो. तरुण पिढीही भूतकाळ व भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. Marathi Suvichar ani Arth
4. #Marathi Suvichar explanation || मराठी सुविचार स्पष्टीकरण

• माता-पिता-गुरू-देश या चार स्तंभावर माणसाचे जीवनमंदिर उभारलेले असते.
एखादी इमारत उभी करत असताना त्यासाठी असणारे खांब मजबूत असावे लागतात. त्याचवेळी इमारत मजबूत व टिकावू बनते. त्याप्रमाणे माणसाची जीवनरूपी इमारतीचे चार खांब असतात आई, वडील, गुरू यांनी केलेले संस्कार, त्यांच्यावरील निष्ठा. तसेच देशाची संस्कृती व देशाप्रत असणारी निष्ठा माणसाचे जीवन घडविते.
● नसलेल्या बोटात, असलेल्या बोटांपेक्षा अधिक कला असते.
सुदृढ शरीर संपदा लाभलेला माणूस प्रयत्न, इच्छाशक्ती नसल्यामुळे कर्तृत्वशून्य जीवन जगत राहतो. परंतु अपंगत्वामुळे शारीरिक कमतरता असूनही जगण्याची इच्छा, प्रयत्नांची पराकाष्ठा यामुळे माणूस आपल्यातील विशेषत्व सिद्ध करतो. डॉ. बाबा आमटे यांनी उभारलेले कुष्ठरोग्यांचे ‘आनंदवन’ हे त्यासाठी उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.
● जगातील दुःखे पचविण्यासाठी हास्य आणि विनोद हा एकच राजमार्ग आहे.
माणूस सुखाचे जीवन आनंदाने कंठतो परंतु दुःखाचा एक क्षण म्हणजे त्याला दुःखाचा डोंगर वाटतो. दुःख सोसणे त्याला कठीण जाते. ते सोपे होण्यासाठी दुःखाच्या काळातदेखील हसण्यासारखे प्रसंग (विनोद) थोडा काळ दुःख विसरायला लावतात. Marathi Suvichar ani Arth
● प्रत्येक मूर्खाला त्याची प्रशंसा करण्यासाठी कुठला तरी मूर्ख भेटतोच.
मूर्खाचे वर्तन हे चुकीचेच असते, त्यामुळे त्याची स्तुती करणारा कोणी भेटणे अशक्यच असते. कोणीही शहाणा, विचारी माणूस मूर्ख माणसाची प्रशंसा करणारच नाही. कारण त्याच्या बुद्धीला ते पटत नाही. त्यामुळे समान विचाराचा, समान पातळी असणारा म्हणजे मूर्खच माणूस मूर्खाची स्तुती करू शकतो. Marathi Suvichar ani Arth
5. #Marathi Suvicharache purn arth || मराठी सुविचार व त्याचे पूर्ण
● जगात फक्त दोघांनाच मते बदलता येत नाहीत; एक मुर्वांना आणि दुसरे मृतात्म्यांना.
माणूस ज्ञानाने, अनुभवाने आपले मत बनवतो व बदलतोसुद्धा. परंतु या जगात असे दोघेजण आहेत की जे आपले मत कधीही बदलत नाहीत. त्यापैकी एक मूर्ख माणूस. त्याला दुसऱ्या कोणाचे पटवूनच घ्यायचे नसते. त्यामुळे तो आपल्या मताशी ठाम राहतो. दुसरा म्हणजे मृत माणूस. त्याच्या सर्वच क्रिया थांबलेल्या असल्याने त्याने मत बदलण्याचा प्रश्नच येत नाही.Marathi Suvichar ani Arth
● कायद्याचा अंमल शरीरावर चालतो. तो मनावर चालू शकत नाही.
माणसाच्या शरीराकडून होणारे वर्तन नियंत्रित करण्यासाठी कायदा अंमल करतो. कृती बदलली तरी कायद्याने वृत्ती बदलत नाही. नीतिमत्ता बदलत नाही. वृत्ती, नीतिमत्ता यांचा संबंध मनाशी असतो. त्यामुळे शरीराकडून केली जाणारी कृती मनाला मान्य नसूनदेखील कायद्याच्या भीतीने केली जाते.
● अडचणी आणि संकटे कधी एकटी-दुकटी येत नाहीत, त्यातून मार्ग काढणारा धैर्यवान असतो.
बऱ्याच वेळी आपल्या आयुष्यात एका अडचणीतून दुसरी अडचण, एका संकटातून दुसरे संकट निर्माण होते. पाठोपाठ येणाऱ्या अडचणी व संकटांमुळे माणूस त्रासून जातो, दुःखी व निराश होतो. परंतु या सगळ्यावर हिमतीने मात करणारा आशावादी माणूस खरंच धैर्य असणारा असतो. Marathi Suvichar ani Arth
● जीवनाचे काटे केवळ सुखाच्या मार्गाने फिरत नाहीत. दुःख भोगली तरच आयुष्याचा अर्थ स्पष्ट समजतो.
घड्याळामध्ये फिरणारे काटे वेगवेगळे वेळ दाखवतात.त्याप्रमाणे जिवणाच्या घड्याळातील काटे सुखदुःखच्या क्षणांवर पुढे जातात. ज्याच्या आयुष्यात दुःखाचे क्षणच येत नाहीत,त्याला सुख म्हणजे काय कळत नाही. त्याला सुखाचा आनंद मिळत नाही. दुःखाचे कटूप्रसंग अनुभवण्याशिवाय जीवन अनुभव अपूर्ण राहतो.