Motivational Reality Marathi Quotes On Life: best 2024

नमस्कार मित्रांनो motivational reality marathi quotes on life मध्ये आपले स्वागत आहे. सुविचार हे एक सकारात्मक ऊर्जा देणारी शक्ति आहे. या सुविचार संग्रहात तुम्हाला सुविचारांचे अर्थ सुद्धा मिळतील. 

Motivational Reality Marathi Quotes On Life

#Motivational quotes in || marathi for Success 

व्यक्तीपेक्षा कृती व गुणधर्माचे कौतुक करा.

व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा त्याचे काम, त्याच्या अंगी असणारे चांगले गुण याच्यामुळेच त्याच्याकडे इतर लोक आकर्षित होतात. आपल्या कृतीचे व गुणांचे लोकांकडून होणारे कौतुक हे त्याच्यासाठी ‘टॉनिक’ असते. त्यामुळे त्याचा अहं सुखावतो. त्याच्या स्वाभिमानाला लोकांकडून होणारे कौतुक आवडते व तो अधिक चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. Motivational Reality Marathi Quotes On Life

* कौतुकामुळे माणसाला ऊर्जा प्राप्त होते.

लहान मुलापासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाला आपल्याला इतरांनी लक्षात घ्यावे असे वाटत असते. त्या कामाचे कौतुक झाल्यास त्याला कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. त्याला आनंद होतो. समाधान मिळते. सुखावलेले मन अधिक काम करण्यासाठी त्या व्यक्तीला प्रेरणा देते. Motivational Reality Marathi Quotes On Life

50 छोटे सुविचार

* सहकार्याची विनंती करावी, हक्क गाजवू नये.

आपल्यावर इतरांनी अधिकार गाजविणे माणसाला आवडत नाही. काही वेळेला अशा अधिकार सांगितलेल्या गोष्टी माणूस नाईलाजाने ऐकतो. तो ते मनापासून स्वीकारत नाही. त्यासाठी तो पळवाटादेखील शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षा विनंती केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपणदेखील महत्त्वाचे आहोत असे वाटते. त्यामुळे मदत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटते व तो ती मनापासून करतो. Motivational Reality Marathi Quotes On Life

* तुमच्यातील क्षमता तुम्हाला सर्वोच्च पदावर नेते, पण तेथे टिकून राहणे चारित्र्यावर अवलंबून असते.

आपण जो उद्योग व्यवसाय करतो त्यामधील सर्वोच्च पदी पोहोचण्यासाठी आपल्या अंगात ती क्षमता असावी लागते. तरच आपण येणाऱ्या समस्यांना तोंड देऊ शकतो, स्पर्धेमध्ये टिकू शकतो. परंतु त्या पदावर पोहोचल्यावर त्याचा चांगला किंवा वाईट पद्धतीने वापर करून घेण्यावर त्या पदावर टिकणे अवलंबून असते.Motivational Reality Marathi Quotes On Life

* पुस्तके आपले मन निर्मळ करणारा साबण आहे.

पुस्तके आपले मार्गदर्शक आहेत. ते आपल्याला चांगले-वाईट, चूक- बरोबर, योग्य-अयोग्य ठरविण्यासाठी विचार करण्यास प्रवृत्त करतात. चारित्र्य घडविण्यासाठी, सुसंस्कार करण्यासाठी सद्विचार करून मनातील दुर्गुण नाहीसे करण्याचे महत्त्वाचे काम पुस्तके करतात. जसा साबण शरीर निर्मळ करतो, तसे पुस्तक मन निर्मळ करते.Motivational Reality Marathi Quotes On Life

आपण केवळ आपल्याच नव्हे तर इतरांच्या भल्याचीही चिंता करावयास हवी.

स्वतःच्याच भल्याचा विचार करणे म्हणजे स्वार्थीपणा आहे. माणसाने स्वार्थाबरोबरच परमार्थदेखील पाहावा. दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार केल्यामुळे स्वतःचे अकल्याण निश्चितच होत नाही. याउलट इतरांच्या हिताची चिंता करताना आत्मविकास होतो. मानसिक विकासदेखील होतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

Motivational Reality Marathi Quotes On Life: best 2024

#Inspirational marathi suvichar || प्रेरणादायी मराठी सुविचार 

*संधी आली की तिचे स्वागत करायची तयारी असणे हेच जीवनातील यशाचे गुपित आहे.

आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्राप्त होणाऱ्या संधीचा मोठा वाटा असतो. येणारी संधी व तिचे महत्त्व लक्षात घेऊन तिचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. जो अशी आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ उठवितो तो कधीच अयशस्वी होत नाही. त्याच्या यशाचे हेच रहस्य असते. Motivational Reality Marathi Quotes On Life

जगातील कोणतीही गोष्ट असो, आपल्याला मिळणार नाही हे आधी मनातून काढून टाका.

कोणतीही गोष्ट मिळविणे अशक्य नाही अशी ज्याच्या मनाची धारणा असते, तो ती गोष्ट मिळविण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगतो. या इच्छाशक्तीच्या बळावरच त्याला काम करण्याची प्रेरणा मिळते. तो अधिकाधिक कष्ट करण्यास तयार होतो व ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो. पण मनातच नकार असेल तर याउलट परिणाम होतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

* अनिश्चिततेच्या मागे लागणे म्हणजे विनाशाचे कारण होय.

मनुष्य स्वभाव फार विचित्र आहे. जे निश्चित मिळणार आहे त्याच्या प्राप्तीसाठी तो प्रयत्नच करत नाही, म्हणून ते मिळत नाही. जे मिळणे अनिश्चित असते त्याच्यासाठी मात्र तो खूपच झटतो, पण ते मिळत नाही. अशा रीतीने न मिळणाऱ्याच्या प्रयत्नात मिळणारेदेखील प्रयत्नांच्या अभावामुळे गमावून बसतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

* दान, भोग व नाश असे संपत्तीचे तीन परिणाम असतात.

संपत्ती हवी असण्याचे कारण काय? मिळविलेली संपत्ती स्वतःच्या गरजांसाठी वापरून तिचा उपभोग घेतला पाहिजे. तसेच ती इतरांच्या गरजांसाठी दान केली पाहिजे. अन्यथा स्वतः किंवा इतरांसाठी न वापरलेली लक्ष्मी म्हणजे असून नसल्यातच जमा असते. कंजूषपणाने पैसे साठवून कोणासाठीच न वापरल्याने ती नष्ट झाल्यासारखीच असते.Motivational Reality Marathi Quotes On Life

* माणसाने स्थानभ्रष्ट होऊ नये.

जो तो आपापल्या ठिकाणी शोभून दिसतो. गाढवाने सिंहाचे कातडे पांघरून तो सिंह होत नाही. गाढवाला मारच खावा लागतो. डोक्यावर केस, तोंडात दात माणसाचे सौंदर्य्य वाढवितात. परंतु गळलेले केस, पडलेले दात माणसाचे सौंदर्य कमी करतात, तसेच त्यांचे सौंदर्य व महत्त्वदेखील कमी होते. Motivational Reality Marathi Quotes On Life

#Motivational Thought in Marathi || मराठी सुविचार

* माणसाचे मन चंचल असते तसेच धनही चंचल असते.

निमिषार्धात माणसाच्या मनातील विचार बदलतात. क्षणात जमिनीवर असणारे मन, क्षणार्धात पक्ष्यांपेक्षा वेगाने आकाशात जाते. ते विनासायास वेळ व स्थळ यांचे बंधन तोडून कोठेही धावते. त्याच्यावर नियंत्रण करणे कठीण असते. त्याप्रमाणे लक्ष्मीचेदेखील आहे. आता प्रसन्न असणारी लक्ष्मी, कधी रुसून पाठ फिरवेल व लक्षाधीश भिक्षाधीश होईल सांगता येत नाही. Motivational Reality Marathi Quotes On Life

* कष्टांना फळ आल्यानेच उत्साह येतो.

माणूस आपल्याला हवे आहे ते मिळविण्यासाठी सतत श्रम करत राहतो.काही वेळेला त्याला अपयश येते. तो नाराज होतो. नव्या जोमाने काम करणे त्याला कठीण जाते. परंतु त्याच्या कष्टांचे फळ म्हणून त्याला यश मिळाले तर त्याच्या मनात उत्साह निर्माण होतो व तो अधिक मनापासून कष्ट करायला तयार होतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

* काळावर जय मिळविणे अत्यंत कठीण आहे.

काळ कोणाच्याही हातात नाही. त्याच्यावर कोणाची मालकी नाही. त्याच्यावर कोणीही नियंत्रण करू शकत नाही. त्याला थांबविता येत नाही. त्याची गती वाढविता येत नाही, कमी करता येत नाही. गेलेला काळ कितीही प्रयत्न करून कोणालाही परत आणता येत नाही. काळ हा असा कोणाचेही प्रभुत्व न मानणारा आहे.

धन मिळविताना जसे कष्ट त्याप्रमाणे सांभाळतानाही तितकेच कष्ट होतात.

धन मिळविण्यासाठी माणसाला खूप श्रम करावे लागतात. सहजपणे धन कोणालाही मिळत नाही. परंतु त्याहीपेक्षा मिळविलेले धन सांभाळणे अधिक कठीण असते. ते आपल्याकडून कोणी लुबाडू नये ते विनाकारण खर्च होऊ नये, त्याच्यावर अन्य कोणाची दृष्टी पडू नये, त्याच्यावर कर लागू होऊ नये, त्याची वाटणी कोणाला द्यायला लागू नये यासाठी त्याची जपणूक करावी लागते. Motivational Reality Marathi Quotes On Life

* जे घडणारच नाही त्याबद्दल बोलणे म्हणजे मूर्खपणाच आहे.

माणूस बऱ्याच वेळेला न घडणाऱ्या गोष्टींबद्दल तर्काने बोलत राहतो, चर्चा व वादविवाद करतो. यामुळे साध्य काहीच होत नाही. त्या चर्चेमध्ये माणसाचा वेळ व शक्ती वाया जाते. हे माहिती असूनही त्याबद्दल चर्चा करणारा माणूस शहाणा असूच शकत नाही. माणसाने कल्पनाविलासात न रमता सत्याचा स्वीकार करून त्याच्याबद्दल विचार करण्यामध्येच शहाणपणा असतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

Course In Marathi BLOGGING https://courseinmarathi.com/

* शांतपणे वागून क्रोधाला जिंकता येते.

राग हा अग्नीसारखा आहे. अग्नीला जोपर्यंत जाळण्यासारखी वस्तू दिसते.तोपर्यंत तो वाढत जातो परंतु पाणी टाकल्यास तो विझतो. त्याप्रमाणे क्रोधाने क्रोध वाढत जातो. व्यक्ती खूप रागावली असता दुसरी व्यक्ती न रागावता शांत राहिली तर थोडा वेळाने रागावलेली व्यक्तीदेखील रागावून काहीच उपयोग नाही या विचाराने शांत होते.Motivational Reality Marathi Quotes On Life

#Positive Thought in Marathi || सकारात्मक सुविचार मराठी 

* देव व देव दुर्बळांचा घात करते.

मनाने किंवा शरीराने जो दुबळा आहे तो दुसऱ्या कोणाचे काहीही बिघडवू शकत नाही, तो कोणालाही त्रास देऊ शकत नाही. याची खात्री असते. त्याचबरोबर त्याला कोणी त्रास दिला तरीही तो विरोध करणार नाही हे माहिती असल्यामुळे त्यालाच लक्ष्य केले जाते.Motivational Reality Marathi Quotes On Life

* ज्याचा अवगुण झडेना तो पाषाणाहून उणा.

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुणदोष असतात. आपल्यातील दोष काढून टाकणे फक्त माणसालाच शक्य आहे. कारण त्याला बुद्धी आहे, तो विचार करणारा प्राणी आहे. आपल्यातील अवगुण जाणूनसुद्धा जो त्या अवगुणांना काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाही तो माणूस म्हणजे निर्जीव दगडाप्रमाणे असतो. तो विचार करत नाही व स्वतःहून स्वतःमध्ये बदल करत नाही.Motivational Reality Marathi Quotes On Life

* चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे.

यश, कीर्ती, मान, सन्मान, मोठेपणा सहजपणे कोणालाच मिळत नाही. त्यासाठी पहिल्यांदा स्वतः त्रास सोसावा लागतो. लोकांसाठी झटावे लागते. लोकनिंदा, समाजाचा विरोध, टीका, अवहेलना, अपमान सोसूनही लोककल्याणासाठी प्रयत्न केल्यास समाज त्या विचारांना व त्या व्यक्तीला स्वीकारतो. त्याला सन्मान, आदर देतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

* सुंदर सकाळ पाहण्यासाठी आधी काळोखाची रात्र जावी लागते.

सकाळ प्रकाशमय असते तर रात्र काळोखमय असते. काळोखापेक्षा प्रकाश सर्वांना आवडतो हे जरी खरे असले तरी रात्रीचा काळोख सरतो तेव्हाच प्रकाश दिसतो. हे अव्याहतपणे चालणारे चक्र आहे. याप्रमाणेच मानवी जीवनात सुखदुःखांचे चक्र चालू असते. सुखाचे दिवस अनुभवण्यासाठी दुःखाचे, त्रासाचे दिवससुद्धा अनुभवावे लागतात.Motivational Reality Marathi Quotes On Life

प्रकाश पेरा आपल्या अवतीभवती, दिवा दिव्याने पेटतसे

ही काव्यपंक्ती आहे कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांची. आपणच आपल्या अवतीभवती आशा जागृत ठेवली पाहिजे. एक आशादायी व्यक्ती त्याच्या सहवासातील सर्वांना आशादायी करते. ज्याप्रमाणे एक दिवा इतर सर्व दिव्यांना प्रज्वलित करतो त्याप्रमाणे आशासंपन्न माणूस त्याला व त्याच्या सहवासातील सर्वांच्या आयुष्यात आशेचे किरण पसरवितो.

Motivational Reality Marathi Quotes On Life: best 2024
#Good Thought in Marathi || चांगले सुविचार मराठी 

जे हृदयात सतत राहते, खटकत राहते त्याचे नाव पाप.

जो माणूस चुकीचे वागतो, दुसऱ्याला त्रास होईल असे वागतो तो जगाला फसवू शकतो, परंतु स्वतःला फसवू शकत नाही. त्याचे त्याला माहीत असते की तो चुकीचे वागत आहे. त्याचे मन त्याला त्या चुकीच्या वागण्याची आठवण करून देत राहते. त्याच्या ते मनात राहते. त्यामुळे तो अस्वस्थ, अशांत राहतो.Motivational Reality Marathi Quotes On Life

संभाषण करताना ज्याचा मागून पश्चात्ताप करावा लागेल, असा एकही शब्द उच्चारता कामा नये.

माणसाने बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा, कारण शब्द हे धारदार शस्त्र आहे. आपल्या बोलण्याचा होणारा परिणाम बोलल्यानंतर बदलता येत नाही. त्यामुळे हे परिणाम लक्षात घेऊन बोलण्यापूर्वीच कोणते शब्द वापरावे हे ठरवावे म्हणजे नंतर त्रास होत नाही. पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.

शिक्षण हे साध्य नसून साधन आहे.

आपल्याला जे मिळवायचे आहे ते म्हणजे साध्य व ज्याच्या मदतीने ते मिळवू शकतो ते म्हणजे साधन. शिक्षणाच्या मदतीने आपण आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करू शकतो. शिक्षणातून नवचैतन्य निर्माण होते. नवीन समाज घडविता येतो. नवीन संस्कृती उद्याला येऊ शकते.Motivational Reality Marathi Quotes On Life

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
10 छोटे सुविचार मराठी || Best Suvichar