या सुविचार संग्रहात तुम्हाला असे सुविचार मिळतील की तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होईल आणि हे सुविचार वाचल्यानंतर तुमच्या जीवनात चांगले यश मिळेल.
Marathi Suvichar : मराठी सुविचार
- अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो. राग सोडलेल्यांना दुःख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो आणि लोभ सोडलेला खरा सुखी होतो. Success marathi suvichar
- चिडणे हा विरोधावर मात करण्याचा मार्ग नव्हे तर नैराश्याने तुमच्यावर मात केल्याचे लक्षण आहे.
- दिलदार मनुष्य त्याच्या अंतिम क्षणापर्यंत आनंदी जीवन जगू शकतो, तर कंजूष मनुष्य शेवटपर्यंत दुःखीच राहतो.
- सत्यापासून नेहमी लपून राहणे म्हणजे असत्याच्या सोबतीने आनंद उपभोगणे होय.
- पाण्याचा थेंब महत्त्वाचा नसतो; परंतु त्याच अनेक थेंबांची धार तयार झाली की, तिच्यामध्ये पाषाणालाही छेदण्याचे सामर्थ्य असते.
- संस्कार संपन्न मुले ही देवाच्या चांगुलपणाची स्मिते आहेत.
- वेळेच्या सदुपयोगासाठी नियमितपणा आवश्यक असतो. वेळेचे मोल अनमोल आहे. ज्यांनी वेळ वाया घालवला त्यांनी सर्वकाही गमावलं.
- मृगजळामागे धावणाऱ्याच्या हाती काहीही लागत नाही.
- प्रत्येकाच्या विकासाला संपूर्ण संधी देणे हाच खरा सुसंस्कृतपणा होय.
- नम्रता हाच माणसातील सर्वोत्तम गुण. Success marathi suvichar
- कोणतेही काम करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करून मगच सुरुवात करा.
- ज्यांना शिकायची आस आहे, त्यांना अनुभव बरेच काही शिकवतो.
- तडजोड कशी करावी हे जाणणाराच कसे जगावे हे जाणत असतो.
- क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम उपाय नाही.
- भित्रेपणामुळे दुर्बलता येते. दूर्बल माणसाला जग जास्त भीती दाखवते. याउलट जो सामर्थ्यवान असतो त्याला सगळे भितात.
- कोणतीही स्थिती कायमची नसते. साहजिकच संकटे ही तात्पुरती असतात. संकटरूपी अंधारात काहीही दिसत नसते. तरी डगमगून जाऊ नये. कारण अंधार संपून उजेड पडणार असतो.
- सवय आपल्या ताब्यात असावी. आपण तिच्या ताब्यात नसावे.
- प्रयत्न करणाऱ्याला यश देण्यापलीकडे ईश्वर कोणालाही कांहीही देत नाही.
- आडमुठेपणामुळे प्रश्न सुटण्याऐवजी तो चिघळतो. Success marathi suvichar
सुंदर मराठी सुविचार
- विद्येच्या संस्कारामुळे माणसाला कसं जगावं याचा बोध होतो, आपल्या जगण्याच्या चांगुलपणाशी मेळ घातला जातो की नाही हे समजण्याची पात्रता विद्येमुळेच प्राप्त होते.
- इतरांना जितका अधिक लाभ द्याल, तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल,
- अनेक प्रश्न असे असतात की, त्यांची उत्तरे बुद्धीच्या कक्षेपलीकडची असतात. अशा वेळी माणसाला काही उत्तरे गृहीत धरावी लागतात. त्या गृहीत धरण्यालाच आपण श्रद्धा म्हणतो.
- आपल्या अंगी असलेल्या गुणांचे चीज कधी ना कधी होतेच.
- जसा स्नानाने शरीराचा मळ धुतला जातो तसा ज्ञानाने अंतःकरणाचा मळ धुतला जातो,
- गर्व, अहंकार हा अत्यंत प्रभावी दुर्गुण आहे. अत्यंत गुणी, कार्यक्षम, सामर्थ्यवान माणसांना गर्वाची बाधा झाली की सगळे नीति पायदळी तुडवले जातात.
- मीपणाच्या द्वंदामुळे जीवन तणावपूर्ण बनते. जो हे द्वंद पार करतो तोच सत्य मिळवतो.
- अपमान म्हणजे मनाची राजवस्त्रे कुरतडणारा उंदीर, उपेक्षा म्हणजे गुणी माणसाला खळबळून टाकणारा झंझावात, अवहेलना म्हणजे अंगावर पडणारा तप्त लोहरस आणि तिरस्काराचे शब्द म्हणजे कानाच्या वारूळात घुसणारे विषारी भूजंग.
- कळी जितक्या सहजतेने फुलते, तितक्याच सहजतेने प्रेम हृदयात फुलते.
- केवळ ढीगभर पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे. ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या.
- जेथे आत्मश्रद्धा आहे, तिथे धर्म आहे. Success marathi suvichar
- निर्बल लोक आपला भित्रेपणा लपविण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आधार शोधतात.
- दृढनिश्चय आणि कर्तव्यकठोरता हीच खरी देशाची संपत्ती.
- जो माणूस आशेचा गुलाम झाला तो सगळ्या जगाचा गुलाम होतो.
- प्रसंगावधान व धैर्य याच्या बळावर संकटांवर मात करता येते.
- अपचन होईल म्हणून कुणी जेवण टाकीत नाही. जंगली प्राणी पिकाची वाट लावतील म्हणून धान्य पेरायचे कुणी थांबवत नाही.
- कृती ही झानाची स्फूर्ती व मूर्ती असते. Success marathi suvichar
- धैर्य म्हणजे जीवनाची कला आहे.
- तुम्ही निर्भय व्हा, भीती बाळगाल तर तरणोपाय नाही.
- जग हा एक बाजार आहे. या बाजारात लबाड माणसाची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात; परंतु प्रामाणिक माणसाची द्राक्षे करवंदाच्या भावानेदेखील विकली जात नाहीत.
- देवावर हवाला कशासाठी ? प्रयत्नवादावर श्रद्धा हवी.
- आपले दोष नेहमी ऐकावेत परंतु स्तुती मात्र ऐकू नये. Success marathi suvichar
- आपली चूक कबुल करण्यात माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना शतपट शरम वाटली पाहिजे.
- अपूर्ण इच्छा व पराजित शत्रू न विझलेल्या आगीच्या ठिणगीसारखेच असतात. संधी सापडताच ते राक्षस बनतात आणि बेसावध माणसाचा सत्यानाश करतात.
- अश्रृंनी मने कळतात अन् मिळतात. Success marathi suvichar
प्रेरणादायी सुविचार : Motivational suvichar
- आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती.
- काही गोष्टी अनुभवाने जाणावयाच्या असतात.
- शत्रूने केलेली स्तुती हीच सर्वोत्तम कीर्ती होय.
- मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती. Success marathi suvichar
- जगातल्या दुःखांनी आपल्यासाठी जन्मच घेतला नाही, असे समजून हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटू शकाल.
- जीवन म्हणजे आश्चर्यांची मालिकाच आहे. उद्याचा रागरंग आपणास आज कधीच समजत नाही.
- माणसाचा मोठेपणा त्याच्या शत्रूवरून आजमावता येोतो. अजातशत्रू असा एकही मनुष्य या जगात नाही.
- संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यांच्यावर मात करा.
- नशीब रूसलं तर किती रूसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
- कोणाच्याही शारीरिक व्यंगावर टीका, चेष्टा करू नये.
- पुरुष निर्बल झाले की, स्त्रियांचा अधःपात ठरलेलाच आहे. जर स्त्री दास्यात असेल तर पुरुष स्वतंत्र कसा ?
- एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा, हे समजायला हवे आणि शेवट केंव्हा करायला हवा, हे देखील समजायला हवे. या गोष्टी ज्याला समजल्या त्याचे व्यावहारिक झान पक्के.
- नदीतीरावरील लाटा कदाचित फिरुन उत्पन्न होतील; परंतु मनुष्याचे नष्ट झालेले रुप, सौंदर्य, बळ कधीच परत येत नाही.
- नदीतीरावरील वृक्ष, परगृही जाणारी पत्नी, सल्ल्यानं ऐकणारा राजा या गोष्टी अत्यंत शीघ्रतेने नाश पावतात.
- चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती शेवटी दुःखच देते.
- प्रयत्नांच्या अभावी केवळ प्रार्थना केली तर परिणाम शून्य.
- नशिबाने फार चांगले दिवस आले तर शेफारून जाऊ नका. नशिबाचे चक्र केंव्हाही फिरते, हे कधीही विसरू नका. Success marathi suvichar
- माणसाने माणसावर प्रेम करणे हाच खरा धर्म आहे.
- अहंकाराचा त्याग हीच सुखाची सुरुवात.
- आपले जीवन हे एक आपणास मिळालेले दान आहे. जीवनाचे दान करत राहिल्यामुळेच त्याचे मोल वाढते.
- केवळ प्रार्थना करण्यापेक्षा निरपेक्षपणे सेवा करणारा अधिक पुण्यवान असतो.
- काळाप्रमाणे बदलणे यालाच वास्तववाद म्हणतात.
- बोलणे चांगलेच, परंतु कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलत असते.
- कर्तव्यपूर्ती म्हणजेच मोक्ष.
- तुम्ही काही लोकांना सर्वकाळ फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकणार नाही.
- सर्वात थोडक्यात उत्तर म्हणजे ‘कृती करणे’.
- जितक्या अपेक्षा कमी, त्या प्रमाणात मनाला शांतता अधिक लाभते.
- कलेच्या व शास्त्राच्या क्षेत्रात जे प्रथम दर्जाचे व उच्च प्रतिभेचे असतात, त्या सर्वांनी आलेल्या अडचणींवर मात केलेली आढळेल. या प्रतिभावंतांनी आपल्या आलेल्या पहिल्याच अडचणीवर केवळ मातच केली असे नव्हे तर त्या अडचणीचे रूपांतर त्यांनी आपल्या कलेच्या व शास्त्राच्या क्षेत्रात प्रगती करावयाच्या साधनात
- केलेले आढळून येईल. Success marathi suvichar
Good morning suvichar : शुभ सकाळ सुविचार
- खरा सन्मान किंवा मानमरातब हा एखाद्या उच्च पदामुळे मिळत नाही किंवा ते पद गेल्यामुळे तो नाहीसाही होत नाही. Success marathi suvichar
- जीवनात तुमच्या ज्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण होणे कठोर परिश्रमावर अवलंबून असते.
- ज्या कारागिराला आपले काम परिपूर्ण करायचे असेल त्याने आपली हत्यारे धारदार ठेवलीच पाहिजेत.
- जो मनुष्य नागरी जीवनातील किंवा धार्मिक प्रश्नांवर खुली चर्चा करण्यास घाबरतो, तो मनुष्य स्वतःच्या मतांवरच सत्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असतो.
- आजारपण घोड्यावर बसून जलद गतीने येते, पण जाताना मात्र पायी चालत जाते. (आजारपण हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.) Success marathi suvichar
- अप्रामाणिकपणा अंगिकारल्यामुळे तात्पुरते फायदे होतात पण नित्य टिकणाऱ्या कल्याणाचा नाश होतो.
- काजव्याप्रमाणे कीर्ती किंवा मोठेपणा हा दुरून झगझगीतपणे चमकताना दिसतो पण जवळून पाहिले तर त्यात ऊब नसते किंवा प्रकाशपण नसतो.
- चांगले काम करावयाचे मनात आले की ते लगेच करून टाकावे. कांही करण्याची प्रेरणा होते तोच योग्य मुहूर्त.
- वेळ गमावणे म्हणजे आयुष्य गमावणे, संधी गमावणे. आयुष्यातील गेलेला क्षण कोणत्याही प्रकारे परत आणता येत नाही.
- जे झाड जमिनीतून रोज नवी द्रव्ये शोषून घेत नाही, त्याची वाढ खुंटते. त्याचप्रमाणे ज्ञान ग्रहण केले नाही तर माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही.
- मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे. Success marathi suvichar
School beutifull marathi suvichar : शालेय सुंदर मराठी सुविचार
- गुरुकृपा जर लाभली तर पुढचा मार्ग सोपा जातो. Success marathi suvichar
- चिंतेने मनुष्य निराश व हतबल होतो. चिंतामुक्त होण्यासाठी चिंतन करणे हा एकमेव उपाय आहे.
- आपला कोणी अपमान करू नये असं वाटत असेल तर आपणाकडून अजाणतेपणीही कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- माणसाच्या प्रत्येक चांगल्या आचरणाचा पाया हा मूळातच एखादा सद्विचार असतो.
- जर विचार करणेच बंद केले तर आचाराचा स्वैराचार होण्यास वेळ लागत नाही.
- वेळ ही अत्यंत गतिमान व नाशवंत गोष्ट आहे. पण त्याबरोबरच ती फलदायी आहे. तिचा सदुपयोग केला तर !
- पात्रता असल्यावर अधिकार आपोआप चालून येतात.
- दहा विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ आहे.
- भंडावून सोडणारे प्रश्नच प्रसंगी बुद्धीला चालना देत असतात.
- सूर्याइतका वक्तशीरपणा आणा म्हणजे ध्येय लांब नाही.
- सत्य कुणापुढे नमत नसते, सत्यापुढे सर्वांना नमावे लागते.
- स्वतःचे काम करणे ही आसक्ती, दुसऱ्याचे काम करणे ही संस्कृती, भगवंताचे काम करणे ही भक्ती आणि कर्मे करुन अलिप्त राहाणे ही विरक्ती.
- शारीरिक शक्तीला प्राधान्य देतो तो पशु आणि विचारशक्तीला प्राधान्य देतो तो मानव.
- बुद्धिवादी केवळ ज्ञानाची चर्चाच करतो, बुद्धिजीवी केवळ बुद्धीचा व्यापारच करतो पण बुद्धिनिष्ठ बुद्धीला जीवनात उतरवितो.
- परमेश्वर कोणावरही कृपा करीत नाही वा कोप करीत नाही, तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो.
- देवासकट सर्वकाही मिळवून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत.
- मनाच्या म्यानात चिंता व चिंतन या दोन तलवारी एकाच वेळी राहू शकत नाहीत.
- सुखाला कारण सुविचार तर दुःखाला कारण अविचार आहे.
- जीवन आनंदाने जगणे ही खरी कला आहे.
- घडलेल्या घटनांचा नीट फायदा करून घेणारा खरा शहाणा.
- अनिष्ट व भ्रष्ट मार्गांनी मिळविलेला शापित पैसा, तो मिळविणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच पण तो त्याच्यापुढील पिढ्यानांही वारसा हक्काने अत्यंत क्लेशदायक ठरतो.
- योग्य दिशेने केलेले प्रयत्नच यशस्वी होतात.
- वाईटाला सारेच वाईट दिसतात, जसे काविळ झालेल्याला सारेच पिवळे दिसते. Success marathi suvichar