Marathi Quotes || Inspiring Suvichar 2024

Marathi Quotes || Inspiring Suvichar 2024

  नमस्कार मित्रांनो Marathi Quotes || Inspiring Suvichar मध्ये आपले स्वागत आहे तसेच आपल्या वेबसाईटवर वर सर्व प्रकारचे सुविचार तुम्हाला मिळतील. 

Marathi Quotes || Inspiring Suvichar 2024

Marathi quotes on life || मराठी सुविचार जीवनावरील 

* आशा ही अशी आश्चर्यकारक साखळी आहे की, त्यामुळे माणूस जोरात धावतो.

माणूस कितीही दुःख, संकट आली तरी त्यातून खचून न जाता वाटचाल करत राहतो. याच्यामागे प्रेरणा असते आशेची. माणूस सुखद भविष्याची आशा करतो. ही आशाच त्याला जगण्याची प्रेरणा देते. इतर बंधने माणसाला जखडून टाकतात. परंतु आशेचे बंधन मात्र माणसाला कृतिशील बनविते. Marathi Quotes

* सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला श्रेष्ठ आहे.

चौदा विद्या, चौसष्ट कला आहेत. परंतु पासष्टावी कला म्हणजे जीवन जगण्याची कला. जीवन जगतात सगळेच. पशू, पक्षी, कीटक, क्षुद्र जीवजंतूसुद्धा जगत असतात. माणूस मात्र त्यापेक्षा वेगळ्या व चांगल्या पद्धतीने जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. जीवन उपभोगू शकतो. जीवनातील सुखदुःखे, संकटे, आव्हाने यांचा आनंदाने सामना करत जगणे हे कौशल्य आहे. परंतु ते कौशल्य खूपच कमी लोकांना अवगत असते. Marathi Quotes

निराशेचा अभाव हे संपन्नतेचे मूळ आहे.

निराशा माणसाला कृतिशून्य, दैवाधिन बनविते. माणूस आळशी व निरुद्योगी होतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये निराश न होणारा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहतो. कष्ट करीत राहतो. त्याच्या अखंड प्रयत्नांमुळे व कष्टामुळे अशक्य असणारेसुद्धा शक्य होते. त्यामुळे त्याच्या आयुष्यात सर्वच दृष्टीने संपन्नता येते.

आत्मविश्वास सुविचार मराठी

* संपत्ती हे अनर्थाचे मूळ आहे.

संपत्ती माणसाला आंधळा बनविते. संपत्तीच्या प्राप्तीमुळे माणसामध्ये अहंभाव येतो. हळूहळू त्याच्या जोडीला दुर्गुण येतात. दुर्गुणांमुळे प्रश्न वाढतात. संकटे येतात. माणूस माणुसकी विसरतो. आजूबाजूला शत्रूची संख्या वाढवितो. जीवनातील आनंद घालवितो. असे अनर्थ संपत्ती असल्यामुळे निर्माण होतात.Marathi Quotes

अविचार ही मोठी आपत्ती आहे.

अविवेक किंवा अविचाराने माणसाने कोणतीही गोष्ट करू नये. अविचार माणसाचे नुकसान करतो. भविष्यात उद्भविणाऱ्या समस्यांचा विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे तो चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो.

Good Morning marathi quotes || शुभ सकाळ मराठी सुविचार 

दैवावर अवलंबून राहणारा सत्वर नाश पावतो.

आळशी माणूस दैवावर अवलंबून राहतो. त्यामुळे अधिकच आळशी होतो. तो अधिक कृतिशून्य होतो. फक्त दैवावर विश्वास ठेवून, देवाचा धावा करून कोणतेही प्रयत्न न करता माणसाला आयुष्यात काहीच मिळत नाही. तसेच जे जवळ आहे त्याचासुद्धा नाश होतो. जीवनाचा मंत्र आहे ‘प्रयत्न, प्रयत्न आणि फक्त प्रयत्न.’

Marathi Quotes || Inspiring Suvichar 2024

* पाणी वाढून गेल्यावर बांध घालण्यात काय अर्थ आहे ?

माणसाने कोणताही निर्णय किंवा कृती योग्य वेळेला केली पाहिजे. माती ओली असताना त्याच्यातून हवा असणारा आकार घडविता येतो. माती सुकली की ते जमणे शक्यच नाही. समस्या निर्माण होईपर्यंत वाट न पाहता आधीच तिच्यावरील उपायांचा विचार करून त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे. Marathi Quotes

• फिरत राहणाऱ्याचे नशीब नेहमी फिरत असते, त्याचे भाग्य उजळते.

जीवनाची ओळख म्हणजे गतिशीलता. फिरत राहणारा म्हणजे गतिशील. फिरत राहणारा म्हणजे प्रयत्न करणारा; कष्ट करणारा. आळशीपणाने हातावरील रेघांमध्ये आपले भाग्य पाहणाऱ्याचे भाग्य कधीच उजाडत नाही. त्यापेक्षा काम करणारा, कष्ट करणारा आपल्या हातावरील रेघा बदलू शकतो.

* शरीराचे शोषण करणारी चिंतेसारखी दुसरी गोष्ट नाही.

चिंता हा एक रोगच आहे; जो खूप गतीने फोफावतो, मनावर ताबा मिळवितो. इतर रोगांप्रमाणे चिंतेसाठी औषधोपचार नाही. चिंतेमध्ये गढलेल्या माणसाला सर्व जगाचा विसर पडतो व स्वतःचे जगणेदेखील विसरतो. सर्वसुख हात जोडून त्याच्यासमोर असतील तरी चिंतेमुळे त्या सुखाचेदेखील दुःखात रूपांतर होते. Marathi Quotes

• उच्च ध्येय सिद्धीला गेले नाही तर काही दोष नाही, पण हीन ध्येय पुढे ठेवणे हे मात्र दोषास्पद आहे.

माणसाने आपल्यासमोर ध्येय निश्चित केले तर तो कार्यरत होतो. ध्येय गरुडासारखी उंच झेप घेण्याचे असावे. हे ध्येय कदाचित सहजपणे साध्य होत नाही, बऱ्याचवेळेला अपयशदेखील येते. परंतु काहीही प्रयत्न न करता सहजपणे प्राप्त होणारे हीन ध्येय बाळगल्यामुळे आयुष्यामध्ये प्रगती होत नाही.

#Reality marathi quotes on life || मराठी सुविचार जीवनावरील

* लागलेला चिखल धुण्यापेक्षा त्यापासून दूर राहणे बरे.

आपल्या चुकीच्या वागण्यामुळे, बोलण्यामुळे, कृतीमुळे आपल्याला लोक दोष देतात. हे करताना आपल्यालाही त्याची जाणीव असते परंतु योग्य वेळी स्वतःवर नियंत्रण न ठेवल्यामुळे लोकांच्या निंदेला माणूस पात्र होतो. पश्चात्तापाने ही निंदा टाळण्यासाठी तो स्वतःच्या वागण्यावर, बोलण्यावर, कृतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकदा लोकांकडून त्यासाठी निंदा झाल्यावर त्याचा काहीच अर्थ राहत नाही.

* जो भूमीवर स्थिर आहे त्याला पडण्याची भीती नाही.

माणसाला आयुष्यात प्राप्त होणारे यश, पैसा, मानसन्मान त्याला स्वतःबद्दल खूपच अभिमानी बनविते. त्यामुळे त्याच्यात गर्विष्ठपणा येतो. तो स्वतःला असामान्य समजतो व इतरांशी या गर्विष्ठपणाने वागतात. परंतु गर्वाचे घर खाली होते. त्याच्या वागण्यामुळे तो एकटा पडतो. यासाठी कितीही यश, कीर्ती, पैसा मिळाला तरी माणसाने गर्विष्ठपणाच्या आहारी न जाणे

• मनातले सर्व हेतू साध्य करण्याचे मौन हे साधना आहे.

बऱ्याच वेळेला गरज नसता जास्त बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होतात. एकमेकांच्यामध्ये भांडण होते. माणसांचे एकमेकांशी संबंध दुरावतात. हे सर्व टाळण्यासाठीचा एक उपाय म्हणजे जेव्हा काय बोलावे समजत नाहीकिंवा विरोधी मत नोंदवायचे असते अशा वेळी काहीच बोलू नये. बोलून प्रश्न निर्माण होतो, न बोलण्यामुळे अपेक्षित परिणाम साधतो.

• सुवर्ण शुद्ध आहे की अशुद्ध आहे, याची कसोटी भट्टीतच होते.

खाणीतून बाहेर काढलेले सोने किती शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे हे नुसते बघून समजत नाही. सर्वसामान्यांच्या नजरेला त्याच्या शुद्धपणाबद्दल काहीच कळत नाही. परंतु अग्नीत टाकल्यावर त्या सोन्यातील अशुद्ध भाग जाळला जातो. उरतो तो भाग म्हणजे शुद्ध सोने. त्याप्रमाणे माणसाचे कर्तृत्व, क्षमता, ज्ञान, सच्चेपणा हे प्रसंगानेच सिद्ध होते.

• मनुष्यप्राण्याला जशी मृत्यूची भीती वाटते त्याप्रमाणे संपत्तीवानांना आपल्या ऐश्वर्याची भीती वाटते.

जन्मलेला प्रत्येक जीव मरतो. हे सर्वांना जरी माहिती असले तरी मृत्यूची कल्पना माणसाला अस्वस्थ करते. त्याला त्याची भीती वाटते कारण मृत्यूमुळे हे जीवन संपणार आहे एवढेच त्याला माहिती असते तसेच भरपूर संपत्ती असणाऱ्यांना ती संपत्ती नष्ट होण्याची, कोणीतरी चोरण्याची, आपल्याकडून हिरावून घेतली जाण्याची भीती वाटते.

#Motivational reality marathi quotes on life || मराठी सुविचार 

• एकटा एक चंद्र अंधःकार दूर करतो. ते अनेक तारांच्या समुदायाने होऊ शकत नाही.

संख्येपेक्षा क्षमता महत्त्वाची असते. तारका परप्रकाशी असल्याने त्या लक्षावधी असल्या तरी त्यांच्यामुळे अंधार नाहीसा होत नाही. परंतु आकाशामध्ये एकच चंद्र सर्व विश्वाला प्रकाश देऊ शकतो. त्याप्रमाणे एक कर्तृत्ववान माणूस हा हजारो निष्क्रिय माणसांपेक्षा प्रभावशाली असतो. हजारो माणसे त्या एका कर्तृत्ववान माणसाच्या मार्गदर्शनाने वाटचाल करीत राहतात. Marathi Quotes

* अलौकिक कार्य केले की लौकिक वाढतो.

आखून दिलेल्या चाकोरीतून सर्वच जण जगत असतात. त्याच्यापेक्षा वेगळे वागणाऱ्याला पहिल्यांदा समाज, कुटुंब, मित्र नावे ठेवतात. त्यापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी सर्वांपेक्षा जगण्याचा वेगळाच मार्ग स्वीकारणाऱ्यांची पहिल्यांदा निंदा होते. परंतु नंतर मात्र आयुष्यभर त्यांची स्तुती वाढते. सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होते.

Marathi Quotes || Inspiring Suvichar 2024

* मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठ !

माणूस माणसाचा शत्रू होतो कारण माणसाला दुसऱ्याचा राग येतो, लोभ निर्माण होतो, मत्सर वाटतो. माणसाचे आपल्या मनावर नियंत्रण राहत नाही. माणूस मनाने खूप क्षुद्र होऊन विचार करतो. दुसऱ्याची छोटीशी चूक किंवा गैरवर्तनाला तो माफ करू शकत नाही. तो खपवून घेऊ शकत नाही.

* जगात दुसऱ्याला हासणे सोपे, परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण.

समाजामध्ये असणाऱ्या अलिखित नियमाप्रमाणे माणूस वागत नसेल तर तो सर्वांचे लक्ष्य होतो. त्यांची निंदा केली जाते. सर्वजण त्याला हसतात कारण दुसऱ्याला हसणे सोपे असते. परंतु दुसऱ्याची अडचण समजून घेऊन ती सोडविणे मात कठीण असते. त्यासाठी तयार असणारे लोक मात्र खूपच कमी असतात. लोकांना मदत करण्यापेक्षा निंदा करणे आवडते. Marathi Quotes

* आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळणारा दोघे किडेच.

किडे जन्माला येतात, जगतात आणि मरून जातात. यापेक्षा वेगळे काही त्यांच्याकडून घडत नाही. त्याप्रमाणे आळशी माणूस कष्ट करून द्रव्य मिळविण्याऐवजी दुसऱ्याकडून भीक मागण्यात धन्यता मानतो. तसेच जर श्रीमंत माणूस स्वतः कष्ट न करता आपल्या पूर्वजांनी कष्टाने मिळविलेली संपत्ती ऐषोरामात राहण्यासाठी संपवत असेल तर ते दोघेही किड्यांचेच कर्तृत्वशून्य क्षुद्र जीवन जगतात.

#Motivational marathi quotes || प्रेरणादायी मराठी सुविचार 

* चुकांची भीती बाळगू नका. पण तीच चूक पुनःपुन्हा करू नका.

कोणतीही नवीन गोष्ट करताना चूक होऊ शकते. चूक होईल या भीतीने काहीच न करणे म्हणजे आळशीपणा होय. घाबरणारा माणूस आयुष्यभर काहीच करू शकत नाही. चुकीतून माणूस शिकतो. त्याला काय करू नये हे समजते. त्यामुळे त्याने तीच चूक पुन्हा करू नये.

Join Marathi BLOGGING COURSE

• पराक्रमाचा अभिमान असावा, उन्माद नसावा.

माणसाचे कर्तृत्व, त्याची कर्तबगारी म्हणजेच त्याचा पराक्रम. स्वबळावर, जिद्दीने, कष्टाने, अपूर्व प्रयत्नाने माणूस आपले कर्तृत्व सिद्ध करीत असतो.आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले म्हणून त्याला कृतार्थ वाटते. स्वतःविषयी अभिमान वाटतो. हा अभियान मध्ये कधी बदलती है धात्र त्याला कळत नाही. अभिमानाने माणसाची प्रगती होते, परंतु त्याची अधोगती होते. Marathi Quotes

• शिक्षणाने परावलंबी वृत्ती नाहीशी झाली पाहिजे.

शिक्षणाने माणसाची सर्वांगीण प्रगती होण्याची अपेक्षा असते. त्यामुले त्याला आपले जीवन स्वतंत्ररित्या जगता यावे. स्वत:ची प्रगती साधता यावी. आपले प्रश्न आपणच सोडविता थावेत. स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये बाजी, जेणेकरून त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागू नये. Marathi Quotes

• नियम अगदी थोडा करावा, पण तो प्राणापलीकडे जपावा.

कोणत्याही गोष्टीचा नियम करण्यामुळे शरीराला व मनाला बंधन पाल्ने लागते. त्यामुळे त्याला शिस्त लागते. तसेच सातत्याने, सरावामुळे आपले कौशल्य वाढते, क्षमता वाढतात. केलेला नियम लहान किंवा मोठा बाल्ला महत्त्व नसते, तर तो किती सातत्याने आपण पाळतो हे महत्त्वाचे असते. Marathi Quotes

• संधीशिवाय कार्यक्षमता शून्य असते.

माणसाच्या अंगी असणारी कार्यक्षमता समजण्यासाठी कोणत्या वा कोणत्या स्वरूपात त्याचा इतरांना प्रत्यय यावा लागतो. ती कार्यक्षमता वापरात येण्यासाठी तशी संधी मिळावी किंवा मिळवावी लागते. तशी संधी न मिळाल्यास कार्यक्षमता असूनही ती वाया जाते.

• दुसऱ्याचे ओझे किती जड आहे हे कोणालाच कळत नाही.

सामान्यपणे माणूस खूपच स्वकेंद्रित असतो. तो कोळ्यासारखा स्वतःभोवती कोश विणत राहतो व त्यातच अडकून पडतो. प्रत्येकाला आपल्या दुःखाची, संकटाची जाणीव असते. त्याच्याइतके दुःख दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आलेले नाही असे त्याला वाटते कारण तेवढे त्याने दुसऱ्याच्या जीवनाकडे पाहिलेले नसते.

Treading

More Posts